चल बे गां# दो भेल बना..
रात्रीच्या शांततेत झालेल्या शिवीगाळाने मी जरा दचकलो. अचानक विचारांची तंद्री तुटल्याने नाही म्हटले तरी जरा चरकलो.
हात धोता है क्या भो#&के, कही खुजलीवाले तो नही है ..
माझे लक्ष जाई पर्यंत तिथून आणखी एक शिवी आली होती..
दोन बेवडे एका भेल विकणारया बारा चौदा वर्षाच्या मुलावर 'चढत' होते. काहीतरी मोठा जोक झाल्यासारखे खिदळत होते. टपली मारल्यासारखे त्याला हूल देत होते.
रात्री दहा साडेदहाची वेळ! ईतर मुंबईला एव्हाना जाग असते. पण चुनाभट्टी स्टेशनचा शांत झालेला परीसर. वरवर निपचित वाटणारया गर्दुल्यांचा वावर. भुंकणारया कुत्र्यांचा सुळसुळाट. अश्यात त्या पोराला आपले भेळीचे टोपले घेत नेमके ईथेच उतरायची दुर्बुद्धी व्हावी?
पण कदाचित असे बेवडे लोकंच त्याचे या वक्ताचे गिर्हाईक असावेत.
करेल तो हॅन्डल. सवय असेल त्याला. असे सोयीने स्वत:लाच समजवत मी दहा पावले लांबच राहिलो.
पण त्यांचे जरा जास्तच होत होते. हूल देता देता एकाने त्याला टपली मारली. उगाचच. कारण काहीच नाही. बस्स चढलेली दारू. निघते अशी कुठून कुठून बाहेर.
सोड ना. ट्रेन येईल आता. पकड आणि निघ. कुठे त्या बेवड्यांच्या नादी लागतोयस. मन समजवत होते. पण तरीही पावलं तिथेच वळत होती.
एक भेल बना.. और कांदा थोडा ज्यादा.. ऑर्डर देत मी तिथेच थांबलो. कदाचित माझ्या तिथे असण्याने ते कंट्रोलमध्ये राहतील असे वाटले.
पण ते बस्स वाटणेच होते..
फटाफट हात चला चु#ये .. ट्रेन छुट गयी तो तेरी.... त्यांचे चालूच होते.
आता त्या पोराला वाईट वाटू लागले होते. कारण त्याला आता त्या शिव्या माझ्यासमोर पडत होत्या. गरीब आणि लाचार असलं म्हणून काय झाले. एक तो असतो ना प्रत्येकात. सेल्फ रिस्पेक्ट! साला माझाही दुखावला जात होता..
त्यांची ट्रेन आली. त्या पोराच्या हातात दहा रुपये कोंबून ते निघाले. खरे तर एका भेलचे दहा, म्हणजे वीस रुपये बनत होते. दहा रुपयाचा फटका..
चल छोड, पियेले थे दोनो.. मी आम्हा दोघांच्या सेल्फ रिस्पेक्टवर फुंकर घालायला म्हणालो..
आणि यावर तो पहिल्यांदाच काहीतरी बोलला..
अभी नही समझेगा उनको. पियेले है ना. कल पता चलेगा.. जलेगा ना ऐसा, के पुरा फाड के धुवा निकलेगा.. ईतना मिर्ची डालाय मै !
.... आणि मला स्मिता पाटीलचा मिर्च मसाला आठवला.
- तुमचा अभिषेक
सही!
सही!
(No subject)
अनपेक्षित शेवट, खूप छान
अनपेक्षित शेवट, खूप छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच.............!
मस्तच.............!
छान किस्सा.
छान किस्सा.
tit for tat
tit for tat
मस्तं
मस्तं
मस्त.
मस्त.
भारि
भारि
भारी ...
भारी ...
जबरीच !
जबरीच !
भारीच!...
भारीच!...
खूप छान
खूप छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी....
भारी....
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरीच !
जबरीच !
मस्तच !
मस्तच !
फाडू
फाडू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सर्व मंडळी
धन्यवाद सर्व मंडळी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकच नम्ब
एकच नम्ब र!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मस्त
मस्त![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
लय भारी!
लय भारी!
अर्रे भारीच.
अर्रे भारीच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहिच
भारी ..
भारी ..
धन्यवाद नव्याने आलेल्या
धन्यवाद नव्याने आलेल्या प्रतिसादांचे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त.
मस्त.
भारी.
भारी.