'डॉक्टर म्हणजे देवदूत' या समाजाला छेद देणारी घटना इतकंच या घटनेचे वर्णन करून चालणार नाही तर हे कसे शक्य झाले अन हे का घडले याचाही विचार होणे गरजेचे आहे .....
निसर्गरम्य सातारा जिल्ह्यातील धोम या गावातली काळजाचा थरकाप उडवणारी ही गोष्ट. एका पाठोपाठ सहा खून घडूनही तिथं एक डॉक्टर स्वतःला देवदूत असल्याचे भासवत होता. प्रत्यक्षात तो होता खुनी यमदूत ! त्या डॉक्टर संतोष पोळवरची ही पोस्ट...
डॉ. पोळच्या डोक्यात ज्याला मारायचे आहे त्याची पूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार असायची. हत्या करण्याचा पूर्ण प्लॅन तयार असायचा. हत्या करण्याचा कालावधी तो आधी निश्चित करायचा अन मुक्रर केलेल्या दिवसाआधी तीन महिने तो कामाला लागायचा. त्यासाठी आधी तो जेसीबी भाड्याने घ्यायचा. जेसीबीवाल्याला त्याच्या फार्महाऊसवर घेऊन जायचा. खेडेगावात शिवारात असते तसे खोपटवजा आणि थोडे कच्चे बांधकाम केलेल्या त्याच्या या फार्महाऊसच्या मोकळ्या जागेपाशी जेसीबी आला की तो तिथं चार बाय दोनचा मोठा खड्डा खोदून घ्यायचा. सहा सात फुट खोल खांदून झाले की जेसीबीवाल्याची मजुरी देऊन त्याला आठवणीने सांगायचा, "मला शेतात नारळाची झाडे आवडतात. नवीन रोपे आणून या खड्ड्यात लावणार आहे !"
प्रत्यक्षात त्या खड्ड्यात तो त्याचे 'सावज' खलास झालं की पुरून टाकायचा.
त्यासाठी ज्याचा खून करायचा आहे त्याला कधी आमिष दाखवून, तर कधी गोड बोलून तर कधी ब्लॅकमेल करून तिथं बोलवायचा. मग त्याच्या वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर करून तो त्यांना विषारी वा तत्सम औषधांचे ओव्हरडोस द्यायचा. शिकार गर्भगळीत झालं की तो त्याला संपवून टाकायचा.
डॉ. संतोष पोळने डॉक्टरीची सुरुवात धोम या आडवळणाच्या गावातून केली. मातीचे घर आणि त्यावर पत्रे अशा रुपात त्याचा दवाखाना होता. धोमसह आसपासच्या गावातील नागरिकांना त्याचाच दवाखाना सर्वात जवळचा होता. महाराष्ट्रात आजही अनेक खेडोपाडी असे शेकड्याने डॉक्टर आढळतील, विशेष म्हणजे यांच्या पदवीची खातरजमा करण्याची कोणतीही यंत्रणा इंडियन मेडिकल कौन्सिलकडे नाही. ते पोलिसांच्या मागे टुमणे लावतात. आहे त्या कामांनी अन पुढारयांना सलाम ठोकून 'बेजार' झालेले पोलीस तरी काय काय करणार ? असो... तर ह्या डॉक्टरची लवकरच पंचक्रोशीत ख्याती झाली, गावातील राजकारणी आणि उच्चभ्रू लोकांसोबत उठबस वाढली. त्याच्याकडे येणारया लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली अन त्याची नियत बिघडू लागली. आर्थिक देवाण घेवाणी वरून ज्याच्याशी वाद होऊ लागले त्यांना गोत्यात आणण्यासाठी त्याने एक नामी अस्त्र शोधून काढले. त्याच्याकडे येणारया 'नेमक्या' महिलांना तुम्हाला गुप्तरोग आहे असे सांगायचा अन पुरुषांना सांगायचा की तुम्हाला एड्स झाला आहे. असे खोटेनाटे सांगून तो ब्लॅकमेलिंग करू लागला. त्याच्याकडे गेलेल्या पेशंटला तो म्हणायचा, 'तुम्हाला गंभीर आजार झाला आहे. त्यासाठी तुम्हाला हे इंजेक्शन घ्यावे लागेल. उपचारासाठी परत-परत यावे लागेल,' असे सांगून तो रुग्णाला कधी इलाजाच्या बहाण्याने तर कधी कामाच्या निमित्ताने त्यांना फार्महाऊसवर नेऊ लागला. त्या व्यक्तींना तिथं नेऊन तो त्यांच्याशी लैंगिक कृष्णकृत्ये करायचा. त्याच्या या ब्लॅकमेलिंगची लोकांना कुणकुण लागली होती पण त्याचे त्यांपुढचे अघोरकर्म लोकांच्या नजरेस पडले नव्हते त्यामुळे दबक्या आवाजात त्याच्या बद्दल चर्चा वाढू लागली होती. त्याच्या सामाजिक प्रतिष्ठमुळे लोक त्याच्याविरोधात बोलण्यास घाबरत होते. त्याचा नेमका फायदा संतोष पोळने घेतला आणि त्याची 'चटक' व 'तलफ' वाढत गेली.....
मांजराने जरी डोळे झाकून दुध पिले तरी जगाला ते दिसत असते. सत्य हे कधी न कधी बाहेर येतेच. संतोष पोळचेही बिंग असेच फुटले. अंगणवाडी सेविका मंगल जेधे या अंगणवाडी सेविकांच्या संघटनाच्या पदाधिकारी महिलेची मिसिंगची तक्रार आली अन पोलीस खात्यावर दबाव वाढला तसे पोलीस लगेच सक्रीय झाले.
२००३ पासून वाई पोलिस स्टेशन हद्दीतून महिलांच्या मिसिंग कसे समोर येत होत्या. त्यामुळे वाई आणि आसपासच्या पोलिस स्टेशन अंतर्गत किती महिला मिसिंग आहे याची माहिती क्राइम ब्रँचने घेतली. यात मंगला जेधे, सलमा शेख, वनिता गायकवाड, जगाबाई पोळ, सुरेखा चिकने यांचे प्रकरण गंभीर होते. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात आल्यानंतर वेगाने तपास सुरु झाला. यातील सलमा, वनिता ह्या संतोषकडे नर्स म्हणून पूर्वी कामास असल्याची माहिती आल्यामुळे पोलिसांचे लक्ष या यमदूत डॉक्टरकडे गेले. शिवाय ज्या दिवशी मंगल जेधे गायब झाल्या त्या दिवसाच्या लास्ट मोबाईल कॉलचे लोकेशन आणि त्याच काळातले संतोष पोळच्या मोबाईल लोकेशन एकच निघाले. आपल्यावर संशय घेऊन तपासाचा फास आवळला जातोय हे लक्षात येताच संतोषने कौटुंबिक कारणं सांगून तिथून सुं बाल्या केला. मंगल जेधे ह्या १६ जूनपासून गायब होत्या अन पोलिसांनी पाळत ठेवून १३ ऑगस्टला दादरजवळ अटक केली अन या सर्व गोरखधंद्यावरचा पडदा उठला. त्याला जेरबंद केल्यावर त्याने सर्व गुन्हे कबुल केले मात्र त्याने जी हकीकत सांगितली ती मात्र चक्रावून सोडणारी अन माणुसकीला काळीमा लावणारी होती. डॉक्टरी पेशाला तर पूर्णतः कलंकित करणारी होती.
घटना घडल्या दिवशी मंगल जेधे ह्या वाई येथून मुलीच्या बाळंतपणासाठी पुण्याला निघाल्या होत्या. मात्र मंगल जेधे तेथे पोहोचल्याच नाहीत. ज्या ज्योती मांढरेमुळे मंगल जेधे आणि संतोष पोळ यांच्यात वाद झाला होता त्या ज्योती मांढरे हिला त्याने नर्स म्हणून कामावर ठेवले होते. पोलिसांनी तिलाच जेंव्हा आपल्या रडारवर घेतले तेंव्हा ती पोपटासारखी बोलू लागली अन सगळे क्ल्यू खुले झाले. तिने आपण तीन जीवांना विषारी औषधाचे ओव्हरडोस दिल्याचे कबूल केले. ज्योतीच मंगलला वाई बसस्टँडवरुन पोळच्या फार्म हाऊसवर घेऊन गेली होती. वाईपासून हे फार्म हाऊस १३ किलोमीटर अंतरावर आहे. तिथून ह्या दोघी थेट फार्महाऊसवर आल्या अन मंगल जेधे आपल्या जीवाला मुकल्या...
मंगल जेधेंना संतोषच्या भानगडींची कुणकुण लागली होती. त्याचे आणखी काही स्त्रियांसोबत संबंध असावेत असा त्यांचा संशय होता अन झालेही तसेच. ज्योती मांढरे सोबत रासलीला करताना त्यांनी संतोष पोळला रंगेहाथ पकडले. आता मंगल जेधे आपल्याला जड जाईल हे लक्षात येताच संतोषने त्यांचा काटा काढला. फार्महाऊसवर 'नारळाच्या खड्डयाचे' खोदकाम करून घेतले ! २२ मे २००३ ला त्याने पहिला खून केला होता तो सुरेखा चिकणे यांचा होता. त्यांनतर १२ऑगस्ट २००६ रोजी वनिता गायकवाड, तर १५ ऑगस्ट २०१० रोजी जगबाई पोळ, १० डिसेंबर २०१५ ला नथमल भंडारी आणि १७ जानेवारी २०१६ ला सलमा शेखचा खून केला, आणि १६ जून २०१६ ला मंगल जेधे यांची हत्या केली. त्याने आणखी किती हत्या केल्या, किती जणांचे शोषण केले हे आणखी काही दिवसात स्पष्ट होईल.
संतोष पोळने त्याच्याकडे येणारे रुग्ण सोडले नाहीत की त्याच्या सहायक असणारया परिचारिका सोडल्या नाहीत. त्यांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेत त्यांनाही औषधाचा डोस पाजून त्याच्याशी संबंध ठेवू लागला. याच साखळीत त्याने मंगल जेधेंना अडकवले. त्यानाही भूलथापा ठोकल्या. मात्र त्यांच्या हत्येतील तपासातच त्याचे आधीचे सर्व गुन्हे उघडकीस आले...
जिथे डॉक्टरची डिग्री खरी की खोटी हे लोकांना माहिती नसते तिथे औषधांविषयी असणारे शून्य ज्ञान, आपल्याला कोणती ट्रिटमेंट दिली जातीय हे माहिती नसणे या गोष्टी अशा लोकांच्या पथ्यावर पडतात. लोकांमध्ये काही रोगांची भीती असते, त्याबद्दल ते वाच्यता करायला घाबरतात वा त्याची खरी माहिती किंवा उपचारपद्धतीही त्यांना ठाऊक नसते. त्याचा अचूक फायदा घेण्याची मनोवृत्ती तिथे बळावते. मग गुन्हेगारी अन विकृतीला तिथे पालवी फुटते अन असे किस्से अधूनमधून आपल्या कानावर येत राहतात. भ्रामक कल्पना डोक्यात ठेवून सहज विश्वास ठेवणे, तथाकथित उच्चभ्रू लोकांना घाबरणे आणि सत्य समोर मांडायला कचरणे यामुळे या प्रवृत्तीचे फावते आणि आपण नेहमीप्रमाणे बैल गेला झोप केला या उक्तीने पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर कामाला लागतो. सजग आणि निर्भीड समाजच असे दुष्प्रकार थोपवू शकतो हे वेगळे सांगायला नको. पण या सर्व प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रास एक काळिमा लागला हे देखील खेदाने नमूद करावे वाटते एकीकडे असे किस्से कानावर येत असताना काही डॉक्टर्स आपल्या पदराला खार लावून रुग्णसेवा करतात त्यांचे मोठेपण अशा प्रसंगानंतर अधिक उठून दिसते .....
- समीर गायकवाड.
अधिक वाचनासाठी ब्लॉगवर भेटा ...
http://sameerbapu.blogspot.in/2016/08/blog-post_85.html
काय माहीत टण्या. माझा अजूनही
काय माहीत टण्या. माझा अजूनही देवावर विश्वास आहे त्यामुळे जशी संतोष पोळची वाईट कृत्ये समोर आली तशी इतरही भोंदुना धडा मिळेल अशी आशा आहे.
मानव, एकाच राज्यातून एम बी बी
मानव, एकाच राज्यातून एम बी बी एस आणि एम डी केले तर एकच रजिस्ट्रेशन नं दोन्हींना असतो.
वेगवेगळ्या राज्यातून केले तर वेगवेगळे नं असतात.
उदा. माझं एम बी बी एस आणि एम डी महाराष्ट्रातून झालंय तर मा झा रजिस्ट्रेशन नं एकच आहे एम एम सी त म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काऊंसेलात. पण फॉर्मॅट मात्र वेगवेगळा आहे.
म्हणजे नं/महिना/वर्ष असा फॉर्मॅट एम बी बी एस ला होता तो एकच सलग आकडा वर्ष महिना नं असा एम डी ला दिलाय.
जेव्हा मी कर्नाटकात प्रॅक्टीस सुरू केली तेव्हा याच क्रमांकावर केली कारण एम एम सी त रजिस्ट्र्शन केलं की ऑल ईंडिया रजिस्ट्रेशन व्हॅलिड असायचं. (काही राज्यांच्या बाबतीत ही प्रोविजन होती)
मात्र स्वतःच्या हॉस्पिटलसाठी कर्नाटक मेडिकल काऊंसिलचा क्रमांक असणे जरूरीचे होते.
याकरिता महाराष्ट्राच्या काऊंसिलकडून नो ऑब्जेक्शन सर्टीफिकेट आणून कर्नाट्कात देऊन नविन क्रमांक घेतला.
आता माझे दोन्हीकडे वैध रजिस्ट्रेशन आहे आणि दर काही वर्षांनी ठराविक गुण मिळवून आणि पात्रता पुन्हा सिद्ध करून ते दोन्हीकडे रिन्यू करून घ्यावे लागते.
काय माहीत टण्या. माझा अजूनही
काय माहीत टण्या. माझा अजूनही देवावर विश्वास आहे त्यामुळे जशी संतोष पोळची वाईट कृत्ये समोर आली तशी इतरही भोंदुना धडा मिळेल अशी आशा आहे.
>>>
बरोबर आहे. तुमचा जगातल्या सगळ्यात मोठ्या क्वॅकवर विश्वास आहे, असल्या छोट्या मोठ्या क्वॅक/ढोंगी वैद्यांनी तुम्ही घाबरायला नाही पाहिजे
धन्यवाद साती, registration
धन्यवाद साती, registration संबंधी छान माहिती दिलीत.
काही वर्षांनी ठराविक गुण
काही वर्षांनी ठराविक गुण मिळवून आणि पात्रता पुन्हा सिद्ध करून ते दोन्हीकडे रिन्यू करून घ्यावे लागते.>>> कृपया, गुण आणि पात्रता ह्यासम्बंधी अजून खुलासा कराल का?
बरोबर आहे. तुमचा जगातल्या
बरोबर आहे. तुमचा जगातल्या सगळ्यात मोठ्या क्वॅकवर विश्वास आहे,>>>>>>देवाला तुम्ही क्वॅक मानता? असेल, प्रत्येकाचा अनूभव वेगळा असतो.:स्मित:
तुमचा जगातल्या सगळ्यात मोठ्या
तुमचा जगातल्या सगळ्यात मोठ्या क्वॅकवर विश्वास आहे, असल्या छोट्या मोठ्या क्वॅक/ढोंगी वैद्यांनी तुम्ही घाबरायला नाही पाहिजे
>> बुद्धीभेद!
साती - वाई तेवढेही खेडे गाव नाहीं त्याने हे उद्योग वाईच्या भोवतालच्या गावात केलेत . अर्थात तो वाई मधल्या एका उत्तम चालणार्या दवाखान्यात कामाला होता पूर्वी हे ही तितकेच वाईट.
किडनी रेकेट नव्हते - हेच त्यातल्या त्यात बरें.
साती विस्तृत माहितीबद्दल
साती विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद.
दर काही वर्षांनी पात्रता पुन्हा सिद्ध करावी लागते ही खरेच चांगली बाब आहे.
त्या साईटवरिल डाटा हा MBBS पदवीनंतर केलेल्या रजिस्ट्रेशनचा आहे असे वाटते. MD नंतर वेगळा नंबर मिळाला असेल तर तो तिथे दिसत नसावा.
पण उपयोगी साईट आहे, छान माहिती मिळाली.
सचिन काळे, दर काही वर्षांनी
सचिन काळे,
दर काही वर्षांनी पात्रता पुन्हा सिद्ध करावी लागते म्हणजे परीक्षाच द्यावी लागते असे नाही.
मेडीकल काऊंसिलने तुम्ही सतत वैद्यकीय शिक्षण घेत आहात ना आणि स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवत आहात ना, याची खात्री करून घ्यायला सुरूवात केली आहे.
त्यानुसार तुम्ही किती सी एम ई (कंटिन्यूअस मेडिकल एज्युकेशन) अटेंकेल्यात, कितीत तुम्ही फॅकल्टी होता, कितीत पोस्टर्/पेओअर प्रसिद्ध केलेत याला त्या त्या सी एम ईच्या दर्जानुसार काही मार्क्स दिलेत.
तसेच काही वर्कशॉप्स , उपक्रम, दूरस्थ शिक्षण यांनाही ठराविक मार्क्स दिलेत.
चार ते पाच वर्षांनी ठराविक गुणांची सर्टीफिकेट्स काऊंसिलला द्यावी लागतात, त्यानुसार पुढचे रिरजिस्ट्रेशन होते.
या सी एम ई साध्या आओ ,खाओ, पिओ वाल्या लोकल हॉस्पिटलच्या मार्केटींगवाल्या सी एम ई असून चालत नाही.
काऊंसिलने रेकग्नाईझ केलेल्या बॉडीजनी घेतलेल्या सी एम ई च या बाबत ग्राह्य धरल्या जातात.
जर एखादी नवी बॉडी अश्या सी एम ई कंडक्ट करू पहात असेल तर काऊंसिलची अगोदर परवानगी घ्यावी लागते आणि काऊंसिलतर्फे निरीक्षक येऊन ती प्रमाणित करण्यायिग्य आहे किंवा कसे ते ठरवितात.
(भारतात सध्यातरी केवळ मॉडर्न मेडिसीनवाल्यांना ( अॅलोपॅथ्स!) हे बंधनकारक आहे.
इतर पॅथीजना नाही.)
साती, विस्तृत माहितीबद्दल
साती, विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद. ज्ञान अद्ययावत ठेवण्याकरिता आपण घेत असलेल्या मेहनतीची जाणीव झाली. खरोखरच, आपण सर्व कौतुकास पात्र आहात. आपले अभिनंदन!
या धाग्यावरले साती यांचे संयत
या धाग्यावरले साती यांचे संयत प्रतिसाद वाचुन बरे वाटत आहे. धन्यवाद साती. _/\_
हो आणि खूप नवी माहिती पण
हो आणि खूप नवी माहिती पण मिळते आहे.धन्यवाद साती.
चांगले वाईट प्रत्येकच प्रोफेशन मध्ये असायचेच..हा माणूस स्थानिक राजकारणी असता तरी त्याने हेच केले असते.
साती, खुप छान माहिती.. आजकाल
साती,
खुप छान माहिती..
आजकाल क्लिनीक्स बद्दल पेशंट्स चे रिव्ह्यूज पण नेटवर वाचायला मिळताहेत. पण त्या क्लीनीक मधे जाण्यापुर्वी किती जण ते वाचत असतील ?
संतोष पोळने पुरलेले लोक
संतोष पोळने पुरलेले लोक ज्यांनी उकरुन काढले ते काल की आज हर्ट्फेलने गेल्याचे टिव्हीवर कळले. काय वाटले असेल त्या माणसाला हे सगळे प्रताप बघुन, तणाव नाही येणार तर काय?
Pages