अधोगती

Submitted by उडन खटोला on 6 June, 2016 - 03:09

संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली.तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा.समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली तेव्हा त्यांचे वय १० पेक्षाही कमी होते.जिजाऊंनी श्री राम, कृष्णाच्या कथा सांगत घडवलेले शिवप्रभु शिवराय यांचे वय होते अवघे १४ जेव्हा त्यांनी शिवपिंडीवर स्वता:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली.तर.. शंभु बाळांनी शास्त्र आणि क्षस्राच्या संस्कारात भिजत"बुधभुषण" नामक ग्रंथ लिहीला तो देखील वयाच्या १६ व्या वर्षीच.अशी कैक उदाहरणं आहेत आपल्याकडे. अगदी विष्णुगूप्त चाणक्य पासुन ते स्वामी विवेकानंद, बाळगंगाधर टिळक, सावरकरां पर्यन्त.ह्या सगळ्यां संत पुरूषांमध्ये समान धागा हाच कि हे सगळे, धर्म आणिमातृभुमी वरील अफाट प्रेमाने झपाटलेले होते. ह्या सगळ्यांमधे प्रचंड उर्जा होती ती समाजाच्या कल्याणाची, प्रगतीची, स्वता:च्या अध्यात्मिक उन्नतीची.

आम्हाला आता ज्या वयात "होशील का माझ्या पोराची आई" सुचतय ना, त्याचवयात ती पिढी लिहित होती..इस कदर वाकिफ है,मेरी कलम मेरे जज्बातोसे ।मै इश्क लिखना भी चाहू,तो भी इन्कलाब लिखा जाता है ।।एकीकडे एैन तारूण्यात असं लिहिणारे भगतसिंग तर दुसरीकडे"तुझ्याशिवाय करमेना" अशा वयात १८ वर्षाची सुंदर पत्नी, ६ महिन्याचं गोंडस बाळ ह्यांना सोडून देश धर्मासाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर. आख्खी पिढीच अजब.ह्या सगळ्यांचीच वयं जरी १५, १६ , २० असली तरी त्याची प्रोसेस काही वर्ष आधीच सुरू झाली असणार हे वेगळे सांगायलाच नको.अशा कोणत्या मातीत ह्या व्यक्ती घडल्या असतील? नेमके कोणते संस्कार ह्यांच्या मनावर बिंबवले गेले असतील की अशा तेजस्वी विचारांची ही माणसं निर्माण होत होती?आज अनेक शतकं उलटल्यानंतरही अशा महापुरूषांची आठवण झाली तरी शरीरावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही, मान आदराने खाली झुकते, हात आपोआप जोडले जातात. मनातले भाव जागे होतात, डोळे पाणवतात, एका वेगळ्याच आनंदाने मन अगदी भरून पावतं.हे अशा प्रकारचे अनुभव आपल्यापैकी ब-याच जणांना कधीना कधीतरी आलेले असतात.

पण आता...गेल्या काही दशकात ही परिस्थिती अगदीच बंद झाल्याचं जाणवतय. चांगली पीढी जन्माला येण्याचं संपलंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शाळकरी मुलं फक्त व्यसन आणि अश्लीलते कडे झुकलेली दिसते आहे.ज्या वयात पुर्वी प्रतिभावान संत जन्माला येत होती त्या वयात आता वर्तमान काळात गावगुंड निर्माण होत आहेत. वय वर्ष १६ व्या मधील मुलं व्यभिचार आणि बलात्कारा सारख्या हिडीस प्रकारात पडलेले आढळतायत. दिल्लीतील चालत्या बस मधे घडलेला बलात्कार काय किंवा मुंबईच्या मिल परिसरातला बलात्कार काय! ही सगळी त्याचीच साक्ष. किशोरवयीन मुलं.. खुन, लफडी, मारामारीत आघाडीवर आहेत. शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांनाहातात सिगारेट असणं अन् तोंडात शिव्या असणं आता अभिमानाचं झालंयही अशी पीढी उद्या प्रौढ होऊन कशी मुलं जन्माला घालतील आणि काय संस्कार करतील ह्याचा विचार न केलेलाच बरा.

आपले वैदिक ग्रंथ सांगतात की जर एक पिढी बरबाद झाली की पुढच्या पाचपिढ्या बरबाद होतात.मग चांगला समाज निर्माण होणारच कसा?इंग्रजांनी आमची गुरूकूल शिक्षण पध्दती बंद केली. आणि तिथूनच आपल्या राष्ट्रीची अधोगती सुरू झाली.सर्वात आधी आम्ही आमची भाषा विसरलो. मातृभाषेची जागा कमकुवत इंग्रजी ने घेतली. मग हळुच सुरवात झाली ती आमचा जाज्वल्य इतिहास पुसण्याची. जे जे वाईट ते ह्या मातीतलं आणि जे जे चांगलं ते फक्त परकीयांचं हे आमच्या मनावर बिंबवायला लागले. विमानाचा शोध आमचा नाही. आयुर्वेद आमचं नाही, अणुरेणु आम्हाला माहीत नाही, विज्ञान आम्हाला माहीत नाही, गुरूत्वाकर्षण, खगोलशास्त्र, भुशास्त्र, सर्जरी सगळं सगळं ह्यांच.जर आमच्याकडे काहीच नव्हतं तर मग आमच्यावर गेली अनेक शतके इतकी आक्रमणं का?आक्रमणं आधी आमच्या भाषेवर, मग इतिहासावर, मग सणांवर, त्यानंतर देवदिकांवर आणि आता... देशावर. आमचा प्रत्येक सण, प्रत्येक दैवत ह्यांचं टार्गेट. ह्यातूनच जन्माला यायला लागली fxxk yaar, टच वुड बोलणारी आणि ईशवराला नाकारणारी असुरी पिढी. पाश्चात्य शिक्षण देणा-या विद्यापीठातून (?) तयार झाले कन्हैय्या सारखे अक्कलशुन्य देशद्रोही राक्षस.

आमचे संस्कार बदलले, आदर्श बदलले. जिजाऊ, राणी पद्मिनी आऊटडेटेड तर सनी लिओन, आलिया भट ह्या आत्ताच्या पिढीची आयडाॅल झाली. पाॅर्न पाहणारा सगळ्यात मोठा देश भारत झाला. कुंकू, टिकली, चुडा साडीतली आई माॅड मम्मा झाली. तीला जिन्स आणि लो बॅक टाॅप जास्त कनर्फटेबल वाटू लागला.ह्या अधोगतीला सगळ्यात मोठा हातभार लावला तो ह्या सिनेसृष्टिने. हाताच्या बोटावर मोजणारे सिनेमे सोडले तर बाकी सगळेच "धन्यवाद" आहेत. पहिला आघात ह्या सिनेमांनी केला तो अभिजात संगीतावर, प्रत्येक गाणं खुदा, दुवा, मौला, इश्क, अल्ला, अशा परक्या उर्दु शिवाय पुरे होईनासे झाले. देवळं ही भ्रष्टाचारची केंद्र तर कबरी वरती चादर हे खुदा गाॅड कडे पोहचण्याचं माध्यम असं चित्र रंगवलं गेलं. आणि आता टार्गेट आहे नुकतीच वयात आलेली किशोरवयीन पिढी.सध्याचे चित्रपट आम्हाला शिकवतात ब्ल्यु फिल्म पाहणं गैर नाही, प्रेमात पडणं म्हणजेच उदात्तीकरण, हातात सिगरेट आणि वाईनचा ग्लास असणं स्टेट्स सिंबाॅल आहे. तुला बाॅयफ्रेंड किंवा तुला गर्लफ्रेंड नसण हे अपमानास्पद आहे.

लहान वयातलं प्रेम दाखवले की मगच राष्ट्रपती पारितोषिक मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो कि काय असा प्रश्न पडावा.असे पारितोषिक जाहिर करून शासन नेमके कोणते संस्कार घडवतय समाजावर????ह्या नॅशनल अॅवोर्ड चा नेमका हेतु काय? ह्यातून नेमके कोणते समाजकल्याण होणार आहे? किंवा आत्ताच्या पिढिचा कोणता उत्कर्ष, उन्नती होणार आहे. ह्या असल्या पारितोषिकांमुळेसमाजात जाणारा संदेश हा योग्य आहे का?की अशाच प्रकारचा समाज निर्माण होणं अपेक्षित आहे?दोन पिढ्यांमधील फरक ठळकपणे जाणवतोय.एक उत्कर्षाकडे जाणारी. आणि..दुसरी अधोगतीकडे जाणारी.संभ्रम...संभ्रम...आणि फक्त संभ्रम.दोनच गोष्टी कळतायतआपला देश विदेशी शिक्षणाचं इंधन भरून, टाॅप गिअर टाकून अधोगती कडे चाललाय...आणि दुसरं समर्थ रामदासांचे शब्द २४ तास डोक्यात रेंगाळतायत, ते म्हणजे...अखंड असावे सा..व..धा..न

*आधारित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयेकर, मला तुमच्यासारखी पुस्तके पाठ नसली तरी मी जो संदर्भ दिला आहे तो अगदीच चुकीचा नाहीये.
वेळ लागेल, कदाचित काही दिवस देखील, पण मी शोध घेऊन येथे संदर्भ देणार हे नक्की.

सद्ध्या एक लिन्क देत आहे, ती पाहून ठेवा.

https://www.facebook.com/PurushottamLakshmanDeshpande/posts/161619594530...

किमान आज पुलंच्या स्मृतिदिनी अपने मन्कीबात त्यांच्या नावावर खपवायचे पातक करू नका ही सर्व पुलभक्तांच्या वतीने कळकळीची विनंती.

मिळाला हाही परिच्छेद पुस्तकात. पण त्याचा अर्थ तुम्ही लावल्यासारखा अजिबात वाटत नाही.
त्या क्षणी त्यांना होमसिक वाटत होते. इथे ते भारतीय संस्कृतीचे वर्णन करतात म्हणजे ती श्रेष्ठ आहे असे नव्हे तर आपल्या रक्तामांसात वाहते आहे हे सांगताहेत. त्याच परिच्छेदात पुढे ख्रिसमस केकवर ब्रँडी ओतून त्याचा वास घेणार्‍या व असे केल्याशिवाय ख्रिसमस वाटतच नाही असे म्हणणार्‍या दोघी लंडननिवासी बहिणींचेही उदाहरण आहे.

मी जे दोन परिच्छेद (एक लंडनविषयी व एक पॅरिसविषयी) दिलेत त्यात कुठेही पुल पाश्चात्य संस्कृतीला नावे ठेवत नाहीएत. त्यांच्यापेक्षा आपली संस्कृती थोर असे म्हणणे तर दूरच. त्या उलट त्यांनी म्हटले आहे असे म्हणायलाही वाव आहे.

तरीही तुम्ही संदर्भ शोधून लवकरच द्याल अशी अपेक्षा आहे.

धन्यवाद भरत. बरोबर. मनाच्या श्लोकाचा उल्लेख होमसिकनेस बद्दल आहे. परदेशात आपल्या संस्कृतीची आठवण येण्याबद्दल आहे.

तेथील "वातावरण सुधरवण्याबद्दल" नाही.

पाश्चात्य (आणि पौर्वात्यही) वातावरणावर पुलंनी केलेली टीका फक्त 'एक बेपत्ता देश' या लेखात न्यू यॉर्क मधे त्यांना ६० च्या दशकात जे दिसले त्यावर आहे. त्याच अपूर्वाई मधे 'मि. सान्फ्रान्सिको' या लेखात सॅ.फ्रा. बद्दल अतिशय चांगले लिहीलेले आहे.

पुलंनी लिहीलेले सगळे माहीत आहे असे अजिबात नाही, पण रावसाहेबांसारखेच एखादे वाक्य 'गल्ली चुकलं काय हो' असे हमखास कळते.

बरोबर, तो उल्लेख homesickness बद्दलच आहे, मला वाटतं ' अपूर्वाई' च्या शेवटी शेवटी. अर्थातच स्वतःला बरं वाटावं म्हणूनच त्यांनी मनाचे श्लोक म्हटले, फ्रेंच किंवा इंग्लिश लोकांवर ' संस्कार' करायला नव्हे Lol

अरे हो की. अपूर्वाई आणि जावे त्यांद्या देशा एकत्र झाले माझ्या डोक्यात. धन्यवाद वावे Happy

अर्थातच स्वतःला बरं वाटावं म्हणूनच त्यांनी मनाचे श्लोक म्हटले, फ्रेंच किंवा इंग्लिश लोकांवर ' संस्कार' करायला नव्हे >> हो Happy

भम - हो तसेही म्हणता येइल. जरा स्ट्रॉन्ग टोन फक्त मला त्या एका लेखातच जाणवला होता.

चेहर्‍यावर भडक रंगाचे रोगण लावलेल्या, दडदडीत दिसणार्‍या, त्या वारयोषिता पाहून शिसारी येते..... पण गया-प्रयागच्या पंड्यांचे आणि अन्य क्षेत्रस्थ पुजारी बडव्यांचे आवाहनही तितकेच गलिच्छ." >>

अ‍ॅक्चुअली ह्या वाक्यात चुकी आहे असे म्हणावयास वाव आहे. पुलंनी तिथे ब ऐवजी भ योजायला हवा होता.

आम्हाला आता ज्या वयात "होशील का माझ्या पोराची आई" सुचतय ना, त्याचवयात ती पिढी लिहित होती..इस कदर वाकिफ है,मेरी कलम मेरे जज्बातोसे ।मै इश्क लिखना भी चाहू,तो भी इन्कलाब लिखा जाता है ।।एकीकडे एैन तारूण्यात असं लिहिणारे भगतसिंग तर दुसरीकडे"तुझ्याशिवाय करमेना" अशा वयात १८ वर्षाची सुंदर पत्नी, ६ महिन्याचं गोंडस बाळ ह्यांना सोडून देश धर्मासाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर. आख्खी पिढीच अजब.ह्या सगळ्यांचीच वयं जरी १५, १६ , २० असली तरी त्याची प्रोसेस काही वर्ष आधीच सुरू झाली असणार हे वेगळे सांगायलाच >>

स्टॅटस्टिकली हे वाक्यच चुकीचे आहे.

ज्ञानेश्वरांना माननार्‍यांपेक्षा त्यांच्या त्या वयात विरोध करणारे जास्त होते.
सगळेच भगतसिंग अन सावरकर निपजले असते तर देश पारतंत्र्यातच गेला नसता.

अगदी १९३० च्या त्या काळात केवळ काही शे मध्येच लोकं जागृत होती. आणि करोडो मध्ये असणारे निद्रिस्त. त्यामुळे तुम्ही ज्यावर तुमचे स्टेटमेंट बेस करत आहात त्याचा आधारच चुकीचा आहे. बहुसंख्य जनता ही खरेतर तुमच्या मते जागृत अन सुसंस्कारी नसायला हवी.

कुठलाही काळातला कुठलाही समाज एकाचवेळी जो काय तुम्हाला वाटतो तो सुसंस्कारी वगैरे कधीच नव्हता आणि नसणार.

रामदेवबाबा प्रमाणे कोणीतरी सुसंस्कारांचे पण कारखाने काढेल का ? >>. महेश सुसंस्कार म्हणजे काय? तू कुठल्यातरी तुझ्या मनातल्या विश्वात जगत आहेस असे वाटत आहे. कोणता काळ सुसंस्कारी होता? अन कोण ठरवणार की हेच संस्कार चांगले / हे वाईट? हिटरलशाही आहे काय?

प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाखाली अगदी विरुद्धार्थी मताचा प्रतिसाद दडपून देणे हे आपल्या महान संस्कृतीची अधोगतीच दर्शवते ना.
अहह!! हा हन्त हन्त!!

मोदींसारखा नेता येत्या दहा हजार वर्षांत होणे नाही असे आचार्य अत्रे यांनी २७ मार्चच्या संपादकीयात म्हटलेले स्मरते.

बहुमताने निवडून आलेले मोदी सरकार हे पण देशाची अधोगतीच समजावे का? गहन विचारात बुडालेली स्मायली

Pages