वांगमय-ए-मोहेंजोदारो

Submitted by rmd on 15 August, 2016 - 14:02

काल मोहेंजोदारो पाहिला. सिनेमा पाहून झाल्यावर त्याची वेगवेगळी व्हर्जन्स इमॅजिन करण्याचा मोह आवरला नाही. 'बे एरिया' च्या वाहत्या पानावर अशी काही व्हर्जन्स पोस्ट करताच तिथल्या बाकी मेंबर्सनी त्यात अजून भर घातली. ही सगळी गंमत इतर मायबोलीकरांसोबत शेअर करण्यासाठी आणि अशी अजून व्हर्जन्स यावीत म्हणून हा धागा.
(हेडर सौजन्य - मॅक्स)

** स्पॉयलर अलर्ट : खालील व्हर्जन्स वाचून कोणाला जर मोहेंजोदारो सिनेमाची खरी स्टोरी समजली तर आम्ही जबाबदार नाही Proud **

भन्साळी व्हर्जन (rmd)
------------------
संपूर्ण मोहेंजोदारो एकदम रंगीबेरंगी. कबीर बेदीचा महाल रंगीत काचांचा, झुळझुळ पडदे असलेला वगैरे. ह्रितिकची त्याच्या मूळ गावात एक मैत्रीण - उससे दिल लगाके बैठेली. मोहेंजोदारो मधे पूजा हेगडे. मग त्या दोघींची 'तू च कशी ग्रेट आणि ह्रितिकसाठी बेस्ट' टायपाची जुगलबंदी. ते पाहून ह्रितिक सिंधू नदीत उडी मारून आत्महत्या करतो.

जुगलबंदी गाणं -

संग संग संगिनी तू संग संग संगिनी
सरमनकी तू है रानी
नहीं वो तो तू है, चानी
आज हम नाचे मिलके
बरसे घटा से पानी

रोहित शेट्टी व्हर्जन (धनि)
-------------------
मोहेंजोदारो मधे बैलगाड्यांचा पाठलाग सिक्वेन्स. त्यात २-४ बैलगाड्या आपटून हवेत उंच उडतात आणि खाली पडतात. मग एक रथांची शर्यत. त्यात ह्रितिकचा आणि पैलवानांचा रथ एकमेकांवर आपटतात आणि सगळे खाली पडतात. मग हाताने मारामारी. ह्रितिकच्या उजव्या हाताच्या एका ठोश्यात पैलवान हवेत लांब उडून पडतो. ह्रितिक डाव्या हाताने दुसर्‍या पैलवानाला पंच मारतो तर तो थेट कबीर बेदीच्या पायाशी जाउन पडतो वगैरे.

केजो व्हर्जन (rmd, धनि)
-------------
ह्रितिकचा काका त्याला लहानपणीच लंडनला घेऊन गेलेला असतो आणि स्थायिक झालेला असतो. ह्रितिकला मोहेंजोदारो बद्दल कळल्यावर तो तिकडे जायला निघतो. इकडे मोहेंजोदारो मधे त्याची आई सिंधू माँ की पूजा करत असते आणि अचानक तिला पानांची सळसळ ऐकू येते. ती पूजेची थाळी घेऊन हळुहळू दाराशी जाऊन उभी राहते आणि तेवढ्यात ह्रितिक येतो. मग कुठूनतरी एक मुलींचा ताफा येतो आणि नाच सुरू करतो इ. इ.

यश चोप्रा व्हर्जन (rmd, धनि)
------------------
ह्रितिक आणि त्याचा काका सरसोंची शेती करत असतो. ते सरसों विकायला तो मोहेंजोदारो मधे जातो. ह्रितिक पूजा ला बघतो. पूजा ह्रितिक ला बघते. एकदम दोघे स्वप्नात स्वित्झर्लंडला जातात. तिथे पूजा शिफॉनच्या साड्या नेसून गाणं म्हणते.

सूरज बडजात्या व्हर्जन (rmd, धनि)
-------------------------
ह्रितिकच्या काकाची तीन मजली झोपडी असते. त्यात सगळे एकत्र जेवत वगैरे असतात. लल्लू त्यांना जेवण वाढतो. ह्रितिक आणि त्याचा चुलतभाऊ फॅक्टरी सुरू करायला मोहेंजोदारो मधे जातात. तिथे ह्रितिक पूजाच्या प्रेमात पडतो. त्यांना आधी कबीर बेदी विरोध करतो. पण शेवटी त्याला अचानक उपरती होते आणि तो पूजाचा हात खुशीखुशी ह्रितिकच्या हातात देतो.

रामगोपाल वर्मा व्हर्जन (rmd, धनि)
-------------------------
सिनेमात सुरूवातीला अर्धा तास कॅमेरा नुसता मोहेंजोदारोच्या गल्लीबोळातून फिरत राहतो. मग पुढची पंधरा मिनीटं ह्रितिक आणि पूजाचं स्वप्न. स्वप्नात समुद्र, पाणी, उर्मिला / अंतरा माळी / निशा कोठारी इ.इ.

पुणे ५२ व्हर्जन (rmd)
---------------
ह्रितिक रोशन बैलगाडीतून इकडून तिकडे जातो आणि थोड्यावेळाने तिकडून इकडे येतो.

फराह खान व्हर्जन (सीमंतिनी)
---------------------
हरप्पा मधून ह्रितीकला भेटायला असंख्य लोक येतात आणि "दारो दारो" म्हणत खूप पितात, गाणी म्हणतात... Wink

रामसे व्हर्जन (मंदार)
-------------
किर्र्र रात्री 'कर्र कर्र कर्र' आवाज करत दार उघडून ह्रिथीक मोहेंजोदारोमधे शिरतो. एका भयाण हवेलीत मिणमिणता दिवा हातात धरलेला वॉचमन त्याला मोहेंजोदारोची करुण कहाणी सांगतो. अनेक वर्षांपूर्वी मोहेंजोदारो गडप होण्याची प्रक्रीया सुरु झालेली असते तेव्हा कबीर बेदी गाडला जाउन मेलेला असतो, पण तो परतोनी आलेला असून त्याची कन्या पूजा हेगडेला कैद करुन ठेवत असतो. केवळ अदीदासचे बूट घालून त्या पायाने लाथ मारल्यासच त्याचा विनाश होणार असतो. त्या आधी एकाने तसा निष्फळ प्रयत्न केलेला असतो.
मग ह्रिथीक अपघाताने पूजा हेगडेच्या बाथरुम मधे शिरतो. तिथे तिची अंघोळ सुरु असते. गाणे म्हणता म्हणता ते बाथटबमधे पडतात, आणी बाथटबला क्रॅक जाउन त्याखाली कबीर बेदीला पूर्वी मारण्याचा प्रयत्न केलेल्याचे प्रेत आदीदासच्या बूटांसकट पुरलेले असते. ते बूट घालून ह्रिथीक कबीर बेदीचा नायनाट करतो.
आनंदाने तो पूजाकडे जातो पण तोपर्यंत आदीदासचे बूट काढलेल्या माणसाच्या भूताने तीला पळवून नेलेले असते. यापुढील ष्टुरी भाग २ मधे....

नागराज व्हर्जन (श्री)
-------------------
पुजा हेगडे विहिरीत अंघोळ करत असताना हृतिक रोशन तिथे येतो आणि धोतरासकट विहिरीत उडी मारतो , पुजा हेगडे म्हणते , आता ग बया , हे कुठुन पडलं , नंतर हृतिकला विहिरीबाहेर हुसकुन काढताना म्हणते , ये रत्ताळ्या हु भाईर , बरा डोळं झाकुन पडलास रं !
Lol

पूजाचा डायलॉग - मला बी तुजी संगिनी व्हायचं. पालीत सांगून कळत नाही व्हय? अर्धमागधीत सांगू?? (सीमंतिनी)

अनुराग कश्यप व्हर्जन (पायस)
-------------------------

ह्रितिकचे वडील अनेक वर्षांपूर्वी कबीर बेदीसाठी मुकादमगिरी करत असतात. त्यांच्यावर खुश होऊन कबीर बेदीने त्यांना खास एकशिंगी गेंड्याच्या शिंगाचं मुंडास दिलेलं असतं. पण त्यांना गेंडा आवडत नसल्याने बेदीचे दोन शिंगी बैलाचे मुंडासे हवं असतं. मग बेदी त्यांना गंगाकाठच्या मगरीचं कातडं आणायाला पाठवतो आणि मगरींचा व्यापार करणार्‍या आपल्या मित्राकडून मारतो. ह्रितिक तेव्हा खूप छोटा असतो तो तेवढं मुंडासं घेऊन पळतो.
अनेक वर्षांनंतर आता त्याने कबीर बेदीच्या सिंधू माँ काठच्या शेतजमिनीवर अवैध कब्जा केला आहे. या झगड्याचा फैसला करायला ते दोघे चावडीवर जमतात. मग ह्रितिक तेच एकशिंगी गेंड्यावालं मुंडासे घालून बैलावरुन उतरतो आणि मागून नॅरेशन सुरु होते
" कबीर बेदी ह्रितिक को तो नही पहचानता था पर अपने मुंडासे को पहचानता था. ये वो जमाना था जब बडे लोग आदमीयों के नाम भुल जाते थे पर अपनी सिंधू माँ के तीर वाली जमीन और अपने सींग नही भुलते थे"
अर्थातच फैसला ह्रितिकच्या बाजूने होतो पण बैलाच्या शिंगाच्या गावात गेंड्याचे शिंग घातल्याबद्दल तसेच अरुणोदय सिंगला सिंग मारल्याबद्दल त्याला कैद होते. मग जाता जाता ह्रितिक कबीर बेदीला म्हणतो
"ये मुंडासा हम छीनेंगे नही, कह के लेंगे"

महेश भट्ट व्हर्जन (rmd)
------------------
ह्रितिकचं ऑलरेडी त्याच्याच गावात लग्न झालेलं असतं. मग तो मोहेंजोदारो मधे येतो आणि त्याला पूजा भेटते. पूजा सोबत त्याचं अफेअर सुरू होतं आणि ते एकत्र राहू लागतात. पण पूजा ओव्हर पझेसिव्ह असते. तिला ह्रितिकचं आधीचं लग्न सहन होत नाही आणि ती आत्महत्या करते.

विक्रम भट्ट व्हर्जन (rmd)
-------------------
ह्रितिक मोहेंजोदारोच्या गल्लीबोळातून फिरत असतो. रात्रीची वेळ असते. तेव्हा त्याला पूजाचा आत्मा दिसतो. तो आत्म्याची स्टोरी जाणुन घ्यायला सिंधू माँ के मंदिर जातो. आणि त्याला कळतं की हा त्याचा पुनर्जन्म आहे आणि पूजाला कबीर बेदीने गेल्या जन्मातच मारलेलं आहे. फिर उलगडता है पूजा के कत्ल का राज! हा पिक्चर बराचसा अंधारातच असतो त्यामुळे मोहेंजोदारो मधे पण ६ महिने वगैरे रात्र असणार असं आपल्याला वाटायला लागतं.

मोहेंजोदरो-५२ (फारएण्ड)
---------------
सन १७८९ मधे फ्रेन्च राज्यक्रांती झाली. नुकत्याच संपलेल्या रेनेसान्स पीरियड मधून नव्या आकांक्षाचे धुमारे घेउन निघालेल्या अ‍ॅन्ग्लो-फ्रेंच-सॅक्सन समुदायाच्या पुढच्या पिढ्या आता पौगंडावस्थेत आल्या होत्या. मध्ययुगीन कालखंडातील अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर नव्हते. अशा एका काळातील व्यक्तिसापेक्ष कथा हॉलीवूड पासून ते फिलीपिनो चित्रपटसृष्टीत अनेक आल्या आहेत. त्यामानाने बॉलीवूड मधे याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेलेले आहे. हा एक महत्त्वाचा कालखंड होता.

दुसरे म्हणजे समोर घडणार्‍या घटनांना कॅमेर्‍याने सतत "फॉलो" करण्याची गरज आहे असे आपल्याकडचे प्रेक्षक समजतात. प्रत्यक्ष जीवनात असे होत नाही. पण त्यामुळे असे नसलेले चित्रपट त्यांना फालतू वाटतात. अशा प्रेक्षकांनी चेन्नई एक्सप्रेस पाहावा.

वर म्हंटल्याप्रमाणे फ्रेन्च राज्यक्रांती व फिलिपाइन्स मधले त्यावरचे परिणाम यावर हा चित्रपट आहे. हृतिक जेव्हा पहिल्यांदा नदी ओलांडून जायला निघतो तेव्हा चतुर्दशी असते (चंद्राची कोर पाहा, डावीकडे झुकलेली) मागे कबिल्यामधे लुई शमाशा उई लागलेले असते. त्यातील (चतुर्दशी = चौदावा) लुई हा तत्कालीन फ्रेन्च राज्यकर्त्यांचे प्रतीक आहे. तर हृतिका नेपोलियन चे. पूजा हेगडे म्हणजे अशा वेळी स्वतःच्या आनंदात मश्गुल असणारी जनता....तिने आंघोळ करणे हे त्याचेच प्रतीक आहे.

ब्लाह ब्लाह ब्लाह

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेस्ट आहे हे. पुणे ५२ आठ्वून फार हसू येतंय.

कांती शाह आणि सीआयडी अशक्य जमलेत. ससुराल सिमर का ब्रह्मे वर्जनपण येऊ द्यात.

एसीपी, अभिजीत प्रभुती नारळ पाणी पीत ह्रितिकला "तुला काईट्स नावाचा प्रकार का करावासा वाटला रे?" ही पूछताछ करत आहेत.>>>> हा हा हा

ससुराल सिमर का ब्रह्मे वर्जनपण येऊ द्यात.>>>>>>>>> तुम्हीच लिहा की बाई. आम्ही वेटींग फॉर युवर लिखाण.

पायस अशक्य आहात. __/\__

ससुराल सिमर का ब्रह्मे वर्जनपण येऊ द्यात.

आणि तोंड काळे केलेले विवेक आणि दया नदीतून पोहत पोहत बाहेर येतात. सगळीकडे आनंदी आनंद!>>>>>>>> हा हा हा हा हा हा हा .............

अरे बाप रे ......

"मोजो" बघण्याची हिम्मत झाली नाही...

हा धागा वाचून पुरता मेलोय हसून हसून

गुंडा काय, CID काय, सैराट काय आणि इतर ..... आ रा रा

Pages