Submitted by श्वेता़क्षरा on 15 May, 2016 - 13:24
आत आत खोल खोल थेट वार झाले
एक एक होत होत फार फार झाले
श्वास थांबतो उगाच नजरभेट घडता
नजरकैद प्रेमवीर बेसुमार झाले
भास व्हायचा तुझा चराचरात तेंव्हा
सत्य भास होत जात आरपार झाले
वाटते कसे बसे तुझ्या मिठीत येता
प्रेम बीम आजकाल थंडगार झाले
पाळ दुःख नेटके हिशोब मांडताना
पारखे सुखास सर्व कारभार झाले
रंगवू कसे घरात चित्र उंबऱ्याचे
नेमके बरेच रंग हद्दपार झाले
एक देह एक प्राण एकसंध नाते
मर्मबंध तोडताच दोन चार झाले
श्वेता द्रविड
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा