हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
आणि काही सेकंदांनीच गजानन
आणि काही सेकंदांनीच गजानन यांनी प्रथम सोडवले आहे.
बिंगो गजानन!
१०३ मराठी अ क क म अ प व व फ
१०३
मराठी
अ क क म अ
प व व फ
तिघांची टक्कर झाली. माझे
तिघांची टक्कर झाली.
माझे पहिल्या ओळीतले शब्द मागे पुढे झाले होते, ते लक्षात आलावर ठीक केले.
१०३ साठी हवी असेल तर ही हिंट घ्यावी:
मराठी संगीत विश्वातील गाजलेल्या पर्वातले हे गाणे आहे.
धुंदीत गाऊ मस्तीत राहू
धुंदीत गाऊ मस्तीत राहू >>>>>>..सगळ्यांच आवडतं गाणं दिसतय.
एकमेकांना मदत सुद्धा करता
एकमेकांना मदत सुद्धा करता येईल इथे.
मराठी संगीत विश्वातील गाजलेले पर्व कुठले?
दादा कोंडके?
दादा कोंडके?
गदिमा/सुधीर फडके/ यशवंत देव
गदिमा/सुधीर फडके/ यशवंत देव
और खोदो और खोदो. दादा कोंडके
और खोदो और खोदो.
दादा कोंडके नाही.
फ ने साथ दिली पाहुनी वेली
फ ने साथ दिली
पाहुनी वेली वरची फुले
उगा का काळिज माझे उले
पाहुनी वेली वरची फुले.
एकदम बरोबर, मानव ! मला
एकदम बरोबर, मानव !
मला अपेक्षित असलेले पर्व म्हणजे गीतरामायण हे होते.
मानव ग्रेट!! सुंदर
मानव ग्रेट!!
सुंदर गीत!
रामायण!
मी सुधीर फडके गदिमा त्यमुळेच म्हणालो...
पुढिल कोडे कोणीही द्या,
पुढिल कोडे कोणीही द्या, ज्यांना जास्त संधी मिळाली नाही त्यांनी अथवा त्यांनी नाही दिले तर कोणीही.
जरा कामात लक्ष घालतो आता.
१०४ मराठी च र म क न प म स स त
१०४ मराठी
च र म क न प
म स स त न प न
अ क क म अ>>>>>>>>उगा का काळिज
अ क क म अ>>>>>>>>उगा का काळिज माझे उले?????????????
बरोबर आहे शोभा. उ हे अक्षर अ
बरोबर आहे शोभा. उ हे अक्षर अ च्या बाराखडीत धरले जाते.
बरोबर आहे शोभा. उ हे अक्षर अ
बरोबर आहे शोभा. उ हे अक्षर अ च्या बाराखडीत धरले जाते.>>>>>>...ऐसा क्या? तो बराबर!
१०४: चांदण्याची रोषणाई मी कधी
१०४:
चांदण्याची रोषणाई मी कधी ना पाहते
मी सुधेच्या सागरी त्या नाहते पण नाहते
वा ताई, आल्या आल्या ६ धावा.
वा ताई, आल्या आल्या ६ धावा.
१०५: ज ह र न अ ह ज क ज ह क स
१०५:
ज ह र न अ ह ज क ज ह
क स क भ अ स द र ब ह
हिन्दी
आता कुठे पहिल्यान्दा सुटलय शोभे!
अग्ग बाबौ....अवघड वाटतय
अग्ग बाबौ....अवघड वाटतय का?
गोल्डन एरातले आहे गाणे. घ्या क्ल्यु.
१०५: ज ह र न अ ह ज क ज ह क स
१०५:
ज ह र न अ ह ज क ज ह
क स क भ अ स द र ब ह
जीना हमको रास न आया हम जाने क्यो जीते हैं
क्या सावन क्या भादो अपने सब दिन रोते बीते हैं
१०६: स र भ न ज म प म व क अ म
१०६:
स र भ न ज म प
म व क अ म ह क ल अ
हिन्दी
१०६. साथी रे भूल ना जाना मेरा
१०६.
साथी रे भूल ना जाना मेरा प्यार
मेरी वफ़ा का ऐ मेरे हमदम कर लेना ऐतबार
१०७. द ज ह त ज द अ न ब फ न
१०७.
द ज ह त ज द
अ न ब फ न क
सॉरी। हिंदी
मराठी की हिंदी?
मराठी की हिंदी?
हिंदी
हिंदी
क्लु शिवाय काही ही जमणार
क्लु शिवाय काही ही जमणार नाही.
१०७. द ज ह त ज द अ न ब फ न
१०७.
द ज ह त ज द
अ न ब फ न क
दिल जलता है तो जलने दे
आँसू ना बहा फ़रियाद ना कर
गाणे जुनेच आहे. त्या
गाणे जुनेच आहे. त्या काळातल्या नामांकित गायकाने गायलेले.
परफेक्ट!!!
परफेक्ट!!!
Pages