फॉल्लो करू ट्विटरपे, टॅग् करू फेसबूक पे, तेरे क्विझ मे गूग्गल को बीट कर दिया..
मिर्रर मे तू दिखता है, नींद मे तू टिकता है, तेरे मॅडनेस ने मुझे धीट कर दिया..
तू है सोडे की बॉटल, मे हू बंटा तेरा..
मै तो हॅन्डल करू,
हर तंटा तेरा..
मेरे दिल के मोबाईल का तू
अनलिमिटेड
प्लान हो गया...
मै तेरा हाय रे जबरा, होये रे जबरा, फॅन हो गया..
मै तेरा हाय रे जबरा, होये रे जबरा, फॅन हो गया..
तुझे देखते ही दिल मे ढॅनग टडॅनग हो गया..
मै तेरा....
.
.
नाही नाही... ही फॅन या शाहरूखच्या आगामी चित्रपटाची जाहीरात नाही. ती करायची गरजही नाही. त्या "फॅनची हवा" अगोदरच सगळीकडे झाली आहे. एवढेच नव्हे तर "चला हवा येऊ द्या" मध्येही लवकरच ही हवा बघायला मिळणार आहे.. तर हा धागा ना त्या पिक्चरवर आहे, ना या गाण्यावर आहे. ना हा शाहरूखवर लिहिलेला लेख आहे.. धाग्याचा विषय तोच आहे जो शीर्षकात लिहिला आहे. तुम्ही कोणाचे 'जबरा फॅन' आहात का.. असालच.. मग शेअर करा की राव..
पण मला हा धागा सुचायला मात्र फॅन चित्रपट आणि त्यातले वरचे गाणेच जबाबदार आहे. कसले जबरा गाणे आहे राव. उगाच नाही त्याला फॅन एंथम घोषित केलेय. जेव्हापासून ऐकलेय तेच ऐकतोय आणि तेच गातोय.. नव्हे त्याच्यावरच नाचतोय.. खुद्द शाहरूख देखील कसला जबरा नाचलाय त्यावर. ते पाहताना आणि हे गाणे ऐकताना आपण शाहरूखचे फॅन असल्याचा पुरेपूर फील येतोय. गेले काही दिवस मी तो घेतोय.
हेडफोन शक्यतो मी वापरत नाही पण हे गाणे ऐकण्यासाठी म्हणून मुद्दाम जवळ बाळगायला सुरुवात केलीय. ऐकताना अगदी ट्रेनमध्येही बसल्या जागी माझी मुंडी हलायला लागते. उठून सीटवर उभे राहत नाचत नाही हेच सहप्रवाश्यांचे नशीब. पण आज तर कहर झाला. रस्ता क्रॉस करताना काय कसा माहीत तोल सुटलाच. सिग्नलला लागलेल्या गाड्यांचा पुरता टाईमपास झाला असणार. मलाही हे तेव्हा समजले जेव्हा क्रॉस केल्यावर मागाहून येणार्या मित्राने मला गाठून विचारले, "काय रुनम्या ठिक आहेस ना.. कुठल्या डान्स कॉम्पिटीशनमध्ये भाग घेत आहेस का.. रोड क्रॉस करताना नाचतोयस काय.. आणि ते पण असा....."
आता हे असा म्हणजे कसा ते त्यालाच माहीत.. आपल्याला काय.. आपण तर शाहरूखचा जबरा फॅन आहे आणि हे सांगायला आपल्याला जराही लाज वाटत नाही.. तुम्हीही कोणाचे जबरा फॅन असाल तर न लाजता जरूर सांगा.. मला तर प्रतिसादांत अजून बरेच काही लिहायचे आहे पण तुर्तास मोबाईलवर असल्याने लेखनसीमा
बहुतेक तुला फिल्मी उत्तरं हवी
बहुतेक तुला फिल्मी उत्तरं हवी आहेत. तर घे-
हीरो - नं.१ (गो विं दा)
हीरोइन - कोई शक?? झिंटा...
सिंगर - शंकर महादेवन
मराठीत - अशोक सराफ
Follow करतो twitter वर tag
Follow करतो twitter वर
tag करतो facebook वर
तुझ्या quiz ने Google ला beat केलया
Mirror मध्ये दिसतोया इचारात असतोया
तुझ्या madness ने मला धीट केलया
गोटी सोडा तू कडक मी रे ठसका तुझा
सारखा सारखा मला येतोय झटका तुझा
माझ्या दिलाच्या mobile चा
तू unlimited Plan झालोया
मी रे तुझा हाय रे जबरा होय रे FAN झालोया
तुला पाहताच दिल हे dhant dan झालया (x3)
मी तुझ्यावर केली PHD माझ luck माझा हक तुझ्या मुले राजा
शपथ आईची तुला नाही माहिती होऊन गेलोया भारी मी पंखा तुझा
तुझ्या साठी हाय झालोय येडा पार हाय
खुला साऱ्या कॉलोनीत तुझ्या पायी आईच्यान झालो या
मी रे तुझा हाय रे जबरा होय रे FAN झालोया
तुला पाहताच दिल हे dhant dan झालया (x3)
Style तुझी लई झाक रे जीव झाला ढिंच्याक रे
फुल 2 मी WIFI Connection तुझा
डेंजरस बिथरलया डोस्क याच फिरलंया
कोण काय म्हणतो या परवा ना मला
तुझ्या साऱ्या अदा येती डिट्टो मला
ठेवला खिशामध्ये रोज जपला तुला
तुझ्या नादानी मी फार सेन्तीमेंतल ध्यान झालोया
मी तुझा.. बा तुझा… fan झालोया
मी रे तुझा हाय रे जबरा होय रे FAN झालोया
तुला पाहताच दिल हे dhant dan झालया (x3)
..............अवधूत गुप्ते ने गायलेलं हे गाणं पहा... मराठी वर्जन ... तरीही नाचाल... (आता वरिजनल त्ये वरिगनल अस काही बाही बोलू नका )
तुम्ही कोणाचे "जबरा फॅन" आहात
तुम्ही कोणाचे "जबरा फॅन" आहात का
फालतू के शौक हम रखते नही
हा धाग अजास्त धावतोय म्हणून
हा धाग अजास्त धावतोय म्हणून इथे आधी विचारते मग योग्य जागी विचारेन.
आज ११ अप्रिल कुणा कवीचा जन्मदिवस किंवा पुण्यतिथि आहे का?
आणि हा प्रश्न कुठे विचारु ते ही सांगा.
सस्मित गूगलभाऊंना विचारा की..
सस्मित गूगलभाऊंना विचारा की..
किरणकुमार, दुनियादारी
किरणकुमार, दुनियादारी
मयुरी, ऐकलेय गुप्तेना..
मयुरी,
ऐकलेय गुप्तेना.. भोजपुरी तामिळ अरबी वगैरे दहा बारा भाषांत ऐकून झालेय.. यू ट्यूबवर बघा.. पुर्ण अल्बममध्ये एकच गाणे कैक भाषांत आहे.. पण चित्रपटात मूळ हिण्दी गाणेही नाही.. किंबहुना एकही गाणे नाही .. इट्स अल्टीमल्टी एक्सायटींगली थ्रिलर शाहरूखपट
महात्मा ज्योतिबा फुले यांची
महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आज. सस्मित .
ओह्ह... ऋन्मेऽऽष गुजराती, भोजपुरी बघितलेलं ... बाकींची कल्पना नाही.
गुगलला विचारायचा प्रयत्न करुन
गुगलला विचारायचा प्रयत्न करुन झाला पण नीट विचारता येइना आणि त्यला नीट सांगता येइना.
महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे.>>>> ओके. धन्य्वाद मयुरी.
काही दिवसांपुर्वी फ्रिवेवर
काही दिवसांपुर्वी फ्रिवेवर (डाउन टाउन सॅन हुसे) एक मरसेडीज बघितली, नंबर प्लेट होती "BIGBFAN"
गाडीवाल्या/ली ला बघायची खुप इच्छा होती पण जमल नाही.
बिगबी चा फॅन मॅच्युअर्ड असावा अस वाटत होत. पण मॅच्युअर्ड असेल तर अशी पर्सन्लाईज्ड नंबर प्लेट बनवण्याचा थिल्लरपणा करणार नाही आणि थिल्लर असेल असेल तर बिग्बीचा फॅन असणार नाही.. अस वाटल होत.
जबरा फॅन म्हणजे मूवीत
जबरा फॅन म्हणजे मूवीत दाखवल्याप्रमाणे वेडेपणा नाही केला.
एकंदर घरात अभ्यास आणि खेळ हेच तरूणांचे जीवन आणि त्यातील खेळात ज्यास्त असल्याने, खूप मूवी असे पाहिले नाहीत.
पण सुरुवातीला एकदम जराशीच नुकतीच अक्कल फुटत असताना म्हणजेच शाळेत असताना,आधी आमीर खान( कयामत से कयामत दोनदा पाहिला).
मग सलमानचा मैने प्यार किया पाहिला तेव्हा सलमान आवडला.
पण क्रेझी गोष्टी कधीच केल्या नाहित. की फोटो कापून बाळगणे, पोस्टर लावणे. फक्त मैने प्यार किया पाहिला तेव्हा एकच सलमानचा फोटो विकत घेतला.
मग घाबरून( आईला) तो लपवला व विसरले.
खेळामध्ये, स्टेफी ग्राफ ( हो आम्ही असेच म्हणायचो) चा एक मोठं पोस्टर लावलेलं.( खेळाडूंचे पोस्टर चालत घरी). बोरिस ब्रेकर, आंद्रे आगासी सुद्धा आवडत. पण त्यांचे फोटो काही जमा केले नाहित.
मग बँडमिंटन खेळायला( शाळेतून सिटी स्पर्धेत गेले तेव्हा) प्रकाश पडूकोण ह्यांना पाहिले होते, ते जज होते.) खूपच आवडलेले. पण पुन्हा फोटो वगैरे जमा नाहि केले.
एकंदरीत माझ्या आळशीपणामुळे की " त्यात काय इतकं जमा करायचे?" विचारांमुळे जबरा फॅन कधीच कोणाची नाही/न्ह:फिदी:
खरेतर मीच माझी जबरा फॅन असल्यामुळे असेल हे.
अदिती, फॅनच्या थिल्लरपणाचे
अदिती, फॅनच्या थिल्लरपणाचे कन्सेप्ट व्याख्या निकष वेगळे असू शकतात. शेवटी वेडच आहे ते एक..
पर्सन्लाईज्ड नंबर प्लेट
पर्सन्लाईज्ड नंबर प्लेट बनवण्याचा थिल्लरपणा करणार नाही आणि थिल्लर असेल असेल तर बिग्बीचा फॅन असणार नाही..>>> प्रत्येकाची थिल्लरपणाची व्य्ख्या वेगळी असते.
बरं. मी शाखा फॅन होते. मी नववीत असताना डीडीएलजे आलेला. तेव्हा मी जबरा(?) फॅन झाले होते त्याची. ५० पैसेवाले कितीतरी पोस्ट्कार्ड साइज फोटो होते माझ्याकडे. अक्षरशः टीनेज प्रेम होतं माझं त्याच्यावर. माय फर्स्ट क्रश. आता ह्याला जबरा म्हणावं की काय ते माहित नाही.
तसंच सचिन तेंडुलकर ची ही फॅन होते मी. त्याचेही बरेच फोटो जमवलेले. पण शाखा एवढे नाहीत.
आता शाखा आवडतो पण एखाद्या वेड्या वयातल्या एक्स क्रश बद्दलच्या फिलिंगएवढंच.
आणी सचिन वर प्रेमाबरोबर आदरही वाढला.
ऋन्मेऽऽष , क्रश आणि जबरा फॅन
ऋन्मेऽऽष , क्रश आणि जबरा फॅन यातला फरक सान्गशिल काय? बाकी मागे कुणी म्हट्ल्या प्रमाणे 'धाग्यावेताळ' नाव सार्थ आहे.
टीव्हीवर शाखाचा दिलवाले
टीव्हीवर शाखाचा दिलवाले पाहिला आणि का तीन तास वाया घालवले असे झाले. त्यापेक्षा अजयचा दिलवाले कितीतरी सुसह्य. अगदी सुनील शेट्टीही खपून जातो. आमीर, सलमान वयानुसार योग्य सिनेमे निवडताहेत, पण शाखा मात्र स्वतःच्या प्रेमातून बाहेर पडायलाच तयार नाही. शाखाचा एकेकाळी मीही फॅन होतो. डीडीएलजे, स्वदेस, परदेस, चक दे हे सिनेमे आवडलेले. पण आता ती मजा नाही.
डीडीएलजे, स्वदेस, परदेस, चक
डीडीएलजे, स्वदेस, परदेस, चक दे हे सिनेमे आवडलेले. पण आता ती मजा नाही.> +१
मी शाहरूखचा फॅन आहे पण
मी शाहरूखचा फॅन आहे पण शाहरूखचे बंडल चित्रपट मी कधीच बघत नाही. रावण वेळ जात नव्हता म्हणून बघितला. जब तक है जान जेमतेम अर्धा तास बघितला. दिलवालेचे नुसते रंग दे तू मोहे गेरुवा गाणे ऐकले. हॅपी न्यू ईयरच्या जवळपासही नाही फिरकलो. चेन्नई एक्सप्रेस तेवढा वन टाईम टाईमपास असल्याने थिएटरात गेलो. त्याने पैसेही वसूल केले. येस्स, प्रामाणिकपणे सांगायचे तर गेले चार पाच वर्ष शाहरूखने जी काही एंजॉयमेंट दिली आहे ती फक्त छोट्या पडद्यावरच. फिल्मफेअरच्या स्टेजवर आणि आयपीएलच्या मैदानावर. पण हे आगामी फॅन आणि रईस फार विलक्षण रसायन दिसत आहेत. मै तेरा जबरा फॅन हो गया या गाण्याचाही मी फॅन झालो आहे. लेटस सी पिक्चर चांगला निघतो की बस्स प्रोमोजच चकाचक बनवलेत.
बाकी शाहरूखचा फॅन म्हणून एक मनापासून इच्छा आहे की त्याचा पिक्चर चांगला असेल तरच चालावा. त्याच्या टीकाकारांनी करून दिलेल्या निगेटीव्ह पब्लिसिटीच्या जोरावर त्याचा फालतू सिनेमाही कमावतो तसे होऊ नये.
ऋन्मेऽऽष , क्रश आणि जबरा फॅन
ऋन्मेऽऽष , क्रश आणि जबरा फॅन यातला फरक सान्गशिल काय?
>>>>>>>>
मी शाहरूखचा फॅन आहे पण तो माझा क्रश नाही.
आता तुम्हीच फरक ओळखा
बाकी मागे कुणी म्हट्ल्या प्रमाणे 'धाग्यावेताळ' नाव सार्थ आहे.
>>>>
जर या विधानाचा बेस पहिले वाक्य असेल तर ते मी खालिज केले आहे
लि नाही री
लि नाही री
कपोचे
कपोचे
ख्ाारीज
ख्ाारीज
One and only SHAHRUKH KHAN.
One and only SHAHRUKH KHAN.
खारीज डोण्ट वरीज, आता हा
खारीज
डोण्ट वरीज, आता हा शब्द आयुष्यभर लक्षात राहील
दोन जणांनी पूर्ण लांबीची गाणी
दोन जणांनी पूर्ण लांबीची गाणी लिहीली आहेत. मायबोलीच्या कॉपीराईट नियमांत बसतं का?
ईंटरेस्टींग. हे असेही असते
ईंटरेस्टींग. हे असेही असते का. बाकी शाहरूख यावर आक्षेप घेणार नाही याची ग्यारंटी मी घेतो. आणि घेतलाच त्याने आक्षेप तर हा त्याचा जबरा फॅन त्याचा आजवरचा सर्वात मोठा दुश्मन बनेल याची खात्री बाळगा !
शाखा ने गाणी लिहायला बंदी
शाखा ने गाणी लिहायला बंदी केल्याने चिडून त्याच्या घरासमोर उभा राहून ऋन्मेष हे बोलत आहे असे डोळ्यासमोर आले
https://www.youtube.com/watch?v=6lcVDiHUa3A&t=2h24m15s
सध्या माझ्या मोबाईलवर यू
सध्या माझ्या मोबाईलवर यू ट्यूब उघडत नाहीये.. कोणीतरी सांगा रे काय आहे हे
फा >> सध्या माझ्या मोबाईलवर
फा >>
सध्या माझ्या मोबाईलवर यू ट्यूब उघडत नाहीये.. कोणीतरी सांगा रे काय आहे हे >> कचरा अडकला असेल. यु फुंक !
फा >> सध्या माझ्या मोबाईलवर
फा >>
सध्या माझ्या मोबाईलवर यू ट्यूब उघडत नाहीये.. कोणीतरी सांगा रे काय आहे हे >> कचरा अडकला असेल. यु फुंक !
harry potter fame Daniel
harry potter fame Daniel Radcliffe न् हो तुझीपन पंखा आहे मी...
Pages