सध्या चेहरेपुस्तकावरच्या ह्या बिलने नेटभरात धुमाकुळ घालायला सुरुवात केली आहे.
त्यांचा बिल तो आपला बाळू , आणि आपला बाळू कसा बरे मागे राहील. जगासोबत चालावे तर लागतेच ना भाऊ!
तर
हा आहे बाळू
हा मनात असेल ते आणि खरे बोलतो.
ह्या सवयीपायी तो काहीवेळा अनेकांना आवडेनासा होतो.
पण तो कोणाचीच पर्वा करत नाही.
तो आपल्या मनाचे ऐकतो. तो स्मार्ट आहे.
बाळू सारखे बना !
ह्या धर्तीवर आपापल्या पसंतीच्या मायबोलीकर आयडींबद्दल लिहा बरं
उदा.
हे आहेत अशोक.
हे नेहेमीच संयमित आणि तटस्थ भुमिका घेतात.
ह्यांना कधीही कुठल्याही वादात पडताना पाहिले नाही
अशोक. स्मार्ट आहेत
अशोक. सारखे बना
किंवा
हा आहे ऋन्मेष
ह्याची लिहिण्याची हातोटी खुमासदार आहे.
ह्याच्या कडे लोकांना काय आवडणार नाही ते किती चांगले असे म्हणून धागा काढण्याची हातोटी आहे.
स्वतःच्या धाग्यांवर विक्रमी प्रतिसाद संख्या मिळवण्याचे कसब वाखाणण्याजोगे आहे.
इतरांशी प्रतिवाद करताना आपला पारा कधीही वर चढू देत नाही.
ऋन्मेष हुषार आहे .
ऋन्मेष सारखे बना
हे आहेत हर्पेन! हे
हे आहेत हर्पेन!
हे मॅरॉथॉनमध्ये धावतात.
हे कधी कुणाशी पंगे घेत नाहीत.
हे स्वतः सत्कृत्ये करतात आणि इतरांना करायला प्रवृत्त करतात.
हर्पेनसारखे बना!
ओय डॉक ! लगेच माझ्यावरच का,
ओय डॉक ! लगेच माझ्यावरच का, पण धन्यवाद
साती हे आहेत हर्पेन, हे बनु
साती
हे आहेत हर्पेन, हे बनु पाहताहेत रु आणि राकु ... ( शतकी, पॉपकॉर्न धागाकर्ते )
फार फार वर्षांपूर्वी
फार फार वर्षांपूर्वी दूरदर्शन वर आणि थेटरात सिनेमा सुरु व्हायच्या आधी '.... याला आपलं म्हणा' प्रकारातल्या टीबी वगैर आजारावर माहितीपर लघुपट लागायचे.. वरचं सगळं वाचल्यावर त्याची आठवण झाली
हा आहे बाळू हा मनात असेल ते
हा आहे बाळू
हा मनात असेल ते आणि खरे बोलतो.
ह्या सवयीपायी तो काहीवेळा अनेकांना आवडेनासा होतो.
पण तो कोणाचीच पर्वा करत नाही.
तो आपल्या मनाचे ऐकतो. तो स्मार्ट आहे.
बाळू सारखे बना ! >
आमचं बी येच्च आलेले बग्गा.
आमी बी कुनची परवा करित न्हायी
मंजूताई कुठे रु आणि राकू कुठे
मंजूताई कुठे रु आणि राकू कुठे मी... ह्या बाबतीत्ली त्या दोघांची पातळी उच्च आहे
मित, हे वेगळं आहे पण ह्याला आपले म्हणा
निनाद१ मग लिहा की तुम्हीपण चांगलं काहीतरी
या आहेत साती तै हुषार आहेत,
या आहेत साती तै
हुषार आहेत, डॉक्टर आहेत,
माबोवर छान छान माहितीपुर्ण लेख पाडतात,
अधेमधे काहीच्या काही कविता पण करतात,
सगळ्यांना खूप मदत करतात,
यांच्या सारखे बना........
ही आहे टीना . रांगोळी काढते ,
ही आहे टीना .
रांगोळी काढते , क्विलिन्ग करते , सॅटीनची फुले बनवते .
वर्हाडी पदार्थ किन्वा डाळीचे बरेच काही बनवते .
अधीमधी वेळ मिळाला की लोणावळ्याला फिरायला जाते .
वेळात वेळ काढून रोमॅंटिक सिनेमे बघते.
ती कलाकार आहे , दिलखुलास आहे
तीच्या सारखे बना
अतरंगी, 'लेख पाडतात' हाय! मार
अतरंगी, 'लेख पाडतात' हाय! मार डाला!

टीनासाठी +१!
टाकतात, टंकतात, छापतात पेक्षा
टाकतात, टंकतात, छापतात पेक्षा " पाडतात " लयीत येते असे वाटले .
हे आमचे दिनेशदा मायबोलीचे
हे आमचे दिनेशदा
मायबोलीचे शेफ
रुचिरेसाठी झटतो हा अवलिया
चालताबोलता एनसायक्लोपीडीया
माहीतीची खाण ही पहा
जणू अलिबाबाची गुहा
मदतीस नेहमी तत्पर
हसतमुख यांचा वावर
केल्याने देशाटन म्हणे
हे विश्वची माझे घर
यांचे गुण घ्या ना
सगळे त्यांच्यासारखे बना
वाह ! अतरंगी स्वस्ति कापोचे
वाह ! अतरंगी स्वस्ति कापोचे
टीनासाठी +१!
टीनासाठी +१!
कपोचे , छान! कित्येक
कपोचे , छान!
कित्येक माबोकरांच्या मनातल्या भावना लिहिल्यात.
कित्येक माबोकरांच्या मनातल्या
कित्येक माबोकरांच्या मनातल्या भावना लिहिल्यात+१
साती, दिनेश,टीना यांच्यासाठी
साती, दिनेश,टीना यांच्यासाठी +१
ही आहे अवल क्रोशा विणकाम
ही आहे अवल
क्रोशा विणकाम करण्यात अव्वल
जगातील सर्वात मोठे विक्रमी आकाराचे ब्लँकेट बनवण्यात हिचा मोलाचा वाटा
अवल एक गुणी कलाकार आहे
अवल सारखे बना
हे आहेत शशांकजी, बालकविता
हे आहेत शशांकजी,
बालकविता लिहीतात, अन तुकोबांची कीर्तनभक्ति, तत्त्वज्ञान सुद्धा !
चित्रे काढतात,
निसर्गाच्या गप्पा मारतात,
स्वताकडे असलेला माहितीचा प्रचंड साठा सर्वाना खुला करतात,
चांगल्या लेखनाला तितकाच छान प्रतिसाद देतात..
शशांकजी सारखे बना..
दिनेशदा आणि अवलसाठी आधीच नंबर लागले

हे आहेत मयुरेश, म्हणतात लोक
हे आहेत मयुरेश,
म्हणतात लोक त्यांना कार्याध्यक्ष
वर्षानुवर्षे वविची धुरा,
पेलतात स्वतःच्या खान्द्यावर
समर्थपणे.....
जसे तेजोनिधी लोहगोलाशिवाय
नभीच्या अंगणाला प्रकाश नाही,
तसे मयुरेश कार्याध्यक्षांशिवाय,
वविच्या कल्लोळाला गती नाही,
मयुरेशसारखे कार्याध्यक्ष बना.... !
आहे हा हर्पेन, तिकडे तो
आहे हा हर्पेन, तिकडे तो केदार,
पलिकडे मनोज, आणि आशुच्याम्प
बहुत असे हे क्रिडाप्रेमी,
निष्ठा कष्ट त्यांचे दिसे दृष्टी,
आळशांस इन्स्पायर करीती,
आधी कृती, मग बोलती,
यांच्यासारखे बना, खेळाडू बना,
तब्येत तंदुरुस्त ठेवा.....
अरे वा ! सगळेच सहीच आहे की
अरे वा ! सगळेच सहीच आहे की हे. कार्याध्यक्षांना उचक्या लागत असतील.
हे आहेत कराण्णा पोचाण्णा
हे आहेत कराण्णा पोचाण्णा चेट्टियाड स्वामी
आहेत ते अंतर्यामी...
आयडी त्यांचा बहुआयामी
हुरडा खा नैतर खा शिजवून मका
पण त्यांच्यासारखे बनू नका..
कापोचे
कापोचे
हा आहे कांदापोहे ह्याची एकाच
हा आहे कांदापोहे
ह्याची एकाच जागी तासंतास बसून राहण्याची चिकाटी अफाट आहे.
त्यामुळेच ह्याने काढलेले पक्ष्यांचे फोटो अप्रतिम येतात.
कांदापोहे उत्कृष्ट पक्षी निरिक्षक आहे
कांदापोह्या सारखे बना
हे आहेत Yo Rocks आणि
हे आहेत Yo Rocks आणि जिप्सी
भरपूर भटकंती करतात
सुंदर सुंदर फोटो काढतात
फोटो ह्यांचे पाहून डोळे तृप्त होतात
ह्यांच्यासारखे बना
अरे वा.. माझ्याबद्दलही ..
अरे वा.. माझ्याबद्दलही :-).. मस्तय !
हि आमची वर्षू,
खर्या अर्थाने जिप्सी,
देशोदेशी फिरली,
अनेक भाषा शिकली,
पण मराठी नाही विसरली,
उत्तम सुगरण, उत्तम लेखिका,
तितकीच उत्तम शिक्षिका,
आणि आमची अत्यंत प्रेमळ ताई,
हिच्यासारखे बना !!
अरे यात यमक जुळवायची नसतात
अरे यात यमक जुळवायची नसतात

यांना खेळच कळालेला नाहीये
अरे व्वा माझ्यासाठी पन..किती
अरे व्वा माझ्यासाठी पन..किती मज्जा..ठांकु
यमकं जुळवायची नसतात. आरत्या
यमकं जुळवायची नसतात. आरत्या ओवाळायच्या एकमेकांच्या.
अहो रुपम अहो ध्वनिम
यमकं जुळवायची नसतात. आरत्या
यमकं जुळवायची नसतात. आरत्या ओवाळायच्या एकमेकांच्या.

अहो रुपम अहो ध्वनिम >>>> हे पाहिलंच नव्हतं
Pages