शनिवारी विवेक मराठे सरानी "चिलीम खडा" रविवारी दिनांक ११सेप्टेंबर १६ रोजी सर करण्याचा छोटेखानी बेत मांडला. सवंगडी तयार झाले, माझी निश्चिती कळविण्यास विलंब झाला आणि मी वेळेवर होकार दिला.
नरवीर तानाजी मालुसारे रस्त्यावरील अभिरुचि येथे भेटून दुपारी १च्या सुमारास सिंहगडाकडे दुचाकीवरुन मार्गक्रमण केले. पार्किंगच्या आधी असलेल्या खिंडीत गाड्या लावून पायवाटेने चालायला सुरुवात केली.
विवेक सरानी पूर्वी हा कडा प्रस्तारारोहन केलेला होता आणि त्यामुळेच आम्हाला आरोहण मार्गाची काळजी नव्हती तसेच सोबत जुजबी साहित्य सुद्धा होते.
साधारण १५ मिनिटांच्या चालीने कडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि आरोहण मार्गाचे निरिक्षण करून चढ़ाईच्या सोप्या श्रेणीच्या मार्गाने ५ मिनिटात सर्वानी माथा गाठला.
माथ्यावर उत्साही मंडळीनी शिवपिंडी कोरली आहे.
चिलीम खड्यावरुन सिंहगड व भोवतालच्या परिसराचे विहंगम दृश्य डोळ्यात, मनात आणि कैमेरयात साठवून थोड्याश्या गप्पा गोष्टीचा ठेवा घेवुन परतीच्या वाटेवर लागलो.
ह्या चढाईतील काही क्षणचित्रे आणि निसर्गचित्रे
तेरडा
सोनकी
कारवी
तेरडा
सवंगडी ट्रेककर
चिलीम खडा
किल्ले सिंहगड
कुर्डू
सवंगडी
“एग-फ्लाय” प्रजातीचे फुलपाखरू
आपटा
चढाई पहिली पायरी
चढाई मधली पायरी
चढाई शेवट
मस्त प्रचि. आम्ही इथून (च
मस्त प्रचि.
आम्ही इथून (च बहुतेक ) रात्री वर चढलो होतो.