चिनी मालावर बहिष्कार

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 October, 2016 - 16:59

चिनी मालावर बहिष्कार !

पाकिस्तानपेक्षा चीन हा भारतासाठी जास्त धोकादायक आहे हे एक असे सत्य आहे जे फार कमी लोकांना माहीत असेल.
पाकिस्तानच्याही बरयाचश्या उड्या या चीनच्या जीवावरच चालतात. सध्या पाकिस्तान कलाकारांवर बहिष्कार टाका सोबत चिनी मालावर बहिष्कार टाका असा प्रचारही जोरात चालू आहे.

खरे तर मला आधी हे एक फेसबूक-व्हॉटसप फॅड वाटत होते. पण या बातम्या वाचून तसे आता वाटत नाहीये. चीननेही या बहिष्काराची दखल घ्यायला सुरुवात केली आहे..

चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे चीनचे धाबे दणाणले
http://dhunt.in/1BTad
via NewsHunt.com

भारतीय वस्तू आमची बरोबरी करूच शकत नाहीत; चीनची अश्लाघ्य टीका
http://dhunt.in/1Av7p
via NewsHunt.com

या बहिष्काराचा खरेच काही फायदा आहे की नाही, असल्यास कितपत, आणि सोबत तोटाही आहे का? वगैरे मुद्द्यांवर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर अशी भिती वाटतेय की स्वयंघोषित गोरक्षकांनी चालू केलेल्या संशयावरून मारहाण मोहिमेसारखे चायनीज फोन्स आणि ईतर प्रॉडक्ट्स वापरणार्‍यांना त्रास देणं चालू होईल की काय लवकरंच. काही सांगता येत नाही हे लोण कसे पसरेल त्याचं आणि कोण आपली पोळी भाजायला कुठल्या गोष्टीचं भांडवल करेल.

स्वत:ला (देशाला) सक्षम बनवणे हाच एक उपाय आहे. बहिष्कार वगैरे घालणं सोप्पं काम आहे. >> खरं आहे दक्षिणा.

चिनी दीपमाळा, डेकोरेशनच्या वस्तू, आकाशदिवे, फटाके आणि दिवाळीसाठीचा माल यावर बहिष्कार टाकुन चीनला फराक पडनार आहे का ?

या वस्तू सुरुवाती स्टॉकिस्ट घेतात. त्यांनी घेतल्या तेव्हाच चिनला पैसे मिळाले. मग घाऊक व्यापारी. आणि आता रिटेलर्स नी म्हणजे अगदी छोटे दुकानदार किंवा इलेक्ट्रीशियन्स, फिरते ब्विक्रेते स्ट्~ओस्टॉकिस्टना पैसे मिळाले. घाऊअक व्यापा-यांना पण मिळाले. आता जेव्हां ग्राहक आणि रिटेलर्स यांच्यातल्या व्यवहाराची वेळ आली तेव्हां बंदी घालुन काय उपयो/\? या गरीबांचे पैसे अडकले आहेत. बहिष्कारामुळे त्यांची दीवाळी कशी जाईल ?

त्यामुळ या वेळी त्यांना इशारा देऊन पुढच्या वेळी बहीष्कार टाकावा , टाकायचा असेल तर एव्हढं मला कळालं.
बाकीचं राजकारण किंवा एकॉनॉमी समजण्याइअत्की मी मोठी नाही.

वर्षु तुझी पोस्ट इथे येणं महत्वाचं होतं, लिहिलंस ते बरं केलंस.
आपली इलेक्ट्रोनिक्स ची जवळ जवळ ८० पेक्षा जास्त टक्के बाजारपेठ ही चीन वर अवलंबून आहे. अनायसे कच्चा मला आणि कमीत कमी किमतीत इलेक्ट्रोनिक गुड्स चायना कडून मिळत असतील तर भारतात ही उत्पादने होणं आणी चायना पेक्षा सरस क्वालिटी ची होणं निव्वळ अशक्य. खूपच मनावर घेतलं तरच काहीतरी होऊ शकतं.

चायनीज लोक किती मेहनती आणि प्रामाणिक आहेत ते पाहून आपण त्यांच्या 10% मेहनत केली तरी आपल्या देशाची बरीच प्रगती होईल.

वर करण जोहारच्या सिनेमाचाच मुद्दा परत चीनच्या चर्चेत आला आहे.
तिथे तो पाकिस्तानी कलाकार आधीच पैसे घेऊन पसार झालेला आणि ईथे चीन देखील आधीच आपले पैसे घेऊन मोकळी झालीय.

पण ईथे हा बहिष्कार शंभर टक्के तर एका दमात लागू होणार नाही. कारण अजूनही प्रत्येक भारतीयाकडे व्हॉटसप आलेले नाहीये. त्यामुळे टप्प्याटप्याने याची तीव्रता वाढत जाणार. तर या काळात व्यापारांनी आधी घेतलेला स्टॉक कसलेही नुकसान न होता खपेलच. पण पुढच्या वेळी नवीन स्टॉक जमा करण्यापूर्वी विचार केला जाईल.

मुळात चीनशी आपले शत्रुत्व काही आजचे नाही. एक युद्धही त्यांनी आपल्याशी केलेय. अश्या पार्श्वभूमीवर व्यापारी तरी चीनचा माल का खरेदी करतात? जर करतात तर त्यांनी नुकसान सोसायची तयारीही ठेवायला हवी Happy

अश्या पार्श्वभूमीवर व्यापारी तरी चीनचा माल का खरेदी करतात?

बाळ रुन्मेश तु बाकीच्यांच्या पोस्ट देखील वाचतोस का?

जर करतात तर त्यांनी नुकसान सोसायची तयारीही ठेवायला हवी >> दे बरं टाकून तुझा मोबाईल. आणि ज्या मोबाईल मध्ये किंवा पिसी मध्ये एकही चिनी भाग नाही असा असेल तरच वापर नाहीतर अजिबात वापर करायचा नाही. काही तरी नुकसान सोसायची तयारी पाहिजेच ना !!

मुळात चीनशी आपले शत्रुत्व काही आजचे नाही. एक युद्धही त्यांनी आपल्याशी केलेय. अश्या पार्श्वभूमीवर व्यापारी तरी चीनचा माल का खरेदी करतात? जर करतात तर त्यांनी नुकसान सोसायची तयारीही ठेवायला हवी >>
Lol Rofl
अहाहा क्या तारे तोड रहे हो प्राजी ! फुल्ल आतिषबाजी! दिन बन गया!

मुळात चीनशी आपले शत्रुत्व काही आजचे नाही. एक युद्धही त्यांनी आपल्याशी केलेय. अश्या पार्श्वभूमीवर व्यापारी तरी चीनचा माल का खरेदी करतात? जर करतात तर त्यांनी नुकसान सोसायची तयारीही ठेवायला हवी >>
Lol Rofl
अहाहा क्या तारे तोड रहे हो प्राजी ! फुल्ल आतिषबाजी! दिन बन गया!

धनि, आहे त्या वस्तू टाकणार नाही. त्यात आपलेच नुकसान आहे. त्याचे पैसे चीनला केव्हाच पोचले आहेत. आपले नुकसान झाले नाही पाहिजे. म्हणून व्यापारांचाही सध्याचा माल खपावा असेच म्हणतोय.

तसेच मला माझ्याकडे कोणत्या वस्तू चीनच्या आहेत कोणत्या नाही हे आधी शोधावे लागेल. जेणेकरून यापुढे घेतल्या जाणार नाहीत.

त्यात आपलेच नुकसान आहे >> अरे तूच तर म्हणतो आहेस ना की "काही तरी नुकसान सोसायची तयारी पाहिजेच ना " मग काय - सत्कर्माची सुरूवात स्वतःपासून करावी. जर तयारी असेल तर कर आणि मग बाकीचा आरडाओरडा कर Wink

माझ्याकडे कोणत्या वस्तू चीनच्या आहेत कोणत्या नाही हे आधी शोधावे लागेल.

>>>>>याचसाठी म्हणलं, बाकी पोस्ट पण वाचत जा.

डोअर बेल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर, मायक्रोव्हेव या प्रत्येक घरगुती उपकरणात पीसीबी वापरतात. बरं तुमची बाईक असेल, कार असेल किंवा तुमचं विमान असेल तर या प्रत्येक वाहनात पीसीबी चं अनन्यसाधारण महत्व आहे. कोणत्याही मशिन्स, मेडिकल इक्विपमेंट यात पीसीबी असतातच.

भारतात जितके इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं बनतात त्याला जे पीसीबी लागतात, त्याच्या फक्त २४% भारतात बनतात. आणि ७४% पीसीबी हे चीन मधून इम्पोर्ट होतात. आणि खरी गंमत पुढे आहे मित्रांनो. हे जे पीसीबी भारतात बनतात त्याचं शंभर टक्के रॉ मटेरियल हे चीन मधून इम्पोर्ट होतं. आणि नुसतं भारताला च नाही तर जगाला चीन हे रॉ मटेरियल सप्लाय करतं. अख्ख्या भारताचं पीसीबी चं प्रोडक्शन जितकं आहे तितकं चीन मध्ये एक कंपनी करते आणि अशा किमान १५ कंपन्या आहेत.

यातल्या कुठल्या वस्तू तु आता यापुढे घेणार नाहीस. उद्या म्हणतोस तसे खरेच भारतीय व्यापाऱ्यांनी हा माल विकत घेणे बंद केले, तर मागणी पुरवठा तत्वावर आपण कुठे आणि कसे पुरे पडणार आहोत.

लक्षात घे, स्वावलंबी बनाव असे प्रत्येक देशाला वाटत असतच. कारण प्रत्येक देश दुसऱ्या देशाशी सोयीनुसार शय्यासोबत करत करत असतो. आपली निर्यात जास्त व्हावी आणि आयात कमी हे वाटणे साहजिकच आहे, पण त्यासाठी पुरक अशी व्यवस्था उभी करणे हे महत्वाचे आहे.

चायनिज माळांना तोड देतील अशा कोल्हापूर माळा बाजारात आल्या आणि हातोहात संपल्या. अशाच टप्प्याटप्प्याने जावे लागणार आहे. लगेच बहिष्कार वगैरे टाकून काही होत नसत रे.

जर दर्जेदार भारतीय उत्पादने वाजवी दरात आणि चांगली सर्विस देत असतील तर कुणाला हौस आलीये बाहेरचे उत्पादन घेण्याची.

"एक युद्धही त्यांनी आपल्याशी केलेय" - त्या युद्धाची पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यात भारताने दलाई लामांना राजाश्रय देणं वगैरे गोष्टी आहेत. नेहरूंची चीन ला दुखवून दलाई लामांना राजाश्रय द्यायची तयारी नव्हती. अगदी शेवटच्या निर्णायक क्षणी अमेरिकेच्या मध्यस्थीने ते घडलं. तिबेट हा स्वतंत्र देश होता जो चीन ने बळकावला. दलाई लामांचा चीन च्या राजसत्तेखाली रहण्याला विरोध नव्हता, पण त्यांना तिथे स्वतःची धर्मसत्ता अबाधित हवी होती. असो. ह्या सगळ्या खूप जुन्या गोष्टी आहेत.

धनि, ते बिजनेस रिस्क बद्दल म्हटलेय नुकसान सोसायची तयारी. भारतीयांचेच नुकसान करण्यात काय प्वाईंट आहे.

आशूचॅम्प, ती व्हॉटसपपोस्ट आहे ना. म्हणजे व्हॉटसपवर सुद्धा वाचलेली. आधी खरे खोटे खातरजमा करायला हवे.
पण खरेच कुतूहल आहे की काय असते असे त्यात जे भारतात बनूच शकत नाही? किंवा जगात फक्त चीनमध्येच बनते?

जर दर्जेदार भारतीय उत्पादने वाजवी दरात आणि चांगली सर्विस देत असतील तर कुणाला हौस आलीये बाहेरचे उत्पादन घेण्याची. >> +१

पण याउपर असे म्हणेन की स्वतःला जे चांगले येते आहे ते बाहेर विकून जास्ती पैसे मिळत असतील तर तसे करावे. उगीच येत नसताना फक्त आपलाच असावा म्हणून निकृष्ट उत्पादन वापरण्याचा हव्यास चांगला नाही. बंद सीमा असण्याचे दिवस संपलेले आहेत. उगीच परत सर्व दरवाजे बंद करून देशाला आंधारमय मध्ययुगात नेण्याची काही गरज नाही.

तसेच मला माझ्याकडे कोणत्या वस्तू चीनच्या आहेत कोणत्या नाही हे आधी शोधावे लागेल. जेणेकरून यापुढे घेतल्या जाणार नाहीत. >> ऋन्मेऽऽष मायबोलीवर येणे बंद करणार का रे मग ? *कोण आहे रे ते कोपर्‍यात उड्या मारताहेत जोराजोरात ?*. मायबोलीचे servers Made in chine parts वापरतात. हे भारतात होस्टेड नाहि आहेत.

फेरफटका, दलाई लामा माहितीबद्दल धन्यवाद. मला हे माहीत नव्हते. फक्त लहानपणी या युद्धाच्या कथा ऐकल्यात त्यात एवढेच आठवते की पिचपिच्या डोळ्यांचे चिनी फार धूर्त निष्ठूर आणि कावेबाज होते. त्यामुळे सिधेसाधे आपण त्यांच्या हिंदी चिनी भायभाय बहकाव्याला फसलो आणि युद्धात हरलो.

असामी, माझे मायबोलीवर येणे न येणे यापेक्षा मायबोली टोटली मेड ईंन ईंडिया होणे जास्त महत्वाचे नाही का? आपला विचार त्या द्रुष्टीने झाला पाहिजे. उद्या चीनच्या मनात आले तर मायबोली बंद पडायची अश्याने.. मग सगळ्यांचेच येणे बंद होईल

अ‍ॅडमिननी एक भिंतीवर डोकं आपटणारा किंवा स्वतःच्या झिंज्या उपटणारा स्मायली द्यायलाच हवा.

त्याचबरोबर सैरावैरा धावणाराही Happy

एजे, कमाल आहे. सेवेस तत्पर! आपल्याकडे हे आधीच उपलब्ध होते की ऑर्डरनुसार बनवलेत Happy

बाकी या साठी कुठले चिनी तंत्रज्ञान वापरले आहे का? तसे असल्यास नका करू असे. गरज पडल्यास आम्ही कीबोर्डवर डोके आपटू. पण चीन नको आता. आपण अमेरीकेचे अनुकरण करत आपल्या गरजा वाढवून ठेवल्या आहेत, आणि त्या अनावश्यक गरजा पुर्ण करायला चीनवर अवलंबून राहायला सुरुवात केली आहे.

तरीही वरचा तो चीन बनवत असलेला नक्की काय पार्ट आहे जो जगात फक्त तेच बनवतात हे जाणून घ्यायला आवडेल. त्याचे काहीतरी करायला हवे. नुसते आपल्याला जमणार नाही म्हणत मांडीवर मांडी घालून बसण्याला अर्थ नाही. अश्याने कधीच आपल्या पायावर उभे राहणार नाही.

स्वतःपासून सुरूवात कर ऋन्मेष. नाहीतर शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात होईल. Wink
अमेरिकेत जन्मलेल्या मायबोलीवर आणि मेड ईन चायना पार्टस वापरून चालणार्‍या त्यांच्या सर्व्हरवर, तुझ्या तशाच कंप्युटरवरून 'मेड इन चायना' 'माल वापरू नका टाईप आवाहन करणारे बीबी काढणं सोप्पय तुलनेत. नाही का?

Pages