तीन शब्दांची कथा " पुनरागमनायच "

Submitted by मिरिंडा on 27 July, 2016 - 08:55

तो चौपाटीकडे वळला
धुंद बेफाम वारा
लघाळ लाटा
कपडे , केस विस्कटलेले
तिने पाहिले
"ऑफिस सुटलं वाटतं ?'
तरी किती उशीर ?
अंधार पडलाय
घरी उशीर होतो "

" सातच्या आत घरात ?
म्हातार्‍याचा हुकूम वाटतं ?"

"मी निघत्ये "

" रागावलीस ? सॉरी !
थांब तरी थोडी
पुन्हा नाही बोलणार "

ती पाठ्मोरी होत
" बाबांना नावं ठेवतोस ?"

"सॉरी म्हंटलं ना !"

ती समुद्राकडे पाहते

" जवळ ये ना ."

"तिथूनही बोलता येतय"

" मी निघतो."

" आं "

" मग काय तर "

" ए, रागावलास ?"

" जवळ आल्यावर कळेल "

" काही नको "
" तुला काहीतरी द्यायचंय "

"मग दे ना "

" ही घे पत्रिका "

लाटांचा भडिमार

" कोणाची .......? "

"माझ्या लग्नाची "

" म्हणजे बोर्‍या वाजला ..?"

" हो........."

"आपण निघू या "

" मी जात्ये ..."
"तुझं तू बघ "

तो पाहात राहतो
तिच्या वाळूतल्या पावलांकडे

वेगवान लाट येते
त्याच्या पाया खालची
वाळू सरकते

तरीही तो थांबतो
उडणारा पदर पाहात
एकटेपणाची मळमळ अडवीत
ओरडून म्हणतो
" वाट पाहीन गं......."

" पुनरागमनायच "

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका वाक्यात फक्त तीन शब्द. या दृष्टीने या कथेकडे पाहावे. आपल्या सुचना लक्षात घेतल्या आहेत.
कथेची लांबी कितीही असेल. निदान लिहिताना माझ्या तरी डोक्यात हेच होते. लिखाण कितपत परिणामकारक
होत आहे ते पाहावे, ही विनंती. कदाचित परिणामकारक नसेलही. असो. प्रतिसादाबद्दल सर्वांचेच आभार.

Small but heart touching Nice!
Waiting for श्री संतराम next parts Happy