शीर्षकच पुरेसे बोलके आहे. फारसे काही लिहून कोणाच्या भावना दुखावण्यात अर्थ नाही. पण तरीही लिहितो.
मागे जेव्हा धाग्यावेताळाने " गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?" असा धागा काढला तेव्हा त्याचे कौतुकच वाटलेले. अर्थात त्याच्या हेतूबद्दल खात्री नव्हती पण तरीही काम धाडसाचेच होते आणि बंडखोरी मला नेहमीच आवडत आलीय.
मात्र सध्या धाग्यावेताळाकडून जे काही चालू आहे त्यात त्याचा काय हेतू आहे, आणि त्याला काय साध्य करायचे आहे, हेच समजेनासे झालेय.
धाग्यावेताळाला या संकेतस्थळावर कैक हक्क नाकारले जातात. कित्येक लेखांवर प्रतिक्रिया देण्यासारख्या जीवनावश्यक बाबींमध्ये त्याला समानतेची वागणूक मिळत नाही. त्याला बाळ, धागा हायजॅक करणारा, प्रत्येक धाग्यावर शाहरुख, सई, गर्ल्फ्रेंड व स्वप्नील (मला तर कधी कधी हे चौघे याच्याकरिता एकच आहेत अशी शंका येते) यांच्यापैकी कुणाही एकाला अथवा सर्वांना धाग्यावर आणणारा, एमेन्सीत काम करुनही कच्चे इंग्रजी असणारा, हाल्फ, फुल्ल असे चक्रावून टाकणारे उच्चार लिहिणारा अशा विशेषणांनी गौरविले (?) जाते. अशा वेळी त्याने केवळ अट्टहासाने नवनवीन विषयावर धागा काढण्याच्या हक्कासाठी लढणे तितकेच गरजेचे आहे का हे मला समजत नाही.
कायद्याच्या समानतेनुसार कोर्ट नक्कीच असा निर्णय देणार की तुम्ही बनियन, मोजे आठवडा आठवडा न धुता तसेच घालण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला जरूर आहे. पण जर तुम्ही एखादी समाज व्यवस्था मानता, त्या समाज व्यवस्थेच्या चालीरीती आणि परंपरा मानता तर त्याविरुद्ध जाण्यातही काय अर्थ आहे. किंबहुना जे पुरुष या प्रथापरंपरांना मानतात ते या बाबतीत समाजव्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन या बनियन न धूता नेसण्याची मागणी करणारच नाहीत. मग हा हक्क बनियन न नेसणार्या पुरुषांनी मागितला आहे का? आणि तसे असल्यास त्या पुरुषांचा या प्रथांवर विश्वासच नसेल तर त्यांना हा हक्क घेऊन करायचे तरी काय?
आज संध्याकाळी मी एका मित्राच्या घरी गेलो होतो. टीव्ही चालू होता. बातम्या लागल्या होत्या. दिवसभर दुचाकीवरील पाठीमागच्या व्यक्तिलाही हेल्मेटसक्तीसंदर्भाने जो गदारोळ झाला त्याच्याच बातम्या होत्या. मित्राचे बाबा म्हणाले, "या पोरांना काही अक्कल नाही का? या आपल्या मोटर वाहन कायद्याची जी कलमे आहेत ती यांना का मोडायची आहेत? बाकी कामधंदे नाहीत का?"
मी त्या वेळी मुद्दामच मित्राकडे तिरप्या नजरेने पाहिले. तो काही बोलला नाही. पण त्याचा चेहरा सांगून गेला की त्याला आपल्या वडिलांचे बोलणे पटले नव्हते. त्या वक्तव्यावर तो नाराज होता. कायदेभंगाची एक हलकीशी ठिणगी पडली होती. पण चुकीच्या कारणासाठी किंबहुना अनावश्यक हक्कासाठी.
समजा जर त्या मित्राच्या वडीलांनी दुचाकीवरून तीन जणांनी फिरण्याबाबत असे उद्गार काढले असते की दुचाकीवर तीन जणांनी बसून जायची गरज आहे का वगैरे तर मी देखील तिथल्या तिथे ते विधान खोडून टाकले असते. त्यावर त्या मित्राच्ने विरोध दर्शवला असता तर पाठिंबाच दिला असता. पण या केसमध्ये स्त्री-पुरुषांनी एकत्र मोटरसायकलवर हेल्मेटखाली चेहरा लपवित फिरण्याचा मुद्दा घेत मला त्या मित्राच्या नाजूक भावना दुखावण्यात फारसे तथ्य जाणवले नाही.
अर्थात हा माझा विचार झाला. एक पुरुष म्हणून. हा विचार चुकीचाही असू शकतो. स्त्रिया याकडे कश्या बघतात ते स्त्रियांनाच ठाऊक.
या फोरमवर माझ्या ओळखीची एकही स्त्री अथवा पुरुष नसल्याने इतर सदस्यांचे मत जाणून घेण्याकरिता हा धागा काढला.
तर मुद्दा असा की, उठसूट कुठल्याही आलतू फालतू विषयावर धाग्यावेताळाचे धागे काढणे - हा त्याचा हक्क की (बाल) हट्ट?
संदर्भः-
http://www.maayboli.com/node/58218
ते म्हणतात ना, यु कॅन हेट हीम
ते म्हणतात ना, यु कॅन हेट हीम अॉर लाईक हीम, बट यु कान्ट इग्नोअर हीम
कापोचे आणि सायो, आपापसात काय
कापोचे आणि सायो,
आपापसात काय वाद घालता..
माझ्याशी घाला ना
runmesh...I like ur way of
runmesh...I like ur way of writing...
admin, think you are reading
admin,
think you are reading these posts.
Yes, religion, caste and BJP vs cong etc discussions on maayboli + posts like Runmesh's are extremely boring. I visit maayboli rarely.
Sanyukta was a good enough reason to visit maayboli once upon a time even when such people and posts and fights existed outside. With that gone and above things, maayboli is loosing what it had earlier. I am sure there will be many like me who have left visiting this place regularly.
I guess, it doenst make a difference. Because there are different people who visit this place now.. head count perhaps is the same and better with du-ids
But talking out of old love for the place.
माझ्या माहितीनुसार मायबोलीवर
माझ्या माहितीनुसार मायबोलीवर कोणी किती धागे काढावेत ह्याला काहीच बंधन नाहीये...
तुम्हाला वाचायचे नसतील तर वाचू नका.. कोणी मानगूट धरुन सांगत नाहीये हाच धागा वाचा म्हणून..
मायबोलीवर जेव्हढा कंटेंट वाढेल तेव्हढा हवाच आहे.. कारण जसा कंटेंट वाढेल तसा लोकांचा वावर वाढेल..
खरतर ह्या धाग्याची तशी काही गरज नव्हती तरी ७०-७५ प्रतिसाद आलेच.. त्यात परत वर चार लेखांचे दुवे आहेतच ते ही वाचायला लोक गेले असतीलच..
त्यामुळे मायबोली वरचा लोकांचा वावर वाढवण्यासाठी हातभार लावल्या बद्दल ह्या धाग्याच्या धाग्याकर्त्याला धन्यवादच द्यायला पाहिजेत....
अरे हो की.. माझ्याही आयडीची
अरे हो की.. माझ्याही आयडीची लिंक दिली आहे. चार चौघे तिथेही फिरून येतील. मला छानसा डीपी लावायला हवा बाबा
सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे..
सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे.. ऋन्मेषने काढलेले धागे तर शंभरी गाठतातच. आता ऋन्मेषवर काढलेला धागाही शंभरी गाठेल लवकरच.
कैच्याकै राव. तुमच्यापैकी ज्यांना तो आवडत नाही.. ते लोक्स याला आणि ह्या धाग्याला भाव देऊन त्याची अजून पब्लिसिटी का करताय?
मायबोलीवर एखादा नवीन आलेला व्यक्ती एवढी चर्चा वाचुन उत्सुकतेने सगळं सोडुन आधी याचे धागे शोधून शोधून वाचेल.
ऋन्मेष.. मान गये यार तुम्हें.. ___/\___
piu...right..maz pn te krun
piu...right..maz pn te krun zaly...I mean tyach sgl writing wachly...
पॅश्चिम(टाईम पास) साठी मी
पॅश्चिम(टाईम पास) साठी मी बरेचदा ,ऋन्मेऽऽषचे धागे वाचते.मागे कोण ते प्रोफेसर होते त्यांनी गझला टा़कून टा़कून
वीट आणला होता.याचे सध्यातरी तसे नाहीय.
मत्सर आहे का? इकडेतिकडे रुमाल
मत्सर आहे का?
इकडेतिकडे रुमाल टाकून ठेवणाय्रांना रुमालाचा धागा वाचून प्रचंड शिंका येऊ लागलेल्या होत्या.
माजघरातले हमसणारे धागे -
माजघरातले हमसणारे धागे - हक्क की हट्ट असा पुढचा धागा काढा.
धाग्यावेताळ>>> Perfect
धाग्यावेताळ>>> Perfect name.
पण धागा काहून काडला? एखाद्या लेखाखाली कमेंट मधे पदवी देता आली असती. एवढ्या सोहळ्यापेक्षा इग्नोर थोर अस्त्र आहे की.
नानबा मराठी संस्थळाविषयीची
नानबा मराठी संस्थळाविषयीची त्यांची कळकळ विंग्रजीत का सांगत आहेत? बरं त्यातही losing ऐवजी loosing अशा मूलभूत चुका केल्यात! मायबोलीचा दैदिप्यमान भूतकाळ असाच होता का?
ऋन्मेषचे धागे न आवडणार्यांनी
ऋन्मेषचे धागे न आवडणार्यांनी त्याखाली प्रतिसाद देऊ नये असा सल्ला देणारे स्वतःच हा सल्ला राजेश कुलकर्णी प्रकरणात पाळू शकले नाहीत हा विरोधाभास म्हणावा का?
अहो.कुठे ते जमदग्नी आणि कुठे
अहो.कुठे ते जमदग्नी आणि कुठे हे नारदमुनी? नारायण! नारायण.!
हळूहळू या धाग्याला वर्मी
हळूहळू या धाग्याला वर्मी बसलेल्यांचं सामूहीक रुदन असे स्वरूप प्राप्त होते आहे.
स्वरूप वगैरे काय कळत नाही पण
स्वरूप वगैरे काय कळत नाही पण आता या धाग्याला टाळे लागले तरी चालेल.
उगाच इथे एखाद दुसरा प्रतिसाद पडला तरी मला माझी नैतिक जबाबदारी असल्यासारखे हातातील सारी कामे टाकून, इतर धागे वाचायचे सोडून या धाग्यावर येऊन काय लिहिलेय हे वाचावे लागतेय
उगाच इथे एखाद दुसरा प्रतिसाद
उगाच इथे एखाद दुसरा प्रतिसाद पडला तरी मला माझी नैतिक जबाबदारी असल्यासारखे हातातील सारी कामे टाकून, इतर धागे वाचायचे सोडून या धाग्यावर येऊन काय लिहिलेय हे वाचावे लागतेय >>>> त्यापेक्षा तू अजून एक दुसरा धागा सुरू कर बघु ............
ओके. केला. डन. थॅन्क्यू ..
ओके. केला. डन. थॅन्क्यू .. http://www.maayboli.com/node/58592
इतर कामे सोडून मानगुटीवर
इतर कामे सोडून मानगुटीवर बसावं लागेल.
हा विरोधाभास म्हणावा का? >>
हा विरोधाभास म्हणावा का? >> नाही हो भंपकपणा. भंपकबोटीचं आजीवन सदस्यत्त्व मिळणार आता.
राजेश कुलकर्णींच्या धाग्यावर
राजेश कुलकर्णींच्या धाग्यावर लिहीणारे लोक माहीत आहेत. त्यांचे लिखाण आवडणारे लोक माहीत आहेत. त्यांनी ज्या विषयांवर लिहीलं त्याबद्दल गैरसमज पसरू नयेत म्हणून जबाबदारीने त्यांना संदर्भ मागणारे आणि ते मागितले म्हणून राजेश कुलकर्णींनी शिवीगाळ केलेले लोक माहीत आहेत. राकुंच्या शिवीगाळीविरुद्ध तक्रार केलेले लोक माहीत आहेत.
यातले कोणते लोक ऋन्मेषच्या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये असं म्हणतात ते नाही कळलं. राकुंच्या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये असं म्हणत प्रतिसाद दिलेत असं म्हणायचं असतं तर एकवेळ ठीक.
वडापाव आणि आमरस यांची तुलना कळाली नाही.
ऋन्मेश - तु मनावर घेऊ नकोस.
ऋन्मेश - तु मनावर घेऊ नकोस. तुझ्याकडे धागा काढण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिभा आहे, त्या प्रतिभेला मारु नकोस किव्वा मुरडही घालायचे कारण नाही. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी तुझे धागे आवर्जुन वाचतो (करमणुक हमखास असते :स्मित:). धागा वाचल्यावरही खुप त्रास होत नाही म्हणुन पुढचा 'नवा' धागा आल्यावरही वाचण्याचे धाडस होते...
तु प्रतिसाद बर्फासारखे थन्ड (शान्त) राहुन कसा देतोस याबद्दल मला हेवाच वाटतो...
उदय +११११
उदय +११११
ऋन्मेषला व त्याच्या धाग्यांना
ऋन्मेषला व त्याच्या धाग्यांना इग्नोर करण्याचा सल्ला देणार्यांना केवळ राजेश कुलकर्णी प्रकरणाची आठवण करून दिली इतकंच त्यावरून लगेच त्याच्या धाग्याला वडापाव आणि कुलकर्णींच्या धाग्याला आमरसाची उपमा वाचून गंमत वाटली.
राजेश कुलकर्णींच्या लिखाणामुळे गैरसमज पसरायचे म्हणजे त्यांचं लिखाण हे खात्रीशीर बातमी स्त्रोत म्हणून संदर्भाकरिता वापरलं जायचं का?
मग ऋन्मेषचे बॉलीवुड धागे हे तर बॉलीसायक्लोपीडियाच म्हणावे लागतील - म्हणजे मराठी / हिंदीतला सुपर्रर्स्टार कोण? त्याला तुम्ही हेट / लव करु शकता पण इग्नोरू शकत नाही असं तो स्वतःच सर्वांच्या वतीने ठामपणे लिहीतो. याच न्यायाने त्यालाही इग्नोरू शकत नसल्याने व लव करण्याचा तर प्रश्नच नसल्याने हा अगदीच हेट नाही तरी त्याच्या हक्क / हट्टावर प्रश्न करणारा धागा काढला आहे.
बाकी, मी (म्हणजे धागाकर्ता) ऋन्मेषचा सैनिक तर नाही ना अशी शंका काढणारा स्वतःच ऋन्मेषचा सैनिक असावा कारण राजेश कुलकर्णींनी ऋन्मेषला अक्षरशः झाको़ळून टाकले होते, त्याचा धाग्यावेताळ हा किताबही जाण्याच्या वाटेवर होता तेव्हा राजेश कुलकर्णींच्या विरोधात ह्याच सैनिकाने आघाडी घेत खिंड लढविली होती आणि आताही ऋन्मेषची बाजू घेत जिवाची शर्थ करीत आहे.
ऋन्मेषचे धागे न आवडणार्यांनी
ऋन्मेषचे धागे न आवडणार्यांनी त्याखाली प्रतिसाद देऊ नये असा सल्ला देणारे स्वतःच हा सल्ला राजेश कुलकर्णी प्रकरणात पाळू शकले नाहीत हा विरोधाभास म्हणावा का? >>>> या प्रतिसादाची आठवण करून देतो. अजून कोण हे लोक हे क्लिअर झालेले नाही. गंमतीवर नेऊ नका आता. ही तुलना कशी केलीये हा खरंच प्रश्न आहे.
राकुंची विधानं संदर्भ म्हणून वापरतात का हे विचारण्याआधी मायबोलीवर बेसलेस स्टेटमेण्ट करू द्यायला मुभा आहे का या प्रश्नाचं सोपं उत्तर द्या. तुम्हाला राकुंचा पुळका आला असेल तरत, तुम्ही जे कुणी असाल ते, तुम्ही ज्या महापुरुषाला वगैरे मानता, त्याच्यावर बेछूट आरोप करून त्याचे संदर्भ दिले नाहीत तर चालेल का तुम्हाला ?
काहीच्या काही.
इथे एकाही पोस्टमधे ऋन्मेषची बाजू मी घेतलेली नाही. त्याच्या धाग्यांवर जिथे आवडत नाही तिथे आवडल नाही हे थेट लिहीलेलं आहे. त्यासाठी बावळ्यासारखा वेगळा धागा काढायची आवश्यकता नाही वाटलेली. हे असे आरोप करणारे जी कारणं देतात ती न देता ऋन्मेषला सांगितलेय इतकेच. ती कारणं बिनबुडाची आहेत हे या बिनकामाच्या धाग्याच्या निमित्ताने सांगता आलं.
{{{ बावळ्यासारखा }}}
{{{ बावळ्यासारखा }}}
इंटरेस्टींग.. अजूनपर्यंत मी कुठलाही अपशब्द वापरला नाहीये. राजेश कुलकर्णींच्या धाग्यावरही आधी कुरापत कोण काढत असे ते स्पष्ट झालंय.
आता आधी पहिल्या पानावर,
kapoche | 1 May, 2016 - 02:55
हा पण तुझाच सैनिक तर नाही ना ?
हा असला बिनबुडाचा आरोप करण्याचं काय स्पष्टीकरण देणार ते सांगा मग बाकी मुद्दे क्लिअर करू.
मला ऋन्मेष यांचे धागे आवडत
मला ऋन्मेष यांचे धागे आवडत नाहीत असे नाही, पण धाग्यांपेक्षा त्यांचा जालवावर अधिक आवडतो. कुणालाही शिवीगाळ नाही, संतापून बोलणे नाही, चिखलफेकीत सामील होणे नाही. आपल्या मताबद्दल कडवट आग्रह नाही. आपण बरे की आपला धागा बरा.
आजकाल मराठी जालावर सर्वत्रच कंटेंट्ची वानवा आहे. जे लोक कुठल्याही एखाद्या विषयात तज्ज्ञ असतात त्यांना जालासारख्या आम प्लॅट्फॉर्मवर यायला वेळच नसतो. आमच्यासारखी सर्वसाधारण माणसे इथे येऊन व्यक्त होतात. त्यांना दोन घटका करमणूक, विरंगुळा तरी हवा असतो किंवा कुस्त्यांची जंगी दंगल तरी. (तीही करमणूक म्हणूनच, बरेच वेळा.)
सो, ठीकच आहे की. निदान कट्टे आणि अड्डे यापेक्षा तरी ऋन्मेषचे धागे वाचनीय असतात.
राकुंशी तुलना पटली नाही. त्यांचा संताप, तो व्यक्त करण्याची भाषा, आक्रमक आग्रहीपणा, दुसर्याचा अपमान करण्याची वृत्ती हे न पटण्याजोगे होते.
<<जालवावर >> ------ समजायला
<<जालवावर >>
वेळ लागला... जाल वावर.
------ समजायला
हीरा पोस्ट आवडली...
बिपीनचद्र किंवा स्पार्टाकस
बिपीनचद्र किंवा स्पार्टाकस किंवा जे कुणी असाल ते.
तुम्ही जिंकले, बाकीचे सर्व हरले. जा ऐश करा.
Pages