सोशल विळख्यातून बाहेर कसे पडावे ?

Submitted by बन्या on 27 July, 2016 - 05:39

गेल्या दोन वर्षात मला सोशल साईट्स चे भयंकर व्यसन लागलेले आहे . दिवसभर सारखे फेसबुक किंवा wats app बघायचा त्यावर बोलायचा रोग लागलाय. अनेकदा यातून ब्रेक घ्याचा प्रयत्न केला , app मोबाईल मधून काढून टाकली
तरीही सराईत बेवड्याची पावले जशी गुत्त्याकडे वळतात ,तशीच ती (app) मोबाईल मध्ये परत आली.

थोडक्यात माझा दिनक्रम सांगतो

सकाळी उठल्यावर सर्वात आधी रात्री कोणाचे मेसेज आले ते बघतो , शौच मुख मार्जन पण मोबाईल सोबतच होते. नंतर चहा पण त्यासोबतच ( घरातली इतर माणसे जणू नाहीतच बोलायला ) इंव्हाना सगळे पेपर,मायबोली,, फेसबुक,wats app बघून झालेले असते, आई आंघोळीचे पाणी ओत्लेय हे सांगेपर्यंत मोबाईल सोडवत नाही. कसातरी मग अंघोळ उरकून ऑफिस ला पळतो. तिथेही बस मध्ये मोब्बील हवाच कोणी बोलायला नसले तर शोधून शोधून सगळ्यांना पिंग करतो , ग्रुप्स मध्ये उगाच वादावादीत सहभाग घेतो. तोवर ऑफिस येते. तिथेई सतत अर्धे लक्ष मोबाईल मध्येच असते. (आत्ताही हे लेखन ऑफिस मधूनच करतोय ) संध्याकाळी जाताना परत तोच प्रकार, घरी गेले
एका हातात मोबाईल एका हाताने जेवण (घरातले काही बोलले कि हु हु करायचे . डोके खालीच ) सतत फेसबुक, यु ट्यूब, क़्वोरा, उगाच मनात येईल ते गुगल करून बघणे , त्यावरच्या लिंका उघडून समोर येईल ते वाचत बसणे. १२ वाजून गेले तरी हे सुरु असते , न कळत हृदयाचे ठोके वाढतात हे आता मला जाणवायला लागले आहे, रात्री पटकन झोप लागत नाही,मध्येच कधी जाग आली तरी मी मोब्बील बघतो.

एका भयंकर प्रकारात मी अडकलेलो आहे याची जाणीव झालीये, पण जितके कमी करायला जातोय तितके आधी वाढतेय , प्लीज मदत करा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे व्यसन दारूपेक्षाही भयानक आहे. सुटणे कठीण आहे. नेट पॅक बंद करुन पहा. नाहीतर एखादा जुना फोन ज्यात अ‍ॅप्स नाहीत असा फोन घ्या.

सगळ्यात आधी स्क्रीन वर दिसणारी नोटिफिकेशन्स बंद करा,
मेसेज आलाय आस दिसले कि वाचायचा मोह होतो,
बरेचसे ग्रुप म्यूट वर टाका
मी असे केले, आणि माझी मोबाइल बघायची फ्रिक्वेन्सी कमी झाली खूप,

१. लग्न झाले नसेल तर करा, बाकीच्या गोष्टीना वेळ नाही मिळणार
२. अँड्रॉइड मोबाइलला वापरणे सोडून द्या

१. लग्न झाले नसेल तर करा, बाकीच्या गोष्टीना वेळ नाही मिळणार>>
ह्याची कायबी गॅरंटी न्हाय बगा.. बायको किट्किट करुन डोक्याला वात आणणारी असेल तर पुन्हा मोबाइललाच शरण जावे लागेल. सो रोगापेक्षा इलाज भयंकर होइल Wink Light 1
जुने लोक्स सांगुन गेलेत बाईल आणि मोबाईल दोन्हीची सवय वाइटच..
बाकि ह्याची काही मदत होतेय का बघा Wink

तुम्हाला काम करून पण इतका वेळ मिळतो?? जरा कंपनीचे नाव सांगाल का? आमचाही सीव्ही पाठवतो Proud Light 1

सोशल मिडिया वर जाणारा वेळ आजकाल वाढला आहेच. तरुण पिढीमध्ये हे प्रमाण जास्त असावे.
मोबाईल वर वेळ घालविण्याचे व्यसन सुटत नसेल तर तो वेळ सत्कारणी लावा.

वर लिहिल्याप्रमाणे व्हाट्सअप वरील फालतू टीपी गृप म्युट करा नाही तर सरळ सोडून द्या. पुश नोटिफिकेशन बंद कराच. जे गृप चांगले असतील त्यावर सहभाग वाढवा. टेक्निकल डिस्कशन करणारे, समाजकार्य करणारे, साहित्य/कला विषयक गृप.....

मोबाईल वरून चांगल्या पुस्तकांचे, तुम्हाला आवड असलेल्या विषयांचे वाचन करा. तुमच्या अंगात एखादा सुप्त कलागुण असेल तर त्याच्याशी संबंधित अँप शोधून वापरा.

स्मार्ट फोन स्मार्टपणे वापरला तर बरीच उपयोगी गोष्ट आहे.....

माझे व्हॉट्सॅप स्टेटस - Not Available for Group Chat

शेवटी मनाचे सामर्थ्य सर्वात मोठे त्यामुळे मनावर घेतलेत तर सगळे होईल, शुभेच्छा!

जितक्या मनापासून या आवडी जपता तितक्याच मनापासून त्या सोडवण्याचा प्रयत्न केलात तर नक्कीच सुटेल .............. थोडा वेळ लागेल पण सुटतील .
आपलं लक्ष इतर गोष्टींकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करा - घरच्यांशी मनमोकळे बोला .

सगळ्यांकडे दिवसाच्या २४ तासांचा वेळ असतोच असतो. आपला वेळ कसा फुकट घालवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे. कारण तुम्ही कितीही तिस्मारखां झालात तरी शेवटी खाली हाथ आये थे और खाली हाथ जायेंगे हेच खरं. बाकी सगळी मोह-माया आहे.

अगदी खरी आणि त्रास्दायक समस्या आहे ही...ह्या मुळे घरच्यानाही त्रास होतो कारण
मोबाईल मध्ये डोके खुप्सून बसलेल्याचे दुसर्यान्च्या बोल ण्याकडे लक्श्यच नसते...आणि आपण मात्र २००० कि.मी. दूर असणार्याचे (आणि काहीही फारसा सम्बंध नसणार्यान्चे) फोटो, पोस्ट, पहाण्यात बि़झी असतो...
सो. मि. चे हे भूत एकदा का मान्गूटीवर बसले की उतरवणे मुश्कील...स्थळ, काळ,, वय, काम ...काही म्हनजे काही ही क्षम्य नाही ह्या भूता समोर...

सगळ apps डीलीट करून टाका...मोबा. चेक करन्याची frequency हळू हळू कमी करा.........झोपायच्या आधी तर अज्जिबात हात लावू नका...स्वप्नामध्ये पन तेच दिसते नाहीतर Wink

माईंड डायव्हर्टिंग टेक्निक्स वापरा. जाणीवपुर्वक लक्ष दुसर्‍या गोष्टीत रमवायचा प्रयत्न करा. हळु हळू जमेल

>>आई आंघोळीचे पाणी ओत्लेय हे सांगेपर्यंत मोबाईल सोडवत नाह>>>>
आई आंघोळीला पाणि काढून देते? घरातली लहान सहान कामे करायला सुरुवात करा म्हणजे मोबाईल तेवढा वेळ दूर राहील. रिकामा वेळ जास्त असला की हे व्यसन वाढते.

अत्यंत जालिम उपाय सुचवू का ?

ट्विटर, फेसबूक व्हॉट्सअप वरून "एका सत्ताधारी पक्षाच्या" चुकिच्या गोष्टींचा तावाने समाचार घ्या. योग्य ती टीका करा.
मग बघा "एका सत्ताधारी पक्षाचे नेटभगवे समर्थक" तुम्हाला इतका त्रास देतील, तुम्हाला इतक्या खालच्या पातळीवर जाऊन पोस्टी करतील की तुम्ही स्वतःहून हे सगळे बंद कराल.

मग तुम्ही आयुष्यात परत कधी सोशल मिडीयावर येणार नाही.
उदा. तुम्हाला इथे लगेच मिळेल.
Wink

सोमनाथ नाही हो, याचा उलटा परिणाम होतो,
भांडायची खुमखुमी असेल तर आपलंच कसं बरोबर होतं, हे सिद्ध करायला अजून गुगल धुंडाळायला लागतं,
मग अजून वेळ जातो
Been there done that Happy

प्रतिसाद कमी देऊन लेखकाला सहकार्य करा..नाहीतर माबो च्या नॉटिफिकेशन्स पाहायला सतत मोबाइल घेतील...

सातत्याने मोबाईल वापरण्यामुळे डोळे आणि मानेला त्रास झालेल्यांची उदाहरणे बघण्यात आहेत. गेम्स खेळणारे तर वेगळ्याच विश्वात असतात. 'आधीसुद्धा मी व्यवस्थित जगू शकत होतो' हे मनाशी घोळवणे हा काही उपाय नाही, कारण तो उपाय आहे हे पटू शकत असले तर कोणीही तो उपाय करेल. तसेच, ज्याला हा प्रॉब्लेम आहे हे समजत आहे तो हा असा धागा काढणारच नाही. तो त्या प्रॉब्लेमपासून सुटका करण्यात वेळ घालवेल. दिवसभरात फक्त (सुरुवात म्हणून) सहाच वेळा डेटा ऑन करा, बाकी बंद ठेवा. नंतर चार वेळा! त्यापेक्षा कमीही नको. काही महत्वाचे मेसेजेस मिस होऊ शकतील.

आजकाल एक गोष्ट आपोआप शिकता येऊ लागली आहे. 'विशिष्ट चर्चेत मी पडावे की पडू नये' असा विचार केला की 'आपण ह्या चर्चेत नाही पडलो तरी आपले काहीच बिघडणार नाही आहे' असे रिअलाईझ होऊ लागते. Wink Happy

त्याचाही बर्‍यापैकी (बराच) उपयोग होतो. Happy

तो अ‍ॅज युज्वल प्रतिपक्षाला दिलेला अनसॉलिसिटेड अ‍ॅडव्हाइस आहे.

नेहमीसारखाच, मागितला नसतानाही दिलेला सल्ला.

Delete those apps from smartphone or change smart phone to simple phone. Soon u will realize, u r happier, have more energy etc. Do this for month. I was very happy without smart phone. Then close frnds and family insisted that they couldn't chat.
I deleted all other apps and have Whatsapp , but exited from most of the grps.. I feel better

नमस्कार सर्वांच्या प्रतिसादासाठी धन्यवाद

दोन तीन दिवसात मोबाईल चा वापर खूप कमी केला आहे.
सर्वात आधी फेसबुक deactivate केले
wats app वरचे ऑफिस आणि इतर एक दोन महत्वाचे ग्रुप सोडून बाकी सगळी कडून बाहेर आलो.

घरी गेल्यावर मोबाईल बाजूलाच ठेवतोय. एक दोनदा बघायचा मोह झाला, पण फेसबुक बंद असल्याने लगेच बाजूला ठेवला गेला.

बघुयात आता पुढे काय होतंय

रच्याकने,
धागाजुलाब लागलेल्यांच्या धाग्याच्या विळख्यातुन माबोकरांनी कसे बाहेर पडावे हा एक धागा काढता येइल Wink

मला आवडतं सोशल नेटवर्क च्या टच मध्ये रहायला.व्हॉ अ‍ॅ वगैरे नव्हतं तेव्हा मी ऑफिस मध्ये इमेल रिफ्रेश करुन काही आलंय का हे बघण्याचा उद्योग करायचेच.माझ्या आयुष्यात ती मोठी थ्रिलिंग घटना असते.
जेवताना टिव्ही/पुस्तक्/मोबाईल सर्व डिव्हाईस बाजूला ठेवून जेवायचं असा नियम आमच्या कुटुंबाने केलाय आणि त्याचा चांगला उपयोग होतो.घरी असताना करावी लागणारी कामं ही बरोबर मोबाईल न घेता करावी लागणारी किंवा मोबाईळ घेतल्यास तो बघायला न मिळणारी असतात त्यामुळे आपसूकच सोशल नेटवर्क कमी होतं.
ऑफिसात वेटिंग वाल्या कामांच्या मध्ये(सर्व्हर लाँच होणे,बिल्ड होणे इ.इ.) मोबाईल आणि सोशल नेटवर्क पाहिले जाते.सुदैवाने एयरटेल २जी चा स्पीड सध्या 'मेल्या मुडद्या उठ ना, पुढे सरक ना' वाला असल्याने व्हॉ अ‍ॅ सोडून फार काही करता येतच नाही.
सोशल नेटवर्क च्या विळख्यातून सुटण्याचा बेस्ट उपाय म्हणजे कामं करणे.किंवा कोणाशी तरी गप्पा मारताना फोन बाजूला ठेवून देणे. कधीकधी मल्टि टास्किंग हा प्रकार उपायाऐवजी अपाय करतो.

आपण एकलेच या विळख्यातून बाहेर पडून फायदा नाही अन्यथा एकटे पडू.. झुंडीच्या झुंडी बाहेर पडायला हव्यात.. उगाच एकटेच शेर बनायला गेलो तर बोर होऊन च्यायला होतो तिथेच बरा होतो म्हणत परत फिरू.. उद्या आपल्याला ठामपणे पटले की फेसबूक व्हॉटसप एक गटार आहे, पण जर आपले सारे मित्र त्या गटारात लोळताना दिसत असतील तर आपण एकटेच स्वच्छ पाण्याच्या धबधब्याखाली घालून घालून किती धिंगाणा घालणार.. आपणही पुन्हा तिथेच जाणार !

गेले दोन दिवस ट्रायल म्हणून मी दूर राहायचा प्रयत्न केला .. आणि मला हे वरचे कारण सापडले.. दोन दिवसांत दोन महिन्यांचा बोर झालो Sad

अशक्य आहे या विळख्यातून बाहेर पडणे!
त्यापेक्षा यात राहूनच लाईफ कसे मनोरंजक बनवता येईल हे बघा ..

सक्काळीं मोबाईल न घेतां 'मॉर्निंग वॉक'ला जावून या विळख्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांचा मुहूर्त करावा. [अर्थात, तिथंही या रोगाची लागण झालेले दिसले, तर मात्र त्यांच्यापासून लांब रहावे !]

सक्काळीं इथं येवून मस्तपैकीं रात्रीचे मोबाईलवरचे मेसेज वाचावे, तर
तुझ्यासारख्या खुळचट 'मॉर्निंग-वॉक' वाल्यांची गर्दी !!
baapre.JPG

<< भाऊ, इतक्या इन्स्टंत इतकी चांगली चित्रे कशी काढता हो? >> सरावामुळे एमएस ऑफिसच्या 'पेंट'मधे माऊस वापरून चित्रं काढण्यावर हात बसलाय इतकंच !
<< मासिकाचे प्रोफेशनल मुखपृष्ठकार आहात का?>> नाही. मीं फक्त एक हौशी , रांगडा, तथाकथित चित्रकार आहे व माबोकरांच्या सहनशक्तीची परिक्षा घेतोय ! Wink

रावामुळे एमएस ऑफिसच्या 'पेंट'मधे माऊस वापरून चित्रं काढण्यावर हात बसलाय इतकंच !>>>
अग्गं बाब्बो!! वेळ भरपुर लागत असेल ना भाऊ? एक अंदाज- वरच चित्र काढायला १.५-२ तास लागले का?

माबोकरांच्या सहनशक्तीची परिक्षा घेतोय >>>>> भाउ, ते परिक्षेचं सोडून द्या. तुम्ही चित्र काढा, आम्ही आहोत चित्र बघायला .................. Happy

व्यचि तर मस्त आहेच, पण पेंट वगैरे वापरून अशी चित्रे काढणे याला निव्वळ कलाकारी नाही तर सोबत दांडगी हौसही हवी.

<< वरच चित्र काढायला १.५-२ तास लागले का? >> १० ते १५ मिनीटं ! 'पेंट'चीं टूल्स आहेत व सरावामुळे हात बसलाय; १.५ ते २ तास लागले असते तर निवृत्त असूनही माझ्यासारखा आळशी माणूस कशाला ह्या फंदात पडला असता ? Wink
<< ..सोबत दांडगी हौसही हवी. >> यू सेड इट !!!

Internet addiction test for you. ही टेस्ट दिल्याने प्रथम आपण कोणत्या गोष्टींनी trigger होतो हे कळेल, त्या लिहून काढल्या की मग त्यावर ताबा मिळवता येईल. मात्र तो मिळवणे सर्वथा तुमच्या प्रयत्नावर अवलंबून. ही टेस्ट anchor आहे आणि दे आठवड्याला देऊन स्कोर दाखवून ती तुम्हाला ' आरसा ' दाखवेल.

https://www.mind-diagnostics.org/internet_addiction-test

Pages