Submitted by घायल on 21 March, 2016 - 01:02
मी पाहिली आहे सोसेनाशी (सोशल मीडियावर)
एका कवीची भीषण उपेक्षा
कवयित्रीला रिप्लाय लाडीक
कवीला नसते खारीक बारीक
अघोरी गप्पा मैलामंडळाच्या
कवयित्रीच्या कवितांवर चाली
यमक जुळवा, अथवा तुडवा
कच्छचे रण कवीच्या भाळी
दु:खात भर आणि तेव्हां पडते
जेव्हां कवयित्री सुंदर असते
गद्य जरी लिहीले तिने
ते महान एक काव्य ठरते
मी कवी एक फाटका तुटका
झोळी घेऊन उन्हात फिरतो
सावलीतले प्रतिसाद लाडे
घामात निथळत वाचत बसतो
कवी दिनाचे निमित्ताने तुमची
गचांडी धरतो रिप्लायसाठी
विनोद समजून सोडून द्यावा
टाळी द्या एक कवितेसाठी
कवी - उद्ध्वस्त कपोचे
सर्व कवी/यित्रींना आजच्या जागतिक कवी दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
आज रस्त्यात दिसेल त्याला अडवून कविता ऐकवू शकता. आज कवी/यत्री दिसल्यास रस्ता बदलू नये ही सर्व सहीष्णू वाचकांना नम्र विनंती.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घ्या टाळी!
घ्या टाळी!
छान ! घ्या टाळी!
छान !

घ्या टाळी!
छान.... आमचे दु:ख तुम्ही
आमचे दु:ख तुम्ही नेमकेपणाने मांडलेत.....
त्यामुळेच गेल्या पंचवीस वर्षात मी नव्याने कविता केल्या नाहीत.
(आता कुणीतरि येईल अन म्हणेल, बरे झाले लिंब्या गद्य खरडतो तेच इतके बोअर होते, पद्य लिहित असता तर काय झाले असते?
छान!
छान!
घ्या टाळी
(No subject)
अगदी वास्तव मांडले आहे.
अगदी वास्तव मांडले आहे.
ज्या दिवशी कविता पोस्टली
ज्या दिवशी कविता पोस्टली त्याच दिवशी सा SSS त प्रतिसाद, ते ही सोमवार असताना... ही सारी जागतिक कविता दिवसाची किमया !
आभारी आहे सर्वांचा.