सोबत
बुधवारचा आठवडी बाजार आटोपुन गोपाळ घराकडे निघाला होता. माळरानातल्या त्या बैलगाडी मुळे तयार झालेल्या कच्च्या रस्त्याने चालताना त्याचे कोल्हापूरी वहाण च्चर्र च्चर्र असा आवाज करत होते आनि त्याबरोबरच रस्त्यावरची धूळ ऊडत होती. नजर जाईल तितक्या दूरवर फक्त माळ आणि माळच दिसत होता. थोड्या अंतरानंतर कवठाच्या झाडापासून रस्ता दूभंगला होता आणि चौथरा तयार झाला होता. त्यातला एक रस्ता वरच्या अंगाला शिरगावला जात होता तर दुसरा खालच्या अंगाला शिवनाकवाडीला जात होता. हिव्वाळा सरत आलेला होता माळावरची कूसळे वार्यावर डूलत होती. सुर्य मावळतीला आलेला होता हातातले बाजाराचे सामान सावरत गोपाळने कपाळावर जमा झालेले घामाचे थेंब सदर्याच्या बाहीने टिपले आणि तो विचार करु लागला आत्ताशा कुठे सात किमी रस्ता संपलाय या वळणावरनं वरच्या अंगाला वळलं की १४ ते १५ किमी अंतरावर शिरगाव तिथून पूढे एक दोन वाड्या ओलांडले की कात्राळ्याचे टेक उतरुन गेले की माळवाडी म्हणजे अजून बराच पल्ला गाठायचा होता. वाटेवर सावलीसाठी लावलेल्या कवठ्याच्या झाडाखाली एका दगडावर त्याने बूड टेकवले आणि खिशातून तंबाकू ची पिशवी काढली, पावसाने भिजू नये अथवा तंबाकू खिशात सांडू नये म्हणून त्याने ती चहा पूडीच्या प्लॅस्टीक पिशवीत घालून तो गुंडाळुन ठेवत.
त्याने पिशवी काढली आणि तंबाकू तळहातावर ठेवली आणि नखाने चुन्न्याच्या डबीतला चुन्ना काढून त्याने तंबाकू वर मळला. तंबाकूचा बार ओठंच्या आतल्या बाजूला दाबत त्याने हात झटकले. काही वेळ तो तसाच बसून राहीला आणि मग बाजूलाच पिचकार्या मारत त्याने चालून आलेल्या रस्त्यावर नज्र्र टाकली. तसा तो चक्रावलाच एक बाई हातातले सामान सांभाळत रस्ता तूडवत येत होती साधारणतः पंचवीत तीस वर्षाची असेल, एका हाताने साडी सावरत ती कशीबशी चालत होती. या आडरानात या वेळेला ही बाई इथे काय करतीये ते पण एकलीच गोपाळ विचार करू लागला. बाई जवळ आली तसं गोपाळने तंबाकू थुंकली आणि सदरा नीट करत तो ऊठून ऊभा राहीला. ती खाली मान घालून चालत होती गोपाळला बघून ती पण ऊसासे टाकत झाडाखाली थांबली, पदराच्या शेंड्याने चेहर्यावरचा घाम पुसत तिने गोपाळ ला कोमल आवाजात विचारलं ” अहो शिवनाकवाडीला जाणारा रस्ता कोणता आहे”. गोपाळ्च्या मनात आनंदाचे ऊमाळे फूटत होते. त्याला आजवर कोणी एवढा आदर दिला नव्हता. गोपाळ ला स्वतः च्या नशिबावर विश्वास बसत नव्हता, अशी देखणी बाई पुर्ण पंचक्रोशीत नव्हती. तीचे ते पाणीदार डोळे, चाफ्यासारखे नाक, तिचे काळेशार केस, कमनीय बांदा, गुलाबाच्या पाकळीसारखे लाल ओठ. चापुन चोपुन नेसलेली साडी, तिची घायाळ करणारी नजर. हे पाखरू गावात नवीनच हाय जणू.
“ सांगताय ना” तिच्या दूसर्या प्रश्नाने तो भानावर आला.
त्याने ठरवले की आलेली संधी दवडायची नाही आणि तो म्हणाला “ म्या बी तिकडं चाल्लोय नव्ह चला की संगटच जाऊ”. तिच्या चेहर्यावर हलकेच स्मित ऊमटले व ती म्हणाली “ हो का, खूपच छान मला पण तुमची सोबत होईल.” असे म्हणून दोघेही सोबत चालू लागले.
दोघेही रस्त्यावर वेगवेगळ्या चाकोरीतुन चालत होते. दोघांमध्ये काही बोलने होत नव्हते पण अधून मधून त्यांची नजरानजर व्हायची तशी ती लाजेने मान खाली घालत असे. गोपाळच्या व्हणांचा आवाज त्याला आता अभिमानास्पद वाटत होता तो आणखीनच ऐटीत चालू लागला. थोडे अंतर चालल्यावर तिने पिशवी एका हातातून दुसर्या हातात घेतली आणि धापा टाकत चालू लागली. “द्या हिकडं ते,तुमचा हात अवघडला असल”गोपाळने गुगली टाकली.
तशी ती सावधपणे म्हणाली “ नको, कशाला ऊगीच तुम्हाला त्रास”
“अवं त्यात तरास कसला, बाईमाणसाला सवय नसती द्या हिकडं म्या घेतो.” अस म्हणत त्याने जवळ जवळ तिच्या हातातून पिशवी हिसकावून घेतली. पिशवी घेण्याच्या नादात तिच्या हाताला याचा हात लागला. तशी ती शहारली आणि गोपाळपण लाजून गेला. पिशवी तशी वजनाला जास्तच होती पण शायनींग मारायला जाऊन पिशवी काढून घेतली होती. आता नाईलाजाने ती ऊचलावीच लागणार होती.
चालता चालता नजरेला नजर वारंवार भीडत होती. शेवटी त्यानेच विषय काढला “ तुम्ही हिकड कुठ?, न्हाय म्हंजी एकटी बाई ह्या माळरानावर मनून ईचारलं” त्यावर ती खाली बघतच म्हणाली “ इकडे एका अंगणवाडीमध्ये माझी शिक्षिका म्हणून निवड झालीये, आणि कालच नियूक्तीचे पत्र आले ऊद्यापासून रूजु व्हायला सांगीतले, म्हणून लगबगीने निघाले” त्यावर गोपाळ म्हणाला “ बाई घाबरू नगा, मी हाय न्हव सोबत”.
“ ईश्श्य बाई काय?? माझ नाव सुशीला आहे” तिने याच्या काळजालाच हात घातला
त्याने हसुन खाली बघीतले आणि “ माझ नाव गोपाळ हाय हितच , हितच शिवनाकवाडीला माझी धा एकर बागायत शेती आहे”
“ हो का?? छान”
“एकलीच ह्रानार व्हय वाडीत?”
“आता पहायचं जाऊन काय सोय होते ते”
बोलन्यासाठी विषय नसल्याने गोपाळ थोडावेळ शांत झाला आणि काही विषय काढता यईल का याचा विचार करू लागला. सुर्य क्षितीजावर तरळत होता, मावळतीच्या लाल किरणांनी आभाळ कस चितारल्या सारख वाटू लागले होते. आता ती पण त्याला प्रतिसाद देऊ लागली होती. हळूहळू गोपाळ रस्त्याची चाकोरी सोडून मधून चालू लागला. त्याच्या पायाला कूसळे चिकटत होती पण त्याचा काहीही परिणाम त्याच्यावर होत नव्हता. खाचखळग्यातून चालताना एकमेकांना स्पर्श होऊ लागले. आता जास्तवेळ नजरेला नजर भिडू लागली. जोपर्यंत ती लाजेने मान खाली घालत नाही तोपर्यंत हापण मागे हटत नव्हता. मध्येच तीला ठेच लागली, तशी ती थोडी गडबडली मग यानेही तीला बाहूपाशात सावरले. तीचा तो स्पर्श त्याला भाराऊन गेला, “जरा वाईस बघून चाला की” अशी काळजी व्यक्त करून तो पुढे चालयला लागला. अकाशात ढगांची गर्दी झाली होती थंड गार बोचरा वारा अंगाला शिरशिरी देऊन जात होता. तिने अंगाभोवती पदर गुंडाळला होता. तोही आता अंग चोरुन चालत होता. पावसाचे थेंब येऊ लागले तसा त्यांनी चालन्याचा वेगही वाढवला, अजून चार मैलावर शिवनाकवाडी होती. एव्हाना मिट्ट अंधार पडला होता, पायाखालची जमीन दिसेनाशी झाली, पावसाने जोर धरला, ते दोघेही चिंब भिजलेले होते तरिही दोघे चालत राहिले. जोरदार पावसामुळे आता पाणी निचरु लागले. त्यांची वाट एका खळखळत्या ओढ्याने अडवली साधारणतः गुडघाभर पाणी असावे पन पाण्याला ओढ खूप. पाण्याच्या प्रवाहा मुळे पाय निसरू लागले तसा तिने गोपाळचा आधार घेतला ति त्याला बिलगलीच. सर्वांगातुन पाणी निचरत होते. गोपाळने तिच्या कम्बरेत हात घालून अक्षरशः तिला उचलून घेतले आणि तो तुडुंब भरलेला ओढा पार केला. ति पण त्याच्या मिठीत विसावली. कालपर्यंत कोणीही भाव न देणार्या गोपाळला आज जॅकपॉट्च लागला होता. दोन मैल पायपीट केल्यानंतर वस्तीवरचे लुकलुकते दिवे दिसू लागले. तशी गोपाळच्या मनाची घालमेल चालू झाली. वस्ती जवळ तशी ति पण आता सांभालुन चालू लागली. गावात पोहोचल्यानंतरही पावसाची रीपरीप चालूच होती.
“हे हीथनं म्होरं गेल कि पार्तमीक साळा हाय बघा”. गल्लीच्या तोंडापाशी ऊभा राहून गोपाळ पुढे बोट दाखवत म्हणाला.
तशी ती पुढे झाली गोपाळकडून पिशवी घेतली आणि चालू लागली.
गोपाळ तिच्या पाठमोर्या आकृती कडे आश्चर्याने पाहत ऊभाच होता. आतापर्यंत त्याने जिच्यासोबत लग्नाची स्वप्ने पाहिली, जिच्यासाठी एव्हढे कष्ट घेतले. ती अशीच काही न बोलता निघून चाललीये नव्हे गेलीच. ती दिसेनाशी झाली तसा गोपाळ भानावर आला. आभाळातून ढग फुटी झाल्याप्रमाणे पाणी गळत होते. आता त्याला परत आल्या पावली एकट्यालाच पाच सहा मैल तोच रस्ता, त्याच झाडापर्यत त्याला परत जायचे होते त्या झाडाखाली बसून तंबाखू खाताना त्याला घरापर्यंतचा रस्ता लांब वाटत होता. ही सोबत त्याला महागात पडली होती.
त्याने खाली पडलेली आपली पिशवी ऊचलली आणि खाली मान घालून चालू लागला.
Jamaliye ka katha
Jamaliye ka katha