Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 02:22
बापूला शब्दांचे का वावडे?
माझ्या विश्वाचा आवाका तो केवढा?
त्यालाही कोंडून घालणारे शब्द.
वळवळणारे, सरपटणारे किडे,
निसरडे, शेवाळी बुडबुडे.
चलाख, चटपटीत, रंगीत फुगे,
शब्दांचीच चिलखते, शब्दांचेच मुखवटॅ.
मयसभेची गुळगुळीत फरशी,
सांदी-कोपर्यातली कुबट बुरशी.
लखखणार्या झुंबरांचे लोलक आरसे,
म्हणे ही शब्द-लेणी अन शब्द-शिल्पे.
मला चिंता अर्थाची, त्यांना हवे व्याकरण,
भिडायचे कसे,विरामचिन्हांची जागा चुकते.
त्यांच्या-माझ्या मधे उभ्या भिंती शब्दांच्या,
त्यांच्या-माझ्या शब्दांमधे दर्या अर्थांच्या.
शब्दांनी घ्यावा वेध, अबोध अमूर्ताचा,
अबोला शब्दांशी, माझ्या आतुर आवेगाचा.
बापू.
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/102005.html?1137402135
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा