वैशाली (गूढ़ कथा)

Submitted by SanjeevBhide on 25 November, 2016 - 10:40

गूढ़ कथा वैशाली

"Hello, Yes ? ",
"अरे मी बोलतोय ", अबु न चा फ़ोन होता.
"अबु ! ,Sorry , मला वाटल कंपनी त न फोन आला",
"हे बघ आत्ता एका मुलीला मी तुझ्या कड़े पाठवलय , अडचणीत असावी, मला वेळ नाही, माझ्या काही कमिटमेंटस आहेत आज त्या चुकवता नाही येणार ; ती काय म्हणत आहे ते बघ जरा", एवढ बोलून त्यांनी फ़ोन कट केला , बरेच घाईत असावेत.
तोच डोअर बेल वाजली. मी दार उघडले ,साधारण 22 23 वर्षाची अतिशय देखणी मुलगी दारात उभी होती.
"त.. तुम्ही च अविनाश का ?",
"तुम्हाला काकां नी पाठवलय का ?" , मी विचारल.
हो ! , त्यांना आज वेळ नाही आहे , त्यांनी हा पत्ता दिला", तिन एक कागद माझ्या पुढे केला, माझा च पत्ता होता तो.
"या ना" ,मी दरवाज्यात न बाजूला होत म्हणालो.
"मला नुकताच काकां न चा फ़ोन येऊन गेला , बोला",
मी सरळ विषयला हात घातला कारण नंतर मला ऑफिस ला एक चक्कर मारवी लागणार होतीच.
तीन बोलावयास सुरुवात केली,
"माझ नाव वैशाली , आय मीन वैशाली साने, MBBS च्या दुसऱ्या वर्षाला आहे मी", एवढं बोलून ती एकदम थांबली, चेहरा कावरा बावरा झालेला, "मला थोड़ पाणी मिळेल पायाला ?" , अस्वस्थपणे इकडे तिकडे बघत ती म्हणाली.
"हे बघ वैशाली, तु सुरक्षित ठिकाणी आहेस , घाबरु नकोस" . पाणी देता देता मी म्हणालो.
"मला एक गोष्ट आधी सांगा उपचार तुम्ही करणार की काका ?",
"वैशाली तुझ्या लक्षात येत नाही य !", मी पुढे बोलण्याचे आधीच तिन सुरुवात केली.
"ओह !, म्हणजे मी तुम्हाला आता जे सांगेन ते तुम्ही काकां ना सांगणार", मग काकां मला मदत करणार .... !!! ,तिच्या आवाजात वैताग होता.
"नॉट रियली", मी तिचे बोलण मधेच तोडत म्हणालो , लॉजिक सिंपल आहे काकां ना वेळ नसल्यान त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलय आणि तुझी समस्या माझ्या कडून सुटु शकणार नसेल तर मी तुला स्पष्ट सांगेन की तू काकांनाच भेट"; आणि तू मला तुझी समस्या नाही सांगितलीस तरी नो प्रॉब्लम, तू काकां नाच भेट, मला त्या बद्दल राग येणार नाही किंवा वाईट वाटणार नाही, कारण शेवटी अडचणी तून बाहेर पडण महत्वाचे".
"तू ठरव", "कारण मला त्या प्रमाणे ऑफिस ला निघता येईल". मी म्हणालो
"नाही हो, माझा म्हणण्याचा तसा उद्देश नव्हता", वैशाली चा रडवेला आवाज.
"बस जरा शांत पणे ", "मी आईला मस्त पैकी कॉफ़ी बनवायला सांगतो, तो पर्यन्त तू ठरव"
कॉफ़ी झाली आता जरा वैशाली शांत दिसत होती , चेहरा निश्चयी झाला होता, आवजाचा टोन बदल ला होता . तिन बोलण्या स सुरुवात केली
"मी देव भुत बाधा वगैरे मानत नाही, हे सर्व कमकुवत मनाचे खेळ आहेत, माणूस कुठे तरी आधार शोधत असतो, याअणि अश्या गोष्टीत तो आधार शोधत रहातो".
तिन एकदा माझ्या कड़े बघितल
"बोल तू मी ऐकतो आहे", "तुला काय वाटते हा तुझा वैयक्तिक प्रश्न मला त्यात काही इंटरेस्ट नाही", बोल पुढं , माझ्या आवाजात थोड़ी आता जरब आली होती.

माझी विशाखा नावाची मैत्रिणी MD Psychiatrist ( मानसोपचार तज्ञ ) आहे. ती सध्या तिच्या नेहमीच्या प्रँक्टीस व्यतिरिक्त पास्ट लाइफ रिग्रेशन चे सेशन्स पण घेते. बऱ्याच लोकांना त्यांच गुण आल्याने मी आउट ऑफ वे जाउन हे सेशन करण्याचे ठरवल
पूर्वजन्म पुनर्जन्म आत्मा भूते मी मानत नाहीच.
त्या सेशन्स नुसार माझ पूर्व जन्मी चे नाव शेवंता आई चे नाव हंसा तिला हंसाबाई या नावाने च गावातले लोक ओळखत गावात तिचा भीतीयुक्त दरारा होता.
नवरा म्हणजे माझे पूर्व जन्मातील बाबा तिचे अगदी गुलाम च, घर ते बघायचे हंसाबाई ना दिवसभर लोक भेटायला यायचे अगदी दूर दूर वरुन लोक येत.
गावातील लोक मला आदराने वागवायचे एकदा होमवर्क केले नाही म्हणुन शिक्षकांनी मला मारल होत, हे शिक्षक नुकतेच शाळेत नवीन लागले होते ,दुसऱ्या दिवशी ते घरात मृतावस्थेत आढळले.
जाशी मी मोठी झाले तस मला कळल माझी आई मांत्रिक होती, पैसे घेऊन ती लोकां ची बर वाईट काम करून द्यायची बाबा या कामात तिला मदत करायचे, वाईट काम करून घेणारे च जास्त यायचे.
शाळेत मुलीं मला टाळायच्या कारण मी एक चेटकिणी ची मुलगी होते.
आईचा मला खूप राग येत असे एकदा बोलून दाखवले सुद्धा तेव्हा आई म्हणाली
"पोरी ह्या जगात लोक दोन गोष्टी ना घाबरतात सत्तेला वा गुंडाना" , "ह्याच गावच पाटलाने तुझ्या बापा समोर माझी अब्रु लुटली", आख्या गावांन वाळीत टाकल होत तेव्हा तू नुकतीच रांगाया लागली असशील ह्याच गावांन तुला हिरित टाकल होत, आज ह्योच गांव अ न आजूबाजू ची गांव हंसाबाई म्हणुन पाया पकडतय !",
"तुझ्या बापच्या पाठीवर बग विसोबा भगतान काय लिवलया तवा पासून ह्यो एड्यावानी फिरायचा अस म्हणत बाबां चा शर्ट वर केला तर पाठीवर काही तरी कोरुन लिहिलेले होत" , वैशाली थांबली.
"क्रिप्टोग्राफी सारख काहीतरी" मी म्हणालो
सांगता सांगता वैशाली ला भावना अनावर झाल्या ,तिला रडू दिल मी, जरा सावरल्यावर तीन पुढे बोलायला सुरुवात केली
"आई चा अहंकार मात्र एक दिवशी तिला नडला, गावात एक नाथपंथी बैरागी आलेला गावा बाहर मारुती च्या मंदिरात उतरलेला एक दिवशी "अलख" म्हणत आमच्या घरा समोर उभा...!!!
"माई भिक्षा" !,
अतिशय देखणा, तेजस्वी, मला बघितल म्हणाला ,"बेटा यहाँ आना", मी मन्त्र मुग्ध झाल्या सारखी त्याच्या जवळ गेले, बैराग्या ने झोळी त न एक लाल धागा माझ्या हातात बांधला, "बेटा ये हमेशा भूत, प्रेत, जाखीण से तेरी रक्षा करेगा । अलख!",
तो वर आई बाहर आलिच, "कोवळी पोर हवी तुला व्हय रे कुत्र्या ? म्या हाय न अजून", अस म्हणत आई ने तोंडाने काही तरी बडबडत बैराग्या वर फूँक मारली...!
अलख निरंजन । सुन गहिनी मेरी बाणी । मीट जाएँ । ये अछूत करणी । ॐ नमो आदेश गुरूजी को आदेश । म्हणत बैराग्या ने झोळीतून विभूति काढून आईच्या दिशेने फूँकली, त्या शब्दाना धार होती । भेलकांड त आई कोसळली
आई चे सगळे मन्त्र सामर्थ्य एका क्षणात नष्ट झाले होते ज्या काही अमानवीय शक्ति आईने प्रसन्न करून ताब्यात ठेवल्या होत्या त्या आईच्या बंधनातून कायम च्या सुटल्या होत्या
राहिली एक जाखीण जी आई च्या बंधनातून सुटली होतीच पण तिला आई वर सूड़ घ्यायचा होता सगळ्या घरावर सूड़...!!!! कारण आई ने तिला वेठिला धरून खूप काम करून घेतली होती
अर्थात हे मला नंतर कळले कारण मला ह्यातली काही माहिती नव्हती ना तशी दृष्टी",
"ज्ञान नाथ नाव त्यांचे", मी वैशालीचे बोलणे मधेच तोडत म्हणालो
"तुम्हाला कस कळल?",वैशाली आश्चर्याने माझ्या कड़े पहात म्हणाली
मी स्वामी महारा जांचे फोटो कड़े बोट केल
"सांग पुढे", म्हणत मी स्वामीं समोर धुप लावला. आई ला जाशी शुद्ध आली तशी ती म्हणाली "शेवन्ते आधी त्या बैराग्याला शोध", मी आणि बाबां नी खूप शोध घेतला पण नाही सापडला.
नेहमी प्रमाणे आई चा दरबार सुरु झाला , लोक यायला सुरुवात झाली होती पण आई ने बर नाही अस कारण सांगून तिचा दरबार तिथेच थांबवला कारण आता ती एक सर्व सामान्य स्त्री झाली होती, आईला ह्याचा फार मोठा धक्का बसला, आई नेहमी म्हणत असे "माजी सगळी शक्ति त्या बैराग्या ने काढून घेतलिया !!!", मी आणि बाबां नी खूप शोध केला आजु बाजुची 20 25 गाव पालथी घातली पण नाही भेटु शकलो त्याला, "जाखीण?", आईला मी विचारले
"शेवन्ते तुला कस माहीत ?,"
"न्हाय त्यों बैरागीच म्हनला मला".
मग मात्र आई ची तबियत ढासळत गेली सगळ्या अंगावर कोड उठल दृष्टी गेली कायम झोपुन असे काही तरी स्वतः शी बडबड चालु असे जोर जोरात किंचाळण, मधेच हात पाय वाकड़े व्हायचे
जाखीण माझ्या स्वप्नात येत असे
"तुझ्या आईला आणि तुला मी अशी सोडणार न्हाय शेवन्ते भिकेला लावेन",
शेवटी हंसाबाई च पर्व संपल , बाबा टी
या धक्क्याने अचानक गेले काय झाल काही समजल नाही
इथे मी मात्र विशाखा ला हे सेशन्स थांबव म्हणून सांगितल कारण ह्या सगळ्या स्मृति मला असहय झाल्या.
"आणि आता ह्या जन्मा त ती जाखीण तुम्हाला स्वप्नात भेटायला सुरुवात झाली असे च ना?" , वैशाली च्या चेहेऱ्या वर आश्चर्य होत
वैशाली पुढे म्हणाली "आणि आता कधी कधी डोक्या पाशी बसलेली दिसते रात्रि अपरात्रि ? "कुट व्हतीस म्या तुला अशी सोडणा न्हाय!!!, काही कळत नाही",
"वैशाली तू तिला गेटवे (रास्ता) करून दिलास वेळेत तुला काकां कड़े जायची बुद्धि झाली ही स्वामी कृपा च म्हणावी लागेल"
"पण मी मनोरुग्ण झाली आहे का? ", वैशाली ने मला विचारल, "कारण मी भुत खेत मानत नाही देव तर नाहीच नाही",
"बस जरा" , तीच बोलण तोडत मी स्वामी महाराजांचे फोटो समोर जाउन बसलो, थोड़े कुंकु हातात घेत सप्तशती तील चंडी कवच पाठ त्या कुंकवा वर करून ते वैशाली ला दिल,
"आज रात्रि झोपताना हे कपाळाला लावून झोप रात्री केव्हाही तू फोन करू शकतेस, आणि आज पासून झोपेच्या गोळया बंद"
वैशाली गेली दुसऱ्या दिवशी सकाळी च् तिचा फ़ोन आला होता कुठल ही विचित्र स्वप्न नव्हती, खूप दिवसांनी शांत गाढ़ झोप लागली होती तिला मला भेटायचे होते,
"एक काम कर मी दिलेले कुंकु मैत्रिणी जवळ देऊन आज कुंकु न लावता
झोप !",
दुसऱ्या दिवशी मलाच वैशाली च्या घरी जाव लागल तिची आई माझी वाट च बघत होती , वैशालीला ताप भरलेला अंगावर लालसर रँश, गळ्या जवळ जखम, चांगलीच भेदरलेली होती
"ती आली होती आज ..!" गळा दाबत म्हणाली "तू कुट बी जा म्या तुला सोडनार नाय", "मग एकदम गळा धरला".
"मला वाचवा ! ", तिची ती दयनीय अवस्था पाहुन वाईट वाटल आम्ही तातडीने तिला हॉस्पिटल मधे हलवल
" मी विशाखा", मी मागे वाळून बघितल
"ओह् तुम्ही हे सेशन्स घेतले तर , वैशाली म्हणाली मला", "पण आता हे सेशन्स नको"
अर्थात तिला बोलून तरी काय साध्य होणार होत ते संभाषण मी तिथेच थांबवल .
मी वैशाली च्या डोक्या पाशी खुर्ची घेऊन बसलो, "सिस्टर एक 5 मिनिटे थांबा मग झोपे च् इंजक्शन द्या",
वैशाली च्या कपाळावर हात ठेवून मी मनात दत्तात्रेय माला मंत्रांची आवर्तन सुरु केली 3 ऱ्या 4 थ्या आवर्तनात तिला शांत झोप लागली होती, इंजेक्शन ची गरज च पडली नाही,
वैशालीच्या डोक्या पाशी बसलेली ती स्त्री भीती वाटावी अशी च मळकट काळी साडी नेसलेली स्त्री मोकळे केस कृश शरीर वाढलेली नख पिवळी पडलेली , डोळयात हिंस्त्र छटा पण पहिल्याच् माला मंत्राचे आवर्तनात ती तिथेच हवेत विरुन गेली
"अविनाश", मला काही बोलायचे आहे", आम्ही रूम मधून बाहेर आलो , "हे तुम्ही दिलेले कुंकु, या सगळ्या सेशन्स मधे शेवटी वैशाली न विचित्र पणे वागायला सुरुवात केली"; "अर्थहीन बडबड' , "मधेच अस्सल गावरान शिव्या" , "अश्लील चाळे",
"हे माझ झाड़ हाय तू मधे येऊ नगस !", "ह्याचा अर्थ मला कधीच लागला नाही सेशन मधून बाहेर आली आणि तिला काही विचारल तर काहीच आठवायच नाही. जेवण कमी झाल, भित्रे पणा वाढला, शेवटी रिग्रेशन ऐवजी मानसोपचार करण्याची वेळ आली बिचारी वर".
रात्र भर आम्ही हॉस्पिटल मधे होतो,
'मैडम बोलवत आहेत", सिस्टर चा निरोप आला आम्ही आत गेलो, "कस वाटते आहे ?' विशाखाने तिचा हात हातात घेत विचारल. वैशाली एक टक माझ्या कड़े बघत होती ,
"काय झाल ?", मला जरा तिची नजर बघून विचित्र वाटल,
"काही नाही", "अविनाश थैंक्स".
'आज तुला डिस्चार्ज मिळाला की आपण काकां न कड़े जाऊ", तीन मान हलवली
झालेल्या सगळ्या गोष्टी मी अबु ना सांगीतल्या
"चला या निमित्ताने तुझी जाखीणी शी ओळख झाली", "मग जाखीणी ला प्रपोज केलस की नाही ?", अबु हसत हसत म्हणाले "उद्या ये तिला घेऊन", इतके बोलून अबु नी फ़ोन ठेवला.
"आता एक काम कर एकधारी लिम्बु हातात घेऊन तिच्या वरुन ७ वेळा उतरव, दत्तात्रेय माला मन्त्र पण ७ वेळा व्हायला हवा मग गुरु गहिनी नाथां चे स्मरण करून आडव काप आणि कचऱ्यात टाकुन दे.आजच कर हे अनायासे आज अमावस्या आहे च", अबु नी सांगितल , मी लगेच कामाला लागलो,
दक्षिणे कड़े पाठ करून मी वैशाली ला बसवल विशाखा काही लागल तर मदतीला होती च
स्वामी ना नमस्कार करून मी एकधारी लिम्बा चा उतरा ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय । स्मरण मात्र संतुष्टाय... म्हणत सुरुवात केली, उतरा संपला, लिम्बु कापल तसे वैशाली घशातून विचित्र आवाज करत जागे वर कोसळली, बाधे तून तिची कायम ची सुटका झाली होती
दुसऱ्या दिवशी अबु ना भेटलो विशाखा पण होतीच स्वामी महाराजांचे फोटो ला नमस्कार केला
"बाळा परत असे करू नकोस पूर्व जन्मा च्या स्मृति घेऊन काय करणार", "आणि विशाखा तू ही हे करू नये असे मला वाटते कारण कमकुवत मनाच्या माणसां मधे ह्या मुळे मनोविकृति निर्माण होऊ शकते क्रिप्टोमेंसिया तर कधी कन्फँब्युलेशन सारखे रोग होऊ शकतात
"काय विशाखा बरोबर आहे ना ?" विशाखा ने मान हलवली पण तिच्या डोळयात ह्या मेडिकल टर्म्स एकल्या मुळे आश्चर्य होत
दोघीनी अबु ना नमस्कार केला व बाहर पड़ल्या
अबु च्या प्रसन्न चेहऱ्या वर मन्द स्मित होत
"का हसत आहात ?", मी अबु ना विचारले
"Whatsup बघ", अबु म्हणाले
त्रिशला ने पिंग केल होत "हयात असल्यास सारस बागेत भेटु !!!"
★★★★

।।श्री स्वामी समर्थ।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users