एकदा बाजारात ताजे-ताजे बीट आवडले म्हणून घेतले. घरी येईपर्यंत बरेच कल्पनांचे इमले बांधून झालेले, वेगवेगळ्या आकाराचे बीट डिशमध्ये दिसत होते... मग घरी आल्यावर आनंदाने ते फ्रीजमध्ये ठेवले. जसा आठवडा सुरु झाला तसे बीट महाशय डोक्यातून बाहेर गेले, पण फ्रीजमध्ये बिचारे गारठून गेलेले.
४-५ दिवसांनी अचानक आठवण झाली. बाहेर काढून बघते तर, ते बिचारे केविलवाणे माझ्याकडे बघत होते... पटपट साल काढून ताटात वाढले पण पतीराजानी कशीबशी एक फोड संपवली...
आता काय करायचे!! पुन्हा प्रश्न???
मग गूगल महाराजाना साद घातली... साध्या कोशिंबीरीत बरेच बदल आणि काही प्रयोग केल्यावर ही डिश तयार झाली...
आमच्या घरातल्या बीटाने असा आकार घेतला. जी आमच्या घरात नंबर एकची मागणी असलेली डीश आहे
बीट रायतं
लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ मध्यम आकाराचे बीट
१ कप दही
३ चमचे साखर(दह्याच्या आंबटपणा नुसार)
१/२ चमचा मीठ
तेल
फोडणीसाठी:
१-२ लाल किंवा हिरव्या मिरच्या
कडीपत्ता
मोहरी
जीरे
हिंग
क्रमवार पाककृती:
- प्रथम बीट स्वच्छ धुवून, साल काढून किसून घ्यावे.
- कढईत २ चमचे तेल तापवून, किसलेले बीट त्यात टाकावे. २-३मिनिटे छान भाजावे.
- त्यात १ कप पाणी घालुन शिजवावे. बीट शिजून कोरडे झाल्यावर गॅस बंद करावा व गार करावे.
- थोडे गार झाल्यावर बाऊल मधे काढून त्यात दही घालावे.
- त्यात चवीनुसार साखर आणि मीठ घालावे.
- वर १-२ लाल किंवा हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, मोहरी-जीरे, हिंगाची फोडणी द्यावी.
- फ्रीजमधे थंड करून खायला घ्यावे.
वाढणी/प्रमाण:
साधारण २-३ माणसांना
अधिक टिपा:
- शिजवताना बीटात पाणी राहू देउ नये. साखर आणि मीठामुळे पुरेसा पातळपणा येतो.
- कोथिंबीर घालू शकता.
- दह्याचे प्रमाण जास्त असले तरी चालेल, छान बेबी पिंक कलर येतो.
माहितीचा स्रोत:
माझे प्रयोग
दह्याच फुल मस्तच
दह्याच फुल मस्तच
फोटो खुप मस्त. पण बीटाचं....
फोटो खुप मस्त. पण बीटाचं....:-(
नाव छान रेसिपी, यम्मी फोटो..
नाव
छान रेसिपी, यम्मी फोटो..
मस्त आहे ...काहीतरी
मस्त आहे ...काहीतरी वेगळं...
ट्राय करुन तर पाहू...खाल्याशिवाय कसं कळणार...सस्मित...
वेगळीच कृती..फोटो
वेगळीच कृती..फोटो भारी.दह्याचं फूल मस्तच !
धन्यवाद.... सस्मित...मला
धन्यवाद....
सस्मित...मला यामुळेच बीट आवडू लागलं... छान लागतं
फोटो मस्त! एक मध्यम बीट
फोटो मस्त!
एक मध्यम बीट शिजवायला एक कप पाणी लागतं?
बीटाला पण शिजवताना पाव कप
बीटाला पण शिजवताना पाव कप पाणी सुटतं ना...एक आधिक पाव सव्वा कप ... :p
ईस्राईलचं मध्यम आकाराच बीट म्हणजे ईंडियातलं मोठ्या आकाराचं बीट...
बीट शिजवायला पाण्याची गरज
बीट शिजवायला पाण्याची गरज नसते. अंगच्या रसात व्यवस्थित शिजतं. मी बीटची किसून, फोडणीत परतून भाजी करते. कधीच वरनं पाणी घालायला लागलं नाहीये.
आता त्या भाजीत दही घालून 'दही बीट' करून बघेन. छानच लागेल
chhaan sajaawaT aahe.
chhaan sajaawaT aahe.
कच्च बीट खात नाही म्हणून पाणी
कच्च बीट खात नाही म्हणून पाणी टाकून शिजवायची कल्पना मीच काढली वरदा...
एक कप पाण्याच म्हणाल तर बीट मऊ शिजावं म्हणून मी तेवढ पाणी घालते,तुम्ही अंदाज घेऊन आवडतील तसे बदल करू शकता..
व्हॉव.. कसलं मस्त दिसतय
व्हॉव.. कसलं मस्त दिसतय
मी हिच रेसीपी बीट उकडून घेऊन
मी हिच रेसीपी बीट उकडून घेऊन करते. मस्त लागते. पोळीसोबत किन्वा नुस्तेहि
वॉव.. सुंदर ऑर्किड डेकोर..
वॉव.. सुंदर ऑर्किड डेकोर..
बीटरूट मी सरळ प्रेशर कुक करून घेते.. आणी मग त्याच्या फोडींवर लिंबु मीठ टाकून खाऊन टाकते .. आता कोशिंबीर ट्राय करीन .. साउंड्स बेटर!!!
मस्त दिसतेय बीट रायत
मस्त दिसतेय बीट रायत
बीट उकडून कोशिंबीर
बीट उकडून कोशिंबीर केल्यासारखंच आहे हे.
छान फोटो! मी नेहमी करते
छान फोटो! मी नेहमी करते दह्यातले रायते. बीट कुकरमधे उकडते.
मी पण बीट उकडून घेते.
मी पण बीट उकडून घेते. कोशिंबीर करताना त्यात थोडा उकडलेला बटाटा आणि थोडा कच्चा कांदा ही घालते. दही मात्र ताजं आणि गोडच हवं. मस्त लागते.
फोटो कातिल.
मी रायता करताना बीट कच्चा
मी रायता करताना बीट कच्चा किसून दह्यामध्ये मिक्स करते.
बीटची भाजी करताना चौकोनी फोडी करून किंवा किसून नेहमीसारखी फोडणीवर परतून घेते. आता याही रेसिपीने एकदा करून बघेन. छान लागेलच.
फोटो मात्र सुंदर आलाय.
मी बीट किसून त्यावर
मी बीट किसून त्यावर (फक्त)जीरे फोडणी घालते, आणि वरुन लिंबू पिळून , चवीपुरता मीठ. मस्त लागते.
इस्कू बोल्ते फोटो के
इस्कू बोल्ते फोटो के मार्क्स!
तो फोटू चोरीला जाण्याआधी वॉटरमार्क टाका बरं त्यात.
दीमा, पटलं अगदी.
दीमा, पटलं अगदी.
मस्त..बीटाची कोशिंबीर आमची पण
मस्त..बीटाची कोशिंबीर आमची पण फेवरेट..:)
मला वाटल बीट फॅन क्लब काढलास.
मला वाटल बीट फॅन क्लब काढलास.
मी बीट मधे पाणी आणि मीठ टाकुन शिजवते. कुकर मधे किंवा मायक्रोवेव मधे.
भाजी पर्यन्त चा पार्ट आठवड्याला एकदा तरी अस्तो पण असा रायताही बनवुन बघेन.
बीटाची दह्यातली कोशिंबीर एकदम
बीटाची दह्यातली कोशिंबीर एकदम आवडीची आहे माझी. मी दाण्याचा कूट पण घालते कधीकधी..
छान दिसतंय, फोटो भारीच.
छान दिसतंय, फोटो भारीच.
शिजवलेलं बीट आवडत नाही मला. कच्या बीटाची आवडते कोशिंबीर, दही आणि शेंगदाणा कुटाची.
मी, फोडणीत बारिक चिरलेला
मी, फोडणीत बारिक चिरलेला कांदा परतते, ते मिश्रण उकडुन किसलेल्या आणि दही घातलेल्या कोशींबीरीत टाकते, ह्यात कींचीत साखर मस्टच. भाजी नसली तरी चालते.
बीटप्रेमींनो बीट हे खूप वेळ
बीटप्रेमींनो बीट हे खूप वेळ वार्यानिशी राहिले की त्यातले अन्टी-ऑक्सिडन्ट लगेच उडून जाते. तेंव्हा इतके सोपस्कार करण्यापेक्षा मी बीटरुटाच्या चकत्या करुन त्या आधी संपवतो. मला उकळवून भाजी केलेला बीट आवडत नाही. फार बोअर वाटतो. मला बीटाची बरफी ह्या प्रकारवार पुर्ण विश्वास नाही त्यात कितपत बीट असेल कारण बीट तसाही फार गडद प्रकार आहे. मला बीटाचा ज्यूस आणि खरे तर कुठलेच ज्यूस आवडत नाही कारण फायबरचा नाश होतो मग विज्ञान शिकलेले गेले कुठे?? बीट किसून कोशोंबीरमधे आवडत नाही
निसर्गा तुमचे नाव आणि तुमची लेखन शैली आवडली.
हे शीर्षक कुठल्या गाण्यावर आधारीत आहे का? जसे की :
१) दिल दिल दिल.. शीशा तो नही.
२) तोफा तोफा तोफा.. लाया लाया
३) पल पल पल.. दिल के पास..
४) लीना लीना लीना.. लीना वो लीना
बी, यातलं कुठलंच गाणं नाही.
बी, यातलं कुठलंच गाणं नाही. दूध, दूध, दूध, दूध! दूध है वंडरफुल, पी सकते है रोज ग्लासफुल हि अमूल दुधाची ऍड आठवते का? त्यावर बेस्ड आहे शीर्षक
नाही मी ही अॅड कधी पाहिली
नाही मी ही अॅड कधी पाहिली नाही. भारतात अलिकडची अॅड आहे का? किती काळ उलटला टिवी बघणेच सोडले आहे.
Pages