पिंट्या इज बॅक .. अॅण्ड धिस टाईम विथ डाळ खिचडी !
पिंट्याच्या आईचा माझ्यावर आधीपासूनच विश्वास होता. आता पिंट्याचाही बसलाय हे म्यागीच्या यशाने सिद्ध केलेय. यश म्हणाल तर पिंट्या महिन्याभराच्या आतच पुन्हा माझ्या हातचे खायला आला यातच ते आले.
तर गेले काही दिवस पिंट्या आजारी होता. माझी म्यागी खाऊन नाही हा, तर मुंबईतल्या अकाली पाऊसपाण्याचा परीणाम. आता काय म्हणावं, ही आजकालची पोरं. जरा पावसाला सुरुवात झाली की यांना लवेरीया तरी होतो किंवा मलेरीया तरी होतो. पोरगं तापाने फणफणलंच. चार दिवस तोंडाला चव नव्हती. कसाबसा पेजपाण्यावर जगला. पण पाचव्या दिवशी एका फिकट चवीची दालखिचडी घेऊन माझ्या दारी हजर झाला आणि म्हणाला, रुनम्या.. होऊ दे खर्च, डाळभात आहे घरचं. मग काय, उतरलो मी स्वैयमपाकघरात, माझे सारे चवदार मसाले घेऊन, पिंट्याच्या दालखिचडीची रंगत वाढवायला.
यावेळी मात्र मी एव्हरेस्टला दूर सारत आमच्या गावचा मालवणी मसाला काढला. सर्वात पहिले तो दालखिचडीवर शिंपडून घेतला. शिंपडताना त्याचा वास मळलेल्या तंबाखूवर थाप मारल्यासारखा वातावरणात दरवळला आणि पिंट्याला तिथेच तरतरी आली. त्याच तिरमिरीत त्यांने कांदा चिरून घेतला. परीणामी तरतरीची जागा आता आनंदाश्रूंनी घेतली. मी काढलेला बेसनाचा डब्बा पाहून तर ते घळघळा वाहू लागले. पिंट्याला पुढच्या परीणामांची कल्पना येऊ लागली होती आणि दुसर्याच क्षणाला एक स्वच्छ धुतलेली कढई माझ्यासाठी गॅसवर तयार होती.
सर्वप्रथम मी त्या पेशंट दालखिचडीला तेल-मसाला-मिरचीचा हलकासा तडका दिला. काहीतरी करपेल, जळेल अशी भिती सतत मनी असल्याने मी असे प्रकार हलकेच करतो.
मग त्यात बेसनाचे पीठ कांद्यासोबत टाकून पार ढवळून घेतले आणि त्या मिश्रणाची चव घेतली.
ईथपर्यंत माझ्यासाठी सारा जुगारच होता. पण या मिश्रणाची चव मस्त लागताच हे जमलेय म्हणत आजच्या पाकृचा पहिलावहिला फोटो काढला.
पुढे जो पदार्थ तयार होणार होता त्याला मायबोलीवर लोकाश्रय मिळावा म्हणून जास्तीचे दोन मसाले वा शेवफरसाण, अंडी, कोथिंबीर न टाकता यालाच फायनल केले आणि पहिले नैवेद्याचे पाच तळून घेतले.
पहिली डेअरींग पिंट्याने केली. दुसरा मी खाल्ला. उरलेल्या तिघांचा फोटो काढला.
अह्हाहा अह्हाहा .. काय चव होती .. वरतून खमंग क्रिस्पी आणि आतून किंचित लुसलुशीत .. फोटोचा फ्लॅश विरतो ना विरतो तोच पिंट्याने आणखी एक उचलला. उरलेल्या दोघांवर मी झडप घातली.
पण तुमच्या पोटात दुखायचे काही कारण नाही. हे पहा तुमच्यासाठी आणखी तळायला घेतले आहेत.
जमले तर ईथेच गरमागरम खावा. नाहीतर पाककृती पॅक करून घरी घेऊन जावा ..
पण त्या आधी हे जरूर वाचा ..
१) हे दालखिचडीचे भजे तुम्ही लंचटाईमला स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा हे तुम्हाला न्याहारीच्या वेळी पोटभरीच्या जेवणाचा आनंद देऊ शकते.
२) दालखिचडी आदल्या रात्रीची उरलेलीही वापरू शकता. शेजार्यांची न संपलेलीही आणू शकता.
३) दालखिचडी कशी बनवावी याची रेसिपी माहीत नसल्यास ते संजीव कपूर वगैरे लोकं असतात ना, त्यांच्या पुस्तकातून उचलली तरी चालेल मला.
४) तांबाट्याचा सॉस याबरोबर चांगला लागतो हे ओळखायला पैसे पडू नयेत. तसेच सोबत चहा असल्यास तो या डिशची रंगत वाढवतो हे देखील सांगायला लागू नये.
तरी पिंट्याच्या मते दह्याच्या कोशींबीर मध्ये बुडवत खायलाही हे मस्त लागतील किंवा घोट घोट ताकाबरोबरही छान जातील. (जे घरात नसतं तेच नेमकं या पिंट्याला हवं असतं..., असं पिंट्याची आई उगाच नाही म्हणत)
असो, तर पाककलेत अडाणी असलेल्या मुलांनीही, मनात आणले तर अंड्याचा वापर न करताही, ते एखादा भन्नाट चवदार पदार्थ तयार करू शकतात हा आत्मविश्वास मला आजच्या या रेसिपीने दिला. आता तो दिवस दूर नाही जेव्हा मी अलाँगविथ पिंट्या ‘कोंबडीवडे विथ सोलकढी’ सारख्या एखाद्या पारंपारीक पदार्थाला हात घालेन आणि त्यातही काहीतरी वेगळे करून जाईन.. बोलो आमीन
- ऋन्मेष
चांगला लागला असेल हा पदार्थ..
चांगला लागला असेल हा पदार्थ.. पण नॉन स्टीक पॅन मधे करताना, इतके तेल घालायची गरज नसते ! पिंट्या आजारातून उठलाय ना, म्हणून सांगतोय
तुमची रेसीपी आलेली बघून एकदम
तुमची रेसीपी आलेली बघून एकदम धडकी भरते.... : फिदी:
( ह. घ्या.)
पण हि बरीय.
नाचो... पहिलाच प्रतिसाद
नाचो... पहिलाच प्रतिसाद मायबोली मास्टरशेफचा .. तो देखील सकारात्मक.. आता मागचेही ठिकठाकच येतील
झंपी, धन्यवाद आणि हो .. हळूहळू मळायला, ढवळायला, तळायला शिकतोय.. स्टेप बाय स्टेप .. पाकृ बाय पाकृ.. सुधारणा दिसत जातील
बाकी तेलाचे गणित नेहमीच या भितीने चुकते. पुढे नॉनस्टीकचा अंदाजही येईल हळूहळू
छान आहे पाकृ. पण मीठ नाही
छान आहे पाकृ. पण मीठ नाही टाकलंस का?
शेजार्यांची न संपलेलीही आणू शकता.>> मंग्याची आई आठवली.
बरं आहे एकंदरीत
बरं आहे एकंदरीत
कोण मंग्याची आई? मीठ बाकी
कोण मंग्याची आई?
मीठ बाकी डब्बल टाकले. पिंट्याच्या आईने बिनमीठाची खिचडी केली होती बहुधा. आमच्याकडे मात्र उलट असते. आजारी पडलो तोंडाला चव नसली तर भाताची खारट पेज किंवा सफरचंदही मीठ मीरपूड लाऊन खायला देतात..
साध्या भाताचे करेन. रोजा
साध्या भाताचे करेन.
रोजा सोडताना काहीतरी खमंग लागते
छान जमलेत दालखिचडी
छान जमलेत दालखिचडी पकोडे.
शाब्बास!
तो दिवसपण दूर नाही जेव्हा तू माबोमास्टरशेफ बनशील आणि युसांयुसुवर सल्ले देशील.
आमेन!
कबाब्ज.. मस्त रे ऋन्मेस..
कबाब्ज..
मस्त रे ऋन्मेस..
छान आहे.
छान आहे.
त्याच तिरमिरीत त्यांने कांदा
त्याच तिरमिरीत त्यांने कांदा चिरून घेतला. परीणामी तरतरीची जागा आता आनंदाश्रूंनी घेतली
हे लैच भारी आवडलेले आहे ऋन्मेषभाऊ! बाकी पाकृ सुद्धा मस्तच
मस्तच. आता जास्तीची दालखिचडी
मस्तच. आता जास्तीची दालखिचडी करून ती ऊरवणे आले.
एक नंबर रे मित्रा !! मुंबईत
एक नंबर रे मित्रा !!
मुंबईत आता काम काढावंच लागेल असे दिसते आहे, म्हणजे तुझ्या हातचे असे भारी प्रकार चाखायला मिळतील
हळूहळू मळायला, ढवळायला,
हळूहळू मळायला, ढवळायला, तळायला शिकतोय.. स्टेप बाय स्टेप .. पाकृ बाय पाकृ.. सुधारणा दिसत जातील स्मित
रुनमेषा, तुझी पाकृ आली की हेच्च होतं सगळं... हळूहळू मळमळणे, ढवळणे, तळमळणे...वगैरे वगैरे...जरा काही दिवस आईच्या आज्जीच्या हाताखाली बसून नेटका स्वैपाक शिकून घे ना पहिल्यांदा....मग प्रयोग कर बरं...
ही पाककृती आवडली. मस्तच. आता
ही पाककृती आवडली.
मस्तच. आता जास्तीची दालखिचडी करून ती ऊरवणे आले. >> +१
झकास बरं का ही पाकृ. लिहायची
झकास बरं का ही पाकृ.
लिहायची स्टाइल पण मस्तच.
पिंट्या बराय ना?
रुनमेषा, तुझी पाकृ आली की
रुनमेषा, तुझी पाकृ आली की हेच्च होतं सगळं... हळूहळू मळमळणे, ढवळणे, तळमळणे...वगैरे वगैरे...जरा काही दिवस आईच्या आज्जीच्या हाताखाली बसून नेटका स्वैपाक शिकून घे ना पहिल्यांदा....मग प्रयोग कर बरं... >>>>
हो ना लग्नानंतर फायदाच होईल त्याचा
मस्त पाकृ चमचमीत. आणि
मस्त पाकृ
चमचमीत. आणि लिखाणाची स्टाईल तर भन्नाट.
रुनमेषा, तुझी पाकृ आली की
रुनमेषा, तुझी पाकृ आली की हेच्च होतं सगळं... हळूहळू मळमळणे, ढवळणे, तळमळणे...वगैरे वगैरे..>>>>> हे बाकी खरंय.
पण हा प्रकार दिसतोय बरा. बाकी पिंट्या जाणे.
वा! चांगले झाले असणार हे
वा! चांगले झाले असणार हे वडे.
लिखाण नेहमी सारखेच! कॅच (कॅची) मसाला घातलेले
मस्त पाकृ आणि लिहायची स्टाइल
मस्त पाकृ आणि लिहायची स्टाइल पण भारी
त्याला मायबोलीवर लोकाश्रय
त्याला मायबोलीवर लोकाश्रय मिळावा म्हणून जास्तीचे दोन मसाले वा शेवफरसाण, अंडी, कोथिंबीर न टाकता यालाच फायनल केले आणि पहिले नैवेद्याचे पाच तळून घेतले. > भारी लिहिलय!
ही पाकृ जमलीये.. लिहलीये पण
ही पाकृ जमलीये.. लिहलीये पण मस्त
मस्त. Shallow fry केल्याबद्दल
मस्त. Shallow fry केल्याबद्दल बोनस पाच गुण.
संजीव कपूरने बचे हुए चावल के पकोडे डीप फ्राय केलेले.
खिचडी मिक्सरमधून काढून पीठ मिसळून pan cake / dosa अशीही रेसिपी आहे.
आम्ही सारे मध्ये, शिळी चपाती
आम्ही सारे मध्ये, शिळी चपाती मिक्सर मधून काढून त्या चुर्यात पाणी ओतोन, जरासे बेसन शिवरून मग डोसे करून दाखवलेले एका बाईने.
आई गं, झालेलं मला....
कधी कधी , काही बायका एकदम धडाकेबाज रेसीपी दाखवतात आम्ही सारे खवय्ये मध्ये. कापरं भरेल पाहून.
रुन्म्या, तुम्ही द्या पाठवून हि रेसीपी.
शिळी चपाती मिक्सर मधून काढून
शिळी चपाती मिक्सर मधून काढून त्या चुर्यात पाणी ओतोन, जरासे बेसन शिवरून मग डोसे करून दाखवलेले एका बाईने.> अगग!
वा रेसिपीबरोबर लिखाणही चवदार
वा रेसिपीबरोबर लिखाणही चवदार आहे.
http://paricashkitchen.blogsp
http://paricashkitchen.blogspot.in/2013/02/pancakes-with-leftover-khicha...
आयुष्यात पैल्यांदा लोकं
आयुष्यात पैल्यांदा लोकं माझ्या पाकृबद्दल आधी बोलताहेत मग लिखाणाबद्दल .. भरून आलेय
डोळे पुसून या रुन्म्या. ----
डोळे पुसून या रुन्म्या.
----
नेट्वर तर शिळ्या चपातीचे दोसे, चकलि, शेव, वडे, उपमे, चिवडे आणि कहर म्हणजे खीर सुद्धा बनवतात म्हणून लिहिलय.
Pages