संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली.तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा.समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली तेव्हा त्यांचे वय १० पेक्षाही कमी होते.जिजाऊंनी श्री राम, कृष्णाच्या कथा सांगत घडवलेले शिवप्रभु शिवराय यांचे वय होते अवघे १४ जेव्हा त्यांनी शिवपिंडीवर स्वता:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली.तर.. शंभु बाळांनी शास्त्र आणि क्षस्राच्या संस्कारात भिजत"बुधभुषण" नामक ग्रंथ लिहीला तो देखील वयाच्या १६ व्या वर्षीच.अशी कैक उदाहरणं आहेत आपल्याकडे. अगदी विष्णुगूप्त चाणक्य पासुन ते स्वामी विवेकानंद, बाळगंगाधर टिळक, सावरकरां पर्यन्त.ह्या सगळ्यां संत पुरूषांमध्ये समान धागा हाच कि हे सगळे, धर्म आणिमातृभुमी वरील अफाट प्रेमाने झपाटलेले होते. ह्या सगळ्यांमधे प्रचंड उर्जा होती ती समाजाच्या कल्याणाची, प्रगतीची, स्वता:च्या अध्यात्मिक उन्नतीची.
आम्हाला आता ज्या वयात "होशील का माझ्या पोराची आई" सुचतय ना, त्याचवयात ती पिढी लिहित होती..इस कदर वाकिफ है,मेरी कलम मेरे जज्बातोसे ।मै इश्क लिखना भी चाहू,तो भी इन्कलाब लिखा जाता है ।।एकीकडे एैन तारूण्यात असं लिहिणारे भगतसिंग तर दुसरीकडे"तुझ्याशिवाय करमेना" अशा वयात १८ वर्षाची सुंदर पत्नी, ६ महिन्याचं गोंडस बाळ ह्यांना सोडून देश धर्मासाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर. आख्खी पिढीच अजब.ह्या सगळ्यांचीच वयं जरी १५, १६ , २० असली तरी त्याची प्रोसेस काही वर्ष आधीच सुरू झाली असणार हे वेगळे सांगायलाच नको.अशा कोणत्या मातीत ह्या व्यक्ती घडल्या असतील? नेमके कोणते संस्कार ह्यांच्या मनावर बिंबवले गेले असतील की अशा तेजस्वी विचारांची ही माणसं निर्माण होत होती?आज अनेक शतकं उलटल्यानंतरही अशा महापुरूषांची आठवण झाली तरी शरीरावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही, मान आदराने खाली झुकते, हात आपोआप जोडले जातात. मनातले भाव जागे होतात, डोळे पाणवतात, एका वेगळ्याच आनंदाने मन अगदी भरून पावतं.हे अशा प्रकारचे अनुभव आपल्यापैकी ब-याच जणांना कधीना कधीतरी आलेले असतात.
पण आता...गेल्या काही दशकात ही परिस्थिती अगदीच बंद झाल्याचं जाणवतय. चांगली पीढी जन्माला येण्याचं संपलंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शाळकरी मुलं फक्त व्यसन आणि अश्लीलते कडे झुकलेली दिसते आहे.ज्या वयात पुर्वी प्रतिभावान संत जन्माला येत होती त्या वयात आता वर्तमान काळात गावगुंड निर्माण होत आहेत. वय वर्ष १६ व्या मधील मुलं व्यभिचार आणि बलात्कारा सारख्या हिडीस प्रकारात पडलेले आढळतायत. दिल्लीतील चालत्या बस मधे घडलेला बलात्कार काय किंवा मुंबईच्या मिल परिसरातला बलात्कार काय! ही सगळी त्याचीच साक्ष. किशोरवयीन मुलं.. खुन, लफडी, मारामारीत आघाडीवर आहेत. शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांनाहातात सिगारेट असणं अन् तोंडात शिव्या असणं आता अभिमानाचं झालंयही अशी पीढी उद्या प्रौढ होऊन कशी मुलं जन्माला घालतील आणि काय संस्कार करतील ह्याचा विचार न केलेलाच बरा.
आपले वैदिक ग्रंथ सांगतात की जर एक पिढी बरबाद झाली की पुढच्या पाचपिढ्या बरबाद होतात.मग चांगला समाज निर्माण होणारच कसा?इंग्रजांनी आमची गुरूकूल शिक्षण पध्दती बंद केली. आणि तिथूनच आपल्या राष्ट्रीची अधोगती सुरू झाली.सर्वात आधी आम्ही आमची भाषा विसरलो. मातृभाषेची जागा कमकुवत इंग्रजी ने घेतली. मग हळुच सुरवात झाली ती आमचा जाज्वल्य इतिहास पुसण्याची. जे जे वाईट ते ह्या मातीतलं आणि जे जे चांगलं ते फक्त परकीयांचं हे आमच्या मनावर बिंबवायला लागले. विमानाचा शोध आमचा नाही. आयुर्वेद आमचं नाही, अणुरेणु आम्हाला माहीत नाही, विज्ञान आम्हाला माहीत नाही, गुरूत्वाकर्षण, खगोलशास्त्र, भुशास्त्र, सर्जरी सगळं सगळं ह्यांच.जर आमच्याकडे काहीच नव्हतं तर मग आमच्यावर गेली अनेक शतके इतकी आक्रमणं का?आक्रमणं आधी आमच्या भाषेवर, मग इतिहासावर, मग सणांवर, त्यानंतर देवदिकांवर आणि आता... देशावर. आमचा प्रत्येक सण, प्रत्येक दैवत ह्यांचं टार्गेट. ह्यातूनच जन्माला यायला लागली fxxk yaar, टच वुड बोलणारी आणि ईशवराला नाकारणारी असुरी पिढी. पाश्चात्य शिक्षण देणा-या विद्यापीठातून (?) तयार झाले कन्हैय्या सारखे अक्कलशुन्य देशद्रोही राक्षस.
आमचे संस्कार बदलले, आदर्श बदलले. जिजाऊ, राणी पद्मिनी आऊटडेटेड तर सनी लिओन, आलिया भट ह्या आत्ताच्या पिढीची आयडाॅल झाली. पाॅर्न पाहणारा सगळ्यात मोठा देश भारत झाला. कुंकू, टिकली, चुडा साडीतली आई माॅड मम्मा झाली. तीला जिन्स आणि लो बॅक टाॅप जास्त कनर्फटेबल वाटू लागला.ह्या अधोगतीला सगळ्यात मोठा हातभार लावला तो ह्या सिनेसृष्टिने. हाताच्या बोटावर मोजणारे सिनेमे सोडले तर बाकी सगळेच "धन्यवाद" आहेत. पहिला आघात ह्या सिनेमांनी केला तो अभिजात संगीतावर, प्रत्येक गाणं खुदा, दुवा, मौला, इश्क, अल्ला, अशा परक्या उर्दु शिवाय पुरे होईनासे झाले. देवळं ही भ्रष्टाचारची केंद्र तर कबरी वरती चादर हे खुदा गाॅड कडे पोहचण्याचं माध्यम असं चित्र रंगवलं गेलं. आणि आता टार्गेट आहे नुकतीच वयात आलेली किशोरवयीन पिढी.सध्याचे चित्रपट आम्हाला शिकवतात ब्ल्यु फिल्म पाहणं गैर नाही, प्रेमात पडणं म्हणजेच उदात्तीकरण, हातात सिगरेट आणि वाईनचा ग्लास असणं स्टेट्स सिंबाॅल आहे. तुला बाॅयफ्रेंड किंवा तुला गर्लफ्रेंड नसण हे अपमानास्पद आहे.
लहान वयातलं प्रेम दाखवले की मगच राष्ट्रपती पारितोषिक मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो कि काय असा प्रश्न पडावा.असे पारितोषिक जाहिर करून शासन नेमके कोणते संस्कार घडवतय समाजावर????ह्या नॅशनल अॅवोर्ड चा नेमका हेतु काय? ह्यातून नेमके कोणते समाजकल्याण होणार आहे? किंवा आत्ताच्या पिढिचा कोणता उत्कर्ष, उन्नती होणार आहे. ह्या असल्या पारितोषिकांमुळेसमाजात जाणारा संदेश हा योग्य आहे का?की अशाच प्रकारचा समाज निर्माण होणं अपेक्षित आहे?दोन पिढ्यांमधील फरक ठळकपणे जाणवतोय.एक उत्कर्षाकडे जाणारी. आणि..दुसरी अधोगतीकडे जाणारी.संभ्रम...संभ्रम...आणि फक्त संभ्रम.दोनच गोष्टी कळतायतआपला देश विदेशी शिक्षणाचं इंधन भरून, टाॅप गिअर टाकून अधोगती कडे चाललाय...आणि दुसरं समर्थ रामदासांचे शब्द २४ तास डोक्यात रेंगाळतायत, ते म्हणजे...अखंड असावे सा..व..धा..न
*आधारित
(No subject)
आधारीत म्हणजे?? कुठल्या
आधारीत म्हणजे?? कुठल्या विनोदी लेखावर आधारीत आहे?
हे प्राइसलेस आहे. दहावी
हे प्राइसलेस आहे. दहावी बारावीचे रिझल्ट बघितलेत का.
संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४
संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली.तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा.समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली तेव्हा त्यांचे वय १० पेक्षाही कमी होते.जिजाऊंनी श्री राम, कृष्णाच्या कथा सांगत घडवलेले शिवप्रभु शिवराय यांचे वय होते अवघे १४ जेव्हा त्यांनी शिवपिंडीवर स्वता:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली.तर.. शंभु बाळांनी शास्त्र आणि क्षस्राच्या संस्कारात भिजत"बुधभुषण" नामक ग्रंथ लिहीला तो देखील वयाच्या १६ व्या वर्षीच.अशी कैक उदाहरणं आहेत आपल्याकडे. अगदी विष्णुगूप्त चाणक्य पासुन ते स्वामी विवेकानंद, बाळगंगाधर टिळक, सावरकरां पर्यन्त.ह्या सगळ्यां संत पुरूषांमध्ये समान धागा हाच कि हे सगळे, धर्म आणिमातृभुमी वरील अफाट प्रेमाने झपाटलेले होते. ह्या सगळ्यांमधे प्रचंड उर्जा होती ती समाजाच्या कल्याणाची, प्रगतीची, स्वता:च्या अध्यात्मिक उन्नतीची<<<<<
लेखकाने स्वतःच्या १४व्या , १६व्या वर्षी वरील पैकी काय पुर्ण केले ? कृपया प्रमाणासहीत स्पष्ट करावे.
दोन वर्षं कट्टर हिंदुत्वीय
दोन वर्षं कट्टर हिंदुत्वीय राज्य येऊनही विव्हळ्णं संपेना !
मेकॉले , कन्हैया , सैराट , इंग्रजी , उर्दू , चादर ..... एकाच वेळी किती विषय घेऊन रडणार ? रडुन रडुन डिहायड्रेशन होइइल
https://m.facebook.com/AntiSa
https://m.facebook.com/AntiSambhajiBriged/posts/1151193024924826
हे इथेही आहे.
दिसामाजी काहीतरी ( कॉपी पेस्ट करुन ) लिहावे !
http://netlaaun.blogspot.in/2016/05/blog-post.html?m=1
प्रत्येक गाणं खुदा, दुवा,
प्रत्येक गाणं खुदा, दुवा, मौला, इश्क, अल्ला, अशा परक्या उर्दु शिवाय पुरे होईनासे झाले.
आणि बिचार्या भगतसिंगाना इश्क इन्कलाब वगैरे उर्दू शब्दच वापरावे लागले !
" परक्या उर्दु" : उर्दू या
" परक्या उर्दु" : उर्दू या देशातच जन्मलेली भाषा आहे हो.
उडन खटोला, वाक्या वाक्याला
उडन खटोला,
वाक्या वाक्याला सहमत. ही व्यथा फार जीवघेणी आहे. अगदी बरोब्बर मांडलीत.
पु.ल. जेव्हा लंडनला गेले होते, तेव्हा थेम्स नदीच्या काठावर चाललेले थेर पाहून त्यांना असे वाटले की तेथेच बैठक मारून मोठमोठ्यांदा मनाचे श्लोक म्हणावेत. म्हणजे ते संस्कार तिथल्या हवेत राहतील आणि भविष्यात कधीतरी त्याचा सुसंस्कारांसाठी परिणाम होईल.
खरच, काय केले म्हणजे हे पश्चिमेकडून आलेले कुसंस्कार कमी होऊन चांगले संस्कार वाढतील ??
पु.लं.ना जे वाटले तसे फार मोठ्या प्रमाणावर करावे लागेल. तसेच कमी वयापासुन मिळणारे स्वातंत्र्य कमी करावे लागेल.
रामदेवबाबा प्रमाणे कोणीतरी सुसंस्कारांचे पण कारखाने काढेल का ?
उडन खटोला - तुम्ही एका
उडन खटोला - तुम्ही एका पिढीतील चांगल्या लोकांची तर सध्याच्या पिढीतील वाईट गोष्टींची उदाहरणे एकत्रित केली आहेत. बराच भाग पटला नाही. ब्लू फिल्म्स चे उदाहरण म्हंटलेत तर ज्या वयात आत्ता तरूण लोक त्या पाहतात त्या वयात पूर्वी लग्ने झालेली असत
पु.ल. जेव्हा लंडनला गेले होते, तेव्हा थेम्स नदीच्या काठावर चाललेले थेर पाहून त्यांना असे वाटले की तेथेच बैठक मारून मोठमोठ्यांदा मनाचे श्लोक म्हणावेत. म्हणजे ते संस्कार तिथल्या हवेत राहतील आणि भविष्यात कधीतरी त्याचा सुसंस्कारांसाठी परिणाम होईल. >>> महेश हे तू स्वतः पुलंच्या पुस्तकात किंवा लेखात वाचलेले आहेस का? पुलं कसे काही म्ह्ण्टले असतील तर प्रचंड आश्चर्य वाटेल. अशा बाबतीत सहसा तरूणांच्या स्वाभाविक वागण्याचे समर्थनच ते करत.
आणि 'जनी वंद्य ते सर्व भावे करावे' चे लॉजिक लावले तर तेथे जे चालले आहे तेच करणे बरोबर ना?
फारएण्ड, हे माझे मनाचे श्लोक
फारएण्ड, हे माझे मनाचे श्लोक नसून, पु.लं.च्या एका प्रवासवर्णनपर पुस्तकात आहे.
काही लोकांना आता पु.ल.
काही लोकांना आता पु.ल. देशपांडे यांचे "साधे विनोद" सुध्दा कळतं नाही. अवघड आहे
काहीच्याकाही लेख आणि त्यावर
काहीच्याकाही लेख आणि त्यावर महेशचा प्रतिसाद म्हणजे एकदम चेरी ऑन टॉप आहे.
>>> समर्थ रामदासांचे मनाचे
>>> समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली तेव्हा त्यांचे वय १० पेक्षाही कमी होते.
कोणाचे? समर्थांचे की कानांचे?
>>> ज्या वयात पुर्वी प्रतिभावान संत जन्माला येत होते
आँ?!
कृष्ण गोपींना हरॅस करायचा तेव्हा किती वर्षांचा होता हो?
आख्खी पिढीच अजब.ह्या
आख्खी पिढीच अजब.ह्या सगळ्यांचीच वयं जरी १५, १६ , २० असली तरी त्याची प्रोसेस काही वर्ष आधीच सुरू झाली असणार हे वेगळे सांगायलाच नको.अशा कोणत्या मातीत ह्या व्यक्ती घडल्या असतील? नेमके कोणते संस्कार ह्यांच्या मनावर बिंबवले गेले असतील की अशा तेजस्वी विचारांची ही माणसं निर्माण होत होती? >>
सात कोटी लोक संख्येत फार फार तर काही डझन लोक म्हणजे अख्खी पिढी ? १९१० - १९४० साली हात भट्ट्या नव्हत्या ? दारू , जुगार, कोठ्या, माड्या , देवदासी , काही नव्हते , सतीची प्रथा, केशवपनाची प्रथा हे सर्व नव्हते ? , पाउणशे वयमान असलेल्यांचे लहान मुलींशी संबंध एकदम avuncular च होते नै का ? अन त्या सात कोटीचे आता बिलियन च्या वर झालेत ते तर इमॅक्युलेट कंसेप्शन मुळेच झाले असावेत ?
हरॅस नाही हो रॅस (लीला)
हरॅस नाही हो रॅस (लीला) करायचा.
>>वयात १८ वर्षाची सुंदर
>>वयात १८ वर्षाची सुंदर पत्नी, ६ महिन्याचं गोंडस बाळ ह्यांना सोडून देश धर्मासाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर. >> अहो, ज्या वयात सावरकरांनी लग्न करून मूल जन्माला घातलं त्या वयात हल्लीची मुलं करीयर करण्यात बिझी असतात हो.
तुमच्या यादीतले सगळे सत्पुरूष
तुमच्या यादीतले सगळे सत्पुरूष मातृभूमी पारतंत्र्यात असताना जन्माला आलेत हेच एक समान सूत्र आहे. भारतीयांना स्वतंत्र असताना पुढच्या पिढ्यांवर सुसंस्कार करता येत नाहीत असं तर नसेल?
ते कमकुवत इंग्रजीचंही काही कळलं नाही. भारतीयांचं इंग्रजी कच्चं आहे असं म्हणताय का?
"एखाद्या तरुतळी प्रणयी
"एखाद्या तरुतळी प्रणयी युग्मे गुजगोष्टी करीत प्रणयक्रीडा करीत असतात. सुरुवातीला मला उगीचच ते दृश्य पाहून बिचकल्यासारखे होत असे; परंतु त्या जोडप्यांना भोवतालच्या जगाचा विसर पडलेला असतो. प्रेम करणे ही पाश्चात्य देशांत एक सुंदर गोष्ट मानली जाते. त्यामुळे तशीच काही भानगड असल्याखेरीज त्यात लपवाछपवीचा मामला नाही. प्रणयी युगुले हा असल्या उद्यानांच तिथल्या तरुपर्णांइतकाच एक अविभाज्य घटक आहे. मात्र पाश्चात्य जोडपी त्या लीलांमध्ये विरून जातात. खरोखरीच प्रेमाचे ते क्षण उत्कटपणाने जगताहेत असे वाटते आणि ज्या सौंदर्यदृष्टीने आपण एखाद्या अजंठावेरूळच्या लेण्यांतल्या पाषाणमूर्तीकडे पाहतो त्याच दृष्टीने याही दृश्यांकडे पाहू लागतो.त्या मीलनामध्ये कुठे वखवख आढळणार नाही.रम्य आणि भव्य अशा त्या उद्यानातील ही प्रणयदृश्ये म्हणजे जणू सजीव शिल्पे आहेत -------- पु.ल.देशपांडे (अपूर्वाई)
ह्या वरच्या पॅरात मनाचे श्लोक
ह्या वरच्या पॅरात मनाचे श्लोक कुठेत?
Para वाचताना ते दृश्य बघताना
Para वाचताना ते दृश्य बघताना मनात म्हणायचे असतात म्हणून मनाचे श्लोक
किंवा आपल्याच मनचं काहीतरी
किंवा आपल्याच मनचं काहीतरी सांगायचं म्हणून मनाचे श्लोक
मी जे लिहिले आहे ते माझ्या
मी जे लिहिले आहे ते माझ्या मनाचे नाहीये नक्कीच. त्याचा आधार शोधायला वेळ लागेल.
बाकी विषयाबाबत लोकांनी केलेल्या टीकेचे नवल नाही, कारण भलभलत्या गोष्टींनी आणि विचारांनी लोकांवर एवढा अंमल चढवला आहे की अनेकांना चांगले वाईट समजेनासे झाले आहे. उलट वाईट गोष्टीच कशा चांगल्या याचे समर्थन करू लागले आहेत हिरिरिने. आता तर या सर्वाचा परिणाम पुढच्या पिढ्यांमधे चढत्या क्रमाने दिसू लागला आहे.
वि.सू. : हे येथल्या कोणा आयडीबद्दल नसून सर्वसामान्यपणे दिले आहे.
ते सोड, प्रतिसादांत काही
ते सोड, प्रतिसादांत काही प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं आहेत का महेश?
पूर्वीचंच सगळं कसं भारी होतं आणि आता सगळं कसं वाईटाकडे बदलत चाललंय ह्यावर आणखी वर्ष रडणार?
पु.ल. म्हणून प्रवीण दवणे नाही
पु.ल. म्हणून प्रवीण दवणे नाही ना वाचलेत? इंग्रजी आद्याक्षरे सारखीच आहैत. P.D.
कृष्ण गोपींना हरॅस करायचा
कृष्ण गोपींना हरॅस करायचा >>>> ऑ?
पु.लं.चा तो उल्लेख "अपुर्वाई"
पु.लं.चा तो उल्लेख "अपुर्वाई" मधे पॅरिसला सीन नदीच्या काठावरचा आहे. लंडनचा नाही.
पान क्रमांक प्लीज.
पान क्रमांक प्लीज.
तुम्ही वाचून बघा प्लिज !
तुम्ही वाचून बघा प्लिज !
पॅरिसवरच्या लेखातून "परिषदेत
पॅरिसवरच्या लेखातून
"परिषदेत एक फ्रेंच विदुषीनेही भाषण केले...तिचे भाषण संपल्यावर फ्रेंच प्रतिनिधींनी चक्क 'त्रेबाँ त्रेबाँ' करीत त्या रमणीच्या गालाचे चुंबन घेतले, आणि मी मनातल्या मनात् पुन्हा एकदा रामरक्षा म्हटली......सीन नदीचे पाणी जिथे असे चढते तिथे अन्य पेयांबद्दल काय सांगावे!"
" रात्रीच्या वेळी चालणार्या पॅरिसच्या अतर्क्य कामलीला पाहून आपल्यासारख्या भारतीयांच्या शेंडीला झिणझिण्या येतात, तर दिवसा या लोकांनी केलेल्या प्रचंड ज्ञानोपासनेची, परिश्रमाची आणि चिकाटीची उदाहरणे पाहून आपल्या पगडीचा जर किती खोटा आहे, याची साक्ष पटते."
"फोलीज किंवा कॅसिनो किंवा लिडो यांमधली नृत्ये आणि इतर करमणुकीचे प्रकार पाहून 'नको नको मनागुंतू मायाजळी' म्हणण्याऐवजी ते जाल निर्माण करणार्याविषयी आदर निर्माण होतो. 'नग्न नृत्य' या शब्दांनी त्या नृत्याचे वर्णन करणे म्हणजे नग्न या शब्दाचा अपमान आहे. ......खट्याळपणा खूप असतो; पण तो इतका चतुर असतो की कुठेही घृणेची भावना येत नाही"
चेहर्यावर भडक रंगाचे रोगण लावलेल्या, दडदडीत दिसणार्या, त्या वारयोषिता पाहून शिसारी येते..... पण गया-प्रयागच्या पंड्यांचे आणि अन्य क्षेत्रस्थ पुजारी बडव्यांचे आवाहनही तितकेच गलिच्छ."
Pages