१ जुलै २०१६
मल्हारी आमचे आधीपासूनच फेव्हरेट गाणे. परवा त्याला जरा तडका दिला. मी परीच्या मम्मीचा एक येल्लो कलर कुर्ता घातला आणि त्या गेटअप मध्ये परीसोबत नाचू लागलो. परीच्या मम्मीच्या शिव्या खाऊनही फार धमाल आली. परीलाही नक्कीच आली असणार. कारण काल पुन्हा ती मम्मीचा एक दुसरा कुर्ता घेऊन माझ्याकडे आली.. आणि म्हणाली, "हे घाल तू.. मल्हारी नाचूया" .. मग काय, धिस टाईम विथ ब्ल्यू कुर्ता.. सोबत परी गळ्याभोवती मम्माची ओढणी लपेटून.. आणि पुन्हा एकदा मल्हारी.. बजने दे धडक धडक.. ढोल ताशे धडक धडक
..
बाकी या अवतारात एखादा सेल्फी काढून फेसबूकवर अपलोड करायचा मोह झालेला.. पण आवरला.. नाहीतर मम्माने त्याच कुर्त्यात गुंडाळून बदड बदड बदडले असते
.
.
८ जुलै २०१६
लाईफ खूप सिंपल असते आपण उगाच कॉम्प्लीकेटेड करून ठेवतो.
त्या दिवशी परीने माझ्या बॅगमधून कॅलक्युलेटर बाहेर काढला. त्याचे स्लाईडींग कवर कसे काढायचे हे तिला थोडावेळ समजले नाही. तसे तिने तो खाली जमिनीवर आपटला... आदळत दोन तुकडे होत कवर वेगळे झाले.
काल पुन्हा तिच्या हाती माझा कॅलक्युलेटर लागला. ए हे कसे उघडायचे असा भोळाभाबडा प्रश्न स्वतालाच विचारत, मी काही हस्तक्षेप करायच्या आधीच, ए हे असे उघडायचे म्हणत, तिने तो पुन्हा जमिनीवर आदळला. आणि पुन्हा त्याचे दोन तुकडे होत कवर वेगळे झाले
खरंच, लाईफ खूप सिंपल असते आपण उगाच कॉम्प्लीकेटेड करून ठेवतो..
.
.
९ जुलै २०१६
एक लांबलचक रस्ता असतो.. रस्त्यावर चिटपाखरूही नसते.. डावीकडून हिरो धावत येतो.. उजवीकडून हिरोईन धावत येते.. स्लो मोशनमध्ये.. मध्ये कुठेतरी ते भेटतात.. एकमेकांना मिठी मारतात.. आणि हिरोईनला हिरो उचलून घेतो.. फुल्ल फिल्मी.. सेवंटीपासून नाईंटीपर्यंत बॉलीवूडच्या कित्येक चित्रपटांत पाहिलेले हे द्रुश्य.. काल खरोखर अनुभवले.. पण यावेळचे कलाकार होते.., तीन आठवड्यानंतर भेटणारे आजोबा, आणि त्यांची नात
.
.
१३ जुलै २०१६
first Autograph
स्वताच्या नावापासून लिहायला सुरुवात.. हि चार अक्षरेच तुर्तास..
पण आता पुढचे नाव माझे
ते एकदा जमले की पोरीने बापाचे नाव काढले म्हणायला मोकळा
.
.
१६ जुलै २०१६
नावांचाही अर्थ असतो.. नावांवरूनही वर्तमान आणि भविष्य ओळखता येते..
काल परीने आपले नाव लिहिताना सहजच अक्षरे उलट सुलट लिहिली.. आणि मला तिच्या नावाचा आणखी एक अर्थ समजला..
R I P A
.
.
Rest in peace .... Abhishek !
.
.
१७ जुलै २०१६
यावेळचा आमचा पावसाळा फुल्ल पैसा वसूल आहे. रोजचाच पाऊस आहे आणि रोजचेच भिजणे आहे. तरीही आमचे मन भरत नाहीये. घरात असलो की खिडकीत बसायचे असते, तर बाहेर पडल्यास कंपाऊंडमध्ये साचलेल्या पाण्यात उड्या मारूनच पुढे जायचे असते. त्यातही जर साचलेल्या पाण्याची पातळी जरा जास्त असेल तर तिला कंपाऊंडबाहेर काढणे एक दिव्य असते.
आजही रविवारचे आम्ही तिला सागरविहारला फिरायला घेऊन गेलो होतो. मस्तीची सुरुवातच पडून झाली. थोडे लागलेही. जरा रडली आणि शांत झाली. पण शांत झाली ते शांतच राहिली. एखाद्या फोटोसाठी तरी हस म्हटले, तर त्यालाही तयार नव्हती. तसे मग आता काय ही ईथे काय मजा करत नाही म्हणत तिला शेजारच्या गार्डनमध्ये नेऊ लागलो. ईतक्यातच अचानक पावसाची जोरदार सर आली. पटापट लोकांच्या छत्र्या उघडल्या गेल्या. पण खाडीकिनारच्या सुसाट वार्याने त्या कुचकामी ठरू लागताच लोकांनी शेडकडे धाव घेतली. मात्र त्याच वेळी एवढा वेळ शांत असलेल्या या पोरीच्या अचानक अंगात संचारले. पावसाचा पहिला थेंब अंगावर पडताच, झटका आल्यासारखे "पाऊस, पाऊस" ओरडत, चेकाळल्यासारखे त्या मोकळ्या जागेत धावू लागली. मी तिच्या मागे मागे पळत तिच्या डोक्यावर छत्री धरायचा केविलवाणा प्रयत्न करत होतो, पण ती मात्र मला झिडकारून "पप्पा नो, छत्री नको" बोलत पुढे पुढे पळत होती. एकीकडे तिने मजा करावी असेही वाटत होते, पण तब्येतीकडे पाहता फारसे भिजू नये याचीही काळजी घ्यायची होती. सरतेशेवटी तिला सर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन छत्री तिच्या मम्मीच्या हातात देत तिचे मुटकुळे करत उचलले आणि तिथून बाहेर काढले. पण जेवढा वेळ तिथे होती आमच्यासह आजूबाजूच्या सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन केले
पावसाची एखादी छानशी सर यावी आणि जावी, पण तेवढ्याश्या वेळात तिने आपल्याला छानसे भिजवून टाकावे. अगदी तसेच हा छोटासा दंगाही आम्हाला विकेंड रिफ्रेशमेंट देऊन गेला
.
.
१८ जुलै २०१६
एकदा आपले नाव लिहायला जमू लागताच,
आता कुठेपण केव्हापण ...
हळूहळू आईबापाच्या एकेक प्रॉपर्टीवर स्वत:चे नाव लिहायला सुरुवात झाली आहे
.
.
२४ जुलै २०१६
स्टोरी टेलिंग - जंगल, डॉगी आणि पाऊस!
एक मोठे जंगल होते.
जंगल मध्ये एक डॉगी होता.
जंगलमध्ये एक खारूताई होती.
खारूताईने डॉगीला खाऊन टाकले.
मग जोरात पाऊस आला.
स्क्विरल भिजून गेली.
कॅटी सुद्धा भिजून गेली.
डॉगी भिजला नाssय.. (कदाचित खारूताईच्या पोटात असल्याने भिजला नसावा)
मग डॉगीने ब्रश केला आणि तो 'सो' गेला..
मम्मी : सो गेला? म्हणजे? सो गया का?
परी : होss.. झोपिंग
आणि आता हा शब्द कुठून आला या विचाराने आम्ही हैराण
काही का असेना, स्टोर्या बनवणे आमच्या रक्तातच आहे ..
.
.
२७ जुलै २०१६
फादर फिंगर, फादर फिंगर, व्हेअर आर यू..
हिअर आय एम, हिअर आय एम.. हाऊ डू यू डू..
असे काहीसे ईंग्लिशमध्ये एक बालगीत आहे. ज्यात फादर फिंगरच्या नावाखाली 'अंगठा' दाखवला जातो. पुढे त्यात मॉम्मी फिंगर, ब्रदर फिंगर, सिस्टर फिंगर वगैरे हाताच्या एकेका बोटांवर येतात. हल्ली हे गाणे आमचे फार फेव्हरेट झालेय. त्यात आज्जी, भाऊ, माऊ अश्या स्वताच्या वेरीएशन सुद्धा आम्ही आणतो.
तर ते एक झाले. पण काल काय झाले, माझ्या बाजूला खेळत असताना अचानक ती पडली. नेमके माझे लक्ष नव्हते. पडल्याचा जोरात आवाज आला नाही, म्हणजे कुठे आपटली नसावी, एवढेच काय ते समाधान. पण हात पोटाखाली अवघडलेल्या आणि मुरगळलेल्या स्थितीत होता. आणि तिथेच काहीतरी दुखावल्याने ती रडत होती. पण मला काही सांगायला तयार नव्हती. म्हणून उचलून आत तिच्या मम्मीकडे नेले. मम्मीने थोपटून शांत केले आणि विचारले, "काय झाले परी?".. तसे तिच्यासमोर अंगठा नाचवत हुंदके देत म्हणाली, माझ्या 'फादरला' लागले ..
आईं ग्ग, हसून हसून एक कळ खरंच फादरच्या छातीतून गेली
.
परीकथा ० , परीकथा १ , परीकथा २ , परीकथा ३ , परीकथा ४ , परीकथा ५ , परीकथा ६ , परीकथा ७ , परीकथा ८ , परीकथा ९
Mast lihilay.
Mast lihilay.
तो परीमधला R किती छान लिहिलाय
तो परीमधला R किती छान लिहिलाय तिने! पाय उंचावून गिरकी घेणार्या मुलीसारखा!
गोड
सुंदर !
सुंदर !
गोडंबी आहे नुसती. मस्त
गोडंबी आहे नुसती. मस्त लिहीलेय.
मस्त
मस्त
मस्त लिहीलेय.
मस्त लिहीलेय.
कसली क्युट आहे परी. आणि आता
कसली क्युट आहे परी.
आणि आता हा शब्द कुठून आला या विचाराने आम्ही हैराण स्मित
काही का असेना, स्टोर्या बनवणे आमच्या रक्तातच आहे ..>>>> छान
.
मस्त
मस्त
मस्तच. God bless u PARI
मस्तच. God bless u PARI
आजोबा - नातीचा मिलन प्रसंग तर खुपच छान.
मस्तच नेहमीप्रमाणे! ते एकदा
मस्तच नेहमीप्रमाणे!
ते एकदा जमले की पोरीने बापाचे नाव काढले म्हणायला मोकळा>>
तो परीमधला R किती छान लिहिलाय
तो परीमधला R किती छान लिहिलाय तिने! पाय उंचावून गिरकी घेणार्या मुलीसारखा! स्मित >>>> भारी उपमा
धन्यवाद सर्व प्रतिसादांचे
लाईफ खूप सिंपल असते आपण उगाच
लाईफ खूप सिंपल असते आपण उगाच कॉम्प्लीकेटेड करून ठेवतो..... आणी मग स्वतःलाच त्रास होतो...
होss.. झोपिंग फिदीफिदी... हाहाहा... छान आहे
मस्तच
मस्तच
मस्त वाटलं वाचताना .
मस्त वाटलं वाचताना .
आई ग्गं.. परी अगदी गोग्गोड
आई ग्गं.. परी अगदी गोग्गोड आहे.. आणी तू लिहितोहीस अगदी मनापासून एंजॉय करत..
खूप मज्जा वाटते वाचायला. एक्केक जम्मत धमाल आहे नुस्ती!!!!
stay blessed always!!!
खुप मस्त
खुप मस्त
परिकथा खूप छान लिहिल्यात.
परिकथा खूप छान लिहिल्यात.
खूप खूप आनंद देतात ह्या
खूप खूप आनंद देतात ह्या छोट्या छोट्या पोस्टी, अभिषेक.
दाद, साळुंकी, ममोताई,
दाद, साळुंकी, ममोताई, वर्षूदी, नील, निशा, आशिका.. धन्यवाद सर्वांचे
मस्त
मस्त
मस्त
मस्त
हाय अभिषेक तुम्हाला हरकत नसेल
हाय अभिषेक तुम्हाला हरकत नसेल तर परीचा एक फोटो पहायला मिळेल का? मी परीचे १०ही लेख वाचले म्हणुन कुतुहल जाणवले
आभार सगळे क्षण शेअर केल्याबद्दल.
धन्यवाद तृष्णा, विपू केलीय
धन्यवाद तृष्णा, विपू केलीय