आपण वाढदिवस का साजरा करतो?

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 May, 2016 - 02:16

आपण वाढदिवस का साजरा करतो?

सिरीअसली का साजरा करतो आपण
आपल्याच जन्मदिवसाचा सोहळा?

करतो तर करतो .. ईतरांनीही त्यात सामील व्हावे, आपले अभिनंदन कौतुक करावे अशी अपेक्षा का करतो?

लग्नाचा वाढदिवस साजरा करणे समजू शकतो.
आणखी एक वर्ष लग्न टिकवले, आणखी एका वर्षाचा संसार झाला..
पण असा काय तीर मारला आपण, एखाद्या अमुक तमुक दिवशी जन्म घेऊन?
आणि त्या दिवसाला आज अमुकतमुक वर्षे होऊन..

बस्स जगलो एवढेच !

ते तर किडे मुंग्याही जगतातच की..

फरक ईतकाच,
ते किड्यामुंग्यांसारखे जगतात आणि आपण माणसांसारखे जगतो.

बास्स !

पण मुळात कधी कुठे केव्हा कसे जन्मावे हे आपल्या हातात असते का...
करायचेच झाल्यास आपल्याला जन्म देणाऱ्या आईवडीलांचे अभिनंदन करणे जास्त योग्य नाही का..
शेवटी त्यांचेच तर प्रॉडक्ट एक वर्ष आणखी टिकले असते.

आता साजरा करणे आले म्हणजे पार्टी आली. केक आला. दारू आली.
जमलेच तर नाच आणि धिंगाणा आला.
या सर्वाचे फेसबूकवर फोटो टाकून त्यावर आणखी शेकडो लोकांचे कौतुकाचे आणि अभिनंदनाचे पोस्ट मिळवणे आले...

झालेय माझेही हे सारे करून..

मग एके वर्षी मी फेसबूकची सेटींग चेंज केली.
माझा वाढदिवस मी सोडून कोणालाच दिसणार नाही याची खात्री केली.

आणि मग त्या दिवशी मला समजले..

मी सोडून माझ्या बर्थ डे बद्दल कोणालाच पडली नव्हती ..

अगदी कोणालाच पडली नव्हती..

नॉट ए सिंगल विश .. ब्लडी नॉट ए सिंगल विश ..

दुसऱ्या दिवशी मी फेसबूक अकाऊंट डिएक्टीवेट केले ..

हे सगळे मला आजच का आठवले..

कारण पुढच्याच आठवड्यात माझ्या गर्लफ्रेंडचा बर्थडे आहे..

आणि तिची अशी अपेक्षा आहे की मी त्या दिवशी सुट्टी टाकावी.. जे मला वर्कलोडमुळे जमणे अवघड आहे !

काय सांगू आता बॉसला..
ऑफिसच्या मिटींग पेक्षा माझी आजची डेटींग महत्वाची आहे.
जिच्याबरोबर सेटींग झालीय ती महत्वाची आहे.

एवढी हिंमत कदाचित होणार नाही सांगायची ..
पण ऑफिसला दांडी जरूर मारणार ..

उडत गेले ऑफिस आणि तेल लावत गेला बॉस,
तिच्यासाठी मी एवढे जरूर करणार ..

का माहितेय ..

कारण बदललेल्या फेसबूक सेटींगला चकवून, ठिक आदल्या रात्री बारा वाजता, माझा जन्म दिवस उजाडल्या उजाडल्याच.. त्याचे सार्थक करायला..

एक तिचाच तर फोन आला होता Happy

- ऋ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ सिमरन,
आजही माझी फेसबुक सेटिंग हाईडच आहे.. त्यामुळे अनावश्यक मेसेज पडत नाहीत. काही जण आठवणीने लक्षात ठेवून विश करतात ते मात्र आवडतेच.

वाढदिवस मुलांसाठी म्हणून घरातल्या प्रत्येकाचाच उत्साहात साजरा केला जातो. तसेही मूळ लेखाचे सार तेच आहे. नुसत्या औपचारिक शुभेच्छा गोळ्या करण्यापेक्षा ज्यांचे आयुष्य तुम्ही अजून एक वर्षे आनंदाने भरून टाकले अश्यानसोबतच हा दिवस साजरा करा..

@सिमरन +१
आमच्या कंपनीत अगदी प्युन पासून प्रत्येकाचा वाढदिवस कंपनीतर्फे साजरा केला जाई केक कापणे आणि स्नॅक्स. त्याची सवय झाली होती. हेड ऑफिस स्टाफ कमी होता, २०.

Pages