सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक
सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक
सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर
सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .
सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .
सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .
सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .
सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!
सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .
सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!
सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस
सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड
सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड
सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात
सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक
सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम
सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!
सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक
सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस
सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस
सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद
सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!
चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. आता मोठी परीक्षा द्यायची आहे- सिंहगड! पण लगेच सिंहगडावर जायची हिंमत झाली नाही. त्याच्या आधी आणखी सराव केला. इतर राईडस सुरू राहिल्या. एनएच ४ वर काही राईडस केल्या. कात्रज बोगद्यामध्ये सायकल चालवली. बोगद्यातले लाईट बंद असल्यामुळे जवळजवळ अंधारात सायकल चालवण्याचा अप्रतिम अनुभव! सिंहगड पायथा- डोणजेपर्यंत जाऊन आलो. इतका वेग वाटत नाहीय, त्यामुळे अशा राईडस सतत सुरू ठेवायला हव्यात.
१६ मार्च २०१५! आज सिंहगडाची परीक्षा द्यायची आहे. पूर्वीपेक्षा स्टॅमिना खूप वाढलेला आहे. नक्की किती हे आज कळेल. राईड सुरू केली. सिंहगडाच्या पायथ्याशी नाश्ता केला आणि पुढे निघालो. काहीच अडचण न येता आरामात घाटात सायकल सुरू केली. अगदी आरामात- एफर्टलेस पुढे जातोय. चढाच्या तुलनेत वेगही चांगला मिळतोय. रस्ता हळु हळु वर चढतोय आणि जमीन खाली दूर जाताना दिसते आहे. जिथे चढ जास्त तीव्र आहे, तिथे खूप डावीकडे वळून किंवा राँग साईडने जातोय ज्यामुळे ग्रेडिएंट कमी होतो. मागे वळून बघितल्यावर खडकवासलाचं पाणी आणि पुण्याच्या बिल्डिंग दिसत आहेत. बघता बघता चाळीस मिनिटात चार किलोमीटर पूर्ण झाले! आता दोन किलोमीटर हलका उतार मिळेल जो पाच मिनिटात पार होईल.
अद्भुत नजारे! आत्तापर्यंत ज्याची वाट बघत होतो तो सिंहगड जवळ येतोय! आता शेवटचे साडेतीन किलोमीटर राहिले आहेत आणि घाट चढायला सुरू करून फक्त पन्नास मिनिटे झाली आहेत! कदाचित मी दिड तासांच्या आतच पोहचू शकेन! हे लक्षात आलं तेव्हा अजून उत्साह वाढला. ह्या शेवटच्या टप्प्यावर चढ थोडा जास्त तीव्र आहे. शिवाय इतका वेळ घाट चढत असल्यामुळे हळु हळु थकवा वाटतोय. स्पीड कमी होते आहे. वारंवार थांबावं लागतंय. पण सायकल चालवण्यात अडचण काहीच नाहीय. फक्त वेग जरा कमी झालाय.
शेवटी जरा जास्त थांबावं लागलं, पण सायकल चालवतच वर पोहचलो! आणि वेळ बघितला तर फक्त सव्वा तास! दोन्ही गोष्टी अतिशय अविश्वसनीय वाटत आहेत! चहा घेतला, वरून दिसणा-या नजा-यांचा आस्वाद घेतला- त्तोरणा आणि दूरवर राजगड! आणि परत सायकल सुरू केली. आता उताराचं थोडं टेन्शन आहे. ह्या राईडमध्ये पहिल्यांदा चढाच्या ऐवजी उताराचं टेन्शन आलं! खरोखर ही राईड माझ्यासाठी माईलस्टोन ठरेल.
सिंहगडाचा क्लाइंब
लदाख़मध्ये सायकल चालवण्यासाठी सिंहगड दिड तासात पार करणं ही पात्रता मानले जाते. म्हणजेच आता मी लदाख़मध्ये सायकल चालवायला पात्र झालो! मी क्वालिफाय झालो! पण आता अजून पुढचा टप्पा गाठायला हवा! शिखरावर पाय ठेवणं सोपं आहे, पण तिथे टिकणं अतिशय कठिण! पूर्वी जेव्हा एकदा गोरखगडाचा ट्रेक केला होता, तेव्हा कसबसं शिखरावर पोहचलो होतो. तिथे सचिन व द्रविडची आठवण आली- शिखरावर दोन मिनिट उभं राहणं इतकं अवघड असताना हे दोघं वर्षानुवर्षे शिखरावर कसे काय राहू शकतात!!
पुढील भाग २३: नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. .
अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग
ग्रेट मॅन.... पहिल्याच
ग्रेट मॅन.... पहिल्याच प्रयत्नात सिंहगड सायकलवरुन चढलात...... हॅट्स ऑफ टू यू.
फोटो छान आलेत.
ग्रेट !!! कुठल्या शब्दांत
ग्रेट !!!
कुठल्या शब्दांत अभिनंदन करू समजत नाही ! जबरदस्त कामगिरी
आता उताराचं थोडं टेन्शन आहे. ह्या राईडमध्ये पहिल्यांदा चढाच्या ऐवजी उताराचं टेन्शन आलं! >>> वाचतानाच यांना पुन्हा खाली यायचं आहे हे विचार मनात आले होते.
कापोचेदादा, तुमची पुर्वीची
कापोचेदादा, तुमची पुर्वीची आयडी कोणती हो? असेच विचारले हं.
तर मुद्दा असा की उताराचीही भिती बसु शकते, अन एकदा भिती बसली की अक्षरषः हात पाय लटपटु लागतात. मी घेतला आहे तसा अनुभव, अगदी चारचाकिमधे, दुचाकीवर अन सायकलवरही.
मार्गी तर मुळात तशा सपाट प्रदेशातुन आलेले. नजरही सरावलेली नसते. तरी मॅनेज केले त्यांनी. म्हणूनच कौतुक.
याच सिंहगड घाटाचि माझी आठवण आहे, आधी कुठेतरी लिहीली आहे, तर कोंढणपुरहून बजाज कब स्कुटरने येत होतो. व सिंहगड घाटाच्या मध्यातुन उतरुन वारज्यात गेलेलो. मी एका गाडीवर, लिंबी दु सर्या. लिंबी गेली सटासटा पुढे निघुन. माज्।ई वाट लागली. कारण शब्दशः ब्रेकवर उभे राहिलो तरी ब्रेक लागत नव्हता. पुढची लिव्हर तर जामच होती. कशीबशी पहिल्या गिअर मधे कंट्रोल करीत, पाय घासित, चालवली. लिंबोटल्याला सुचना होती, केव्हाही उडी मारुन उतरुन जायच्या तयारीतच बस.
असेच दोन उतार आहेत, धोकादायक, अगदी फोरव्हिलरमधुनही धास्ती बसावी असे, एक औंधच्या यमाई मंदिरापासुन निघाल्यावर लगेच उ तार सुरु होतो, व पुढे हेअरपीन वळण आहे, तो उतार, दुसरा पाबे घाटाने विंझरकडून सिंहगडाकडे येतानाचा सरळसोट उतार, एकदम डेंजर. इतरत्रही असतील, मला माहित नाहित.
पूर्वीचा आयडी ? Admin /
पूर्वीचा आयडी ? Admin / Webmaster
विपूत हिण्ट देण्यात येईल.
अवांतराबद्दल क्षमा असावी.
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद काका आणि कापोचे जी! हा सिंहगड पूर्ण सायकलवर चालवत जाण्याच्या तिसरा प्रयत्न होता व सराव वाढवत नेल्याने जमला! येताना एक- दोन वेळेस थोडं पायी उतरलो, बाकी सावकाश व काळजीपूर्वक उतरलो. उतरताना थांबत थांबत दोन्ही ब्रेक्स ना ब्रेक देत राहिलो!
मस्त रे मार्गी ..... फोटो पण
मस्त रे मार्गी ..... फोटो पण झ्याक अभिनंदन
रोमांचकारी अनुभव. मार्गाजी.
रोमांचकारी अनुभव. मार्गाजी. मी सायकल प्रेमी असल्याने श्रश्रीनर लेह चे धाडस कराण्या साठी वाचकांना प्रेरणा मिळते हे खात्रीने सांगु क्शकतो.