Submitted by आर्फी on 24 February, 2009 - 13:22
अॅडमिन, नमस्कार.
कदाचित हे या आधीही चर्चिले गेले असेल, पण मला जाणवले म्हणून सांगतो.
"Group" देवनागरीत लिहिताना 'गृप' पेक्षा 'ग्रूप' असे बरोबर वाटते.
माझ्यामते English मध्ये 'ऋ' अक्षर नाही. त्यामुळे त्याचे 'गृ' असे जोडाक्षरही बरोबर वाटत नाही.
लोकांचं काय मत आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मलाही
मलाही याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
पण तुमचा मुद्दा पटला नाही. कारण इंग्रजीमधे अनुस्वार नाही, त्यामुळे "इंग्रजी" लिहिणे चुकीचे आहे का (फक्त "इन्ग्रजी" लिहिणे योग्य)?
पण गृप हा
पण गृप हा शब्दच कशाला हवा? गट, समूह हे समानार्थी शब्द आहेत की.. अॅडमिन, या व अशा शब्दांवर फेरविचार व्हावा ही विनंती.
----------------------
एवढंच ना!
आशूला
आशूला अनुमोदन.
गट अथवा समूह हे शब्द अधिक योग्य आहेत.
गृप हा
गृप हा शब्द आता मराठीत रुळला आहे. एखादा नविन शब्द प्रचलित करणे आणि रुळलेला शब्द सोडून दुसरा प्रचलित करणे यात खूप फरक आहे. आमचा एक मस्त समूह जमलाय असे आपण केंव्हा म्हणतो?
एखादा नविन
एखादा नविन शब्द प्रचलित करणे आणि रुळलेला शब्द सोडून दुसरा प्रचलित करणे यात खूप फरक आहे.>>
"समूह" नसेल तितका रुळलेला. पण गट हा तर किती नेहमीच्या वापरातला शब्द आहे! मग तसे असेल तर मराठीत लिहायची वाचायची हौसच कशाला हवी? बोलीभाषा वेगळी आणि इथे हा संदर्भ लिखाणाशी येतो.. म्हणजे ग्रुप हे एक सदर/नाव/विभाग आहे इथे.. तसं म्हटलं तर बाफ ला लोक बीबी म्हणतात.. पुण्यातले पुणेकर ला PP , सिंहगड रोड ला SG इतकंच काय तर लोक "मायबोली"चे लघुरुप करताना पटकन MB म्हणतात.. म्हणून आपण मायबोलीचे नाव MB ठेवणार का?
इतर लोक इथे जे लिहितात त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही पण व्यवस्थापनाकडून तरी असे होऊ नये अशी अपेक्षा बाळगली तर त्यात काही गैर नाही असे मला तरी वाटते. निर्णय तुमचाच आहे. चूकभूल द्या घ्या. (याला पण इथे CBDG म्हणतात बरं!)
----------------------
एवढंच ना!
आशूला परत
आशूला परत अनुमोदन
आशूला
आशूला पूर्ण अनुमोदन.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.
हो. आशूचे
हो. आशूचे म्हणणे पटते.
जाता जाता: 'इंग्रजी' बरोबर, 'इन्ग्रजी' नाही. रोमन लिपीत जरी अनुस्वार नसला आणि त्याऐवजी "n", "m" यांचा वापर होत असला, तरीही त्याचा उच्चार 'न' 'म' सारखाच होईल असे नाही. उदा. ink, launch चे उच्चार इन्क, लॉन्च ऐवजी इङक, लॉञच हे आहेत.
आपण देवनागरीत उच्चारानुसार लिहितो. अनुस्वार ही फक्त आपली सोय आहे; ञ, ङ, न, म, ण यांची जोडाक्षरे टाळण्यासाठी.
आणि अर्थातच, चूभूद्याघ्या..!
आशूला /
आशूला / आर्फीला अनूमोदन..
--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?
उदा. ink, launch
उदा. ink, launch चे उच्चार इन्क, लॉन्च ऐवजी इङक, लॉञच हे आहेत. >>
कुतुहल म्हणून हे कसे ठरवायचे ?
M-W च्या मते ink असे बोलतात. Pronunciation: \ˈiŋk\
मला वाटतं
मला वाटतं इथल्या 'ग्रुप' शब्दाला नुसता साधा मराठी पर्याय शोधायचा आहे असं नव्हे. हा ग्रुप याहू किंवा गूगलचे जसे 'ग्रुप' असतात तसा आहे/ असणार आहे. तसे असेल तर इंटरनेटवरच्या या याहू किंवा गूगल ग्रुपला जो अर्थ आहे तो पर्यायी शब्दातून सहजासहजी समजेल का हे पाहिले पाहिजे. पुन्हा आपण इथे त्याचे 'सदस्यत्व' घेतो. गटाचे, समूहाचे 'सदस्यत्व घ्या' हे नक्कीच प्रचलित नाही. फक्त जो 'गृप' असा शब्द लिहिलाय त्याऐवजी 'ग्रुप' असावा कारण त्याचा उच्चार आपण तसा करतो, 'ऋ' सारखा नाही.
बाकी लोक बीबी, सीबीडीजी, पीपी वगैरे म्हणतात त्याचा इथे काय संबंध मला कळले नाही. इथे लोक काय बोलतात आणि काय शब्द प्रचलित आहेत ते कधी साईटची रचना करताना विचारत घेतले जाईल असे वाटत नाही.
'समुदाय'
'समुदाय' घ्या मग.
कोणी गोंविंद घ्या च्या चालीवर.
समुदायाचे सदस्यत्व घ्या म्हणने उचित ठरेल, गटाचे म्हणन्या पेक्षा.
लालू, माझे
लालू,
माझे म्हणणे हेच होते, की गृप ऐवजी ग्रूप म्हणावे. पर्यायी शब्दाचा मुळात माझा आग्रह नाही.
असामी,
अनुस्वारानंतर येणार्या व्यंजनावरून जोडक्षर कशाबरोबर होते हे ठरते.
क वर्गातील (क, ख, ग, घ) व्यंजनांसाठी ङ, मंगल = मङगल,
च वर्गातील (च, छ, ज, झ) व्यंजनांसाठी ञ, वंचित = वञ्चित,
ट वर्गातील (ट, ठ, ड, ढ) व्यंजनांसाठी ण, उदा. कंटक = कण्टक,
त वर्गातील (त, थ, द, ध) व्यंजनांसाठी न, उदा. संत = सन्त,
प वर्गातील (प, फ, ब, भ) व्यंजनांसाठी म, रंभा = रम्भा इ.
M-W च्या मते ink असे बोलतात. Pronunciation: \ˈiŋk\ >>>>
)
ŋ वेगळा, n वेगळा.
honk, sing यांत 'ŋ' आहे, तर Anthony त 'n' आहे. (M-W च्याच मते!
ŋ वेगळा, n
ŋ वेगळा, n वेगळा. >> अहो म्हणूनच तर विचारले ना कि english शब्द देव्नागरीमधे लिहिताना मराठी व्याकरणाचे नियम कसे घुसडायचे ते ?
असामी, मी
असामी,
मी कुठे घुसडतोय व्याकरणाचे नियम? मी फक्त उच्चारानुसार तरी लिहा म्हणतोय.
अॅडमिन यांच्या 'इंग्रजी' की 'इन्ग्रजी' ला उत्तर दिले फक्त.
आणि अनुस्वाराचे स्पष्टीकरण दिले ते ही तुम्हाला 'कुतुहल' होते म्हणून.
झालंच तर तुम्ही दिलेला M-W चा संदर्भ अतिशय बरोबर आहे. मी त्यापुढे दिलेली उदाहरणे त्याच्या पुष्ट्यर्थच आहेत, विरोधात नाहीत.
अनुस्वारा
अनुस्वाराचे नियम आहेत हे माहिती आहे उदा.वर दिलेले क वर्गातील (क, ख, ग, घ) व्यंजनांसाठी ङ.
पण र जोडाक्षर म्हणून वापरताना क्रु आणि कृ याचे कुठले नियम आहेत?
व्वा! इकडे
व्वा! इकडे काय छान "गॄप" मधे चर्चा चालू आहे!!
अगदी गॄपिझमच वाटतोय!
Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!!
आर्फी,
आर्फी, चांगली माहिती देतो आहेस तू..
मी कुठे
मी कुठे घुसडतोय व्याकरणाचे नियम? मी फक्त उच्चारानुसार तरी लिहा म्हणतोय. >>अरे नाही तोच तर प्रकार मला कळत नाही. म्हणजे असे बघ ink हा शब्द घेतला, तर मूळ शब्द english आहे तेंव्हा, त्याचा उच्चार english उच्चार धरला पाहिजे. जो iŋk आहे. ŋ हे velar nasal आहे, ज्याचे mapping देवनागरीमधे ङ्ग ला होते (IPA) प्रमाणे.
group चा उच्चार grüp आहे. त्याचे असे mapping नाही. म्हणून देवनागरी नियम लावायचा का ?
--------------------------------------------
जर लावायचा असेल तर .....
'गृ' हे अक्षर 'ऋ' जोडक्षरामूळे येते. 'ऋ' हा बहुधा मूर्धास्थानाचा स्वर धरतात नि त्याचा उच्चार थोडाफार अर्ध्या रफारासारखा पण असतो पण खेचला जाऊ शकतो. (म्हणजे नक्की कसा ही मला लिहिता येत नाही). त्यामूळे "Group" चा उच्चार तसा आहे का बघायचे ठरवले तर मला तरी त्यात ठाम उत्तर काढता येत नाही. कदाचित फ ला जमेल. And that will be the answer.
नियम मला
नियम मला नाही माहित, मी फक्त उच्चारावरुन म्हटलं की ते 'ग्रुप' हवं (गृप किंवा ग्रूप पण नाही). 'ग्रु' म्हणताना ओठांचा चंबू होतो, 'गृ' किंवा 'ऋ' म्हणताना होत नाही.
यापूर्वी सगळीकडे तो 'ग्रुप' असाच लिहिलेला पाहिलाय. 'गृप' तर मी प्रथम मायबोलीवरच पाहिला.
हिंदी, मराठी वृत्तपत्रांतही तो 'ग्रुप' असतो. उदा. टाटा ग्रुप, टाईम्स ग्रुप इ.
Mapping>> माझ्या
Mapping>>
माझ्यामते 'ऋ' चं mapping नसावं. कारण map करण्यासाठी त्याच उच्चाराचा ध्वनी English मध्ये नाही.
(एका भाषेतले सगळे स्वर/व्यंजनं दुसर्या भाषेत असतीलच असं नाही.
उदा. German भाषेतले ü आणि ö आपल्याकडे नाहीत.)
लालू,
होय, तुमचं बरोबर आहे. मी ही फक्त उच्चारावरूनच म्हणत होतो.
पण 'ग्रुप' नाही. मी ही पूर्वी 'ग्रुप' म्हणायचो. ते बरोबर नाहीये.
ग्रूप. ऊ दीर्घ. तोच खरा उच्चार आहे. (कुठल्याही Dictionary चा संदर्भ.)
>'ग्रु'
>'ग्रु' म्हणताना ओठांचा चंबू होतो, 'गृ' किंवा 'ऋ' म्हणताना होत नाही.
बरोबर. हृदय, कृष्ण, मृत याला तुमचा नियम बसेल.
पण मग आकृती म्हणताना चंबू होतो का नाही? आपण आक्रती किंवा आक्रुती लिहित का नाही?
ग्रुहपाठ का नाही , गृहपाठ का आहे? का अर्धाच उच्चारलेला उ असा काही स्वर(ऋ) आहे जो फक्त र बरोबर वापरतात? हिंदीमधे बर्याचदा मृ चा उच्चार म्रि जवळ जाणारा करतात (उदा. तुम्हारी अम्रिता, क्रिष्ण ) तो जास्त योग्य आहे?
म्हणजे
ग + र् + अ = ग्र
ग + ऋ = गृ
ग + र् + उ = ग्रु
ग + र् + ऊ = ग्रू
असा काही नियम आहे का?
हिंदीमधे
हिंदीमधे बर्याचदा मृ चा उच्चार म्रि जवळ जाणारा करतात (उदा. तुम्हारी अम्रिता, क्रिष्ण ) तो जास्त योग्य आहे? >> माझ्या तुटपुंज्या समजानुसार हे उच्चार बरोबर नाहीत.
असं असेल
असं असेल तर मी माझ्या आयडीच्या स्पेलींगचं काय करू? डुआय या घ्यावा म्हणते!
ट्रूथ
ट्रूथ प्रूव्ह ग्रूव्ह ग्रूप क्र्यू श्र्यूड
टॄथ पॄव्ह गॄव्ह गॄप क्यॄ श्यॄड
असंच लिहून बघत होते..
Route हे ॠट
Route हे ॠट असं लिहाल की रूट असं?
म्हणजे group मधला r हा र आहे की ऋ असाच प्रश्न आहे ना? मग वरचं स्पेलिंग तसंच आहे म्हणून विचारते.
जर रूट बरोबर असेल तर ग्रूप हे सयुक्तिक आहे.
पण ते
पण ते जोडाक्षर नाही तेंव्हा ते उदाहरण बरोबर ठरणार नाही.
का?
का? जोडाक्षरापैकी र या व्यंजनाची चर्चा चालली आहे ना?
काय ग ?
काय ग ? जोडाक्षरामधे व्यंजनाचा स्वभाव बदलतो ना....
हा धागा
हा धागा सार्वजनिक नाही वाटतं..
Pages