Submitted by satishb03 on 15 May, 2016 - 14:36
लाल अडवाणी
लाल अडवाणी चिरुट पिताना
चावायाचा नुस्ताच चोथा
म्हणायचा अन् मनाशीच की
प्रधानसेवक होईल सोता
कचकावुनी कासरा रथाचा
आणि थोपटून झ्या झ्या घोडे
दंगल मंगल सांडीत जाता
रामाचे मंदिर बांधीन थोडे
चोथा लाल अडवाणीने जो
चावुनि चावुनि फेकून दिधला
संसंदेमधल्या जाजमास तो
सदैव रुतला सदैव रुतला
स्वप्नांवरती धूर सांडणे
लोकसभेचा विधानसभेचा
चिभन जळक्या खासदारांना
वाचवी गाथा भागवताचा
लालु अडवाणी चिरुट बापडा
वडता वडता खंगून गेला
चावी फिरवत पत्ते काटूनी
फेकू बाबा सेवक झाला
कवी : रॅम्बो वाघमारे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
भयंकर वास्तव मांडले आहे.
भयंकर वास्तव मांडले आहे.
आज देशामधे जे काही धार्मिक विद्वेषाचे विष भिनलेले दिसत आहे त्याची पेरणी अडवाणी यांनी केली आहे. आज त्यांना पश्वाताप होत असेल, ( रडत असतात असे वाघेला म्हणतात ) पण मागे जाता येत नाही.
"गणपत वाणी" चे क्लासिक विडंबन
"गणपत वाणी" चे क्लासिक विडंबन. जमलय. व्वा व्वा बहुत खूब! मस्त!
मस्त विडंबन!
मस्त विडंबन!
=====
>>> आज देशामधे जे काही धार्मिक विद्वेषाचे विष भिनलेले दिसत आहे त्याची पेरणी अडवाणी यांनी केली आहे.
खरे आहे. सगळे जग नको नको म्हणत असतानाही अडवानी यांनी फाळणी केलीच शेवटी!
मस्त विडंबन.
मस्त विडंबन.
छपरी लेखक
छपरी लेखक
(No subject)