जाऊ तिथे खाऊ (प्रकाशचित्रांचा झब्बू - ५) - समाप्त!

Submitted by संयोजक on 14 September, 2016 - 14:20

​आपण सर्व मायबोलीकर देशोदेशी पसरलेले आहोत. मायबोली आपल्याला एकत्र आणतेच, पण अजून एक गोष्ट सगळ्यांना जवळ आणते. आणि ती म्हणजे खवैय्येगिरी!! वेगवेगळे गटग साजरे होतात खाबूगिरीने आणि दर गणेशोत्सवात हिट स्पर्धा असते ती पाककृतींचीच! तर हा झब्बू सगळ्या खवैय्यांसाठी - वेगवेगळ्या देशांमध्ये खाल्लेले कोणतेही पदार्थ किंवा भारतात खाल्लेले जरा अनवट, अप्रसिद्ध पदार्थ यांच्या प्रकाशचित्रांचा.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुम्ही खाल्लेल्या विविध पदार्थांची प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

उदा. सुशी
IMG-20160915-WA0000-640x480.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिशेलिन २ स्टार स्पॅनिश रेस्तराँ मधे खाल्लेला माशाचा प्रकार. जोडीला हिरवे आणि पांढरे अ‍ॅस्परअ‍ॅगस.
IMG_0099_1.JPG

मटका कुलफी:-
चव विसरणे अशक्य.... सर्व्ह करायची पध्दत निराळी..आता पर्यंत मी बघितली नव्हती..
kl.jpgkl1.jpeg

२ वर्शापूर्वी आम्ही ४ मैत्रिणीनी एक अचानक "नाईट आउट" प्लॅन केलं .
मुम्बईच्याच एका हॉटेलमधला सकाळचा साधा ब्रेकफास्ट .
सूर्य-चंद्र-तारे-पृथ्वी एकाच प्लेट मध्ये.

20140622_091721.jpg

Pages