सारी ईस्कटून जिंदगी मी पाहिली - अजय-अतुल फॅन क्लब

Submitted by हायझेनबर्ग on 7 June, 2016 - 11:47

२०१४ च्या फँड्रीनंतर 'त्या' एकाच गाण्यासाठी साठी धागा काढावा म्हणता म्हणता सैराट ऊजाडला आणि अजय -अतुल फॅन क्ल्ब जमवणे नेसेसिटीच झाली.

https://www.youtube.com/watch?v=O_R0Sx6bggI

खरं तर अजय- अतुल फॅन क्लब काढण्यासाठी फँड्रीतली ऊरूस स्टाईल म्युझिक कंपोझिशन, नटरंग मधला गण किंवा जीव रंगला, किंवा मोरया सुद्धा असं एखादंच गाणं पुरेसं आहे. चित्रपटांची जंत्रीच्या जंत्री देण्याची काही गरजंच नाही, पण तरी फॅन म्हंटलं की ऊदो ऊदो करणं हक्कंच आहे आमचा.
अगं बाई अरेच्याचं एकंदर मुझिक पॅकेज मस्तं होतं.मला कोंबडी वगैरे सारखी गाणी फार अपील झाली नाहीत पण नटरंग च्या गाण्यांनी पुन्हा वेड लावलं.
'जीव झाला येडा पिसा' ऐकून दिवसभर काही सुधरलं नाही. त्या गाण्याचं लिरिक्स, अजयचा आवाज फार फार अमेझिंग यट डिस्टर्बिंग आहे. सैराटचा ऊल्लेख करण्याचीही आवश्यकता भासणार नाही, कारण 'एपिक लवस्टोरी सारखी' ईतकी ही गाणीही 'एपिकच' आहेत.
अजय-अतुलनं मराठी संगिताला काय दिलं वगैरे विचार करण्याच्या फंदात मी पडत नाही, त्या गाण्यांनी मला काय दिलं - तर 'जीव झाला येडापिसा' ने दिलेले शहारे आठवतात, मोरयावर तालात पडणारी पावलं आणि अंगात भिनणारी झिंग आठवते, वाजले की बारा असो की अप्सरा आली असो, गण असोवा सिंफनी असो दोन्हींमध्ये एक रांगडी नजाकत आहे जी तुमच्या डोक्यात भुंग्यासारखी ऊडत राहते, सैराट झालं जीचं गुदगुल्यानंतर अंग शहारवणारं तरूण प्रेम असो वा जीव रंगलात हरिहरन च्या सोल सर्चिंग आवाजातून जाणवणारी प्रेमातली प्रगल्भता, मला अजय-अतुल , त्यातल्या अजयच्या आवाजासहित सॉलिड आवडतात.
मला तर वाटतं अजय-अतुल नं एक्स्ल्यूझिवली मराठीतंच रहावं पण व्यावसायिक गणितं आपल्या डोक्याबाहेरची आहेत आणि तो ईथे विषयही नाही.
अजय-अतुल आणि अरिजित असं एक हळूवार मराठी कॉबिनेशन ऐकण्याचीही फार मनिषा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायझेनबर्ग, तुझ्या क्लबात मीही (अन्यत्र क्लब्ज् झेपले नाहीत तरी ;))

माझंही इंट्रोडक्शन "मन उधाण वार्‍याचे " ने झालं. पण तू म्हणतोस त्याला १००% अनुमोदन. त्यांची मराठी गाणीच अस्सल वेड लावतात. पीके मधलं लक्षातही नाही आणि चिकनी चमेली नुसतीच कॉपी वाटते स्वतःच्या चालीची (हृदयनाथचं "होळी आयी" ऐकून जसं झालं तोच इफेक्ट). अपवाद फक्त "देवा श्रीगणेशा",

मी "माऊली" ही मेन्शन करेन. भन्नाट वाटतो त्याचा इफेक्ट.

मी पाचवा मी पाचवा. Lol
मल्हारवारी, वाऱ्यावरती गंध पसरला आणि हे देवा तुझ्या दारी आलो नी सुरुवात...

मी पण ह्या क्लबात !

सैराटची याड लागलं, सैराट झालं जी आणि आता गं बया पहिल्या नंबरवर सध्या
गोर्‍या गोर्‍या गालावरी खूप आवडतं
जोगवाचं जीव रंगला आवडतंच पण तितकंच लल्लाटी भंडारही आवडतं.
एकदंताय वक्रतुंडाय खूप आवडतं.

अगो+१
"मल्हारवारी" असो की "जीव रंगला" असो, अजय अतुलची गाणी मराठी मातीतली वाटतात. त्यांनी वेस्टर्न फ्युजन केले तरी गाण्यातलं मराठीपण जात नाही हे सैराटमध्ये ऐकलंच. सैराटची गाणी खरंच "एपिक" आहेत.

अगो +१
हिंदी मध्ये अभी मुझमें कहीं फार आवडतं. बाकी अजय अतुल ची सर्व गाणी आवडतातच असं नाही पण काही खूप आवडतात.

अगंबाई अरेच्चा ची सगळी गाणी मस्त आहेत. ती आवडतातच पण फँड्री किंवा सैराटची गाणी अजून ऐकलेली नाहीत त्यामुळे कल्पना नाही.
फॅक्लबात आहे की नाही कल्पना नाही कारण मुद्दाम आवर्जून मिळवून गाणी ऐकल्याचं आठवत नाही.

मी पण अजय-अतुल फॅन क्लबात!

सैराटची सगळी गाणी अावडलीत. शिवाय 'माऊली माऊली" हे गाणे ऎकताना तर भारावून जायला होते.

मी पण ह्या क्लबात ...
खरच खुप सुंदर आणि एकापेक्षा एक सुंदर याड लावनारी गाणी ... जवळपास सगळीच गाणी आएकलेलि आहे.. ती पन खूपदा...

अजय अतुल यांच्या संगितने मराठी चित्रपट सृष्टी मधिल मरगळ दुर केली... मराठी संगितात नवीन प्रयोग केले.. महत्त्वाच म्हनजे दुसऱ्या भाषेतील गायक वपरून सुद्धा त्या गाण्याचे मराठीपन जपल... यासाठी त्यांचे मन:पूर्वक आभार...

त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या एका अप्रतिम गाण्याचे शब्द ते सैराट च्या निमित्ताने पूर्ण करत आहे ...

सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ
उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ
रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू
भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू
नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे...

सायो, नटरंग ची गाणीही खूप मस्तं आहेत, पूर्ण अल्बमच सॉलिड आहे तो.

हो, मराठी संगीत,बोल, लय, आवाज आणि ऊच्चार सगळ्यातंच मराठी मुरलेलं वाटतं म्हणून अपील होतात.

अजून एक मला अजय अतुल च्या गाण्यांबद्दल नेह्मी वाटतं, विशेषतः जर लिरिक्स सुद्धा त्यांचंच असेल तर, की ओळी आणि त्यातल्या भावना अ‍ॅबस्ट्रॅक्ट कमी आणि थेट जास्त असतात. कवितेतल्या विचार आणि कल्पना घिस्या पिट्या असतात पण थेट असतात.

सशल क्लबात स्वागतंच आहे. टेनिस क्लब सोडून ईतर क्लबात 'हेल फेडरर' म्हणणं बंधनकारक नाहीये. Wink

मला बरीच गाणी आवडतात त्यांची, 'मल्हारवारी', एकदंताय वक्रतुंडाय आणि 'जीव गुंगला, दंगला' ही अति जास्तच आवडतात. मला आवडतात ते दोघं, त्याचं कौतुक वाटतं पण अगदी fan नाही म्हणता येणार मला.

हेss उरात होतयं धडधड लाली गालावर आली
अन अंगात भरलयं वारं ही पिरतीची बाधा झाली
आरं उरात होतय धडधड लाली गालावर आली
आनं अंगात भरलयं वारं ही पिरतीची बाधा झाली
आता आधीर झालोया बघ बधीर झालोया
आगं तुझ्याचसाठी बनुन मजनु मागं आलोया
आनं उडतोय बुंगाट पळ्तोय चिंगाट रंगात आलोया
झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग

हायला ह्या गाण्याची झिंग काही वेगळीच आहे.

मी पण जबरा फॅन Happy
ए.आर .रहमानच्या तोडीचे मराठीत फक्त अजय अतुल !
रहमानचं संगीत जसं चढत जातं चढत जातं , तशी जादू यांच्या म्युझिकची.. माणुस पार झिंगत जातो त्या म्युझिक वर , त्यांच्या गाण्यांचा इफेक्ट डोक्यातून जातच नाही.. काहीतरी वेगळच.. क्लास अपार्ट फ्रॉम अदर्स !
शंकर महादेवनच्या आवाजतली गणेशवंदना , दुसरी अजुन एक गणेशवंदना 'जयजय सुरवर पूजित ' अगबाई अरेच्या, जोगवा, नटरंग आणि सैराट मास्टरपिसेस आहेत !

एक लंबर आहेत अजय अतुल. आसपासही कोणी नाही. मी तर हल्ली कुठलेही जबरदस्त गाणे ऐकले की ते अजय अतुलचेच ठरवून मोकळा होतो. साला आणि काय कमाल. ते निघतेही अजय अतुलचेच. थिएटरमध्ये पब्लिक झिंगाट वर नाचते म्हणजे काय, आमच्या घरी आज एवढे दिवस झाले ते गाणे आणि पिक्चर रीलीज होऊन तरी रोज धिंगाणा असतो त्या गाण्यावर. ते माऊली गाणे तर एकदा ऐकून मनच भरत नाही माझे. एकदा ऐकायचे, एकदा स्वता सोबत गायचे, आणि एकदा फील घेत डोलायचे, असे तीनदा सलग ऐकावेच लागते. हल्ली तर दर दुसर्या मराठी मालिकेत सैराट आणि याड लागलंची म्युजिक नाहीतर गाणे वाजवतात आणि त्यावर त्या मालिकेतल्या हिरोहिरोईनला रोमान्स करायला लावतात. त्या गाण्यामुळे मी तो आनंदाने सहन करत थांबून बघतो..

फँड्रीमधले 'ते' एक गाणे काय खासंखास बनवलेय ...

सुरुवात आणि शेवटाची ती सुरावट कसलीतरी चुटपुट लावून जाते ...

तसेच लल्लाटी भंडार गाण्यातली सुरूवातीची दिमडी [?]

माझ्यातर्फे हे गाणे : सजवून सांज जशी एक वेगळा प्रयोग ....

सही रे सही नाटकाचे गाणेही त्यांचेच.

हिंदी मधले त्यांचे सर्वात चांगले गाणे म्हणजे सोनुचे अग्निपथमधील 'मर जाउ या जीलू जरा'
<<<
+ १
बाकी मराठीची हिंदी व्हर्जन्स नाही आवडत , सैराटची नको यायला :(.
आहे ती मराठी सैराट गाणीच ग्लोबली अजुन पॉप्युलर होउ देत !

फँड्रीच्या त्या गाण्याची नशा एवढी जबरदस्तं आहे की त्याच्यावर सैराटचा ऊताराही लागू पडेना Sad

जीव झाला येडापीसा रात रात जागनं
पुरं दिसभर तुझ्या फिरतो मागंमागनं
जादु मंतरली कुनी , सपनात जागंपनी
नशीबी भोग असा दावला
तूझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला
तूझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला
माग पळून पळून वाट माझी लागली
अन तू वळून बी माझ्याकडं पाहिना

भीरभीर मनाला या घालू कसा बांध गं
अवसची रात मी अन पुनवचा तू चांद गं
नजरतं मावतीया तरी दूर धावतीया
मनीचा ठाव तुझ्या मिळंना
आता तोंडा म्होरं घास परी गिळंना
गेला जळून जळून जीवं प्रीत जुळना
सारी इस्कटून ज़िंदगी मी पाहिली
तरी झाली कुटं चूक मला कळना

सांदी कोपरयात उभा येकला कधीचा
लाज ना कशाची तकरार न्हाई
भास वाटतोया ह्ये खरं का सपानं
सुखाच्या या सपनाला दार न्हाई
राखं झाली जगन्याची हाय तरी जीता
भोळं प्रेम माझं अन भाबडी कथा
बग जगतूया कसं , सार्‍या जन्माचं हसं
जीव चिमटीत असा घावला

तूझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला
तूझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला
माग पळून पळून वाट माझी लागली
अन तू वळून बी माझ्याकडं पाहिना

खरकटया ताटावर रेघोट्याची झालरं
हातावर पोट ,बिदागीची झुणका भाकरं
उन्हातान्हात भुका , घसा पडलाय सुका
डोळयातलं पानी तरी खळंना
आता तोंडाम्होरं घास परी गिळंना
गेला जळून जळून जीवं प्रीत जुळंना
सारी इस्कटून ज़िंदगी मी पाहिली
तरी झाली कुटं चूक मला कळंना

नीळकंठ मास्तर ची गाणी पण छान आहेत -

अधीर मन - https://www.youtube.com/watch?v=JLf2YK4Z_oc
परतून ये ना - https://www.youtube.com/watch?v=o7ntXPyBQBs
कौनसे देस चला - https://www.youtube.com/watch?v=cnnWaVG2ySs
वंदे मातरम - https://www.youtube.com/watch?v=uXNMTggKN_c

मलाही त्यांची गाणी आवडतात ..
मल्हारवारी, वाऱ्यावरती गंध पसरला आणि हे देवा तुझ्या दारी आलो नी सुरुवात... +१

८०% गाणी आवडतात त्यामुळे कोणती खास आवडतात हा प्रश्न आहे.
हिंदी मध्ये खोया खोया चांद चं शीर्षकगीत, अग्नीपथ मधली सगळी, विशेष करुन शाह का रुतबा.एकाच गाण्यात वेगवेगळ्या कडव्यात वेगवेगळ्या चाली हे यशस्वी करणं कठीण असतं.बाकी श्रीगणेशा,एकदंताय वक्रतुंडाय, नटरंग मधली सगळी, सैराट, जोगवा ही ऑल टाईम आवडती आहेतच.

Pages