अघोरी
"अवि आज तुला भेटण शक्य आहे ? ", पलिकडून समीर चा घाबरा आवाज .
"पण मी कोल्हा पुरात आहे, उद्या सकाळ पर्यन्त मुम्बई स पोहोचेन" .
"काय झाल ?" .
"फ़ोन वर सांगण नाही शक्य , पण उद्या तू असशील च ना ???"
"हो रे !", फोन ठेवला पण का कुणास ठाऊक मला समीर ची काळजी वाटायला लागली होती.
सकाळी मुम्बई ला पोहोचलो फ्रेश होई पर्यन्त bell वाजली , समीर दारात उभा होता , बरोबर अजून एक जण त्यांच्याच वयाचा, घाबरलेला चेहरा अस्वस्थ.
"ये ! "
समीर आत आला ,
"अरे विनु आत ये ना !,"
"नाही ! मी इथेच बरा आहे तू बोल ",
मला नवल वाटल,
"प्रॉब्लम झालाय , आपण कुठे बाहर बसू या का ?" , समीर च्या स्वरात काकूळता होती.
"आणि अमावस्ये ला थोड़े दिवस राहिलेत !"
"अरे तू काय बोलतो आहेस ? , मला काही ही समजत नाहीय ! ", मी आता वैतागलो होतो.
शेवटी "मी अर्ध्या तासात येतो", सांगत घरा तून बाहर पडलो.
"हं ! , बोल बाबा ",
"अवि , माझ्या आणि विनय च्या हातून एक राडा झालाय" .
"त्यात विशेष काय आहे ?' तुझे राडे चालू च् असतात".
"प्लीज आय एम् सीरियस ! ". समीर ची चीड़ चीड़ होत होती.
"खूप दिवसा पासून मी व विनय, ठरवत होतो अस काही जुगाड़ करू की मजबूत पैसा हताशी येईल !", समीर
"बर, मग ?"
शेवटी आम्ही दोघांनी मिळून मेडिकल दुकान टाकल धंदा तसा फारसा नव्हता च. एकदा आमच्या दुकानात एक फकीर आला
"समीर भाई, खाना खिलाओ !".
मला नवल वाटल ह्या फकिराला आपल नाव कस समजल ?.
दुपार ची वेळ , तसे फारसे पैसे नव्हते आमच्या कड़े पण त्याला आम्ही जेऊ घातल
"बोलो क्या चाहते हो ?"
ज्याला स्वतः ला च् दोन वेळा जेवायची भ्रांत तो काय देणार ?
"ग़लत सोच !", फकीर कड़ाडला. परत एकदा मला त्याच्या मन कवडे पणा चे नवल वाटल !
"बाबा, धंदा कम है । बढाने का कोई तरीका होगा तो बोलो" मी जरा उपरोधिक टोन मधे च् म्हणालो.
"कल डोंगरी में स्टेशन के बाजू में गुलमोहर बिल्डिंग के बाजू में आना।", इतके बोलून फकीर गेला.
माझी काही त्याला परत भेटण्याची इच्छा नव्हती पण गेलो.
फकीरान सांगितलेली जागा म्हणजे काही त्याची झोपडी किंवा आश्रम नव्हता ते कब्रस्तान होत रादर ती स्मशान भूमी होती
काही पड़क्या समाध्या काही थडगी फक्त ते स्मशान नेहमी च्या अन्त्य विधि साठी वापरात नसाव. उदास वातावरण ,वर घिरट्या घालणारी वटवागुळ.
"मी जे सांगेन ते करणार ?", दारू चा घोट घेत फकीर अस्खलित मराठीत म्हणाला.
खर तर फकीर कसला तो साधु च् होता एका दगडी समाधी पाशी आम्ही बसलो होतो
रात्रि अप रात्री स्मशानात जाण्याची ही पहिली च् वेळ त्या मुळे जरा दडपण आल्या सारख झाल होत.
"तुमचा धंदा मी सेट करून देतो, पण मी जे सांगेन ते करावे लागेल, बोलो ?"
"दर अमावस्ये ला इथ एक कोम्बडी व् दारु चा भोग", वर्षातुन एकदा मानवी रक्त, म्हणजे मी आहे ना मी सांगीन काय करायच ते.डोंट टेक लिटरली !!!"
"वा!!! ", म्हणजे बाबा ला इंग्लिश पण येत असाव
"ओके नाउ लिसन !!!,
या पुढे मंदिरात जाणे नाही घरातील सर्व देव विसर्जन करायचे अगदी तुमच्या गाव कडच्चे सुद्धा , मी तिन नारळ देइन एक दुकानात व् एक आपापल्या घरी
घरा तील लोकांनी पण कुठल्याही धार्मिक कार्या ला , मंदिरात ई0 जायचे नाही
हे मान्य असेल तर पुढे सांगतो " एवढं बोलून फकीर थाबला होता ,
असा ही मी नास्तिक च होतो विनय तसा धार्मिक होता पण फरस त्याला ही धार्मिक गोष्टी त रस असा नवहताच ,.
उगाच कुठे कोणी तरी सांगीतल्या मुळे शनिवारी मारुती , चतुर्थी , एकादशी , शिवरात्र उपास देवा पुढे उदबत्ती लावणे इतपत च.
पण करून पहायाला काय हरकत आहे अस आम्ही ठरवल शेवटी जग़ायला पैसे च लागतात
"बाबा तुम बोलो , हम तुम कहो वो सब करने को तयार है".
त्याने त्या समाधी पाशी काही विधि केले तोंडाने मन्त्र चालू होते मधेच पेटवलेल्या अग्नीत दारु ओतत होता शेवटी, आमच्या करंगळीला सूरी ने चिरुन थड़ग्या वर रक्त अर्पण केल व् काही मन्त्र म्हणायला लावले
कधी तिथुन बाहर पडतो असे झाले होते
शेवटी तिन नारळ त्याने आमच्या हातात दिले तेव्हा रात्रि चा दीड वाजला होता
तसेच त्याला गाडीत घेऊन दुकानात आलो
दुकाना त ल्या नारळा शी जणू काही तो बोलत असावा त्याला पुन्हा गोवंडी ला सोडल आम्ही आपापल्या घरी.
बघता बघता धंदा बहरला मजबूत पैसा एका मेडिकल दुकानाची 2 दुकाने नोकर चाकर
सगळ मना प्रमाणे
"काय नाव आहे त्या साधू बाबा चे ?", मधेच मी समीर च् बोलण तोड़त विचारल.
"शिवहरि बाबा "
शर्वरी ने आपण हुन् प्रपोज केल तर विनु च त्याला आवड णा ऱ्या वर्षा शी लग्न केल
शिवहरि कधी मुक्कमी माझ्या किंवा विनु च्या घरी असतो
एक सांगायचं विसरलो 'एकदा विनय च् मुलगा शेजारी चंडी याग होता तिथ होता दिवस भर रात्री ओरडत उठला, गळ्या वर छाती वर सूरी ने चिरा दिल्य्या सारख्या जख्मा होत्या",
बाबा म्हणाला "विनु भाऊ खरच गळा चिरला गेला असता तर !!!?, एकदा सांगितल ना देवा चे ठीकणी जायचे नाही मग ...???", एवढं बोलून समीर गप्प बसला तर विनय अस्वस्थ
"अरे बोल ना ". लाज वाटते ना !!!
"शर्वरी वर्षा मजबूत दारू पितात , गरज पडेल तेव्हा शिवहरी बाबा च्या सेवे करता जावच लागत, रात्र रात्र बाबा ची सेवा करतात , बिल्डिंग व् आजु बाजु च्या बायका ही शिवहरि च्या भजनी लागल्यात".
मटना चा नैवेद्य दर शनिवारी नारळा ना दाख्वावा लागतो ? समाधी वर तर आता दर 15 दिवसांनी बोकड द्यावा लागतो,
"आता मानवी रक्त द्याव लागत", मी म्हणालो
"अवि, पण पण तुला कस हे कळल ?".
समीर आश्चर्य चकित होऊन माझ्या कड़े बघत होता
ती स्मशान भूमि आम्ही विकत घेऊन तिथे बंगला बांधलाय व् तिथे शिफ्ट झालो. त्या बंगल्यात शिवहरि ने एक तळघर बांधलय ! तिथे दिवस रात्र काय करतो देव जाणे
आणि आता या सगळया चा मोबादला म्हणून त्या जागवलेल्या शक्ति ला आता प्राण्या ऐवजी माणसां च रक्त हवय आणि ते सुद्धा स्त्री च !!! अस आम्हाला आठवण करून देत असतो".
'अवि, फार मोठी चुक झाली आमच्या हातून ह्या येत्या अमावस्ये स व् पुढच्या प्रत्येक, मानवी रक्त !!!", नाही मिळाल तर शर्वरी किंवा वर्षा च् रक्त
समीर रडत होता विनय च् सिगरेट च् 6 व् पाकिट संपल होत.
"अवि त्या बाबा ला समजत असेल का आम्ही आत्ता काय करतोय???".
"हो ,तो काय त्या कोपऱ्यात बसून बघतो आहे ???"
"पण हे कसे शक्य आहे ?"
"कर्णपिशाच सारख्या विद्या वापरून !!!" जाऊ दे तो आपला प्रान्त नाही."
"पण् तो आत्ता काही करू नाही शकणार ?'
"का ?"
"माझ्या मागे तू बघितल नाहीस का ?",
"स्वामी महाराजांचा अत्यंत रागीट मुद्रा असलेला उभा फोटो आहे",
"म्हणून तर तुम्हाला मी ह्य होटेल मधे घेऊन आलो,
आणि तू मागे वळु न बघू पण नको !!!"
विनय आधीच कुठे तरी गायब झाला होता
"समीर , प्रत्येक गोष्टी ची किम्मत चुकवावी लागते
झटपट काम होत म्हणून तुम्ही लोक अश्या गोष्टी ना बळी पड़ता पण आता त्याची किम्मत तर चुकवावी लागेल ना ?"
"एकदा aghori the left hand path of god वाच "
"अवि प्लीज तू मदत करणार आहेस की नाही हे सांग ना यार ????"
आत्ता तर निघु या . संध्याकाळी मी फ़ोन करतो, अणि बाय द वे गोवंडी बंगल्याचा address
"तू साधु झाल्यास मी संन्यासी होऊन तुझ्या बरोबर उकिरडे फुंकत फिरणार नाही"
त्रिशला चा message वाचून मला हसू आल !!!
नेहमी सारखे 5 10 मिस कॉल
फोन करून बाई साहेबांच्या शिव्या खाण गरजे च होत
बंगला कसला राजवाड़ा च् चारी बाजूनी ऊंच भिंती सिक्योरिटी सगळ च् आत जाण्या पूर्वी काही गूढ़ आकृति बंध मी कागदावर काढून खिशात ठेवले होते
समीर गेट वर माझी वाट बघत उभा होताच सुदैवाने शिवहरि तिथे नसला तरी काही प्रेत योनीतिल जीवात्मे लक्ष ठेवायला बसवून गेला होता अर्थात समीर च्या समज ण्या पलिकडच्या गोष्टी त्याला सांगून उपयोग नवहताच
"हाय !!!", शर्वरी चा आवाज ,शर्वरी नुस्त्या गाउन वर होती डोळ्यात आव्हान होत लड़खड़नारे ओठ व लालसर डोळे नक्कीच घेतली असावी कस ही करून त्या शक्तिला मी इथे नको होतो
"बर झाल तू आलास ,", मी किती दिवसांची वाट बघते आहे ,
"किती" ,
"250 वर्षे !!!!""
शर्वरी ने जवळ यायचा प्रयत्न पण ते शक्य नव्हत कारण शर्वरी च्या शरीरात दूसर् च् कोणी तरी होत ती जवळ येत असताना केलेल्या मंत्रांची मर्यादा ओलंडण्या ची ताकद त्या शक्तित नव्हती
समीर माझ्या कड़े चमत्कारिक नजरेने बघत होता
मधोमध तळघरात जाण्या करता जीना जमिनीत एक पँचताराकृति आकृतित फारशी लावून बसवाला होता
"समीर आता आत नको !",
"आजची पौर्णिमा जाऊ दे उद्या सकाळी मला एकदा पहावे लागेल".
घाटकोपर ला आलो.
रात्रि ध्यानाला बसलो पण सद्गुरुं च्या मूर्ति ऐवजी शर्वरी च् येत होती शेवटी ध्यान थाम्बवल आणि मी चांगलाच दचकलो मी घाटकोपर ला नवहतो च् गोवंडी च्या त्या बंगल्यात होतो बेड वर शर्वरी च् होती मादक नजरेने माझ्या कड़े बघत होती दोन मिनिटे मी तिच्या नजरेत अड़कलो होतो आणि बेडरूम च्या दरवाज्यात न काही समजाय च्या आत आत आलेल्या वर्षा ने माझ्यावर कोयत्याने वार केला पण तो हातावर निभावला
तोंडाने दोघी काहीतरी बडबडत होत्या बहुदा खल्डिअन शब्द असावेत
असह्य वेदना सहन करत मी अपराजिता दुर्गे च् स्मरण केल
दोघी बिचकून एकदम लांब उभ झाल्या खोलीला एक च् दार होत दारात शिवहरि खून शी चेहऱ्याने उभा होता अचानक जामिनीतून सडलेले दुर्गन्धी सकट हात बाहर येऊन त्या अनेक हातानी मला जमिनीत ओढ़ा याला सुरुवात केली होती
हात कसले ती काही हातावर त्वचा नव्हती आतली हाड दिसत होती काही त न रक्त
गळत होत शिवहरि हातात धारदार सुरा व् तोंडाने कही तरी पुटपुत होता अचानक दोघीनी मला धरून ठेवल शिवहरिने हातात ला सूरा घेऊन माझ्यावर झडप घातली पोटात असहय वेदनांचा डोम्ब उसळ ला असहय वेदनानी तड़फड मी खाली पडलो "स्वामी !", एवढेच शब्द उच्चा रु शकलो सगळ संपल होत त्रिशला माझ्या शिवाय कशी राहणार ह्या विचारात शुद्ध हरपली
डोळे उघड़ले तेव्हा मी माझ्या घरात बेड वर होतो हांताना जख्मा आणि पोटा वर व्रण म्हणजे म्हणजे मी जिवंत होतो तर...
रात्री चा 0130 उठालो स्वामी न च्या फोटोला नमस्कार केला पण नंतर झोप नव्हतीच् खरच मी नस ती उठाठेव करून बसलो होतो.
सकाळी उठुन आधी दादर च्या स्वामी महाराजांचे मंदिरात गेलो जरा वेळ शांतपणे बसून जप केला
इतक्यात खाडिलकर काका भेटले ,
"हे घे", अस म्हणुन त्यांनी एक कागद माझ्या हातात दिला "विनियोग वगैरे सगळ आहे त्यात",
काका मोठी अधिकारी व्यक्ति पण फारच थोड़क्या लोकांना ही माहिती होती
मठातून बाहर पडलो आणि अबु न चा फोन
"बरी आहे का पोटावर् ची जख़्म?"
"अबु माझी चूक झाली .... !!!", मी.
"किती वेळेला सांगितलय स्वामीं च्या निरोपा शिवाय ह्यात पडायच नाही ?",
अबु , मी चुकलो आता परत असे करणार नाही !!!"
"ठिक आहे ,आता काकां नी संगीतल्या प्रमाणे कर !"
"आणि तिथे जाण्या आधी 3 धारी लिम्बावर बीज त्रयी, म्हणुन ते जवळ ठेव",
"आणि ती समाधि आहे त्रिजटा अघोरी ची !!!", एवढ बोलून अबुन चा फोन बंद झाला.
समीर ला फोन करून शिवहरि आज बंगल्यावर येणार नाही अशी व्यवस्था करायला सांगितली दारू आणि बाई समीर न सगळ सेटिंग करून ठेवल होत.
हार्डवेयर दुकानातून मी दीड इंची जाड खिळे घेतले.
गोवंडी गाठल काकं नी दिलेल्या कागदावर अथर्व वेदतील काही ऋचा होत्या समीर गेट वर उभा होताच आधी वेदोक्त मंत्रोच्चार करत गेट च्या जमीनी लगत खिळे ठोकून गेट बांधल होत
आता शिवहरि ला आत येण शक्य नव्हतं पण तरीही तो पोहोचलेला तांत्रिक होता उद्याच्या अमावसेच्या आत सगळ संपवायच होत
बरोबर कोहळा आणला होताच सगळ्या बंगल्या च्या आठ ही दिशात वल्गा सूक्त म्हणत खिळे ठोकले होते दिग्बन्ध गरजेचे होते,
समीर चा फोन वाजला ,शिवहरी चा च् होता
"बाबा , सब ठीक है । आप चिंता मत करो, वो हरामी अवि अब इदर कभी आनेवाला नहीं ऐसी सेटिंग की है ।"
"हा जी ", हा, शाम को मैं गाड़ी भेज दूंगा ।
तळघराचा दरवाजा उघडला मनावर दडपण होत आत उतरलो दगडी तळघर दक्षिणेला त्रिजटा अघोरी ची समाधि वेदी वर सांडलेले वाळलेल्या रक्ता चे डाग एक उग्र दर्प ,आसन मांडल बीज मन्त्रोक्त उद पेटवला एक रिंगण आखुन समीर ला त्यात बसवल
"समीर काही ही दिसला तरी रिंगण सोडून बाहेर येऊ नकोस",
डोळे मिटून स्वामीं चे स्मरण करून वल्गा ची आवर्तन सुरु केली.
शर्वरी चा किंचाळ ण्याचा आवाज गड़गड़ त ती समाधि समोर येऊन पडली होती
तोंडाला फेस हातपाय वाकड़े
समीर रिंगण सोडून उठायच्या आधी च् मी समीर वर जोरात ओरडलो होतो
"समीर ती शर्वरी नाही लक्ष देऊ नकोस"
हळू हळु माझी भोवतालची जाणीव कमी होत चालली हाती
समाधि च्या आत आसान स्थ त्रिजटा !!!
वातावरणात असहय दुर्गन्धी
, त्रिजटा समाधि त न बाहेर आला होता, त्याच्या मगोमाग एक सडलेली बाई सरपट त बाहर तोंडाने विचित्र आवाज करत बाहर येऊन अंगावर थूंकली
त्रिजटा आड़दांड होता, तळघर पाण्या ने हळु हळु भरत होत छाती पर्यन्त पाणी आल होत
एकदम अंगावर धावून त्याने माझे डोक पाण्यात बुडवल होत अर्थात हे जाणीवेच्या वेगळ्या पातळी वार घडत होत,. कसा तरी प्रतिकार करत मी डोक पाण्या बाहर ठेवल. कोहळा हातात धरून त्रिजटा ची च् प्राणप्रतिष्ठा मी कोहळयात केली
पाणी गळ्या पर्यन्त आल होत पाण्यात असंख्य सरपटणारे जीव अंगावर चढ़त होते
आणि लाईट गेले मिट्ट काळोख नाका पर्यन्त पाणी, पाण्यात कोणाचे तरी हात अंगावरून फिरत होते पण हे सर्व भास होते याची जाणीव असली
स्वप्न पडतात तसे ध्याना च्या उच्च अवस्थेत मनाची पातळी किंवा awareness जस वाढत जातो तशी वेगळ्या प्लेन्स वरील दृश्य दिसणे एक साधारण गोष्ट असते पण भीती निर्माण करण्या चे सामर्थ्य त्यात असत.
मन्त्र प्रयत्न पूर्वक आठवावे लागत होते
वेळ घालवण्यात अर्थ नव्हता सुरी ने
कोहळा सहस्राक्षरी चा उच्चार करत मी आडवा कापला, विचित्र आवाज होत त्रिजटा कोसळ ला होता. आता पाणी सरपट णा रे जीव हात काही च् नव्हत ए का क्षणात सर्व दृश्ये नाहिशी झा ली होती.
समाधिला दुभंगून तिला चीरा पडला होता त्रिजटा चा हाडा न चा बसलेल्या अवस्थेतील सापळा वाकडा तिकड़ा होत अर्धवट बाहेर डोकावत होता
पण समोर त्रिजटा उभा होता पण आता त्याच्या डोळ्यात तिरस्कार नव्हता , मार्दव होत
,"मला कौतुक वाटत पोरा तुझ "
मला शंका यायला लागली होती ही त्रिजटा ची नवीन चाल तर नाही
"तू चुकीचा विचार करतो आहेस", त्रिजटा
"एवढं मोठ साहस", त्रिजटा .
"माझ कुठल साहस ही सगळी स्वामिन् ची कृपा !"
शिवहरी माझा शिष्य माझ्या कडून सगळ्या विद्या शिकला आणि एकदा मी ध्यान करत असतां ना माझी समाधी लागली डोळे उघडले तेव्हा त्रिजटा ने ही समाधि माझ्या भोवती बांधली व् माझ पूर्ण बंधन केल
"पण मग आता चे ते भीतिदायक दृश्ये" मी विचारले.
"तो शिवहरि चा दादर स्मशान भूमित बसून चाल लेला खेळ!!!"
"बंगल्याच् गेट तू बंधलेल असल्याने त्याला आत ये ण् शक्य नव्हतं कारण तुला ज्या ऋचा खाडिल कर काका नी दिल्य्या त्या अथर्व वेदातील भीषण कृत्या संहारक प्रयोग होते".
"पोरा तुझी मोठी मदत झाली, तांत्रिक फक्त राडे करतो हा आपल्या देशातील चुकीचा गैरसमज ह्या विद्येचा वापर करून लोकान् चे भले करणारे बरेच आहेत".
"आता समीर च्या हातून माझ्या remains वर अन्त्य संस्कार कर म्हणजे मला गती मिळेल !!!".
शिवहरि च्या पाशात मी पण फसलो
त्रिजटा चा वासना देह हवेत विरुन दिसे नासा झाला
समीर जागेवर च् बेशुद्ध पडलेला होता कागदा वरील उरलेल्या ऋचा म्हणत मी उद जाळत समाधि वर कपूर जाळून अग्नि प्रज्वलित केला.
।। अग्नि मि ळे पुरोहितं .... । होतारं ....।।
रुग्वेदातील पहिले च् सूक्त मी सस्वर म्हणून कापुर प्रज्वलित करत सूक्त संपवल.
अंगा वर ठीक ठिकाणी जखमा पाठीत असह्य वेदना हातात तील कोह ळा टाकला पण हात भाजले अस वाटत होत हे मात्र भास नव्हते.
घडयाळ बघितल अमावस्या सुरु व्हायला 15 मिनिटे शिल्लक होती
तळघराच्या दरवाजा आम्ही काढुन् च् ठेवला होता
तळ घरातुन बाहर आलो अबु नी संगीतल्या प्रमाणे त्या त्रिजटा च्या अवशेषां चे विधिपूर्वक दहन गोवंडी च्या स्मशान भुमीत समीर च्या हातून करवुन घेतले
घाटकोपर ला आलो पण तीन महीने बिछान्या ला खिळून होतो , शेवटी अबु नी स्वतः घाटकोपर ला येऊन आयुर्वेदिक औषधे आदि नी बर केल होत
समीर ने ती जागा विकून टाकली दोघां नी मेडिकल दुकाना चा व्यवसाय बंद केला होता, शिवहरि त्या दिवसा पासून कधी दिसला नाही
दादर च्या मठात जवळ जवळ तीन महीन्या नी आलो होतो.
डोळे मिटून स्वामीं चे ध्यान करता करता तन्द्रित त्रिजटा स्वामी महाराजांचे पाया पाशी बसलेला होता आणि कृपा मूर्ति स्वामीं च्या चेहेऱ्या वर मंद स्मित झळकत होते असे दृश्य स्वप्नवत दिसले व् नाहिसे झाले.
शेवटी शिवहरि च्या बंधनातून तुन त्रिजटा ची सुटका झाली अस मला वाटल .
"त्रिजटा तिबेटियन black cult मधला ज्या पन्था ची मदत अडोल्फ हिटलर ने सुद्धा घेतली होती !!!! , होता मोठा तांत्रिक पण फसला, ...... पुण्यास आलास की त्रिजटा ची गोष्ट मी तुला सांगेन अस अबु नंतर मला फोन वर म्हणाले" आता वेध पुण्या चे !!!!.....
गोष्टी चे नाव बदल ले आहे
गोष्टी चे नाव बदल ले आहे कृपया नोंद असावी
मस्त
मस्त
मध्ये मध्ये एडीटींग करून कथा
मध्ये मध्ये एडीटींग करून कथा कापल्यासारखी वाट्ते , बाकी लिखाण उ त्त म !....
मला काही कळलचं नाही
मला काही कळलचं नाही
खुप्च सुन्दर....तुम्हि
खुप्च सुन्दर....तुम्हि स्वतःहा....हे करता का ????