अमेरिका अमेरिका !
कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झाले कम्प्युटरच्या पदव्या घेतल्या
आता आम्ही लायक झालो एकच एक घोष करण्या – अमेरिका अमेरिका
पालक आमचे कृतार्थ होता लागलेत आता वाट बघायला
कधी एकदाचे पोचतोय आम्ही सिलिकॉनच्या valleyला – अमेरिका अमेरिका
पासपोर्ट आमचा हातात आणि व्हिसा मिळवायचा निश्चय आमचा
एम्बसीमध्ये जाताजाता चालणार आहे जप आमचा – अमेरिका अमेरिका
आम्ही ज्यांना ‘आमचे’ म्हणतो सगळे ‘तिकडेच’ करताहेत नोकऱ्या
आम्ही तिकडे पोचताक्षणीच करतील तेही जल्लोष केवढा – अमेरिका अमेरिका
विदेश्भूमीच्या गालीचाला लागला एकदा की पाय आमचा
किती पटीने वाढणार की हो बाजारातील भाव आमचा – अमेरिका अमेरिका
आतुर आम्ही निघण्यासाठी पृथ्वीवरच्या स्वर्गनगरीला
उच्च सुखाच्या इच्छेपोटी कवटाळतोय आम्ही त्याच स्वप्नाला – अमेरिका अमेरिका !
*****************************************************************
(No subject)