Submitted by बेफ़िकीर on 9 August, 2016 - 12:34
थोडे जगून झाले, थोडे अजून आहे
मीही जगाप्रमाणे आहे म्हणून आहे
केसांत मोकळ्या त्या निजलो कसाबसा मी
थाटात सावली अन् धाकात ऊन आहे
बघ चाललो तुला तर, आहे जसा.... तसा मी
हेही करून आहे, तेही करून आहे
तिरके कटाक्ष आता तिरकस कटाक्ष झाले
'मेला तसाच' त्याचा, केलास खून आहे
हा भाग वेगळा, मी, आता हयात नाही
गातेस आज तू ती माझीच धून आहे
ही 'बेफिकीर' टीका माझ्यावरील होती
ओवाळलेच जग मी माझ्यावरून आहे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/43142
२०१३ सालच्या मतल्याची एकदाची गझल झाली
शेवटल्या दोन शेरांत मस्त
शेवटल्या दोन शेरांत मस्त कलाटणी आहे.
थाटात सावली अन् धाकात ऊन आहे >> : हे विशेष आवडले.
मस्त! >>>केसांत मोकळ्या त्या
मस्त!
>>>केसांत मोकळ्या त्या निजलो कसाबसा मी
थाटात सावली अन् धाकात ऊन आहे>>>विरळा खयाल!
मतला,खून आणि धून अतिशय आवडले!
छान
छान
वा पहिले दोन शेर मस्त
वा
पहिले दोन शेर मस्त
केसांत मोकळ्या त्या निजलो
केसांत मोकळ्या त्या निजलो कसाबसा मी
थाटात सावली अन् धाकात ऊन आहे>> वाह!!
मस्त !
मस्त !
मतला आवडला शेर चांगले आहेत .
मतला आवडला
शेर चांगले आहेत . ....... थोडी अपेक्षा जास्त होती
वाह! वाह! सुरेख गझल बेफी.
वाह! वाह! सुरेख गझल बेफी. आवडली .
केसांत मोकळ्या त्या निजलो
केसांत मोकळ्या त्या निजलो कसाबसा मी
थाटात सावली अन् धाकात ऊन आहे >>>
मस्तं.