सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.
सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक
सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक
सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर
सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .
सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .
सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .
सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .
सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!
सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .
सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!
सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस
सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड
सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड
सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात
सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक
पाचवे शतक- लोअर दुधना डॅम
१२ ऑगस्ट २०१४ ला नव्या सायकलने पहिलं शतक केल्यानंतर सायकलिंग चालू राहिलं. छोट्या छोट्या राईडस करत राहिलो. लवकरच पुढच्या शतकासाठी सायकल हातात घेतली. ह्या वेळी सुमारे ६० किलोमीटर दूर असलेल्या लोअर दुधना धरणाकडे जाईन. जाऊन येऊन १२० किलोमीटर होतील. कित्येक दिवस नियमित प्रकारे सायकल चालवत असल्यामुळे आता शरीराला चांगला सराव झालेला आहे.
१७ ऑगस्टच्या पहाटे निघालो. आता पंक्चर किट सोबत घेऊन जातोय, पण अजून त्याचा वापरच शिकलो नाहीय! सकाळच्या थंड वेळी माझ्यासोबत आणखीही काही सायकलिस्ट आहेत जे काही अंतर जातील. सायकल सुरू केल्यानंतर काही वेळाने वाटलं की, सायकलची सीट अजून वर घ्यायला हवी ज्यामुळे पेडलवर जास्त जोर पडेल. सीट शक्य तितकी जास्तीत जास्त उंच केली. सुरुवातीला बसताना आणि सायकल चालवताना अडचण झाली. पण थोड्याच वेळात जमलं, पाय लयीत आले आणि आधीपेक्षा जास्त जोर मिळाला. सीट अगदी वर ठेवल्याचे दोन फायदे होतील- एक तर पेडलवर जास्त फोर्स येईल आणि दुसरा पाय पूर्ण खाली येतील व त्यामुळे गुडघा दुखणार नाही. इतकी सायकलिंग केल्यानंतर काही गोष्टी तर शिकलोच आहे! सायकल चालवताना मध्ये मध्ये आळीपाळीने एक हात, एक पाय ह्यांना विश्रांती देतो. उतार आला की आलटून पालटून पाय खाली सरळ करून घेतो. पाऊस अजिबात नाहीय, पण पावसाचं प्रसन्न वातावरण मात्र आहे!
पहिल्या तीस किलोमीटर अंतरापर्यंत अनेकदा फिरलो आहे. त्यामुळे तो रस्ता पाठ आहे. पुढचा रस्ताही ओळखीचा आहे, पण कधी सायकलवर गेलो नाहीय. महाराष्ट्रातल्या परभणीजवळचे हे रस्ते अगदी शांत आहेत! अशा एकांतात सायकल चालवण्याची मजा वेगळीच! चांगला सराव झाला असल्यामुळे मस्त वेगात पुढे जात राहिलो. मध्ये मध्ये चहा- नाश्ता घेत राहिलो. साडेतीन तासांमध्ये सेलूला पोहचलो. अर्धशतक झालं! आता इथून फक्त बारा किलोमीटर पुढे डॅम आहे. डॅमच्या चार किलोमीटर आधीपर्यंत मेन रोडनेच जायचं आहे. धरण जवळ आल्यानंतर एक अनपेक्षित शॉर्ट कट असा चांगला रस्ता मिळाला. हा रस्ता मॅपमध्ये नाहीय, पण चांगला आहे.
डॅमपर्यंतचा मार्ग. शेवटच्या तीन- चार किलोमीटरचा रस्ता नकाशात नाहीय.
साडेनऊ वाजता डॅमवर पोहचलो. अतिशय रम्य परिसर! आत्ता भरपूर पाणीसुद्धा आहे. अजून थकवा जाणवत नाहीय, त्यामुळे इथे थोडं आरामात फिरेन. काही फोटो घेतले. थोडा वेळ तिथेच पडून आराम केला. अशा जागी आल्यानंतर एकदम शांत वाटतं! पर्यटन स्थळ नसल्यामुळे गर्दीसुद्धा नाहीय. भरपूर मजा घेतल्यानंतर सायकल वळवली.
परतीच्या प्रवासात आता पहिलं काम चांगलं जेवण करणं हे आहे. पूर्वी वाटायचं की, मोठ्या राईडच्या वेळी खाऊ नये, कारण सायकलिंगला खूप ऊर्जा लागत असते आणि जर पोटभर खाल्लं, तर पोटाला पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते व पायांना मिळणारी ऊर्जा कमी होते. पण आता वाटतंय की, चांगलं खाल्लं पाहिजे, कारण शरीराची ऊर्जा सारखी खर्च होत असते. त्यामुळे फार कमी नाही आणि फार जास्तही नाही, असं खायला हवं. पण हवं तसं हॉटेल मिळालं नाही आणि मोठा नाश्ता करून निघालो. ह्यावेळी ओआरएस सॅशेसुद्धा सोबत घेतले आहेत. त्यांना शेवटच्या तीन तासांसाठी ठेवलं आहे. पुढे निघाल्यावर हळु हळु थकवा जाणवायला लागला. एक ओआरएसचं सॅशेट घेतलं. लगेच ताजेपणा मिळाला. अजूनसुद्धा २-५ व २-६ वर चालवू शकतोय.
आपण सायकल चालवतो, तेव्हा नेहमी आपल्या मनात अंतरांची गणितं फिरत असतात. अजून किती किलोमीटर दूर, किती वेळ लागेल, स्लो तर जात नाहीय इत्यादी प्रश्न फिरत असतात. हा रस्ता अगदीच सपाट आहे, त्यामुळे चढाचा प्रश्नच नाही. आणि आज हेड विंडही चांगली सोबत देतं आहे. सीटसुद्धा वर घेतली आहे. त्यामुळे पाय थोडे कमी थकले असावेत आणि पेडलवर जास्त फोरसही मिळतोय. शिवाय ओआरएसचा फायदा! त्यामुळे फार थकवा जाणवलाच नाही आणि गतीही चांगली राहिली. छोटे छोटे पॉझ घेत पुढे जात राहिलो. अर्थात् मध्ये मध्ये कडक ऊन आहे. पण त्याचीही वेगळी मजा असतेच! जेव्हा घर तीस किलोमीटर दूर राहिलं, तेव्हा ओळखीचा टप्पा सुरू झाला. एका हॉटेलमध्ये मस्त पोहे खाल्ले आणि पुढे न थांबता निघालो. मनात फिरणा-या गणिताने लवकरच घोषणा केली, की शतक पूर्ण झालं! अरे वा, अजून दुपारचा दिडही झाला नाहीय- जेवणाचीही वेळ झाली नाहीय आणि शतक झालं! टेस्ट क्रिकेटमध्ये जसं लंचच्या आधीच शतक पूर्ण! मग तर थकवा येण्याचा प्रश्नच आला नाही. उलट घर जसं जवळ येत गेलं, तसा प्रवास सोपा होत गेला. २-५ काँबीनेशनवरच चालवत राहिलो. अडीच वाजता घरी पोहचलो. एकूण १२० किलोमीटर सायकलिंग झालं आणि हे आजवरचं सर्वांत वेगवान शतक ठरलं! थकवा अगदी किरकोळ आहे. पण काय मजा आली!
पुढील भाग १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!
अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग
वा छान लिहिलय ............
वा छान लिहिलय ............
व्वा.... मस्त फोटो, छान वर्णन
व्वा.... मस्त फोटो, छान वर्णन
परभणीत कुठे रहाता?
आम्ही गव्हाणे रोडच्या आतिल बाजुस नेहेरु उद्याना समोर रहायचो.
पोस्ट संपादित. कै नै, परभणीचा
पोस्ट संपादित.
कै नै, परभणीचा नकाशा उघडुन बसलो होतो, घर शाळा कॉलेज बघितले.....
गूड.... तुम्हाला ह्या राईड
गूड.... तुम्हाला ह्या राईड मध्ये सायकलींगसाठी योग्य पोश्चर सापडले असे दिसून येत आहे..
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद!
@ लिंबूटिंबू काका, मी परभणीत रामकृष्णनगरमध्ये आणि पुण्यात चाकणला राहतो.
राईड ५० किमीची असो वा २००
राईड ५० किमीची असो वा २०० किमीची, शेवटचे ५-७ किमी जीव घेतात
राईड ५० किमीची असो वा २००
राईड ५० किमीची असो वा २०० किमीची, शेवटचे ५-७ किमी जीव घेतात
माझ्याबाबतीत सातारा साईडनी येताना तसे होत नाही. कारण कात्रज बोगद्यापासून घरापर्यंत मस्त उतारच उतार आहे..त्यामुळे किमी कॅल्क्युलेशन्स बोगद्यापर्यंत. तिथुन आराम
मार्गी प्रत्येक राईडमधुन नविन काहीतरी शिकताय ही प्रोसेस जाणवतीये....तुमच्यातला अॅम्युचर ते प्रो हा प्रवास बघताना मज्जा येतीये.
धन्यवाद आशूचँप जी! पण मला
धन्यवाद आशूचँप जी! पण मला एमेच्युअरच राहायचंय, प्रो नाही व्हायचं!