बीट बीट बीट....बीट है वंडरफुल...!!!

Submitted by निसर्गा on 25 January, 2016 - 03:54

एकदा बाजारात ताजे-ताजे बीट आवडले म्हणून घेतले. घरी येईपर्यंत बरेच कल्पनांचे इमले बांधून झालेले, वेगवेगळ्या आकाराचे बीट डिशमध्ये दिसत होते... मग घरी आल्यावर आनंदाने ते फ्रीजमध्ये ठेवले. जसा आठवडा सुरु झाला तसे बीट महाशय डोक्यातून बाहेर गेले, पण फ्रीजमध्ये बिचारे गारठून गेलेले. Sad
४-५ दिवसांनी अचानक आठवण झाली. बाहेर काढून बघते तर, ते बिचारे केविलवाणे माझ्याकडे बघत होते... पटपट साल काढून ताटात वाढले पण पतीराजानी कशीबशी एक फोड संपवली... Angry
आता काय करायचे!! पुन्हा प्रश्न???

मग गूगल महाराजाना साद घातली... साध्या कोशिंबीरीत बरेच बदल आणि काही प्रयोग केल्यावर ही डिश तयार झाली...
आमच्या घरातल्या बीटाने असा आकार घेतला. जी आमच्या घरात नंबर एकची मागणी असलेली डीश आहे

बीट रायतं

लागणारा वेळ:
१५ मिनिटे

लागणारे जिन्नस:
१ मध्यम आकाराचे बीट
१ कप दही
३ चमचे साखर(दह्याच्या आंबटपणा नुसार)
१/२ चमचा मीठ
तेल

फोडणीसाठी:
१-२ लाल किंवा हिरव्या मिरच्या
कडीपत्ता
मोहरी
जीरे
हिंग

क्रमवार पाककृती:
- प्रथम बीट स्वच्छ धुवून, साल काढून किसून घ्यावे.

- कढईत २ चमचे तेल तापवून, किसलेले बीट त्यात टाकावे. २-३मिनिटे छान भाजावे.

- त्यात १ कप पाणी घालुन शिजवावे. बीट शिजून कोरडे झाल्यावर गॅस बंद करावा व गार करावे.

- थोडे गार झाल्यावर बाऊल मधे काढून त्यात दही घालावे.

- त्यात चवीनुसार साखर आणि मीठ घालावे.

- वर १-२ लाल किंवा हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, मोहरी-जीरे, हिंगाची फोडणी द्यावी.

- फ्रीजमधे थंड करून खायला घ्यावे.

वाढणी/प्रमाण:
साधारण २-३ माणसांना

अधिक टिपा:
- शिजवताना बीटात पाणी राहू देउ नये. साखर आणि मीठामुळे पुरेसा पातळपणा येतो.
- कोथिंबीर घालू शकता.
- दह्याचे प्रमाण जास्त असले तरी चालेल, छान बेबी पिंक कलर येतो.

माहितीचा स्रोत:
माझे प्रयोग

10686861_900779923279982_8023181879388578654_n_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे ...काहीतरी वेगळं...
ट्राय करुन तर पाहू...खाल्याशिवाय कसं कळणार...सस्मित...

बीटाला पण शिजवताना पाव कप पाणी सुटतं ना...एक आधिक पाव सव्वा कप ... :p
ईस्राईलचं मध्यम आकाराच बीट म्हणजे ईंडियातलं मोठ्या आकाराचं बीट...

बीट शिजवायला पाण्याची गरज नसते. अंगच्या रसात व्यवस्थित शिजतं. मी बीटची किसून, फोडणीत परतून भाजी करते. कधीच वरनं पाणी घालायला लागलं नाहीये.
आता त्या भाजीत दही घालून 'दही बीट' करून बघेन. छानच लागेल Happy

कच्च बीट खात नाही म्हणून पाणी टाकून शिजवायची कल्पना मीच काढली वरदा...

एक कप पाण्याच म्हणाल तर बीट मऊ शिजावं म्हणून मी तेवढ पाणी घालते,तुम्ही अंदाज घेऊन आवडतील तसे बदल करू शकता..

वॉव.. सुंदर ऑर्किड डेकोर.. Happy
बीटरूट मी सरळ प्रेशर कुक करून घेते.. आणी मग त्याच्या फोडींवर लिंबु मीठ टाकून खाऊन टाकते .. आता कोशिंबीर ट्राय करीन .. साउंड्स बेटर!!!

मी पण बीट उकडून घेते. कोशिंबीर करताना त्यात थोडा उकडलेला बटाटा आणि थोडा कच्चा कांदा ही घालते. दही मात्र ताजं आणि गोडच हवं. मस्त लागते.

फोटो कातिल.

मी रायता करताना बीट कच्चा किसून दह्यामध्ये मिक्स करते.

बीटची भाजी करताना चौकोनी फोडी करून किंवा किसून नेहमीसारखी फोडणीवर परतून घेते. आता याही रेसिपीने एकदा करून बघेन. छान लागेलच. Happy

फोटो मात्र सुंदर आलाय.

मी बीट किसून त्यावर (फक्त)जीरे फोडणी घालते, आणि वरुन लिंबू पिळून , चवीपुरता मीठ. मस्त लागते.

इस्कू बोल्ते फोटो के मार्क्स!
तो फोटू चोरीला जाण्याआधी वॉटरमार्क टाका बरं त्यात.

मला वाटल बीट फॅन क्लब काढलास. Happy

मी बीट मधे पाणी आणि मीठ टाकुन शिजवते. कुकर मधे किंवा मायक्रोवेव मधे.
भाजी पर्यन्त चा पार्ट आठवड्याला एकदा तरी अस्तो पण असा रायताही बनवुन बघेन.

छान दिसतंय, फोटो भारीच.

शिजवलेलं बीट आवडत नाही मला. कच्या बीटाची आवडते कोशिंबीर, दही आणि शेंगदाणा कुटाची.

मी, फोडणीत बारिक चिरलेला कांदा परतते, ते मिश्रण उकडुन किसलेल्या आणि दही घातलेल्या कोशींबीरीत टाकते, ह्यात कींचीत साखर मस्टच. भाजी नसली तरी चालते.

बीटप्रेमींनो बीट हे खूप वेळ वार्‍यानिशी राहिले की त्यातले अन्टी-ऑक्सिडन्ट लगेच उडून जाते. तेंव्हा इतके सोपस्कार करण्यापेक्षा मी बीटरुटाच्या चकत्या करुन त्या आधी संपवतो. मला उकळवून भाजी केलेला बीट आवडत नाही. फार बोअर वाटतो. मला बीटाची बरफी ह्या प्रकारवार पुर्ण विश्वास नाही त्यात कितपत बीट असेल कारण बीट तसाही फार गडद प्रकार आहे. मला बीटाचा ज्यूस आणि खरे तर कुठलेच ज्यूस आवडत नाही कारण फायबरचा नाश होतो मग विज्ञान शिकलेले गेले कुठे?? बीट किसून कोशोंबीरमधे आवडत नाही Happy

निसर्गा तुमचे नाव आणि तुमची लेखन शैली आवडली.

हे शीर्षक कुठल्या गाण्यावर आधारीत आहे का? जसे की :

१) दिल दिल दिल.. शीशा तो नही.
२) तोफा तोफा तोफा.. लाया लाया
३) पल पल पल.. दिल के पास..
४) लीना लीना लीना.. लीना वो लीना Happy

Happy

बी, यातलं कुठलंच गाणं नाही. दूध, दूध, दूध, दूध! दूध है वंडरफुल, पी सकते है रोज ग्लासफुल हि अमूल दुधाची ऍड आठवते का? त्यावर बेस्ड आहे शीर्षक Happy

नाही मी ही अ‍ॅड कधी पाहिली नाही. भारतात अलिकडची अ‍ॅड आहे का? किती काळ उलटला टिवी बघणेच सोडले आहे.

Pages