एका तळ्याकाठी एक सुंदर बगीचा होता. विवधरंगी फुलांनी बहरलेल्या बगीच्यात माळीकाकांनी एक नवीनच गुलाबाचं रोपटं लावलं होतं. माळीकाका संपूर्ण बगीच्याची खूप काळजी घेत, विशेषतः या नवीन गुलाबाच्या रोपट्याची. दिवसागणिक गुलाबाच्या रोपट्याची छान वाढ होत होती, एके दिवशी झाडांना पाणी देताना माळी काकांना त्या गुलाबाच्या रोपट्याला पाहुन खूप आंनद झाला, त्या रोपट्याला पहिल्यांदाच दोन कळ्या आल्या होत्या. माळीकाका या कळ्या फुलण्याची आतुरतेने वाट बघू लागले. त्या कळ्याही फुलण्याच्या तयारीत असताना अचानक एका रात्री पहिल्या कळीला कुणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. तीने आवाज ओळखीचा वाटतो म्हणून आजूबाजूला पाहले तर दुसरी कळी बिचारी पानाआड तोंड लपवून हुंदके देऊन रडत होती. पहिलीने विचारपूस केल्यावर दुसरी कळी म्हणाली " उद्या आपण उमलणार आणि उद्याच आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरणार. आपलं एक दिवसाचं आयुष्य निरर्थक संपणार याच मला फार वाईट वाटतं. " पहिली कळी गालात हसते आणि दुसरीला समजावताना म्हणते, " आपले आयुष्य संपणार याचे वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण थोडा वेगळा विचार करूया. उद्या आपण जेव्हा उमलू तेव्हा आपल्या सुगंधाने अनेक फुलपाखरे आपल्याकडे आकर्षित होतील, आपल्या जवळ येवून आपल्याशी खेळतील, आपल्या सुगंधाने भारावून मनुष्य आपल्याला अत्तराच्या कुपीत जतन करून ठेवेल, स्त्रिया आपल्याला डोक्यावर मिरवून त्यांच्या सौंदर्यात भर घालतील, अनेक देवघरात आपल्याला देवपूजेचा सन्मान मिळेल, सजावटीसाठी आपली सुंदर आरास मांडली जाईल. एवढं सगळं सुखं, समाधान एखाद्याला देणार आपलं अस्थित्व मग निरर्थक कसं ठरेल. या उलट आपण कुणाच्यातरी उपयोगी पडू शकतो याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे "
दुसऱ्या कळीला हा वेगळा विचार फारच भावला. स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव झाली आणि आनंद गगनात मावेनासा झाला.
दोन्ही कळ्यांना पहाटेच्या नवचैतन्याचा सूर गवसला आणि एक एक पाकळी बाजूला सारून कळीचा टवटवीत फुलात कायपालट झाला.
सकाळी माळीकाकांनी ती दोन्ही फुले हळूच तोडली पहिल्या फुलाला देवळात देवाच्या पायावर स्थान मिळाले तर दुसरया फुलाने एका आकर्षक पुष्पगुच्छाची शोभा वाढवली. कळी म्हणून जन्माला आलेल्या दोन गुलाबाच्या फुलांचं आयुष्य समृद्ध झालं.
म्हणूनच दोस्तहो उद्याची काळजी न करता परिस्थिती चांगली-वाईट कशीही असली तरी आनंदाने फुलात रहा. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवा आणि सदैव फुलासारखं दरवळत रहा.
सकारात्मक दृष्टीकोन
Submitted by salgaonkar.anup on 3 May, 2016 - 00:02
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! आवडले!
मस्त! आवडले!
छान
छान
वाह छान, हे वाचून एक जुनी
वाह छान, हे वाचून एक जुनी कविता आठवली.
http://ek-kavita.blogspot.in/2007/05/blog-post_05.html