जगाच्या पर्यटक नकाशामध्ये ठळकपणे चमकणारी वेरूळ आणि अजिंठा हि दोन नावे म्हणजे मराठवाड्याच्या केंद्रस्थानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचे कंठमणीच. महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी फिरलो पण विदर्भ आणि मराठवाडा राहिलेला. यावर्षी ऑफिसच्या कामासाठी फेब्रुवारी महिन्यात नागपुरला जाणे झाले आणि ऑगस्ट महिन्यात आलेल्या सलग सुट्ट्यांचा फायदा घेत औरंगाबाद भटकंतीचा बेत ठरवला. नेटवर सर्च करून आणि औरंगाबादच्या मायबोलीकर डॉ.मानसीताई (सरीवा) यांच्याकडुन अधिक माहिती घेऊन (मायबोलीकर मानसीताई यांच्या घरचा पाहुणचार हा वेगळ्या धाग्याचा विषय होऊ शकतो. ) ५ दिवसाचा (पुण्याहुन) बेत आखला गेला. मुंबईहुन मी, संदीप, समीर आणि पुण्याहुन दिपक त्याच्या कारसोबत असे ४ जण फिक्स झालो. प्रवासाचा बेत साधारण असा होता.
मुंबई - वाकड (पुणे) - रांजणगाव महागणपती - अहमदनगर मार्गे - देवगिरी किल्ला, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, बिबी का मकबरा, पाणचक्की, मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), जिजाऊ स्मृती (सिंदखेड राजा), लोणार सरोवर (बुलडाणा) - जायकवाडी धरण, संत एकनाथ समाधी मंदिर, संत एकनाथ वाडा, नाग घाट, पैठण - अहमदनगर मार्गे रांजणगाव महागणपती - वाकड (पुणे) - मुंबई.
दिवस पहिला-
सकाळी पाच वाजता वाकड (पुणे) हुन औरंगाबादला निघालो. साधारण १०:३० - ११ वाजता औरंगाबादला पोहचलो.
तासभर आराम करून देवगिरी किल्ला पाहिला.(पूर्ण दिवस)
दिवस दुसरा:-
सकाळी लवकर उठुन घृष्णेश्वर मंदिर, वेरूळची लेणी. संध्याकाळी ५ वाजता बिबी का मकबरा
दिवस तिसरा:
सकाळी लवकर उठुन बीड बायपास मार्गे लोणार सरोवर आणि संध्याकाळी पुन्हा औरंगाबाद परत.
दिवस चौथा :
अजिंठा लेणी (पूर्ण दिवस)
दिवस पाचवा :
औरंगाबाद - पैठण (जायकवाडी धरण, संत एकनाथ समाधी मंदिर, संत एकनाथ वाडा, नाग घाट) मार्गे पुणे व रात्री मुंबई.
प्रवासाचे साधनः- दिपकची कार
राहण्याचे ठिकाणः Tourist Home, औरंगाबाद रेल्वे स्टेशनजवळ, पैठण रोड.
राहण्याच्या खर्च- ७०० रू.प्रत्येक दिवसाचे Twin Sharing Basis, Non AC
औरंगाबादविषयी थोडे:-
औरंगाबाद हि साक्षात इतिहास नगरीच आहे. कोरीव लेण्यांच्या रूपाने ती इसवीसनपूर्वीचा इतिहास सांगते तर नंतरचा मुस्लीम राजवटींचा इतिहास आजही इथल्या ऐतिहासिक वास्तुंच्या रूपाने बोलत असतो. पश्चिम भारतातील चार बलाढ्य राजवंश म्हणजे सातवाहन, राष्ट्रकूट, यादव आणि अगदी शेवटीच्या मुस्लीम शाह्या. त्यांच्या राजधान्या अनुक्रमे पैठण (प्रतिष्ठान), वेरूळ (एलापूर), देवगिरी आणि शेवटी औरंगाबाद ह्या परिसरातच नांदल्या. त्यामुळे इतिहास ह्या नगरीच्या रोमारोमात भिनलेला जाणवतो. पूर्वी औरंगाबाद शहराला ५२ दरवाजे होते असे इतिहास सांगतो. त्यांची आठवण देत आजही दिल्ली गेट, भडकल गेट, पैठण गेट, मकई गेट इ. प्रशस्त प्रवेशद्वारे उभी आहेत.
अजिंठा, वेरूळ लेणी, बिबी का मकबरा, पाणचक्की, देवगिरी किल्ला, पैठण अशा विविध पर्यटन स्थळांनी नटलेल्या व ५२ दरवाजांचे शहर नावाने ओळखल्या जाण्यार्या या ऐतिहासिक नगरीचा हा छोटासा चित्र परिचय.
अजिंठा लेणी
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०३
प्रचि ०४वेरूळ लेणी
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
देवगिरी किल्ला (दौलताबाद)
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७बिबी का मकबरा
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०जायकवाडी धरण, पैठण
प्रचि २१
पाणचक्की
प्रचि २२लोणार सरोवर
खरंतर लोणार सरोवर हे बुलडाण्या जिल्ह्यात येते पण औरंगाबाद भटकंतीत लोणार सरोवर समाविष्ट केल्याने त्याचेही प्रचि औरंगाबाद भटकंतीत देतोय.
प्रचि २३
प्रचि २४औरंगाबादचा मशहुर तारा पानवाला
इतकं सुरेख पान या आधी कुठेच खाल्लं नाही. पान होतं की मलई. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळलं. अगदी १० रू. पासुन ५००० रू. पर्यंतचे पान उपलब्ध आहे. औरंगाबाद भटकंतीत आवर्जुन भेट देण्याचे एक ठिकाण म्हणजे तारा पानवाला.
प्रचि २५खादाडी
औरंगाबाद परिसरात खादाडीची अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यात आम्ही भोज रेस्टॉरण्ट (अप्रतिम राजस्थानी थाळी), शेगाव कचोरी सेंटर, देवगिरीच्या रस्त्यावरील शेळकेमामा ढाबा (यातील शेवगा हंडी आणि फोडणी दिलेलं पिठलं अप्रतिम), फौजी ढाबा, सिंदखेड राजा गावच्या आधी एक छोटासा ढाबा आहे त्यातील शेव भाजी आणि वांग अप्रतिम. औरंगाबादला आलात आणि भोले शंकर चाटवाला येथे भेट न दिलीत तर तुमची औरंगाबाद भटकंती व्यर्थच. अप्रतिम चवीचं शेवपुरी, रगडा पॅटिस, भेळ इ. पदार्थ येथे मिळतात.
प्रचि २६शेवभाजी
प्रचि २७चला औरंगाबाद भटकंतीला
प्रचि २८
प्रचि २९(क्रमशः)
मस्त झालीये भटकंती . फोटोही
मस्त झालीये भटकंती . फोटोही मस्त आलेत
निव्वळ खतरनाक. चलो औरंगाबाद.
निव्वळ खतरनाक. चलो औरंगाबाद. मस्त आलेत प्रचि.
सुरेखच. मघई पानांची जोडी
सुरेखच. मघई पानांची जोडी पाहून तोंडाला पाणी सुटले.
जबरदस्त फोटोज , डोळे तृप्त
जबरदस्त फोटोज , डोळे तृप्त झाले.
फार सुंदर आलेत फोटो योगेश .
फार सुंदर आलेत फोटो योगेश .
अप्रतिम फोटो सर्वच. खादाडीचे
अप्रतिम फोटो सर्वच.
खादाडीचे फोटो बघून भूक लागली आणि पान तर आहाहा.
सुंदरच... वेरुळच्या देवळाची
सुंदरच... वेरुळच्या देवळाची भव्यता अगदी जाणवतेच आहे. औरंगाबादला माझे कामानिमित्त जाणे झालेय पण तूझ्यासारखे प्लान करुन फिरणे नाही झाले, आता हि मालिका बघुन नक्कीच परत जायला हवे ( खरे तर यातले काहीच बघितलेले नाही मी )
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता हि मालिका बघुन नक्कीच परत जायला हवे >>>>>दिनेशदा, नक्की प्लान करून जा. आम्हाला ५ दिवसही कमी पडले
औरंगाबाद लेणी, म्हैसमाळ, अंतुर किल्ला इ. बघायचे राहिले. मला प्रचंड आवडलं औरंगाबाद. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तारा पान सेंटरची तर बातच और
तारा पान सेंटरची तर बातच और आहे. एकदा मी क्लास बुडवून गफे ला तारा येथे बोलावले आणी गप्पांच्या ओघात एक एक वेगवेगळ्या पद्धतीचे पानाचा आस्वाद घेत २ तास कसे गेले हे कळलेच नाही. जेव्हा बिल विचारले तर झाले होते रु. ५४०. बिल तसे थक्क करणारेच होते माझ्यासाठी कारण मी फार फार तर २ पान खात तिला घेऊन लक्की ज्यूस सेंटरला जाणार होतो. पण त्या पानांची मिठास आणी गफेचे ते सुंदर वाक्य ऐकुन चीज झाल्याचे वाटले. ती म्हणालेली "नेहमी तु पैसे इकडेतिकडे विनाकारण खर्च करुन पाण्यात घालत असतो. आज मात्र तु पानात घालवलेस". तिचा स्वभाव तसा कोटी करण्याचा नाहीये मुळी. सबब,तिचे हे वाक्य माझ्यासाठी खास आहे.
तसेही बिल दिल्यानंतर कॉम्लिमेंटरी म्हणुन "सईदभाईंनी" दिलेली २ चॉकलेट पानांनी अजुन रंगत आली.
औरंगाबादचे किस्से कैक आहेत. सावकाश लिहीलच.
तूर्तास,मुंबई लोकल एके लोकल. लोकल दुणे मेट्रो
@जिप्सी,पुढील खेपेला "सोनेरी
@जिप्सी,पुढील खेपेला "सोनेरी महल",पडेगाव येथे असलेले" शिव-पार्वतीचे" पुरातनकालीन मंदिर, विद्यापीठ परिसरातील "गोगा बाबा" ह्यांना सुद्धा पर्यटनातील देण्याजोगे ठिकाणात समाविष्ट करा.
औरंगाबाद मेरी जान फोटो मस्त
औरंगाबाद मेरी जान
फोटो मस्त आहेत. भोज, तारा पान, आणि भोला शंकर चाट बरोबर गायत्री ची कचोरी, उत्तम ची इम्रती अनिवार्य आहे. ते मिस केल्याबद्दल तुला पुन्हा एकदा औरंगाबादची सफर घडो.
विद्यापिठातला सोनेरी महाल, गोगा बाबा टेकडी, औरंगाबाद लेण्या राहिल्याच की. इतिहासात रस असणा-यांनी वेळ काढून औरंगाबादच्या जवळपास असणा-या अजून बाकीच्या छोट्या छोट्या ऐतिहासिक स्ठळांना भेट आवश्य द्यावी .
दरवाजांचे फोटो नाही काढलेस?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
तसे तर सिटी चौकातील "टिकीया
तसे तर सिटी चौकातील "टिकीया समोसा" सुद्धा राहीलाच की.
हा पदार्थ केवळ कट्टर मांसाहारी व्यक्तीसाठीच आहे. ज्यात नेहमीच्या समोस्यात कुस्करून टाकलेल्या बटाट्याऐवजी "बड्डेका" म्हणजे बैलाचे मांस टाकलेले असतात. (खखोदेजा)
ह्याासमोस्यानंतर तितक्याच उत्कट चवीचा "ईरानी चहा" अगदी मस्टच.
पुढे, "सागर" वा "जझिरा" मधील बिर्याणी दर सुभान अल्ला
अतिशय सुंदर फोटो . दिवाळीनंतर
अतिशय सुंदर फोटो . दिवाळीनंतर औरंगाबाद ला जायचा विचार आहे. वरील माहितीचा निश्चित उपयोग होईल. विशेषतः रूट ठरवताना. पैठण ला बाग आहे ती सुस्थितीत आहे का कि फक्त देऊळ च पाहण्याजोगे आहे ?
जिप्सी,लेख व फोटो
जिप्सी,लेख व फोटो नेहमीप्रमाणेच खास.
वरील प्रतिक्रीयांत राहून गेलेल्या गोष्टी,शूलीभंजन,परीयोंका तालाब,पैठणचे 'मऱ्हाठी'पैठणी केंद्र इ.बघण्यासाठी अजून एक दौरा मात्र करावाच लागणार आहे तुम्हाला!
फोटो सुंदर आहेत
फोटो सुंदर आहेत
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
_/\_ फोटो एकदम जबरदस्त
_/\_
फोटो एकदम जबरदस्त
वा झकास प्रचि खादाडीपण भारिच
वा झकास प्रचि खादाडीपण भारिच , पुढ्चा भाग पटापट येऊदे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
औरंगाबाद इतकं सुंदर
औरंगाबाद इतकं सुंदर नाहिच्चे... तु बनवलंस त्याला सुंदर...
औरंगाबाद इतकं सुंदर
औरंगाबाद इतकं सुंदर नाहिच्चे... तु बनवलंस त्याला सुंदर... +१
बाकी फोटो छान आलेत !
सुंदर फोटो आम्हि पनवेल -
सुंदर फोटो
आम्हि पनवेल - तळेगाव मार्गे औरंगाबाद
डे १ पाणचक्कि, मकबरा, जायकवाडी धरण
डे २ फक्त अजंठा
डे ३ देवगिरि, वेरुळ, घृष्णेश्वर मंदिर, निद्रा मारुति, शिर्डि मुक्काम,
डे ४ , येवला साडि खरेदि, त्रंबकेश्वर मुक्काम,
डे ५ घोटि मार्गे ठाणे - पनवेल केले होते
it was a great experience, specially Ajanta caves .
सुरेख प्रचि! वेरूळच्या
सुरेख प्रचि! वेरूळच्या प्रत्येक फोटोला आहा! होत होतं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१४ वा फोटो अप्रतिम
देखणे फोटो आहेत. म्हैसमाळ
देखणे फोटो आहेत.
म्हैसमाळ कराच. पावसाळ्यात तर एकदम अप्रतिम नजारा असतोय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रे...वाईड अँगल भारी आले
मस्त रे...वाईड अँगल भारी आले आहेत.
वाह! घृष्णेश्वरचा टॉप व्ह्यु
वाह! घृष्णेश्वरचा टॉप व्ह्यु सुंदर!
लोणारचा प्रचि २३ खासच...
इतकं इत्तंभूत आणि उपयुक्त
इतकं इत्तंभूत आणि उपयुक्त स्थलवर्णन मायबोलीवर प्रथमच आले असावे. कुठे रहावे, काय बघावे, काय खावे, कसे फिरावे - सगळंच! बरोबर खमंग फोटोंची फोडणी आहेच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान फोटो.... औरंगाबाद प्रथम
छान फोटो....
औरंगाबाद प्रथम चौथीत पाहिलं होत.
नंतर 5/6 वेळेस तरी जाणे, येणे झाले.
छान ऐतिहासिक शहर आहे.
वर्णन पण मस्त. आठवणी ताज्या झाल्या...
खूपच छान सादरीकरण व तितकीच
खूपच छान सादरीकरण व तितकीच पुढच्या भागाची उत्सुकता... !! दॅट्स जिप्सी !
काही फोटो तर कातिल आलेत एकदम... !!
मी नातेवाईक नाहीत अश्या
मी नातेवाईक नाहीत अश्या गावाला केलेली औरंगाबाद ही पहिली ट्रिप. तेव्हा पाहिलेली ही सर्व ठिकाणे पुन्हा बघून आठवणी ताज्या झाल्या. भोजची थाळी तेव्हाही खाल्लेली आठवते, आणि त्या रेस्तराँच्या शेजारचे प्रिन्ट ट्रॅवल हॉटेलमध्ये राहिलो होतो.
वाह!!! मी पण काढले होते फोटो
वाह!!! मी पण काढले होते फोटो अजिंठा वेरूळ भेटीत.. पर जिप्सी की तो बात ही कुछ और है!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages