चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो - भाग २

Submitted by अस्मि_ता on 23 May, 2016 - 06:50

पूर्वार्ध -

मनूला तिच्या college मधील मित्र अनिकेत चा फोन येतो.. आणि तो तिला आपण परत friends नाही का होऊ शकत असं विचारतो.. ती विचार करायला वेळ मागते..

अनिकेत प्रधान!!! अनि....

उंच , गोरा, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, confident , topper असल्यामुळे सगळ्या शिक्षकांचा लाडका.. पण एका बाबतीत मात्र तो अगदी लाजाळू होता.. तो स्वतःहून कुठल्या मुलीशी कामाशिवाय कधीच बोलत नसे. त्याचे आयुष्यातले ध्येय ठरलेले होते. B.E पूर्ण झाल्यावर लोन काढून परदेशात जाऊन M.S. करायचे आणि परत भारतात येऊन मोठ्या पगाराची नोकरी करून , आई बाबांना खूप खूप सुखात ठेवायचं.. त्यामुळे त्याचा सगळा कल अभ्यास आणि फक्त अभ्यासाकडेच होता.. आणि तो हे नेहमी आपल्या मित्रांना बोलून पण दाखवायचा..
पण आपण ठरवतो तसच जर आपल्या आयुष्यात झालं असत तर आयुष्यात काही गम्मत राहिलीच नसती.. आपण ठरवतो त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या गोष्टी घडतात.. काही चांगल्या तर काही वाईट... पण त्यामुळे आपलं अख्खं जीवनच बदलून जात.. आणि आपल्याबरोबर इतरांचाही बदलत हे आपल्या कधीतरी लक्षात येत नाही.. आणि जेव्हा हे लक्षात येत तेव्हा ती व्यक्ती आपल्यापासून खूप दूर निघून गेलेली असते.. अनिकेत च्या बाबतीत पण असच झालं..

मनु अजून खिडकीत बसून बाहेरचा पाऊस बघत होती..
तिला college चा तो पहिला दिवस आठवला. १ जुलै २००७ .. तिला पाऊसामुळे उशीर झाला होता.. धावतच ती असेम्ब्ली hall कडे जात होती. sack च एक बेल्ट खांद्यावर , एका हातात छत्री, एकीकडे ओढणी, उशीर झाला म्हणून चेहऱ्यावर आलले tension .. त्या अवस्थेतही ती खूप छान दिसत होती. गडबडीतच मनु hall च्या दारापाशी आली आणि समोरून येत असलेल्या अनिकेतला धडकली. क्षणभर दोघांनी एकमेकांकडे पहिले आणि लगेच सावरून मनु sorry sorry म्हणत मिळेल त्या जागेवर जाऊन बसली. सगळे तिच्याकडे बघून हसत होते तर काही मुली उगाच आपल्यावर असा प्रसंग कधी का येत नाही म्हणून मनु चा हेवा करत होत्या. जागेवर बसल्यावर काही वेळाने मनु ने चोरून अनिकेत कडे पहिले पण तो त्याच्या कामात busy होता.. तो senior होता आणि freshers च introduction वगैरे गोष्टी शिक्षकांनी त्याच्याकडे सोपवल्या होत्या. तो ते सगळ अगदी मनापासून करत होता... थोड्या वेळाने introduction झालं.. college ची सगळी माहिती सांगितली गेली.. थोडा timepass आणि नवीन विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी अभ्यासाचा ताण नको म्हणून काही games च आयोजन करण्यात आल होत.. मनूचा पहिला दिवस खूप छान गेला .. तिला 12th मध्ये चांगले मार्क्स मिळालेले होते हे introduction मध्ये कळले सगळ्यांना.. त्यामुळे काही मुली स्वतःहून येऊन तिच्याशी बोलत होत्या.. तिच्या जवळ बसलेली मुलगी तर तिच्याबरोबर फिरत होती दिवसभर.. मनु अभ्यासाबरोबर इतर activities मध्ये पण हुशार होती.. आणि तिने ठरवल सुद्धा होत कि department च्या कमिटी मध्ये भाग घ्यायचा.. ती घरी आली आई बाबांना आणि भावंडाना सगळ्या गमती जमती सांगितल्या अर्थात एक गम्मत सोडून..

College मध्ये आता regular lectures चालू झाले. Syllabus, reference books, library ह्यातच वेळ निघून जायचा.
पण मनुला अनिकेत विषयी एक ओढ वाटत होती.. ती सारखा त्याचाच विचार करत होती.. पण 'हा मुलगा कुठल्या मुलीशी बोलत नाही मग आपल्याशी कसा बोलेल ?' जाऊ दे.. "अभ्यासावर concentrate करायला हव मिस. मानसी देशपांडे"... अस म्हणून ती गप्पं बसे.. पण मनाला जास्त वेळ आवर घालू शकत नव्हती ती...

इकडे अनिकेत च्या मनात चल बिचल चालू होती..खरे तर पहिल्या दिवशीच मनु त्याला खूप आवडली होती.. पण तिच्याशी बोलणार कस? आत्तापर्यंत कुठल्या मुलीशी जास्त बोलत नव्हता आणि आता अचानक काय न कस बोलायचं हे त्याला सुचेना.. मनातल्या मनात त्याने हजारदा तिच्याशी काय काय बोलायचं हे ठरवलं होत, पण प्रत्यक्षात जेव्हा ती दिसायची तेव्हा तो फक्त तिच्याकडे बघून हसायचा काही बोलण्याची हिम्मतच होत नव्हती..

मग असेच एकमेकांकडे बघण्यात , एकमेकांचा विचार करण्यात दिवस कसे निघून गेले कळलंच नाही.. न सांगताही दोघांना माहित होत कि आपल्यामध्ये काही तरी आहे.. कारण बस मध्ये त्याने कुणाच्या नकळत तिच्यासाठी जागा पकडणे, त्याच्या notes तिला देणे.. तिने त्याच्याकडे चोरून बघणे, तो समोर आला कि लाजणे , हे सगळ होतच होत... हळू हळू बाकीच्यांना सुद्धा हे कळले होते पण अजूनही दोघांनी एकमेकांसमोर हे मान्य केले नव्हते.. मनुची college ची ३ वर्ष अशीच निघून गेली.. 3rd year ची शेवटची semester होती.. आणि अनिकेत ह्या वर्षी final year ला होता.. आता ह्यापुढे दोघांनाही एकमेकांना भेटता येणार नाही याच दुखं होत होत.. पण काहीतरी करायलाच हव होत कुणीतरी..

अजय.. अनिकेत चा मित्र...
मनु च प्रक्टीकॅल संपल होत, आणि ती lab मध्ये मैत्रिणींबरोबर बसली होती.. तेवढ्यात अजय आला आणि मनु ला बाजूला घेत एक कागद तिच्या हातात दिला ... ते कागद म्हणजे काय आहे हे मनुला समजल होत पण.. तेवढ्यात अजय म्हणाला "अनि ने द्यायला सांगितलं आहे.. त्यामध्ये त्याचा mobile number सुद्धा आहे.. phone कर.. तो वाट बघतोय"... मनुला काही समजतच नव्हते.. आज इतके दिवस तीने ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघितली होती तो क्षण आला होता.. तिच्या डोळ्यातून पाणी आले , खूप रडली ती.. मग हातातल्या त्या पत्राकडे बघितले.. हळूच कुणाच्या नकळत ते ओठाजवळ घेऊन त्याला किस केले.. जणू काही ती अनि ला किस करत आहे असे.. मग पटकन ते पत्र journal मध्ये लपवून ठेवले आणि library मध्ये जाऊन वाचायचे असे ठरवले.. प्रक्टीकॅल सुटल्यावर मैत्रिणींना मला जरा काम आहे मी library मध्ये जाऊन येते असे सांगून ती पळतच library कडे धावली.. कधी एकदा ते पत्र वाचते असे झाले होते तिला..

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users