Submitted by बेफ़िकीर on 17 May, 2016 - 10:57
कुर्बान विभ्रमांवरती ही सारी दुनिया आहे
स्त्री हीच जगाची उर्जा, स्त्री हीच समस्या आहे
उत्तीर्ण इथे झालेले, जातात कुठे समजेना
अंतिम घटिका येईतो नुसतीच परीक्षा आहे
एकाही चर्येवरती संतुष्ट भाव विलसेना
मृगजळात ह्या विश्वाच्या, तहहयात तृष्णा आहे
ही स्थिती बदलण्यासाठी करतोस कशाला पूजा
तू भोग भोगणे सारे, ही खरी प्रार्थना आहे
तो होता तेव्हा त्याचे, अस्तित्त्व जाणवत नव्हते
गेल्यावर जेथे तेथे, त्याचीच वानवा आहे
मी अजून जगतो ह्याचे आश्चर्य तुला का वाटे
ही माझी इच्छा नाही, मरणाची इच्छा आहे
ती बर्याच वर्षांनंतर मिसळवून डोळे गेली
भलत्याच दिशेला बहुधा हा सूर्य उगवला आहे
आजचा दिवस विसरूया, पाहूया उद्या उद्याचे
'बेफिकीर' होऊ.... आता हाताशी मदिरा आहे
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच _/\_ उत्तीर्ण सर्वात
मस्तच _/\_
उत्तीर्ण सर्वात जास्त आवडला
भाव विलसेना मध्ये जरा अडखळायला झालं .
_/\_
छानच खूप दिवसानी तुमची एखादी
छानच
खूप दिवसानी तुमची एखादी स्वरांत काफियाची गझल वाचनात आली
अनेक ओळी विशेष आवडल्या अनेक शेर विशेष आवडले
उत्तीर्ण सर्वाधिक आवडला
उत्तीर्ण इथे झालेले, जातात
उत्तीर्ण इथे झालेले, जातात कुठे समजेना
अंतिम घटिका येईतो नुसतीच परीक्षा आहे
सुर्रेख…
गझलही छानच.
आजचा दिवस विसरूया, पाहूया
आजचा दिवस विसरूया, पाहूया उद्या उद्याचे
'बेफिकीर' होऊ.... आता हाताशी मदिरा आहे>>सहज सुंदर!
गजल आवडली!
मस्त गझल
मस्त गझल
वा मस्त
वा
मस्त
छान गझल
छान गझल
एकाही चर्येवरती संतुष्ट भाव
एकाही चर्येवरती संतुष्ट भाव विलसेना
मृगजळात ह्या विश्वाच्या, तहहयात तृष्णा आहे >>>> सुपर्ब .....
सुर्रेख गजल ....