सारी ईस्कटून जिंदगी मी पाहिली - अजय-अतुल फॅन क्लब

Submitted by हायझेनबर्ग on 7 June, 2016 - 11:47

२०१४ च्या फँड्रीनंतर 'त्या' एकाच गाण्यासाठी साठी धागा काढावा म्हणता म्हणता सैराट ऊजाडला आणि अजय -अतुल फॅन क्ल्ब जमवणे नेसेसिटीच झाली.

https://www.youtube.com/watch?v=O_R0Sx6bggI

खरं तर अजय- अतुल फॅन क्लब काढण्यासाठी फँड्रीतली ऊरूस स्टाईल म्युझिक कंपोझिशन, नटरंग मधला गण किंवा जीव रंगला, किंवा मोरया सुद्धा असं एखादंच गाणं पुरेसं आहे. चित्रपटांची जंत्रीच्या जंत्री देण्याची काही गरजंच नाही, पण तरी फॅन म्हंटलं की ऊदो ऊदो करणं हक्कंच आहे आमचा.
अगं बाई अरेच्याचं एकंदर मुझिक पॅकेज मस्तं होतं.मला कोंबडी वगैरे सारखी गाणी फार अपील झाली नाहीत पण नटरंग च्या गाण्यांनी पुन्हा वेड लावलं.
'जीव झाला येडा पिसा' ऐकून दिवसभर काही सुधरलं नाही. त्या गाण्याचं लिरिक्स, अजयचा आवाज फार फार अमेझिंग यट डिस्टर्बिंग आहे. सैराटचा ऊल्लेख करण्याचीही आवश्यकता भासणार नाही, कारण 'एपिक लवस्टोरी सारखी' ईतकी ही गाणीही 'एपिकच' आहेत.
अजय-अतुलनं मराठी संगिताला काय दिलं वगैरे विचार करण्याच्या फंदात मी पडत नाही, त्या गाण्यांनी मला काय दिलं - तर 'जीव झाला येडापिसा' ने दिलेले शहारे आठवतात, मोरयावर तालात पडणारी पावलं आणि अंगात भिनणारी झिंग आठवते, वाजले की बारा असो की अप्सरा आली असो, गण असोवा सिंफनी असो दोन्हींमध्ये एक रांगडी नजाकत आहे जी तुमच्या डोक्यात भुंग्यासारखी ऊडत राहते, सैराट झालं जीचं गुदगुल्यानंतर अंग शहारवणारं तरूण प्रेम असो वा जीव रंगलात हरिहरन च्या सोल सर्चिंग आवाजातून जाणवणारी प्रेमातली प्रगल्भता, मला अजय-अतुल , त्यातल्या अजयच्या आवाजासहित सॉलिड आवडतात.
मला तर वाटतं अजय-अतुल नं एक्स्ल्यूझिवली मराठीतंच रहावं पण व्यावसायिक गणितं आपल्या डोक्याबाहेरची आहेत आणि तो ईथे विषयही नाही.
अजय-अतुल आणि अरिजित असं एक हळूवार मराठी कॉबिनेशन ऐकण्याचीही फार मनिषा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण फॅन क्लबात..
आई भवानी तुझ्या कृपेनं
वार्यावरती गंध पसरला
मायेच्या हळव्या
मल्हार वारी
दुर्गे दुर्गट भारी ( अगबाई आरेच्चा मधलच )
नवरी आली...
अभी मुझमे कही
मोरया
माउली माउली
जीव रंगला
लल्लाटी भंडार
नटरंग ची सगळी गाणी
आणि आता सैराट ची सगळी गाणी...
मस्त मस्त मस्त...

ही सगळी गाणी एकत्रीत कुठल्या सीडी मद्धे मिळतील का ?

अजय-अतुलची जी देवांची गाणी आहेत जसे 'आई भवानी', 'मोरया', अथर्वशिर्ष, श्रीगणेशा,एकदंताय वक्रतुंडाय, माऊली' ही सगळीच गाणी ऐकताना प्रत्येकवेळी डोळ्यात 'भावाश्र्र्' (सद्भावनेने ओतप्रोत भरलेले अश्र्र्) येतातच.
>>>>>
सहमत पण अश्रू ऐवजी भक्तीभावाचा काटा येतो अंगावर. अर्थात ही संगीताचीच जादू अन्यथा मी नास्तिक आहे.

अभी मुझ मे कही' गाणे ऐकतानाही शहारा येतो. मात्र याचे श्रेय अजय-अतुल-सोनू या त्रिकूटाला जाते.
चला नाव निघाले तर ऐकावेच लागणार. रात्री सव्वाची वेळ, स्थळ आपलेच बेडरूम, दूर दूर पर्यंत रातकीड्यांचाही आवाज नाही, अर्ध्या उघड्या खिडकीतून आत येणारा वारा तेवढा येता जाता तुळशीच्या पानांची सळसळ करतोय .. यापेक्षा चांगला माहौल नाही हे गाणे ऐकायला.. Happy

मी ही क्लबात! वर उल्लेखलेली बरीच गाणी माझीही आवडती.. मल्हारीवारी भयंकर आवडते. इतर काही गाणी ऐकली नाहीयेत असं दिसतंय. गेल्या दोन ट्रिपांना अजय-अतुलची गाणी असलेली एम्पी३ घेऊन येणे हे नेहेमीचे काम आहे माझे. Happy ह्यावेळेसही आणली आहे. अजुन ऐकायची आहेत. त्यात असतील बहुधा ही वरची गाणी..

अजय-अतुल जोडीची सगळीच गाणी माझी अतिशय आवडती आहेत. सिंघममधले " साथिया पगले से दिल ने ये क्या कीया" या गाण्यात अजयच्या आवाजातला "बदमाश दिल तो ठग है बडा" हा कोरस ऐकायला मला खूप आवडतं. "गोऱ्या गोऱ्या गालावरी " हे तर माझ्या लग्नसमारंभाच्या वेळी मी स्वत: भावाला सांगून ७-८ वेळा पूर्ण हळद लावण्याचा कार्यक्रम होईपर्यंत रिपीट केलं होतं आणि "भरुनिया आलं डोळं जड जीव झाला " हे ऐकून पप्पांच्या कुशीत शिरून रडले होते.

अजय-अतुल ने संगीत दिलेलं सायकल एक्की हे तेलुगू गाणं ऐकलंय का कोणी? माझ्या फेवरेट लिस्ट मधलं हे टॉप गाणं.

अजय अतुल अतिशय गुणी संगितकार जोडी.
इतिहास रचणार.
त्यांची कोणतीही गाणी खिळवून ठेवतात. रक्त उकळवणारं संगितही ते देऊ शकतात(झिंगाट) आणि तितकंच निर्मळ शांत मन हेलावून टाकणारंही (अभी मुझमें कही)
गाणं कोणतंही असो, रोमँटिक, भक्ती गीत, डान्स नंबर... त्यावर अजय अतुलचा एक न दिसणारा शिक्का बसतो (ट्रेडमार्क सारखा) तो अस्सल कानसेन आणि अजय अतुल च्या फॅनलाच कळतो Happy

जीव झाला येडापिसा प्रचंड डिस्टर्बिंग आहे. जबराट अडकलोय ह्या गाण्यात. >> ई तो स्साला होना ही था Lol
पहिल्यांदाच ऐकतोय का श्री?

अजय अतुल ऑन रिपीट मोड .
जीव झाला येडापिसा प्रचंड डिस्टर्बिंग आहे. जबराट अडकलोय ह्या गाण्यात.
<<
एक दोनदाच ऐकलय गाणं , सगळ्यांना डिस्टर्बिंग का वाटतय ? लिरिक्स तसे आहेत का ?
मला वाटलं फिल्म प्रमोशन साँग आहे , गाण्यात मोस्ट्ली जाब्या शालुची स्वप्नं बघताना दाखवलाय असं आठवतय, पहायला पाहिजे परत !

मी पण मी पण... फॅनक्लबात!!

मन उधाण वार्‍याचे पासून वेड लागलंय. आणि बहुतेक सगळीच गाणी आवडतात. सद्ध्या सैराट झालं जी रीपीट मोड वर सुरू असते.

दिवसाची सुरूवात तर त्यानी संगीत दिले ्या अथर्वशीर्षाने होते.

हायझेन बहुतेक आधी ऐकलं होतं पण नक्कीच नीट लक्ष देऊन ऐकलं नसणार.
काय जबरदस्त गाणं आहे यार , जबरदस्त वेडा झालोय ' तुझ्या पिरतीचा हा विंचु ' गाण्याने.
https://www.youtube.com/watch?v=mGvByHomks4

गणपती झाले, माऊली झाली, होळी झाली, झिन्गाट झाल
आता एक देशभक्तीपर गाण बनवायला सान्गा त्याना, १५ आउग्स्ट आणि २६ जान साठी
म्हणजे प्रसन्ग कोणताही असो हिट गाणे आमचेच असे होईल त्याना

मीही आहे ह्या फैन क्लबात!

Pages