* महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी,वात्रटिकाकार " विशाल मस्के "
यांची महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर गाजत असलेली
" भिमजयंती १२५ "निमित्त एक खास रचना
-------* भिमरायाचे अनुयायी *-------
कवी :- विशाल मस्के,सौताडा.
मो. 9730573783
फक्त घोषणा देणारे नाही
आत्मसात करणारे आहेत
वेळ प्रसंग लक्षात घेऊन
नसात वादळ भरणारे आहेत
इतिहासाला साक्ष ठेऊन
भविष्याचे आहेत निर्माणकर्ते
करताहेत हे कार्य असे
पाहूनी यांना छाती स्फूरते
कुठे नरम,कुठे गरम तर
कुठे सारेच भन्नाट आहेत
हवे तिथे होतात लीन अन्
हवे तिथे ते ऊर्माट आहेत
अन्यायाचा प्रतिकार अन्
दांभिकतेला हे तडे आहेत
वाघिणीचं दुध पिणारे हे
भिमरायाचे बछडे आहेत
शिक्षण चांगलं घेऊन हे
समाजात टिकणारे आहेत
अन्यायाच्या महासुरांना
कायद्याने ठोकणारे आहेत
महापुरूषांना डोक्यात घेऊन
मनसोक्त वाचणारे आहेत
डोक्यावरती घेऊन घेऊन
ऊत्साहात नाचणारे आहेत
घरात आहेत, दारात आहेत
गल्लीत आणि गावात आहेत
अहो भिमरायाचे हे अनुयायी
आता प्रगतिच्या तावात आहेत
या देशाची ते शान आहेत
नाहीत कुठल्याच जातीतले
राज्य घटणेने वागणारे आहेत
आहेत याच भारतीय मातीतले
* विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
--------------------
* कविता आवडल्यास नावासह शेअर करू शकता
* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
-------------------------
तडका राहिला काय?
तडका राहिला काय?
हा तडका नाही कविता आहे
हा तडका नाही कविता आहे