सख्या रे,...

Submitted by vishal maske on 7 June, 2016 - 04:20

सख्या रे,.....

कवी :- विशाल मस्के,सौताडा
मो. :- 9730573783

ज्वानीच्या जोशात,
नजरेच्या फास्यात
माझी नजर अशी
ही फसली रे

भिरभिर फिरुन पापण्यात लपुन
अशी लाजुन खुदकन हसली रे

माझ्या नजरेला ओढ
तुझ्या नजरेची लागली
तुझी प्रीत हि साजना
माझ्या मनात जागली

मी ना माझीच राहिले सजना रे
कशी सावरू मनाला सांग ना रे

तुझ्या नजरेचे झोल
जणू अबोल हे बोल
रूतले हे आरपार
काळजात खोल खोल

तुझी गोडी या मनाला लागली रे
भासे मलाच आज मी वेगळी रे

तुझा होतोय हा भास
तुझी पाहते रे वाट
तुझी आठवण खास
मनी येते दाट दाट

तुला भेटण्या आज मी त्रासली रे
तु येताच गालामधी हसली रे

तुझा होताच स्पर्श
मनी झालाया हर्ष
तुझ्या प्रेमाचा मनी
हा महा परामर्श

माझी जिंदगी ही तुझीच जाहली रे
तुझ्या प्रेमात बहरून फुलली रे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी

* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* अधिक वात्रटिका वाचण्यासाठी www.vishalmske.blogspot.in

-----------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users