पाकिस्तान : जगा समोरच नविन आव्हान !!
सध्या ईराक मध्ये उत्तेरकडचा बराच मोठा भाग जो ISIS बळकावलेला होता तो आता थोडा थोडा करत इराकची सेना परत मिळवत आहे. आता इराक मधल्या दुसर्या सर्वात मोठ्या शहरात (मोसुल) सध्या ISIS विरुद्द बाकिचे अशी लढाई सुरु आहे. ह्या बाकीच्यात इराकी सैन्य , तुर्कीच सैन्य, पाशमर्गा लढाकु, यझदी सैनिक व त्यांच्या सोबत अमेरिकन हवाई दल.
ईराकच्या पुर्वेला सिरीया तर पश्चिमेला ईराण आहे खाली सौदी अरेबिया तर वरच्या बाजुला तुर्की आहे. ईराक मध्ये ISIS घुसली सिरिया मधुन त्याम्ना साथ द्यायला ईराक मध्ये ही लोक होतीच. ईतके देश आजुबाजुला असताना इराक विरुद्ध ISIS च्या युद्दात कोणी पडु ईच्छीत नाही.
आता अशी न्युज आहे की , पाकिस्तानची ISI ही संघटना ह्या ISIS वाल्या अतिरेक्यांना पाकिस्तान मध्ये बोलवत आहे. म्हणजे मोसुल मधुन फरार झालेले अतिरेकी आता आपल्या शेजारी दिसणार आहेत. पाकिस्तानात सर्वात सेफ जागा म्हणजे पाक व्याप्त काश्मिर , तिथेच हे लोक रहाणार !! त्यांना आश्रय देण्यामागे एकच अट आहे, ती म्हणजे ISIS भारता विरुद्ध अॅटॅक करायचा. ही बातमी विदेशी वृत्त पत्राच्या हवाल्याने झी टीव्हीने दिलेली आहे.
http://bostonreview.net/world/c-christine-fair-isis-pakistan-militant-fo...
https://www.youtube.com/watch?v=eUxKaia1YIA
जस आता सध्या ईराक मध्ये चाललेल्या युद्धात कोणता ही देश ईराकचा साथ देत नव्हता तेच भारता बरोबर होत आहे. होणार !!
भारत पाकिस्तान विरुद्ध गळा फोडुन काही दशक सांगत आहे, कोणत्याच देशाने काय पण युन ने सुद्धा त्याला
मानलेल नाही. आताच गोव्यात पार पडलेल्या ब्रिक्सच्या काँफ्रेन्स मध्येही ईतर देशांनी पाकिस्तान हा एक अतिरेकी देश आहे अस म्हणुन मान्यता द्यावी भारताने आग्रही भुमिका मांडलेली आहे.
ब्रिक्स मधल्या ईतर देशाना ह्याची झळ बसणार नाही म्हणुन त्या देशांनी भारताच्या मागण्यांना मानलेले नाही,
पण आता आणी भविष्यात भारताला पाकिस्तानपासुन स्वत:च्या सुरक्षिततेचा उपाय करावा लागणारच आहे.
पाकिस्तानात जर ISIS अतिरेकी आले व त्यांनी आपल्या अत्याधुनिक शस्त्रांनी भारताच्या सीमेवर , शहरांवर हल्ले सुरु केले तर आपण काय करु शकतो. हे सर्व सुरु होण्या पुर्वि काय काय करु शकतो. पाकिस्तान देशावर दबाव टाकण्यासाठी काय काय करता येईल !! तिथे काही सर्वच लोक खुनशी नाहीत मग कोणीतरी ह्याच्या विरुद्ध काही तरी करेलच का ?
नजदीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या ह्या नविन घटनेकडे बघताना एक भारतीय म्हणुन आपण काय करु
शकु ? भारत सरकार काय करायच ते करेलच ! पण एक जवाब्दार नागरीक म्हणुन आपली सुद्धा काही जवाबदारी
आहेच !!
नुसते प्रश्न काय
नुसते प्रश्न काय विचारता?
एखादा पॉईंट तुम्ही पण लिहा ना, म्हणजे आमच्याही डोक्याला चालना मिळेल.
तुम्ही धागा काढण्याशिवाय दुसरे काय करू शकता?
माझं प्रामाणिक उत्तर, मी
माझं प्रामाणिक उत्तर, मी काहिही करू शकत नाही.
नेटवर वगैरे लिहू शकते.
पण सरकारात माझ्यापेक्षा हुशार लोक याबाबत चर्चा करण्यासाठी, डिसीजन घेण्यासाठी बसलेले आहेत.
एक सामान्य नागरिक म्हणून आपण याबाबत काहिही करू शकत नाही.
ते तेवढेच करतात ...
ते तेवढेच करतात ...
लेख वाचता पाकिस्तान : जगा
लेख वाचता
पाकिस्तान : जगा समोरच नविन आव्हान !!
या ऐवजी
भारतासमोरचे नवीन(?) आव्हान असे शीर्षक हवे ना
आपल्याला काय करता येईल यावर मात्र विचार करावा लागेल, उगाच भवानेच्या भरात काही टंकायला नको.
पण पर्सनली मला वाटते की आरपारची लढाई करण्यापेक्षा किंवा त्यांना आणखी चिथवण्यापेक्षा जे गेले काही दशके केलेय म्हणजे हे प्रकरण झुलवत खेळवत राहणे हिच योग्य पॉलिसी आहे. ते येडे लोकं आहेत. टाकलाच एखादा अणोबॉम्ब किंवा केलाच एखाद्या जैविक अस्त्राचा वापर, भले मग आपण त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचे नामोनिशाण मिटवून टाकू पण एकूणच गोळाबेरीज करता आपल्याला भोगावे लागणारे नुकसान जर जबरी आणि दिर्घकालीन असेल तर काय फायदा? पाकिस्तान जिंकून करणार काय? उगाच उरलेसुरलेही आपल्या डोक्याला तापच बनून राहणार.
<<<<<< तुम्ही धागा
<<<<<< तुम्ही धागा काढण्याशिवाय दुसरे काय करू शकता? >>>>>
साती ताई
हा काय प्रश्न आहे ?
ह्या पुर्वी माझा कोणता धागा तुम्ही वाचलेला आहे ?
आता पर्यंत तर मी एकही धागा काढलेला नाही. पहीलाच काढला तर तुम्ही डायरेक्ट आरोपच करत आहात ?
तुमचा लाडका दिवसा गणिक धागे विणत असतो त्याला मात्र तुम्ही काही बोलत नाही, उलट थोडे दिवस धागा आला नाही तर आस्थेने त्याच्या तब्येतीची विचारपुस करता !! ये ना चॉलबे !! ये नाईंसाफी ह्य !!
इथे मी काही लिहिलं होतं का
इथे मी काही लिहिलं होतं का मघाशी?
या आधी काय लिहिलं याचा काय
या आधी काय लिहिलं याचा काय संबंध?
'याबाबतीत तुम्ही धागा काढण्याव्यतिरीक्त काय करू शकता अशी एखादी कल्पना सूचवा ' अस म्हणत्येय मी.
कळलं का? की इंग्रजीत सांगू?
kindly suggest one or more ideas about what can you do in this case more than starting a new thread?
झाडू, मलाही असंच काहीसं
झाडू,
मलाही असंच काहीसं वाटतंय.
मी एक शहाण्णव कुळी चित्पावन
मी एक शहाण्णव कुळी चित्पावन नवकोळी ब्राह्मण आहे. सो, धागा विणने हा माझा छंद आहे

यावर उपाययोजना म्हणून तुम्हीही जर - "ऋन्मेष : मायबोली समोरच नविन आव्हान !!" असा तुमच्या आयुष्यातील दुसरा धागा काढून लोकांनाच सल्ले विचारणार असाल तर तुमच्यात आणि माझ्यात फरक काय उरला असे बहुधा त्यांना म्हणायचे आहे
असो,
त्यादिवशी न्यूजहंट मध्ये बातमी वाचलेली, मोदीही म्हणाले की मला युद्ध नको बुद्ध हवाय.
प्रश्न ना चर्चेने सुटणार ना शांततेच्या मार्गाने, पण चाणक्यनितीने नक्की सुटेल. सध्याच्या सरकारने सर्जिकल स्ट्राईकला प्रसिद्धी देण्याची निती अवलंबली आहे ती मला पर्सनली चूकीची स्ट्रॆटेजी वाटतेय. अश्या कारवाया सुमडीत करून शांत राहणेच योग्य होते. असो, डिट्टेलवार लिहू शकतो, पण हे मत स्पष्ट सांगायची चोरी झालीय सध्या. कारण आपण जाणताच. या भारतात आधीच जाती धर्म कमी होते जे आता पुन्हा दोन जातीत लोकांची विभागणी होऊ लागलीय. एक देशभक्त, आणि एक देशद्रोही
<<< अश्या कारवाया सुमडीत
<<< अश्या कारवाया सुमडीत करून शांत राहणेच योग्य होते >>>>
काय योग्य होते हे आता सांगुन उपेग नाही.
अश्या कारवाया सुमडीत करायचा टाईम केंव्हाच निघुन गेलाय !!
प्रश्न तेंव्हा मागे अश्या कारवाया का केल्या गेल्या नाहीत हा आहे !! मग भले त्या सुमडीत का होईना !!
आणी त्या कारवाया म्हणजे नुसतेच कारवाया नसुन "कंबरडे मोडुन टाकायच्या" प्रकाराच्या पाहीजे होत्या !!
आता कारवाई केली बरका !! अस म्ह्णुन आता करुन त्याचा गाजावाजा केला गेलाय !
जर अश्या कारवाया जर पुर्वी केल्या असत्या तर भारताला सॉफ्ट स्टेस असा शिक्का बसला नसता !!
रस्त्यावरचा रोड रोमियोसुद्धा प्रतिकार केला नाही तर चेकाळतो,
पुढे होऊन दोन ठेवुन दिल्या ना मग कसा वठणी वर येतो,
त्याच्या कानात जाऊन सांगीतल की तुझ्या वागण्याचा तिव्र निषेध आहे मग तो कसा येणार वठणीवर ?
मिलिंद जाधव >> ISIS ने
मिलिंद जाधव >> ISIS ने भारताविरुद्ध कारवाया सुरु करण्यासाठी त्यांना पैसे लागतील. कारण ISIS ची सद्ध्या पिछेहाट होते आहे. त्यांचे अनेक म्होरके मारले गेलेत आणि नेतृत्वात पोकळी निर्माण झाली आहे. ह्याचा अर्थ त्यांना चालवणारे जे खरे सूत्रधार आहेत त्यांना ते पैसे पुरवावे लागतील.
ह्या सुत्रधार देशांना भारता विरुद्ध कारवाया करण्यात "रस" आहे का हा कळीचा मुद्दा कळीचा मुद्दा आहे. इस्लाम आणि शरियाचे राज्य आणणे असा वरकरणी अजेंडा दिसत असला तरी खरा अजेंडा आहे त्यामागुन तेल, जमीन आणि प्रगत देशांविरुद्ध राजकारण करणे. तो अजेंडा भारता विरुद्ध जसाच्या तसा लागू होणार नाही.
ISI ढीग बोलवेल ISIS वाल्यांना पण ISI ला त्यांना पैसा पुरवणे जिकीरीचे आहे. कारण सद्ध्या जगभरात पाकिस्तान विरुद्ध मत बनले आहे. आणि शेवटी पाकिस्तान अशा कारवायांना जे पैसे वापरतो ते अमेरिकेकडून आलेल्या मदतीतले असतात हे सुद्धा जगजाहीर आहे. अमेरिकेतच आता त्याबद्दल आवाज उठवला जातोय आणि धोरणांचा फेरविचार केला जातो आहे. तेव्हा दिल्या जात असलेल्या पैशाचा पुर्ण हिशेब ह्यापुढे मागितला जाईल.
ISI व ISIS ची अशी युती होऊन भारताला त्याची कट कट होणे अमेरिकेला आवडणार नाही कारण १. त्यांना चीन ला शह देण्यासाठी भारताचा वापर करायची ईच्छा आहे आणि २. स्वतःच्या भांडवली बाजारासाठी भारतीय नवसंपन्न वर्गाची वाढती आर्थिक पत खुणावते आहे. त्यामुळे अशी काही युती झाल्याचे ध्यानात जरी आले तरी अमेरिका पाकिस्तानची मदत थांबवून भारताला जास्त मदत देईल. (असे सद्ध्या तरी चित्र आहे)
जिहाद आणि इस्लाम च्या नावाखाली पाकिस्तान किती ISIS वाल्यांना भारताविरुद्ध भरीस पाडू शकेल ते देवच जाणे. पण तसे झाल्यास भारताला अमेरिकेकडून आणि इतर जगातूनही बरीच आर्थिक, संरक्षणात्मक आणि राजकिय मदत मिळेल असे माझे मत आहे.
त्याच्या कानात जाऊन सांगीतल
त्याच्या कानात जाऊन सांगीतल की तुझ्या वागण्याचा तिव्र निषेध आहे मग तो कसा येणार वठणीवर ?
>>>>
मी काय म्हणालो आणि तुम्ही काय उदाहरण दिले.
पुन्हा वाचून बघता का माझी पोस्ट?
चौकट राजा, पटण्यासारखे
चौकट राजा, पटण्यासारखे स्पष्टीकरण.
चौकट राजा मुद्देसुद लिहीले
चौकट राजा मुद्देसुद लिहीले आहेत.
आजची बातमी... BSF kills 7
आजची बातमी...
BSF kills 7 Pakistani Rangers, 1 terrorist in 'retaliatory firing' in Jammu
या वेळेच्या बातमीत मारलेले लोक केवळ "अतिरेकी" नसून आपल्या बीएसएफ च्या प्रमाणे पाकिस्तानातील "पाकिस्तानी रेंजर्स" या अर्धसैनिकदलाचे सैनिक आहेत, हे फार महत्वाचे आहे.
असे करायला उघड परवानगी मिळणे आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे त्याची उघड बातमी देण्याची परवानगी मिळणे हे या लेखात अधोरेखीत केलेल्या "राजकीय इच्छाशक्ती असण्याचे व ती वापरण्याची धमक असल्याचे" लक्षण आहे. सर्जिकल ट्राईकचा असा पाठपुरावा (फॉलो अप) करने हे एक अत्युत्तम सामरिक-राजकिय-मुत्सद्दी पाऊल आहे.
पाकिस्तानमध्ये वर वर काहीही देखावा चालला असला तरी पाकिस्तानी सैन्य (आणि त्याचा खास विखारी भाग असलेली आयएसआय ही संस्था) सद्यातरी पाकिस्तानमधले सर्वेसर्वा आहेत हे उघड गुपीत आहे. त्याचबरोबर, पाकिस्तानमधल्या जनमानसात "जिसकी लाठी उसकी भैस" ही सद्य व्यवस्था (अगतिकतेने का होईना) खोलवर रुजली आहे.
पाकिस्तानच्या सैन्याची जनमानसवरची पकड "बाहुबली" प्रकारची आहे. अश्या परिस्थितीत, आपल्या अजेयत्वाचा (भारतापेक्षा व कोणत्याही अंतर्गत शक्तीपेक्षा पाकिस्तानी सैन्य जास्त ताकदवान असल्याचा; व त्याला हात लावण्याचा यापैकी कोणीही प्रयत्न करणार नाही हा) भास कायम ठेवणे, पाकिस्तानवर आपली पकड कायम ठेवण्यासाठी, पाकिस्तानी सैन्याकरिता अत्यावश्यक आहे.
जनमानसातून उतरलेल्या "तथाकथित अजेय" लष्करी सत्तांचे काय होते याची उत्तम उदाहरणे, काही कालापूर्वी झालेल्या अरब स्प्रिंगमध्ये, ट्युनिशिया, इजिप्त व लिबिया या देशांमध्ये पहायला मिळाली आहेतच.
त्यामुळे, उरी हल्ल्याचा बदला घेणे हे सर्जिकल स्ट्राइकचे तात्कालिक महत्वाचे कारण असले तरी, त्यापुढे जाऊन भारत-पाकिस्तान सीमा, ताबारेषा व जम्मू-काश्मीरमध्ये जी कारवाई चालली आहे ती "पाकिस्तानी सैन्य अजेय आहे व ते स्वतःच्या देशात व सीमेपलिकडेही मनात येईल ती उघड-गुप्त कारवाई करू शकते" हा जनमानसातील गैरसमज दूर करण्यासाठीची उत्तम रणनीती आहे.
यापुढच्या काळात "ती प्रतिमा भ्रामक असल्याचे सिद्ध करत राहणे हा भारताचा प्रयत्न राहील" आणि "आपल्या अजेयत्वाची प्रतिमा कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याची धडपड चालू राहील". ती धडपड, 'शेवटचे आचके' ठरविण्यात, भारतीय रणनीतीज्ञ जेवढे यशस्वी होतील तेवढे भारताच्या भविष्याच्या दृष्टीने, पाकिस्तानी जनतेच्या दृष्टीने, दक्षिण आशियाच्या दृष्टीने आणि एकंदर जगाच्या दृष्टीने चांगले होईल.
१. भारताने सर्जिक स्ट्राईक्स
१. भारताने सर्जिक स्ट्राईक्स केले असे अधिकृत स्तरावर व माध्यमांत त्या कारवाईचा मुख्य असलेल्या अधिकार्याकरवी (डीजीएमओ) उघडपणे व स्पष्टपणे सांगितले.
२. "सर्जिक स्ट्राईक्स झाले नाहीत" (साध्या शब्दांत सागायचे झाले तर : "भारताने आमचे नाक कापले नाही") हे सांगण्याचा आटापिटा सैन्याने केला आणि जगापुढे विनोदी दिसत असला तरीही, तसाच आटापिटा पाकिस्तान सरकारकरवी करून घेतला.
३. चीन वगळता जगातल्या सर्व महत्वाच्या देशांनी भारताच्या शब्दावर विश्वास ठेवला आहे व पाकिस्तानला अतिरेक्यांना मदत न करण्याचा सल्ला दिला आहे.
३. सीमेवरील कारवाया, सद्याची बीएसएफची कारवाई, काश्मीरमधल्या अतिरेकीविरोधी कारवाया, इत्यादी माध्यमांत आकड्यांसकट अधिकृतपणे प्रसिद्ध करणे, ही सुद्धा सर्जिकल स्टाईक्सचा पाठपुरावा आहे.
४. या बातम्या जेवढ्या जास्त प्रमाणात "पाकिस्तानमधील जनमतावर प्रभाव असणार्या सुबुद्ध व महत्वाच्या व्यक्ती" आणि "एकंदर सर्वसामान्य जनता" यांच्यापर्यंत पोहोचतील, तितका पाकिस्तानी सैन्याच्या अजेयतेचा पाकिस्तानी जनमानसावरचा प्रभाव कमी होत जाईल.
साभार : वरचे दोन्हीही लेख डॉ
साभार :
वरचे दोन्हीही लेख डॉ सुहास म्हात्रे यांनी मिसळपाव वर लिहीलेले आहेत.
चौकट राजा मुद्देसुद लिहीले
चौकट राजा मुद्देसुद लिहीले आहेत.