कुर्ग सहल - भाग ३

Submitted by दिनेश. on 24 October, 2016 - 22:12

कुर्ग - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/60600

कुर्ग सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/60628

कुर्ग सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/60630

त्या रात्री मला खुप शांत झोप लागली. एरवी मी अगदी भल्या पहाटेच उठतो पण त्या दिवशी चांगली उन्हे येईपर्यंत
जाग आली नाही.

१) हा माझा बेड

DSCN2564

२) रुम मधून दिसणारी कॉफीची बाग

DSCN2565

३) ठिक सात वाजता टेबलवर ब्रेकफास्ट हजर होता. नीर डोसा, चटणी, नारळाचे दूध आणि मश्रुमची भाजी.
मी आजवर वेगवेगळ्या देशातले आणि वेगवेगळ्या प्रकारचे मश्रुम्स खाल्ले आहेत, पण याची चव अगदी एकमेव
अशी होती. एकेक मश्रुम घेऊन तो नीट करावा लागतो आणि रात्री साडे दहा पर्यंत रोहिणी ते करत होती.

नीर डोसे तर अगदी रेशमाच्या पोताचे होते. एरवी २ डोसे खाल्यावर पोट भरते माझे, तिथे ५ खाल्ले.

DSCN2566

४) त्या घरातच नव्हे तर व्हरांड्यातही सगळीकडे फुलांची रेलचेल होती

DSCN2558

५)

DSCN2559

मग मी खाली उतरलो, अर्थातच पावलोपावली फोटो काढण्याजोगे काहीतरी दिसतच होते.

६)

DSCN2561

७)

DSCN2567

८)

DSCN2568

९)

DSCN2569

१०) माझ्या अंघोळीसाठी पाणी गरम करणे चालले होते. त्या चुलाण्यात मी पण काही लाकडे सरकवली. अगदी कडाक्याची नव्हे पण सुखद थंडी होती. तिथेच हि ज्यूली बांधलेली होती. मला कुत्रे खुप आवडतात आणि असे
गोंडस दिसणारे कुत्रे दिसले कि मला त्यांच्याशी खेळल्याशिवाय चैन पडत नाही. कुत्रे पण आपल्याला जोखतात.
आणि आपल्याबद्दल त्यांना विश्वास वाटला तर ते आपला मानतात. हि ज्यूली बांधलेली असली तरी तिच्या रेंज मधे
गेल्यावर दोन पायावर ऊभी राहून नुसता नाच करायची. माझ्या पायांना मिठी मारून रहायची.

DSCN2571

११) हा फोटो मुद्दाम देतोय. सुर्य वर आला तरी घरासमोर इतकी दाट झाडी होती कि उन्हे पोहोचू शकत नसत.

DSCN2582

१२) तेरड्याचाच प्रकार

DSCN2583

१३)

DSCN2585

१४) अंघोळ वगैरे आटपून मी गावात भटकायला बाहेर पडलो. रस्त्यावर हे तुतारीचे फुल दिसले. एरवी हे फुल इतके
उमलत नाही.

DSCN2586

१५) गावातले निवांत रस्ते. एरवी आपल्याकडच्या रस्त्यावर सकाळच्या वेळी धुराचा वास येतो, पण कुर्ग मधे
अगदी कमी घरे आणि दाट झाडी असल्याने, तसाही वास नव्हता. आवाजही नाहीत... अगदी निवांत !

DSCN2588

१६)

DSCN2589

१७) एका घराजवळ हे संत्र्याचे असे झाड होते. तोडायचा मोह आवरला ( घरी येऊन काकांना सांगितल्यावर त्यांनी मग आपल्या बागेत नेले आणि संत्री, पेरु, केळी खाऊ घातली. ) ही संत्री हिरवी दिसत असली तरी गोड आणि सुंदर स्वादाची होती.

DSCN2590

१८) या रस्त्याच्या जरा पुढे खोल दरी होती आणि त्या पलिकडे डोंगर रांगा. या डोंगरांच्या माथ्यावरून सतत पाणी झिरपत असते. हेच पाणी पन्हळीद्वारे घरोघरी येते आणि ते इतके चविष्ट असते कि नुसते पाणी पिऊन पोट भरावे,
असे वाटते.

DSCN2591

१९) मला अनोळखी काही झाडे

DSCN2592

२०) अश्या रस्त्यावरून भटकताना थकवा येणे तर सोडाच, वेळेचेही भान रहात नसे

DSCN2593

२१ ) हा देखील तेरड्याचाच प्रकार

DSCN2594

२२)

DSCN2596

२३)

DSCN2597

२४)

DSCN2598

२५)

DSCN2600

२६)

DSCN2601

हे सर्व फोटो सकाळच्या भटकंती मधे टिपलेले. राजेंद्रची रहायची सोय त्याच घरात होती. मग साडेनऊ वाजता आम्ही घराबाहेर पडलो...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम नजारा आहे.. तेरड्याचा हा प्रकार कधीच पाहिला नव्हता..
जूली खूपच क्यूट आहे..डोळे कसे प्रेमळ आहेत अगदी तिचे!!! Happy
नीर दोसा.. वॉव स्लर्पी!!!

काँक्रीटचं जंगल बघून बघून विटलेल्या डोळ्याना काय दिलासा मिळाला आतां !!! धन्यवाद.
[ ब्रेकफास्टला मिळालेली अशी पावती ही एका पाककलेबाबत अत्यंत चोखंदळ असलेल्या व्यक्तीकडून आहे, याची त्या बिचार्‍या रोहिणीला कल्पनाही नसेल ! Wink ]

सुंदर!!! कुर्ग बद्दल खुप पुर्वीपासून ऐकून आहे पण आज तुमच्यामुळे त्याचे फोटोरूपी दर्शन घडले. आणि जे काही ऐकले ते खरे आहे ही खात्री पटली.

सगळेच फोटो भारीये...

७ व्या फोटोतली जास्वंदी कसली सुंदर आहे!+१११
आत्ताच कूर्गला जावंसं वाटतंय.+१११

आभार..

भाऊ, असं आयतं जेवायचे योग माझ्या जीवनात फारच कमी वेळा येतात !

साती, होम स्टे मधे घरपण मिळते पण टॉयलेट पेपर, टी मेकर, मिनी बार, मिनरल वॉटर वगैरे लाड नसतात. माझ्या आयूष्यातला हा पहिलाच होम स्टे... पण मी अगदी खुश आहे. नेट वर जे दर आहेत, त्यापेक्षा स्वस्त दरात ते मिळू शकतील. या मालिकेच्या शेवटी मी सर्वांचे फोन नंबर्स देईन.

अंकु, ते अळूच्या वर्गातील शोभेचे झाड आहे. ४ आणि ५ पण तशीच आहेत.

२५ मधल्या झाडांवर जे वेल चढवलेले दिसताहेत ते मिरीचे !

हो मामी, अक्षरशः कुणीच नसते त्या रस्त्यावर ! कॉफी, मिरीची कामे फक्त जानेवारी, फेब्रुवारी मधे असतात. एरवी शेतातही कुणी नसते.

छान.. दहापंधरा दिवस उन्हाळ्याची सुट्टी घालवावी अशी शांत निवांत जागा वाटतेय फोटो पाहता

२२, २३ आणि सर्व रस्त्यांचे फोटो नुसते बघूनच शांत वाटलं. जाना पडेगा!
संत्र्यांबद्दल काकांना कसं सांगितलंत? काकांचा शर्ट ओढून 'काका, मला ती संत्री पाहिजेत' की 'मला पण तसली झाडावरची संत्री पाहिजेत' असं? Happy

सई, काकांना विचारले, बाजारात संत्री मिळतील का ? तर ते म्हणाले, बाजारात कशाला, आहेत कि आपल्या बागेत..
काय असतं ना, वयाला शोभेल असा हट्ट केला पाहिजे आता Happy

खरेच इतके निवांत रस्ते ना... आता राजेंद्र मला शोधायला येईल बहुतेक, असे वाटेपर्यंत भटकलो मी तिथे. क्वचित एखादी मिनी बस दिसली असेल... बाकी कुणी नाही तिथे.

केवढी सुंदर होते आहे हि सिरीज! कूर्ग खूप अप्रतिम दिसते आहे. आत्ता या क्षणी दिनेशजींचा खूप हेवा वाटतो आहे. मस्तं !

Happy
तो नाश्ता बघून त्रास झाला! असा हेवी नाश्ता करून भटकायला जायचं, पाय ओरडायला लागले की परत येऊन तिथंच कुठंतरी पायरीवर टेकून हातात पुस्तक धरायचं, हळूहळू डोळे उठाबशा काढायला लागतील, मग तिथंच लुढकायचं. जेवायला वाढलं की उठवायला येतीलच, मग आयतं पानावर बसून गरम गरम जेवायचं. की पुन्हा ये रे माझ्या मागल्या. बास!

जोतं आणि खांब असलेलं पडवीवालं घर, अशी शांतता आणि कुठं जायचं नाही की यायचं नाही वगैरे फँटसीज असतात. त्यात वाहन, फोन, पैसे, बोलणे वगैरे निषिद्ध.