निघालो घेऊनी जत्था

Submitted by संतोष वाटपाडे on 21 July, 2016 - 02:28

निघालो घेऊनी जत्था तुझ्या गतआठवांचा
पुरावा ठेवला मागे निनावी आसवांचा....

बघा काळीज माझे एकदा उकरुन कोणी
कसा झाला असावा खून माझ्या भावनांचा...

जिव्हारी लागली दुःखा तुझी माघार कारण
मला आधार होता तू दिलेल्या वेदनांचा....

असा आनंद मज देऊन गेली आत्महत्या
जगाने ठेवला सत्कार माझ्या लेकरांचा...

कधी देशील पायाखालची तू वीट मजला
मलाही होत आहे त्रास इथल्या ढेकळांचा...

उतारा गवसला नाही अजुन ज्यांच्या विषावर
म्हणे तो वर्ग तर असतो जवळच्या माणसांचा ..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप मस्त .....
कधी देशील पायाखालची तू वीट मजला
मलाही होत आहे त्रास इथल्या ढेकळांचा....... हे जास्त आवडल Happy