गेल्या दोन वर्षात मला सोशल साईट्स चे भयंकर व्यसन लागलेले आहे . दिवसभर सारखे फेसबुक किंवा wats app बघायचा त्यावर बोलायचा रोग लागलाय. अनेकदा यातून ब्रेक घ्याचा प्रयत्न केला , app मोबाईल मधून काढून टाकली
तरीही सराईत बेवड्याची पावले जशी गुत्त्याकडे वळतात ,तशीच ती (app) मोबाईल मध्ये परत आली.
थोडक्यात माझा दिनक्रम सांगतो
सकाळी उठल्यावर सर्वात आधी रात्री कोणाचे मेसेज आले ते बघतो , शौच मुख मार्जन पण मोबाईल सोबतच होते. नंतर चहा पण त्यासोबतच ( घरातली इतर माणसे जणू नाहीतच बोलायला ) इंव्हाना सगळे पेपर,मायबोली,, फेसबुक,wats app बघून झालेले असते, आई आंघोळीचे पाणी ओत्लेय हे सांगेपर्यंत मोबाईल सोडवत नाही. कसातरी मग अंघोळ उरकून ऑफिस ला पळतो. तिथेही बस मध्ये मोब्बील हवाच कोणी बोलायला नसले तर शोधून शोधून सगळ्यांना पिंग करतो , ग्रुप्स मध्ये उगाच वादावादीत सहभाग घेतो. तोवर ऑफिस येते. तिथेई सतत अर्धे लक्ष मोबाईल मध्येच असते. (आत्ताही हे लेखन ऑफिस मधूनच करतोय ) संध्याकाळी जाताना परत तोच प्रकार, घरी गेले
एका हातात मोबाईल एका हाताने जेवण (घरातले काही बोलले कि हु हु करायचे . डोके खालीच ) सतत फेसबुक, यु ट्यूब, क़्वोरा, उगाच मनात येईल ते गुगल करून बघणे , त्यावरच्या लिंका उघडून समोर येईल ते वाचत बसणे. १२ वाजून गेले तरी हे सुरु असते , न कळत हृदयाचे ठोके वाढतात हे आता मला जाणवायला लागले आहे, रात्री पटकन झोप लागत नाही,मध्येच कधी जाग आली तरी मी मोब्बील बघतो.
एका भयंकर प्रकारात मी अडकलेलो आहे याची जाणीव झालीये, पण जितके कमी करायला जातोय तितके आधी वाढतेय , प्लीज मदत करा
ते पडले बाहेर, दिसले नाहीत
ते पडले बाहेर, दिसले नाहीत माबोवर कधी.
आपल्याला ट्रिक न सांगता गेले, आपण अडकलोत अद्याप.
मानव कुणा बद्दल बोलत आहात?
मानव कुणा बद्दल बोलत आहात?
माझा एखादा आयडी असेल...
माझा एखादा आयडी असेल...
जो मी वापरायचा बंद केला असेल
@केकू: धागाकर्त्याबद्दल.
@केकू: धागाकर्त्याबद्दल.
ब्ल्यू कोलंबसे यांनी दिलेली
ब्ल्यू कोलंबसे यांनी दिलेली टेस्ट पाहिली.
सोशल मीडीया चे व्यसन किंवा बाहेरख्यालीपणाचे व्यसन यातले अती काहीच बरे वाटत नाही. दोन्हीकडे प्रमाणात आणि आपल्या गरजेनुसार वापर असला तर काहीच प्रॉब्लेम नाही. सोशल मीडीयावरचा वेळ बाहेर घालवा असा काही रामबाण तोडगा असत नाही. हल्ली बाहेरच्या जगात असहिष्णुता प्रचंड वाढलेली आहे. बर्याचदा आपले वेगळे मत मांडणे धोक्याचे ठरते. त्यासाठी सोशल मीडीया बरा पडतो.
इथेही राजकीय किंवा सामाजिक, इतिहासावरची मतं पटली नाहीत म्हणून समग्र बहीष्कार घालणारे असतात. प्रत्यक्ष जीवनात त्यांनी काय केलं असतं सांगता येत नाही.
मी ठरवलं होतं बाहेर पडायचं.
मी ठरवलं होतं बाहेर पडायचं. माझं वाटप मृत आहे. फेसबुक नुसता कातळ आहे. काही उगवत नाही. काही ईपब पुस्तकं वाचत होतो मोबल्यावर. आणि मागच्या वर्षी मोबाईलचा वापर अगदी कमी झाला. सोशल मिडियावर अर्धा तास फार तर.
कसा?
टॅब घेतला. Screen on time दहापट झाला.
कसा? पेपर वाचन, पुस्तकं वाचून (ईपब आणि पीडीएफ प्रकारातली ही), आणि यूट्यूबवर विडिओ पाहणे.
Pages