Submitted by ऋन्मेऽऽष on 27 October, 2016 - 16:59
चिनी मालावर बहिष्कार !
पाकिस्तानपेक्षा चीन हा भारतासाठी जास्त धोकादायक आहे हे एक असे सत्य आहे जे फार कमी लोकांना माहीत असेल.
पाकिस्तानच्याही बरयाचश्या उड्या या चीनच्या जीवावरच चालतात. सध्या पाकिस्तान कलाकारांवर बहिष्कार टाका सोबत चिनी मालावर बहिष्कार टाका असा प्रचारही जोरात चालू आहे.
खरे तर मला आधी हे एक फेसबूक-व्हॉटसप फॅड वाटत होते. पण या बातम्या वाचून तसे आता वाटत नाहीये. चीननेही या बहिष्काराची दखल घ्यायला सुरुवात केली आहे..
चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे चीनचे धाबे दणाणले
http://dhunt.in/1BTad
via NewsHunt.com
भारतीय वस्तू आमची बरोबरी करूच शकत नाहीत; चीनची अश्लाघ्य टीका
http://dhunt.in/1Av7p
via NewsHunt.com
या बहिष्काराचा खरेच काही फायदा आहे की नाही, असल्यास कितपत, आणि सोबत तोटाही आहे का? वगैरे मुद्द्यांवर चर्चा करायला हा धागा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता रुन्मेश मराठीत लिहा असा
आता रुन्मेश मराठीत लिहा असा फाटा फोडणार. :खोख::
धनि, वाचतो उद्या सावकाश. आता
धनि, वाचतो उद्या सावकाश. आता झोपेन बसल्याबसल्या. दिड वाजलाय आधीच.
सायो,
मी अजून कोणत्या निष्कर्शावर आलो नाहीये. चर्चा वाचतोय. शंका काढतोय. त्यानंतर जे ठरवेन ते करेनच.
आपण चिनी मालावर बहिष्कार घालणे याची तुलना शिवाजी जन्माला यावा या वाक्यप्रचाराशी करत आहात म्हणजे कठीण असले तरी ते योग्य आणि गरजेचे आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का?
>>आपण चिनी मालावर बहिष्कार
>>आपण चिनी मालावर बहिष्कार घालणे याची तुलना शिवाजी जन्माला यावा या वाक्यप्रचाराशी करत आहात म्हणजे कठीण असले तरी ते योग्य आणि गरजेचे आहे असे आपल्याला म्हणायचे आहे >>> नीट वाच की रे. शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात असं म्हटलंय. बाकी शब्दच्छलात विंटरेस्ट नाय.
असामी, माझे मायबोलीवर येणे न
असामी, माझे मायबोलीवर येणे न येणे यापेक्षा मायबोली टोटली मेड ईंन ईंडिया होणे जास्त महत्वाचे नाही का? आपला विचार त्या द्रुष्टीने झाला पाहिजे. उद्या चीनच्या मनात आले तर मायबोली बंद पडायची अश्याने.. मग सगळ्यांचेच येणे बंद होईल >> हो पुढे नि बनव बरं मायबोली टोटली मेड ईंन ईंडिया. आमचा तुला पूर्ण पाठींबा आहे. पण तोवर तू अमेरिकेत जन्मलेल्या मायबोलीवर आणि मेड ईन चायना पार्टस वापरून चालणार्या त्यांच्या सर्व्हरवर, तुझ्या तशाच कंप्युटरवरून " 'मेड इन चायना' 'माल वापरू नका" ह्या तूच टाईप केलेल्या आवाहनाला जागणार का ?
अरे अब बस भी करो; बच्चेकि जान
अरे अब बस भी करो; बच्चेकि जान लोगे क्या?..
साईज बदलून द्यायलाच इतकी कटकट
साईज बदलून द्यायलाच इतकी कटकट करतात .................आपल्याकडे कधी येणार?
ते भारतात कठीण. कारण पुरवठा नि मागणी यांचे गणित भारतात अमेरिकेच्या उलट आहे. गिर्हाईकाला नाखूष करणे इथे परवडत नाही - पुरवठा प्रचंड, पुरवणारे अनेक. गिर्हाईक सरळ दुसरीकडे जाईल. भारतात कुठे जाईल गिर्हाइक? पुष्कळदा हवी असलेली गोष्ट कुठेहि कशीहि असली तरी घ्यावी लागते.
थोडक्यात अमेरिकेत Buyer's market, भारतात sellers market.
उगाच बहिष्काराच्या बाता
उगाच बहिष्काराच्या बाता नुसत्या! चांगल्या प्रतीचा नि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल एव्हढा माल आहे का भारतात?
स्वतः संशोधन करून अधिक चांगल्या प्रतीचा माल मोठ्या प्रमाणावर बनवायचा या कामाला प्रचंड वेळ लागतो, पैसा लागतो. तेव्हढा वेळ नाहीये कारण जग झपाट्याने पुढे जात आहे. त्यांच्याशी स्पर्धा तर सोडाच पण त्यांच्या जवळपास पोचायचे तरी वेळ गमावून चालणार नाही. सुदैवाने आता पैसे तरी आहेत. तर वापरा.
एकच आशा - भारतीय लोक प्रचंड हुषार. आणि संख्येने तर अफाट. त्याचेच भांडवल करून पैसे मिळवायचे. उगाच बहिष्कार वगैरे करण्यापेक्षा ते बरे. एकदा पैसे मिळाले की आ़जकालच्या जगात सगळे काही मिळेल. उगाच चिनी मालावर किंवा अमेरिकन माला वर बहिष्कार घालताना आपला किती तोटा होईल याचाहि विचार करा.
असामी... अगदी बरोब्बर!!!
असामी...
अगदी बरोब्बर!!! 
असामी, त्रास नको देऊस ऋला.
असामी, त्रास नको देऊस ऋला. त्याला काय माहित प्रकरण त्याच्यावरच शेकेल आणि त्याचं ऑनलाईन अस्तित्व धोक्यात येईल. हे वयच आहे त्याचं गंभीर विचार चर्चेला घेऊन इंप्रेशन मारण्याचं.
त्याची गफ्रे इथे नसताना
त्याची गफ्रे इथे नसताना कोणावर इंप्रेशन मारतोय पण मग तो ?
ऋन्मेष लेका तुजो सटल
ऋन्मेष लेका तुजो सटल सर्क्याजम बाकी भारी आसा. भल्या भल्यांका समजणा नाय.
मी तुका कदी सांगलय काय मी तुजो फॅन आसय म्हणान.
व्यापारी बहिष्काराचे
व्यापारी बहिष्काराचे अस्त्र!
http://www.loksatta.com/jagatkaran-news/india-bans-import-of-goods-from-...
चयना हे प्लॅस्तिक
चयना हे प्लॅस्तिक इलेक्टृओनिक वस्त्चे माहेर घर आहे.
भारत हे फार्मा उत्पादनाचे माहेरघर आहे.
टग्या! +१
टग्या!

+१
टग्या असामी, हो पुढे नि बनव
टग्या
असामी,
हो पुढे नि बनव बरं मायबोली टोटली मेड ईंन ईंडिया. आमचा तुला पूर्ण पाठींबा आहे.
>>>>>>
जेव्हा मोदींनी स्वच्छ भारतची घोषणा दिली तेव्हा मी त्यांना अगदी हेच म्हणालेलो, घ्या हातात खराटा आणि झाडून काढा सारा देश. पण ते तर फोटोपुरते एक पोज देऊन परदेशात पळाले. मग मी तरी कशाला त्रास करून घेतोय. आजही मी ट्रेनमध्ये संत्रे सोलून साली बाकाखाली टाकतो आणि बिया पचापचा खिडकीबाहेर थुंकतो
आता तुला लोक देशद्रोही ,
आता तुला लोक देशद्रोही , पाखंडी व पाकडा असे जाहीर करतील
पाकडा व पाखंडी शब्दात किती
पाकडा व पाखंडी शब्दात किती साम्य आहे नै
मला वाटलंच होतं तू गिरे तो भी
मला वाटलंच होतं तू गिरे तो भी टांग उपर वाला प्रतिसाद देणार ऋ. पण म्हणावं तितका जमला नाही
मग मी तरी कशाला त्रास करून
मग मी तरी कशाला त्रास करून घेतोय. >> उत्तम मग हे धोरण बाफ उघडताना पण वापरत जा कि
वर त्या टग्यांना तुझा
वर त्या टग्यांना तुझा सार्कॅझम वगैरे वाटला तरी मला मजा आली तुझ्या तंगड्या तुझ्याच गळ्यात पडलेल्या बघून.
असामी, त्याची गफ्रे असेल माबोवर. आपल्याला काय माहित?
असामी, बाफ उघडणे म्हणजे
असामी, बाफ उघडणे म्हणजे स्वत:ला त्रास करून घेणे असे म्हणायचे आहे का आपल्याला. मला तरी तसे नाही वाटत. उलट ज्याला स्वताला काही करता येत नाही, फक्त किबोर्ड बडवत तोंडाची वाफ दवडता येते असेच लोक बाफ काढतात ना
सायो, आपल्या आसपासच्या लोकांना आनंद देणे, मजा देणे, खुश करणे आणि यातून स्वत:ही आनंद मिळवणे हा माझ्या लाईफचा फंडा आहे. आपला हा प्रामाणिक प्रतिसाद हेच माझे समाधान
पुन्हा एकदा शाब्दिक बुडबुडे.
पुन्हा एकदा शाब्दिक बुडबुडे.
शाब्दिक बुडबुडे. मग मायबोलीवर
शाब्दिक बुडबुडे.
मग मायबोलीवर कसली डोंबलाची गंभीर चर्चा करताय? इथे नुसती धमाल. उगाच गंभीरपणाचा आव आणला तर लग्गेच वैयक्तिक शिव्या, अपमान वगैरे. अगदी माहितगाराने खरी माहिती दिली तरी कुणाला तरी त्यात प्रचाराचा वास येईलच.
तसेहि इथले वाचून प्रथम लोकांचे म्हणणे तुम्ही अमेरिकेत रहाता, तुम्ही भारताबद्दल कशाला बोलता, ,तुम्ही अमुक जातीचे तेंव्हा असेच बोलणार असले बोलतात. म्हणजे काय लिहीले आहे त्याकडे लक्ष नाही. नाहीतर त्यातल्या खर्या खोट्या शुद्धलेखनाच्या चुका काढणार.
भारत स्वच्छ झाला पाहिजे म्हंटले म्हणजे जणू तुम्हाला उद्देशून लिहीले आहे असे समजून लगेच "मग घ्या झाडू हातात नि करा स्वच्छ सगळा भारत - नाहीतर उगाच बोलू नका" असे म्हणणार.
इथले वाचून कुणाचेहि, विशेषतः सरकार, क्रिकेट बोर्ड, सिनेमावाले कुण्णाचेहि मत बदलत नाही.
तेंव्हा इथे फक्त गंमत करायला या.
आता माझ्या माहितीत काही लोक आहेत ज्यांना फक्त दुसर्याचे उणेदुणे काढणे, नावे ठेवणे यातच गंमत वाटते ते सोडा.
उदा. कुणाला जरी गणितात नोबेल पारितोषिक मिळाले तरी "पण दिसायला किती कुरुप" किंवा अमेरिकेतले लोक "काय हा त्याचा अॅक्सेंट, इंग्रजी सुद्धा धड बोलता येत नाही" असे म्हणतात ते लोक.
जेंव्हा जरा खर्च कमी करा
जेंव्हा जरा खर्च कमी करा म्हंटले म्हणजे लगेच खाणेपिणे सोडून द्या असा होत नाही, पण जिथे आवश्यक नाही अश्या चैनीच्या वस्तूंवर खर्च कमी करा असा त्याचा अर्थ असतो.
तसेच आयात बंद करा म्हणजे फक्त कित्येक अनावश्यक गोष्टी जर आयात करत असाल तर ते कमी करा. असा अर्थ घेतला तर यात काही वावगे नाही.
तसेच आयात बंद करा म्हणजे फक्त
तसेच आयात बंद करा म्हणजे फक्त कित्येक अनावश्यक गोष्टी जर आयात करत असाल तर ते कमी करा. असा अर्थ घेतला तर यात काही वावगे नाही.
>>>>
सहमत
मला टॉयलेट पेपर 'अनावश्यक'
मला टॉयलेट पेपर 'अनावश्यक' वाटतो.
अनेकांना त्याच्याशिवाय होत नाही.
आवश्यकतेचे निकष कुणी ठरवायचे?
टग्या बहुधा स्वतःच ऋबद्दल
टग्या बहुधा स्वतःच ऋबद्दल सारकॅजम वापरत असावेत.
मला तरी तसे नाही वाटत. >>
मला तरी तसे नाही वाटत. >> आम्हाला वाटते ना
टग्या बहुधा स्वतःच ऋबद्दल सारकॅजम वापरत असावेत. >> मलाही तीच शंका आली होती पण कु. ॠ. परत स्पष्टीकरण मागायचा हि भिती
असामी, आपल्यावर आलेल्या
असामी,
आपल्यावर आलेल्या चांगल्या कॉमेंटसनी हुरळून जाणे आणि नकारात्मक प्रतिसादांनी व्यथित होणे या दोन्ही गोष्टी मी टाळतो. टाळायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला टग्या यांच्या प्रतिसादाचा जो अर्थ काढावासा वाटेल तो तुम्ही खुशाल काढा. त्यामागचे सत्य काहीही असो, मला स्वत:लाही ते शोधायचे नसल्याने मी हुज्जत घालायला येणार नाही
पण त्या शेजारच्या धाग्यावर धोनी विरोधात काही बोलाल तर मात्र रात्र रात्र भर जागून भांडत बसेन
धागा पुन्हा विषयावर आणतो.
धागा पुन्हा विषयावर आणतो. अश्या त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या चीन बनवू शकतो पण जगात ईतर कोणता देश बनवू शकत नाही. सव्वाशे करोडचा भारत बनवू शकत नाही तर का बनवू शकत नाही. मनुष्यबळ आणि बुद्धीमत्ता तर ईथे मुबलक आहे. सरकारने स्वत: मेक ईन ईंडिया आणि डिजिटल ईंडियाचा नारा दिला आहे. गेल्या दोन तीन वर्षांत भ्रष्टाचारालाही आळा बसला आहे. मग घोडे पेंड कुठे खातेय..
Pages