Submitted by अभय आर्वीकर on 15 July, 2016 - 13:13
॥सांगा तुकारामा : अभंग-१॥
ठेविले अनंते । तैसे कैसे राहू ।
तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥
इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥
आयातुनी माल । शत्रू देशातला ।
माझ्या सृजनाला । बुडविती ॥३॥
माझ्या निर्यातीची । वाट अडविती ।
जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥
गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥
लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय ।
आणि हयगय । श्रमिकांची ॥६॥
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(१५/०७/२०१६)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त अभंग ! तुकोराया पेक्षा
मस्त अभंग !
तुकोराया पेक्षा तुकाराया चांगले वाटेल !