तुम्ही कोणाचे "जबरा फॅन" आहात का :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 April, 2016 - 16:37

फॉल्लो करू ट्विटरपे, टॅग् करू फेसबूक पे, तेरे क्विझ मे गूग्गल को बीट कर दिया..
मिर्रर मे तू दिखता है, नींद मे तू टिकता है, तेरे मॅडनेस ने मुझे धीट कर दिया..

तू है सोडे की बॉटल, मे हू बंटा तेरा..
मै तो हॅन्डल करू,
हर तंटा तेरा..
मेरे दिल के मोबाईल का तू
अनलिमिटेड
प्लान हो गया...

मै तेरा हाय रे जबरा, होये रे जबरा, फॅन हो गया..
मै तेरा हाय रे जबरा, होये रे जबरा, फॅन हो गया..

तुझे देखते ही दिल मे ढॅनग टडॅनग हो गया..
मै तेरा....
.
.

नाही नाही... ही फॅन या शाहरूखच्या आगामी चित्रपटाची जाहीरात नाही. ती करायची गरजही नाही. त्या "फॅनची हवा" अगोदरच सगळीकडे झाली आहे. एवढेच नव्हे तर "चला हवा येऊ द्या" मध्येही लवकरच ही हवा बघायला मिळणार आहे.. तर हा धागा ना त्या पिक्चरवर आहे, ना या गाण्यावर आहे. ना हा शाहरूखवर लिहिलेला लेख आहे.. धाग्याचा विषय तोच आहे जो शीर्षकात लिहिला आहे. तुम्ही कोणाचे 'जबरा फॅन' आहात का.. असालच.. मग शेअर करा की राव..

पण मला हा धागा सुचायला मात्र फॅन चित्रपट आणि त्यातले वरचे गाणेच जबाबदार आहे. कसले जबरा गाणे आहे राव. उगाच नाही त्याला फॅन एंथम घोषित केलेय. जेव्हापासून ऐकलेय तेच ऐकतोय आणि तेच गातोय.. नव्हे त्याच्यावरच नाचतोय.. खुद्द शाहरूख देखील कसला जबरा नाचलाय त्यावर. ते पाहताना आणि हे गाणे ऐकताना आपण शाहरूखचे फॅन असल्याचा पुरेपूर फील येतोय. गेले काही दिवस मी तो घेतोय.

हेडफोन शक्यतो मी वापरत नाही पण हे गाणे ऐकण्यासाठी म्हणून मुद्दाम जवळ बाळगायला सुरुवात केलीय. ऐकताना अगदी ट्रेनमध्येही बसल्या जागी माझी मुंडी हलायला लागते. उठून सीटवर उभे राहत नाचत नाही हेच सहप्रवाश्यांचे नशीब. पण आज तर कहर झाला. रस्ता क्रॉस करताना काय कसा माहीत तोल सुटलाच. सिग्नलला लागलेल्या गाड्यांचा पुरता टाईमपास झाला असणार. मलाही हे तेव्हा समजले जेव्हा क्रॉस केल्यावर मागाहून येणार्या मित्राने मला गाठून विचारले, "काय रुनम्या ठिक आहेस ना.. कुठल्या डान्स कॉम्पिटीशनमध्ये भाग घेत आहेस का.. रोड क्रॉस करताना नाचतोयस काय.. आणि ते पण असा....."

आता हे असा म्हणजे कसा ते त्यालाच माहीत.. आपल्याला काय.. आपण तर शाहरूखचा जबरा फॅन आहे आणि हे सांगायला आपल्याला जराही लाज वाटत नाही.. तुम्हीही कोणाचे जबरा फॅन असाल तर न लाजता जरूर सांगा.. मला तर प्रतिसादांत अजून बरेच काही लिहायचे आहे पण तुर्तास मोबाईलवर असल्याने लेखनसीमा Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला शाखा च्या फॅन पेक्षा एक 'रईस' म्हणून जाहिरात येत होती ती जास्त इंटरेस्टिंग वाटत होती. तो कधी येत आहे माहीत आहे का?

ऋन्मेष - बाय द वे तो एक 'फ्रेण्ड्स' नावाचा मराठी चित्रपट पाहा. तुला बहुधा स्वजो च्या प्रत्येक सीन करता एक धागा काढावासा वाटेल Happy

अखिल भारतीय बलात्कारपटू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. रणजीत यांचा मी जबरा फॅन आहे. संघटनेचे महासचिव असलेले शक्तीकपूर, गुलशन ग्रोव्हर यांच्याबद्दलही नितांत आदर आहे. पण अध्यक्ष ते अध्यक्षच !

याचबरोबर पाटीलसाहब हमेशा कहा करते थे वाल्या लायन उर्फ अजित यांचाही मी पंखा आहे.

एक भिवई वर करून अदमास घेणारे के एन सिंग यांचाही जबरा फॅन आहे.

आपल्या मर्यादेत कमीनापण करणा-या पण कमीनेपणाचे इरादे बुलंद असलेल्या प्रेमचोप्रा साहेबांचा पण मी पंखा आहे.

एकेक अशी महान रत्नं आपल्याला सिनेसृष्टीने दिलीत. हे नसते तर नायकाला महान कुणी केलं असतं ? आपल्याकडे वाईटपण घ्यावं आणि चांगलं ते दुस-यावर लुटावं हा गुण आपणास वरील विभूतींकडून शिकावयास मिळतो.

मराठीमधे रणजीत यांना तोडीस तोड राजशेखर यांना मान द्यावा लागेल.

माझं जरा अधिक 'हास्यास्पद' आहे. दामुअण्णा मालवणकर, लॉरेल अँड हार्डी, जॉनी वॉकर, मेहमूद ... आणि सध्यां भाऊ कदम !!

भाऊ, भाऊ कदम आपला पण सध्या फेवरिट. "हवा" मधे तो नुसता आला तरी हसू येते. मात्र त्याला स्त्रियांचे रोल दिलेले आवडत नाहीत.

सिनेमे खुप कमी बघत असल्यामुळे सिनेसृष्टीत कोणाचीच पंखा नाही पण पत्रकार दिलिप मंडलची पंखा आहे.
ndtv न्युज वरिल रविश कुमारची पण पंखा आहे.

जबरा फॅन म्हणले तर फ़क्त आमचे गुरु परमपुज्य १२००१ ब्रिटिश स्पेशल एयरबोर्न सर्विसेजचे मुकुटमणी अन विलक्षण सकारात्मक उर्जेने पुर्ण अश्या श्री. एडवर्ड माइकल्स "बेयर" ग्रिल्स भगवान ह्यांचा मी फॅन आहे! वाटेत येईल ते कापून खाऊ हा बाणा अन सर्वात भयानक परिस्थिती मधुन दिव्य प्रकारे बाहेर पड़ताना सुद्धा आमचे गुर्जी कायम हसतमुख असतात ह्याचे विशेष कौतिक वाटते! आयुष्यात एकदा तरी गुर्जीना भेटायची आत्यंतिक आस आहे आम्हाला तर. Happy

आपलं असं कै पक्क नै ब्वा. म्हणजे शिकत असतांना मैने प्यार किया चित्रपट पाहिला. अन ती भाग्यश्री आवडायला लागली. पुढे दिल मधील माधुरी दिक्षीत आवडायला लागली. पुढे वयोमानाप्रमाने काहीही आवडायला लागलं. एक अशी आवड नै राहीली. आत्ता सकाळपासून विनाकारण शषीकपूर आणि शबाना आझमीचं हे गाणं पाहतोय. दोघेही गाण्यात पाहतांना उगाच भारी वगैरे वाटतं आहे.

(टीप : गाणं फक्त प्रौढांसाठी आहे, लहान मुलांनी लिंकवर क्लिक करु नये असे वाटतं. ) Happy

धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

खेळ- साबा करीम
गाणे- शब्बीर कुमार, मो. अजीज
अभिनय- कमल सदाना, चाैधरी(नाव विसरलो), पैलवान चोप्रा इ.इ.
बाकीचं जसं आठवेल तसं लिहीन......

मी ज्याचा जबरा फॅन आहे त्याबद्दल :
ओम भगभुगे भग्नी भागोदरी ओम फट स्वाहा
सिंगिंग, अ‍ॅक्टिंग सबकुछ करेगा अपना तारीक शहा !

पण सध्या 'फॅन' वर बंदि घालायची मागणी
राखी सावंत नामक महान अभिनेत्रीने केली आहे ना.

जबरी स्त्रीलिंग
जबरा पुल्लिंग

फॅनवर राखीची बंदी.. आता हा काय नवीन स्टंट

फारेण्ड रईसला वेळ आहे. मागे कुठेतरी वाचलेले की रईस ईदला रीलीज करायचा आहे तर सलमानचा सुलतान आपली ईद त्याला देणार का.. तर तेव्हा किंवा दिवाळीत येईलच.. ईंटरेस्टींग आहे खरे तो सुद्धा.. बनिये का दिमाग और मियाभाईकी डेअरींग.. समोरून नवाझुद्दीन सिद्दीकीलाही तगडा रोल असेल तर दोघांची जुगलबंदी बघायला मजा येईल.

फॅन कधीच कोणाचा/ची नाही.बरेचजण/णी तेवढ्यापुरते आवडले होते/त्या,इतकेच.

मला खूप नट नट्या आवडत असतानाही मी कोणाचीही अशीजबरी फॅन बनु शकले नाही याचे मला कायम वैषम्य वाटत आलेय.

हेडसेट म्हणजे?

मला खूप नट नट्या आवडत असतानाही मी कोणाचीही अशी जबरी फॅन बनु शकले नाही याचे मला कायम वैषम्य वाटत आलेय.
>>>>>>>>>>>>
साधनाजी वैषम्य वाटून घेऊ नका. जबरा फॅन हे प्रकरण फार च कमी आढळते.
किंबहुना कोणाचे तरी फॅन असणे हे देखील सर्वांच्या नशिबी असतेच असे नाही.
अश्या लोकांना मग जबरा फॅन लोकांची मानसिकता समजणे कठीण जाते. कोण एखाद्याचा ईतका कसा फॅन बनू शकतो हे पचनीच पडत नाही. यावरच फॅन चित्रपटात प्रोमोमध्ये डायलॉग आहे.

अन्नू
हम हमारैच फ्यान हय!
>>>>>>
सेम पिंच
मेरा तो मानना है जो इन्सान खुदसे प्यार नही करता वो किसी और से प्यार कर ही नही सकता. अगर तुम्हे किसी का तहे दिल से फॅन होना है तो तुम्हे पहले खुदका फॅन होना जरूरी है. उसके बाद ही वो भरोसा आता है के मै जिसका फॅन हू वो कोई मामुली इन्सान हो ही नही सकता Happy

पहिले नाव शाहरु़ख खानचेच!
फक्त आजकाल त्याचे मूव्हीज जरा घसरत चालले आहेत...त्यामुळे रीपीट रन ओफ स्वदेस, वीर झारा वगैरे चालू आहे...:)

वॉव.. खरेच जबरा..
शाहरूख हे नाव एक ब्रांड आहे माहीत होते पण त्याच्या गाण्याचे बोलही ब्रांड आहेत Happy

माऊ, हो खरेय ते.. पण त्याचे जुने पिक्चर बघण्यातही एक मजा असते.. मागच्याच आठवड्यात मी रात्री 1 ते 5 स्वदेश पाहिला..

बाकी फॅन आणि रईस हे दोघे किंवा दोघांपैकी एक तरी हा दुष्काळ नक्की संपवेल. चित्रपटही चांगला निघेल आणि आपला हक्काचा फिल्लमफेअर एवॉर्ड सुद्धा तो घेऊन जाईल Happy

खरय ऋन्मेऽऽष !
रईस ची वाट बघुया आता!
बाकी मी मराठी चित्रपटांची, पुस्तकांची आणि मायबोलीचीही जबरा फॅन आहे...:)

काही ईतर क्षेत्रातील -

बॉलीवूड हिरोईन - आवडत्या बरेच आहेत. प्रियांका चोप्रा, दिपिका पदुकोन आणि कतरीना कैफ या टॉप तीन. पण फॅन म्हणता येणार नाही.

मराठी हिरो - स्वप्निल जोशी. हो याचा फॅन आहे. पण अप्रत्यक्ष फॅन म्हणू शकतो. कारण शाहरूखचा फॅन आहे म्हणून याचा फॅन आहे. हा मला मराठीतील शाहरूख वाटतो Happy

मराठी हिरॉईन - सई ताम्हाणकर. अर्थातच. दुसरी कुठली मराठी हिरोईन दूर दूर पर्यण्त नाही. Happy

सिंगर - सोनू निगम आणि आतिफ अस्लम.. दोघांचा ईक्वली

क्रिकेट - सौरव गांगुली उर्फ दादा. दुसरे कुठलेही नाव ही जागा घेऊ शकत नाही. खुद्द सचिनही नाही. त्याची जागा देव्हार्यात सेपरेट आहे.

ईतर क्रिडाप्रकार - सानिया मिर्झा. एकेकाळी होतो. हिच्या खेळापासून स्टाईलचा आणि ईतरही कैक गोष्टींचा.

राजकारण - बाळासाहेब ठाकरे. बाकी राजकारण गेले चुलीत. पण भाषण ठोकावे तर बाळासाहेबांनीच.

Pages