कधीतरी एखाद्या रविवारी आळसावलेल्या संध्याकाळी हॉटेलातून आपण ऑर्डर करतो. जेवढे जमेल तेवढे खातो. उरलेसुरले फ्रीजमध्ये टाकतो. सोमवारच्या जेवणाची सोय म्हणून..
पण जर ऑर्डर केलेले जेवण मांसाहारी असेल आणि घरात सोमवारचे कोणी खाणारे नसेल तर ते मोजकेच मागवले जाते आणि तेव्हाच्या तेव्हाच संपवले जाते.
पण तरीही काही पदार्थ असे असतात जे आपल्या इच्छेविरुद्धही उरतातच,
आणि असाच एक पदार्थ म्हणजे चिकन ट्रिपल शेजवान राईस. ज्यातील राईस हा घटक चायनीज रसायनांची चटक लागल्यामुळे पुर्ण संपवला जातो. पण त्याची ग्रेव्ही मात्र नेहमीच शिल्लक राहते. तिचे काय करायचे हे समजत नाही. त्यातले चिकनचे पीस आपण सारेच खाऊन संपवलेले असतात. उरलेली ग्रेव्ही आपल्या घरच्या पांढर्या भातासोबत खाण्यात मजा नसते. बरं चपातीसोबत खावे अशीही काही तिला मसालेदार चव नसते. तरीही चटपटीत चवीचा हा पदार्थ फेकून द्यायला जीवावर येते. शेवटी पैसे याचसाठीच तर एक्स्ट्राचे मोजलेले असतात. मग काय करावे हा विचार करत ती फ्रिजमध्ये तशीच पडून राहते. आणि चार दिवसांनी फेकून दिली जाते. म्हणजे आमच्याकडे तरी नेहमी असेच होते. आजवर व्हायचे. पण थॅन्क्स टू पिंट्या, यापुढे असे होणार नाही.
अशीच एक शिल्लक राहिलेली ग्रेव्ही विदाऊट चिकन पीस पिंट्या घेऊन आला आणि त्याच्याच कल्पनेनुसार आम्ही त्या पासून नूडल्स तयार केल्या. थोडेसे कोबीपत्ते त्या ग्रेव्हीमध्ये आधीपासूनच होते. हलकासा कांदा चिरून आम्ही टाकला. एखादा चिकनचा पीस शिल्लक असता तर त्यालाही किसून टाकता आले असते असे वाटले खरे, तसेच यात आणखी काय टाकून रंगत वाढवता येईल याचीही खलबते आम्ही केली. त्यानुसार पुढच्यावेळी आणखी भारी बनेल हे नक्की. पण काही का असेना, एका टाकाउ जिन्नसापासून एका चवदार खाद्यपदार्थाची निर्मिती आम्ही केली एवढे मात्र खरे
तुमच्याकडे ही ग्रेव्ही संपवायची काही आयड्या असेल तर प्लीज शेअर, आमच्याकडे आणि पिंट्याकडे हा चि ट्रि शेजवान राईस वरचेवर मागवला जातो, त्याची निव्वळ म्यागी बनवून तरी कितींदा खायची
म्हणूनच मी पिंट्या fan, तो
म्हणूनच मी पिंट्या fan, तो तुला मास्टरशेफ करणार बघ.
हाच तो पदार्थ. याला बीफोर
हाच तो पदार्थ.
याला बीफोर आफ्टर असे म्हणता येणार नाही, ही मधली स्टेज आहे. यानंतर आंबट वरणाचा तडका दिला त्याचा फोटो नव्हता काढला.
अगं आऽई गंऽ... याला आंबट
अगं आऽई गंऽ...
याला आंबट वरणाचा तडका??
का शिकलो मी स्वयंपाक?
वजन कमी करायला उपयुक्त धागा.
वजन कमी करायला उपयुक्त धागा. फक्त जेवणाधी उघडून चाळला तरी पुरे!
अंडा भुर्जीत वरण ??? रताळ्या
अंडा भुर्जीत वरण ??? रताळ्या जीव दे चमच्यात बुडुन !
श्री, जेव्हा या जगात (बहुतेक
श्री, जेव्हा या जगात (बहुतेक पुण्यात) पहिल्यांदा मिसळ बनली असेल तेव्हा खुद्द कित्येक मराठी माणसांनी अशीच प्रतिक्रिया दिली असेल तो फरसाणीत उसळीला टाकायचा प्रकार बघून... पण आज बघा... आज आमच्या मुंबईतील मिसळ जगातील सर्वोत्कृष्ठ शाकाहारी पदार्थ म्हणूना ओळखला जातो
ए चुपे रताळ्या
ए चुपे रताळ्या
रीया ऋन्म्या ह्या बंद
रीया

ऋन्म्या ह्या बंद पडलेल्या धाग्यालापण ढकलत ढकलत १०० वर नेईलच
म्हणूनच मी पिंट्या fan, तो
म्हणूनच मी पिंट्या fan, तो तुला मास्टरशेफ करणार बघ. >>> + १०००० .
अंडा भुर्जीत वरण ??? रताळ्या जीव दे चमच्यात बुडुन ! >>>
पण आज बघा... आज आमच्या
पण आज बघा... आज आमच्या मुंबईतील मिसळ जगातील सर्वोत्कृष्ठ शाकाहारी पदार्थ म्हणूना ओळखला जातो >>> वाद विवाद स्पर्धेत तुझा हात धरणारा कोणी नाही रे . लेका , वकिल वगैरे का नाही झालास ? मिडिया मध्ये तरी असायला हवा होतास , गेला बाजार मार्केटिन्ग मध्ये तरी रे .
टेक्निकल साईडला काय करतोयस?
सस्मित, अंकु , नीरा आणि
सस्मित, अंकु , नीरा आणि बाकीच्या सगळ्या, कुठे आहात सार्याजणी.
)
मिळूनी सार्याजणी +१ द्या..........
बरं झालं तू धागा काढलास. मला कित्ती दिवस हाच प्रश्न पडलेला पण तू इथे लिहीपर्यंत वाट बघत होते.>>>+११११११
(पण मी असल (सामिष) काही खात नाही.
सस्मित, अंकु , नीरा आणि
सस्मित, अंकु , नीरा आणि बाकीच्या सगळ्या, कुठे आहात सार्याजणी.
मिळूनी सार्याजणी +१ द्या.<<<<<
बरं झालं तू धागा काढलास. मला कित्ती दिवस हाच प्रश्न पडलेला पण तू इथे लिहीपर्यंत वाट बघत होते.>> + १००००
मी तर चिट्रिशे मागवलं. मुलांना खाउ घातलं आणि उरलेली ग्रेवी फ्रीज मधे ठेवली. आणि दुसर्या दिवशी त्याचे न्युडल्स पण बनवले.
लेका , वकिल वगैरे का नाही
लेका , वकिल वगैरे का नाही झालास ?>>> स्वस्ति, हे मी आणि सातीने बर्याचदा म्हणून झालो त्याला.
निरा आणि मी सामिषच खातो.
निरा

आणि मी सामिषच खातो. याचे एक कारण हे देखील की वेजमध्ये फारच कमी पदार्थ भाज्या आवडतात. म्हणून सामिष खाण्याबाबत मन कलुषित होऊ नये म्हणून मी कधीही कत्तलखाना, कसाई लोकांच्या आसपासही जात नाही. उगाच काहीतरी बघायचो आणि मनाला टाचणी लागायची आणि गिळले जायचे नाही. असे शाळेत असताना एकदा झालेही आहे, तब्बल दोन वर्षे मटण बंद होते .. असो, एवढ्या चांगल्या धाग्यावर अश्या अवांतर पोस्ट नको
स्वस्ति, टेक्निकल साईडला काय करतोयस? >>> बस्स पोटापाण्यापुरते कमावतोय ईथे ईतकेच
निरा आणि
निरा आणि सस्मित!

ग्रेट!
(सायोबाई अमेरिकेत डोकं आपटून घेत असतील! - ऋन्मेष, पाप लागेल तुला! )
अरे तो रताळ्याचे काप करुन
अरे तो रताळ्याचे काप करुन मटणाच्या ग्रेव्हीचा तडका देइल. वर श्री रताळ्या म्हणाला म्हणुन रेस्पी सुचली असं आभार प्रदर्शनाचं पण लिहिल.
वर श्री रताळ्या म्हणाला
वर श्री रताळ्या म्हणाला म्हणुन रेस्पी सुचली असं आभार प्रदर्शनाचं पण लिहिल.>>

एवढा प्रतिसाद दिला पण ऋ काय
एवढा प्रतिसाद दिला पण ऋ काय मैत्रिण पण म्हणेना. सातीम्मा देखो.
अरे मी काऊंट करतोय ना .. वर
अरे मी काऊंट करतोय ना .. वर तीन पर्यंत मोजलेय बघा
पटापट मोज!
पटापट मोज!
काय पटापट मोजणार, गलबलून
काय पटापट मोजणार, गलबलून आलेय, डोळे भरून आलेत.., एकेकाळी प्रतिसाद पटापट मोजण्यातच समाधान मानण्यारयावर आज अशी मैत्रीणी मोजायची वेळ येईल असे वाटले नव्हते.
पहिल्यांदा पहिल्यापासुन
पहिल्यांदा पहिल्यापासुन सुरुवात करतो............
१. बाहेरुन ट्रिपल शेजवान राईस मागवा विथ ग्रेव्ही (चिकन असलेली)
२. चिकनचे तुकडे संपवुन ग्रेव्ही उरवुन (मुद्दामः एका धाग्याची बेगमी) ठेवा
३. घरात उरलेले मॅगी ,टॉपरामन्स, पतंजली, नॉरचे नुडल्स उकळुन घ्या.
४. १०० ते ५०० मेश साईज (चिकनचे लहान तुकडे हाडांचा चुरा इ.इ. चालत नसेल व ग्रेव्ही थेरॉटिकली व्हेज डिक्लेअर करायची असेल तर) मधुन ग्रेव्ही गाळुन घ्या.
५.उकळलेले नुडल्स त्या ग्रेव्ही मधे टाकुन ढवळा.
६. आता ओरपा, जर पुन्हा त्यातला रस उरला तर पुन्हा फ्रीजमधे ठेवा.
७.दुसर्या दिवशी.........ढॅण्ट्ढॅण.......(मम्मा आयम बॅक) त्या रस्स्यामधे ब्रेडचे तुकडे टाकुन अॅज अ सुप म्हणुन प्या.
८. त्या सुपात खाली ब्रेडचे लहान लहान तुकडे असतील ते तव्यावर वाळवुन घ्या, पुन्हा फ्रीज मधे ठेवा.
९. त्या वाळवलेल्या तुकड्यांना बारीक वाटुन घ्या (नवीन मागवलेल्या ट्रिशेराचि मधले यावेळेस ग्रेव्ही संपवा तुकडे उरवा) त्या वाटलेल्या ब्रेडच्या चुर्यात चिकनचे तुकडे घोळवुन केएफसी तत्वावर तळा.
९.ते केएफ्सी तत्वातले तुकड्या बरोबरचा सॉस उरवुन फ्रीजमधे ठेवा.....
१०. सकाळी त्या सॉस मधे पाणी टाकुन उकळा पुन्हा एकदा टोमॅटो सॉस तयार.
११. सॉस उरला की फ्रीजमधे ठेवा.........
बरं झालं तू धागा काढलास. मला
बरं झालं तू धागा काढलास. मला कित्ती दिवस हाच प्रश्न पडलेला पण तू इथे लिहीपर्यंत वाट बघत होते.>> + १००००००
मी पण आहे हो.
जोक नाही पण मला महिन्यातून एकदातरी हा प्रश्न पडतोच.
नाचो ७ मैत्रीणी झाल्या जेम्स
नाचो ७ मैत्रीणी झाल्या
जेम्स बॉन्ड
हे दोन वेगवेगळे प्रतिसाद
हे दोन वेगवेगळे प्रतिसाद आहेत!
मला वाटलं
०-०-७
म्हंजे तुझ्या माबो आयुष्यात पहिल्या - दुसर्या - तिसर्या वर्षातील मैत्रिणींची संख्या म्हणू तुला जेम्स बाँड आठवले की काय!
बाकी जेम्स बाँड, भारीच इनोवेटीव आहे हां तुमची शिळा सप्तमी (एकादशी खरं तर ११ पॉईंट आहेत ना!)
ऑर्डर आल्या आल्या जेव्हा ती
ऑर्डर आल्या आल्या जेव्हा ती ग्रेव्ही गरम असते तेव्हा सोबत ज्या तळलेल्या नूडल्स मिळतात त्या टाकून सूप म्हणू आधी थोडे पिऊन घ्यावे मग उरलेली ग्रेव्ही राइस बरोबर खाऊ शकतो. उरतेही खूप कमी, ती द्यायची टाकून.
अपर्णा, ही आयड्या छान आहे.
अपर्णा, ही आयड्या छान आहे. पण आमच्याकडे कितपत चालेल शंका आहे. कारण त्या नूडल्सवर सारे मसाला पापड टाईप स्टार्टस असल्यासारखे तुटून पडतात. अर्ध्यापेक्षा जास्त तिथेच संपतात. तरी पुढच्या वेळी सर्वांना हे समजवून पटवून द्यायचा प्रयत्न करतो.
माझे ऊलटेच आहे ग्रेव्ही आधी
माझे ऊलटेच आहे ग्रेव्ही आधी संपते मग कोरडा भात खावा लागते
>>(सायोबाई अमेरिकेत डोकं
>>(सायोबाई अमेरिकेत डोकं आपटून घेत असतील! - ऋन्मेष, पाप लागेल तुला! )>> नाही हो सातीअम्मा, उलट ऋन्मेषच्या फॅनक्लबातल्या (माझ्या अंदाजाप्रमाणे) सगळ्या साळकाया माळकाया इकडे जमलेल्या बघून मजाच वाटली. फक्त त्यातल्या कोणी अजून 'अय्या ऋन्मेष, आम्ही कित्ती महिने ही ग्रेवी फ्रिजमध्ये जपून ठेवलेली तू असा धागा काढून उपाय विचारशील म्हणून' असं न म्हणाल्याने भ्रमनिरासच झाला.
(यापुढे म्हटल्यास फाऊल होईल)
धन्यवाद हो सायो! तुमच्यामुळे
धन्यवाद हो सायो!
तुमच्यामुळे आम्हाला आमच्या ग्रूपच्या मेंबरांचा अंदाज आला.
Pages