चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो - भाग ३

Submitted by अस्मि_ता on 28 May, 2016 - 06:05

पत्र उघडताना हृदयाची धड धड होत होती..

प्रिय मनु,

Sorry, तुला मनु म्हणायचा मोह नाही आवरत आता. मनु , मनु , मनु, माझी मनु.. तुला काय सांगू आणि किती सांगू अस झालाय मला.. इतके दिवस फक्त मनातल्या मनात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होतो आज कागदावर लिहितोय..
तुला जेव्हा पहिल्यांदा पहिले तेव्हाच मला काहीतरी झाले. किती सुंदर दिसत होतीस तू.. तुझे ते ओले झालेले केस, किंचिंत बाजूला झालेली ओढणी, मला धडकल्यावर तुझ्या expressions, किती गोड दिसत होतीस.. अगदी निरागस... जागेवर जाऊन बसल्यावर माझ्याकडे चोरून बघितलं. पण मी, माझ लक्ष असूनही नाहीय अस दाखवत होतो.. नकळत तुझ्याकडे ओढला जात होतो...
काय जादू केलीस माझ्यावर? सगळीकडे तू आणि फक्त तूच दिसतेस.. कुठेच लक्ष लागत नाही ग... तुझ हसण, बोलणं , असं वाटत तासंतास तुझ्याकडे बघत रहाव.. डोळ्याची पापणी झाकूच नये.. तुझ्या नकळत तुझ्या सगळ्या आवडी निवडी टिपत होतो मी.. तुला लाल रंग आवडतो, तुला chinese आवडत, राहुल द्रविड, अमीर खान आवडतो, इतकाच काय, तुझी आवडती serial, तुझा आवडता सिंगर, fav drink.. सगळ सगळ माहितीय मला...
मनु.. माझ्या प्राणापेक्षा जास्त आवडतेस तू मला..
I Love You Manu.. I Love You... I Love You.. I Love you...
मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत.. तुझा हात हातात घेऊन भविष्याची स्वप्ने बघायची आहेत.. खूप प्रेम करेन मी तुझ्यावर.. आयुष्यभर.. आणि नंतरही...
तुलाही जर माझे प्रेम मान्य असेल तर मला फोन कर... वाट पाहतोय मी ... मला खात्री आहे तुझ पण माझ्यावर प्रेम आहे आणि तू नक्की call करशील ...

"I Love You too Ani"...Love you Vedu... मनुच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले..ज्या अनिकेत वर ती गेली ३ वर्षे प्रेम करत होती, त्यानेच तिला propose केल होत. अजून काय हव होत तिला.. त्याचक्षणी जगातलं सगळ सुख मिळालं असं तिला वाटल.. ३ वर्षात देवाकडे तिने एकच गोष्ट मागितली होती ... " देवा, अनिकेत माझा होऊ दे" आणि आज .... देवाने तिचं ऐकलं होत.. अनिकेत च तिच्यावर निरातिशय प्रेम आहे हे तिला कळल होत.. ती.. हसत होती, बागडत होती.. स्वतःच्याच जगात होती ती.. library मधून बाहेर आली आणि तिला अनिकेत दिसला.. त्याला बघायचं होत की पत्र वाचल्यानंतर मनु कशी react करते... मनु हसतच बाहेर आली. अनिकेत कडे बघून लाजली आणि पळतच बस मध्ये शिरली... आणि त्याच्यासाठी जागा पकडून ठेवली.. चाचा ने बस start केली तसा अनिकेत आणि त्याचे मित्र गाडीत चढले.. अनिकेतने मनु कडे पहिले.. तिने सरकून त्याला बसायला जागा दिली.. दोघेही बोलत नव्हते.. पण शब्दावाचून सगळे कळत होते .. हृदयाची धड धड ऐकू येत होती, आणि तळमळ समजत होती.. हळूच अनि ने तिच्या हाताला स्पर्श केला.. मनुचे अंग शहारून गेले.. किती प्रेम, आपुलकी आणि विश्वास होता त्या स्पर्शात..
मनु ने घरी जाताच त्याला call केला.. दोघांनी भेटायचं ठरवलं.. वेळ आणि स्थळ निश्चित केल.. मनु ला आज झोप लागली की नाही ते कळलंच नाही.. स्वप्नात आणि जागेपणी फक्त अनिचे विचारच होते.. उद्या त्याला भेटायचं आहे.. कित्तूर garden मध्ये संध्याकाळी ७ वाजता..
आज तो दिवस उगवला ज्याची दोघे आतुरतेने वाट बघत होते... College मध्ये कशातच लक्ष लागत नव्हत. एकमेकांचा विचार चालू होता मनात. घरी गेल्यावर मनुने सांगितले आज एका मैत्रिणीच्या वाढदिवसाला जायचे आहे.. जेऊनच येईन.. आणि मग तिने तिचा लाल रंगाचा ड्रेस घातला आणि हलका make up केला .. नितांत सुंदर दिसत होती मनु..
इकडे अनि केव्हापासूनच तिची वाट बघत थांबला होता.. एक एक मिनिट त्याला युगासारखा भासत होता. आणि मनु आली..
अनि तिच्याकडे बघतच बसला. कित्ती गोड दिसत होती ती.. त्या लाल रंगाच्या ड्रेसचे reflection तिच्या चेहऱ्यावर दिसत होत.. तिचे ते बोलके डोळे काजळ लावल्यामुळे अजूनच मादक वाटत होते.. ह्या सगळ्यात तिचे ते स्मित हास्य आणि लाजून लाजून गुलाबी झालेले गाल.. अप्सराच आली आहे जणू असे वाटले त्याला... मनु त्याच्याजवळ आली आणि हळूच हात दाखवत hi म्हणाली.. दोघे बसले.. काय बोलायचं सुचतच नव्हत.. शब्द जणू कुणी चोरले आहेत कि काय असे वाटत होते दोघांना ... अनि ने तिचा हात हातात घेतला.. बराच वेळ तो घट्ट दाबून ठेवला... थोड्या वेळाने म्हणाला.." मनु, I Love You"..
मनुने डोळे घट्ट मिटले आणि म्हणाली.. "I Love you too Ani... I really Love you.. गेले किती दिवस मी ह्या क्षणाची वाट बघितली".. आणि ती रडायला लागली..
अनिकेतने तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेतला आणि म्हणाला, " हो ग.. मला माफ कर.. मी खूप त्रास दिला न तुला?" मी आधीच सांगायला हव होत.. पण हिम्मत नव्हती होत..
"It's OK re Ani , चूक दोघांचीही आहे".. मनु म्हणाली आणि अनिकडे पहिले.. त्याच्या चेहऱ्यावर tension दिसत होत.. "काय झाल अनि? anything serious?"
" मनु , मी खूप स्वप्न पाहिली आहेत ग आयुष्यात... Engineering झाल्यावर मला U.S. ला जायचं आहे M.S. करायला. त्यानंतर इकडे येउन job करून आई बाबांना खूप सुखात ठेवायचं आहे.. माझ्यासाठी खूप कष्ट केलेत ग दोघांनी... मी ठरवलं होत, कुठल्या मुलीच्या प्रेमात पडायचं नाही पण तुला बघितलं आणि स्वतःवर ताबाच राहिला नाही माझा.. तू इतर मुलींसारखी नाहीस.. खूप समजूतदार आहेस. तुला तुझ्या रूपाचा गर्व नाही.. माझ्यासारख्या विश्वामित्राची तपश्चर्या भंग केलीस तू तुझ्या ह्या स्वभावाने".... अनि हसत हसत म्हणाला... काय लाजली मनु..
अर्ध्या तासाच्या भेटीतच 'शिक्षण पूर्ण झाल कि नोकरी करायची, पुर्ण settle झाल्यावर घरी सांगायचं, पुण्यातच मोठ्ठ घर, ४ चाकी गाडी घ्यायची, खूप सुखाने संसार करायचा, आई बाबांची खूप सेवा करायची, आपल्याला १ मुलगा आणि १ मुलगी असेल, मुलाच नाव अर्जुन , तर मुलीचं नाव श्रिया ठेवायचं, अर्जुनला क्रिकेटर आणि श्रिया ला डॉक्टर बनवायचं, दर वर्षी लग्नाच्या वाढदिवसाला परदेशात फिरायला जायचं' कितीतरी गोष्टी ठरवल्या दोघांनी..
हळू हळू फोनवर बोलणे, चोरून भेटणे चालू झाले. किती जादुई दिवस होते ते.. बघता बघता परीक्षा संपली.. दोघेही हुशार असल्यामुळे अभ्यास सुद्धा भरपूर केला होता.. त्यामुळे result च tension नव्हत.
सुट्टीतही दोघे भेटत होते. अनिकेत ची U.S. ला जायची तयारी चालू झाली तसे दोघंही खूप tension मध्ये आले. एकमेकांपासून एकदम दूर होणार ह्या विचारानेच मन भरून यायचे. पण काय करणार? भविष्यासाठी हे करावे लागणार होते. खूप आणा भाका झाल्या. तिकडे गेल्यावर आठवड्यातून एकदा फोन आणि कधीही online chat करायचं अस ठरलं.
अनिला जायला १ आठवडा उरला होता आणि त्याच्या आई बाबांना अचानक परगावी जावे लागले. २ दिवसात परत येऊ तेव्हा उरलेलं packing करू असे सांगून ते निघून गेले. अनि त्याच एक एक समान बघत होता तेवढ्यात मनूचा फोन आला.. बोलण संपल तसं अनि एकदम खुश झाला आणि पटकन आवरा आवरी करून ठेवली. मस्त T - Shirt आणि short घातली, deo spray केला इतक्यात doorbell वाजली. अनिने पटकन दरवाजा उघडला समोर मनु होती.. मस्त Red कलर चा top आणि black slack घातली होती. कुरळे केस मोकळे सोडले होते. काय दिसत होती ती.. अनिने पटकन तिला घरात ओढून घेतले आणि दार बंद केले कुणी बघायला नको म्हणून. दोघेही एकमेकांकडे बघत होते. पहिल्यांदाच अस एकांतात भेटत होते. काय कराव सुचत नव्हत. अनिने मग तिला बसायला सांगितलं आणि पाणी घेऊन आला.. तिच्या समोर बसला.. खूप इच्छा होत होती तिच्या जवळ बसून तिला घट्ट मिठी मारावी पण हिम्मत होत नव्हती. मनु पण खूप संकोचली होती.. चहा करते म्हणून उठून किचन मध्ये गेली आणि चहा साखरेचे डबे शोधू लागली.. चहा करायला टाकला आणि gas कडे बघत असताना तिला मागून अनिने येउन घट्ट मिठी मारली.. ती त्याच्याकडे वळली आणि त्याच्या मिठीत सामावून गेली... कित्येक दिवसाचं प्रेम आज व्यक्त करत होते दोघे. थोड्या वेळात मिठी सैल झाली आणि अनिचे ओठ तिच्या ओठांवर टेकले. मनु डोळे मिटून अनिला प्रतिसाद देऊ लागली. आता दोघानाही राहवत नव्हते. त्याने तिला उचलले आणि बेडरूम मध्ये घेऊन गेला... जे व्हायला नको ते झाल नेमक... चूक.. एक चूक.. जेव्हा दोघांना कळल तेव्हा मनात खूप अपराधी भावना होत्या. मनुने पटकन आवरलं आणि पळतच घराबाहेर पडली. अनिकेतला सुद्धा तिला थांबवावे वाटले नाही. त्याला खूप वाईट वाटत होत पण जे काही झाल ते त्याला सुखावून गेल होत... जेव्हा ती भावना परत उफाळून आली तेव्हा त्याला एक क्षण वाटले उगाचच जाऊ दिले मनुला.. थोड्या वेळाने त्याने मनुला फोन केला. मनुने उचलला नाही. त्याने खूप call केले पण तिचा काहीच reply आला नाही. आता मात्र त्याला मनुची काळजी वाटत होती आपण तिला नीट समजावून मग पाठवायला हव होत अस वाटत.. तिला काही झाल तर नसेल ना ह्या विचाराने तो व्याकूळ झाला... आणि त्याचा फोन वाजला. मनूचा SMS होता. "Sorry, आज बोलायच्या मनःस्थितीत नाहीय, उद्या call करते" अनिने सुटकेचा निःश्वास टाकला. मनु सुखरूप होती हेच त्याच्यासाठी खूप होत.
दुसर्या दिवशी अनिने फोन केला तेव्हा मनु त्याच्याशी बोलली पण ती अजूनही कालची गोष्ट विसरू शकली नाही... पण अनिकेतला आता ह्या क्षणी मनु हवी होती... त्याने तिला शांतपणे ह्या विषयावर चर्चा करायला घरी बोलावलं आणि आज दुसर काही होणार नाही असे आश्वासन दिले.
मनु त्याच्या घरी आली. दोघेही सोफ्यावर बसले. अनिने विषयाला सुरुवात केली,
“मनु, मला माहितीय काल आपल्याकडून जे झाल ते व्हायला नको होत. पण आता जे झाल त्याच्यावर चर्चा करत बसणे हा मूर्खपणा आहे. खर सांगायचं तर आपण जे केल त्याविषयी अपराधी मानून घेऊ नकोस. २ वर्षांनी आपल लग्न झाल्यावर आपण जे केल असत तेच काल झाल. आता आपण लग्न तर करणारच आहोत. So,chill.. उगाच विचार करू नकोस. मी फक्त आणि फक्त तुझा आहे. तू कसलीच काळजी करू नकोस" हे बोलत असतानाच तो मनुजवळ गेला आणि तिच्या कपाळाच चुंबन घेतलं. हळू हळू तो तिच्या ओठांकडे वळला आणि.. आजही दोघांना कंट्रोल करणं जमल नाही. मनुने सुरवातीला थोडा विरोध केला पण.. नाही.. ते वयच अस असत.. आता दोघेही खूप समाधानी दिसत होते. खूप वेळ एकमेकांजवळ पडून होते. खूप उशीर झाला होता पण दोघानाही एकमेकांना सोडून जावेसे वाटत नव्हते. शेवटी आईचा फोन आला तशी मनु उठली आणि आवरून निघाली आणि जाताना त्याच्या गळ्यात पडून खूप रडली.
अनिकेत चा U.S. ला जायचा दिवस उजाडला. त्याआधी तो सकाळी देवाला जातो अस सांगून मनुला भेटून आला. शिक्षण पूर्ण होऊन job लागला की लगेच लग्न करायचं अस ठरलं.
आज अनिकेतला ला जाऊन ५ वर्ष झाली. सुरवातीला २ महिने आठवड्यातून एकदा फोन, वेळ मिळेल तेव्हा chat अस चालू होत पण हळू हळू सगळ कमी होत गेल. अनि कधीही online येईल म्हणून मनु २४ तास online रहायची पण अनि chat करणं टाळायला लागला. फोन तर आता येतंच नव्हता. आधी मनुला वाटायचे तो अभ्यासात busy असेल म्हणून reply देत नसेल... पण नंतर नंतर तिला कळल की तो तिला avoid करतोय. पण तो अस का वागतोय हे कधी कळलंच नाही. त्यानेही कधी तिला कधी सांगितलं नाही.
मनु कधीतरी त्याचा फोन किंवा मेसेज येईल ह्या आशेवर दिवस काढत होती. मनुचे college संपले नोकरीचीही चांगली ऑफर आली. ती job करायला पुण्याला निघून गेली. पण तिथेही तिचा जीव अनिकेतच्या आठवणीने कासावीस व्हायचा. खूप जणांनी तिला propose पण केल. पण तीच हृदय अजूनही अनिकेत साठी धडकत होत. तो कधीतरी येईल आणि कायमचा तिचा होईल अस तिला वाटायचं. अशीच अजून २ वर्ष निघून गेली. पण अनिकेतने कधीच तिला संपर्क केला नाही. त्याच्या एका मित्राकडून कळल की तो पुण्यातच नोकरी करतोय. ह्या आशेवर की तो कधीतरी भेटेल मनु खूप फिरायची. घरी आता तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. मनुने सांगितले पूर्णपणे settle झाल्याशिवाय ती लग्न करणार नाही. हळू हळू मनुने परिस्थिती स्वीकारली. आता अनि परत कधीच तिच्या आयुष्यात येणार नाही ह्याची तिला पूर्ण खात्री पटली. पण आता दुसर्या कुणावर प्रेम करणं हा गुन्हा आहे असं तिला वाटत होत.
तेव्हाच तिच्या आयुष्यात ओंकार आला. तो तिच्या आधी तिच्या office मध्ये होता पण आता दुसर्या कंपनीत join झाला होता. त्याला खर तर आधीपासूनच मनु आवडत होती पण एकाच office मध्ये राहून तिला कस विचारायचं ह्यामुळे त्याने आजपर्यंत तिला कधी काही सांगितलं नाही. आता कंपनी change केल्यामुळे त्याला वाटले की एकदा तिच्याशी बोलून बघावं.
त्याने मनुला फोन केला व coffee साठी विचारलं. मनुने नाही हो करत होकार दिला. तिला पण एकट फिरायचा कंटाळा आला होता आता. ओंकार चांगला मुलगा होता पण त्याला मनुला कस विचारव हे सुचत नव्हत. त्या coffee date नंतर तो तिला सारखा call करायचा. आणि होकर देण्यासाठी गमतीने force करायचा. मनुला सुद्धा त्याच्याशी बोलायला आवडायचं पण ती confuse होती. एकीकडे तिला असं वाटायचं की कधीतरी अनिकेत येईल तेव्हा आपल लग्न झालंय म्हणून आपल्याला त्याच्याशी बोलता येणार नाही. दुसरीकडे तिला वाटायचं की इतकी वर्ष झाली तो आला नाही किंवा एक साधा फोन, SMS काही केला नाही तर आता कसा येईल? त्याला विसरून जाणच योग्य होईल.. घरचे पण आता लग्न ह्या विषयावर गंभीर झाले होते. सगळा विचार करून शेवटी एकदा तिने ओंकारला लग्नासाठी होकार दिला. त्याला खूप आनंद झाला. त्याने घरी आईला सांगितले. त्याच्या आईला काहीच प्रोब्लेम नव्हता कारण तो एकुलता एक मुलगा होता आणि त्याला बाबा नव्हते. त्यामुळे त्याला नाही म्हणून दुखवायचा प्रश्नच येत नव्हता. त्यांनी मनूच्या घरी officially मागणी घातली. तिच्या घरच्यांना सुद्धा काही प्रोब्लेम असण्याच कारण नव्हत. १५ दिवसात साखरपुडा आणि २ महिन्यांनी लग्नाची तारीख ठरली. घरचे सगळे खूप खुश होते त्यामुळे मनुसुद्धा खुश होती. तिने अनिकेतला विसरून जायचा आणि ओंकारशी एकनिष्ठ राहायचा निर्णय घेतला. साखरपुडा झाला, ओंकार खूप प्रेमळ होता आणि मनुची खूप काळजी घ्यायचा. त्याच्या आई ने तर आत्तापासूनच सगळी जबाबदारी मनुवर सोपवली होती. सगळ अगदी स्वप्नवत चालू होत.
आणि आज अचानक अनिकेतचा फोन आला. सुरवातीला मनुने call cut केला, पण नंतर स्वतःच फोन केला. तिला अनिकेतला दाखवून द्यायचे होते कि, त्याच्याविषयी तिच्या मनात आता काही भावना उरल्या नाहीत. आणि तिला ते जमत होत. काही झालंच नाही असं दाखवून दिल तिने... त्याच्याशी हसत हसत बोलत होती पण मनातल्या मनात कित्येकदा रडत होती. लग्न ठरलंय आणि आता आपला होणारा नवराच आपल सर्वस्व आहे हे सांगायचं होत तिला... पण... अनिकेतच्या त्या शेवटच्या वाक्याने ती सुन्न झाली. त्याला काय उत्तर द्यावे तिला काहीच कळेना.

का असा वागतोय अनि? का??? इतकी वर्ष मी त्याची वाट पाहिली आणि आत्ताच लग्न करण्याचा निर्णय घेतला... पण आज... आजच का फोन केला?

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!