नमस्कार,
गेल्या वर्षीच्या युनिक फीचर्स 'अनुभव' च्या 'कॉमेडी कट्टा' या दिवाळी अंकात आलेली माझी अहिराणी भाषेतली कथा आज मायबोलीच्या वाचकांसाठी देत आहे, अर्थात पुर्वपरवानगीने !
शहादा ना जोडे डांबरखेडा गाव शे! गावना पोरे शिकीसन शेरगावमा नोकरीले लागी ग्यात आणि आठे गाव सुधरनं! तापीनं पानी येयेल व्हतं. पह्यले ऱ्हायेत तशी मातीनी घरे, कुडाना भिंती जाईसन पक्की घरे, धुयमिट्टीनी वाट जाईसन पक्की डांबरी सडक व्हयेल व्हती. मोबाईल, एल सी डी टीव्ही, लेप्टाप का काय म्हंतस ते बी पोचेल व्हतं. एक दोन मोबाईल कंपन्यासनी टावर बी बांधेल व्हते गावना भायेर वावरमां.
पन तरीबी चौधरीन धल्लीना वट होता गावमां! बठ्ठा लोके वचकीसन ऱ्हायेत.म्हतारी धिप्पाड. सत्तरीले टेकनी तरी बाईना आवाज खणखणीत, बुद्धी तल्लख व्हती.तशी चार बुक शिकेल व्हती. थोडबहुत ए बी सी डी पन ये वाचता. आजकाल गावना पोरेटोरेस्ना तोंडमां डाटा कनेक्शन, रिचार्ज, इन्टरनेट,सिमकार्ड असे शबुद येत… त्या म्हतारीना कानवर पडे. धल्लीनं घर मोठ खटल्यानं. तिले ३ आंडोर आन १ आंडेर! १० साल व्हई ग्यात आंडेर ना लगन ले. ४ साल पह्यले जवाई फारेन ले गयथा तं तठेच घर लिधं आन मंग अस्तुरी(बायको) ले बी लइ ग्या. घरमा धल्लीनीच काठी फिरे. बठ्ठा कारभार तिन्हाच हातमां. बैठं ६ खोल्यास्न घर. तरीबी घरमाना बठ्ठा लोके आंगणमाच झोपेत. पुरुषेसले लोखंडी पलंग, धल्लीमाय बाजल्यावर आणि खाली झोऱ्या टाकीसन 'व्हवा'(सूना),नातु झोपेत.
धल्लीना सकाय सकायले आंगणमाच बठीसन तोंडना पट्टा सुरु व्हये. म्हतारीले गाया शिव्या त एकदम तोंडपाठ. (कोनी छाती नै व्हती म्हतारीले उलट उत्तर देवानी. हा धाकली 'व्हवु' थोडी शिकेल व्हती. ती थोडे उत्तर दे पण ते काय फुसका फटाकाना गत.)
“अय भुरी पाल! काब्रं त्या गाद्यास्वर कुदी राह्यनी वं!खुंदाली खुंदाली चिपट्या व्हई जायेल शेतस त्या तुन्ह्या नाक ना गत!
त्या झिपाट्या आवर आन तुन्ह मुसडं पाह्यनं का? जसा उंदरे मांजरे मुतेल शेतस! शिलग तठे! चव नै न ढव नै सोंगाडी!
"हाउ सत्त्या कथा तरफ़डना?बठेल व्हई त्या मोबाईल लिसन! उठरे तीन डाव, तोच धंदा! आंगले पानी नै न गांxxxxले पानी नै! सकाये सकाये मरी जाय जो ते डबडं लीसन बठतंस! आह्य्याह्या काय या आतेना पोरे! बाल काय वाढवतस, छातडं काय उघडं टाकतस, ती इजार कथी जास कुल्लाना खाले!”
आसा म्हतारीना वटका सुरु व्हयना का व्हवा खाली मुंड्या घालीसन काम करेत.गरीबना घरन्या पोरी करेल व्हत्या. मोठान हसाले बंदी व्हती.त्या बिचार्या तोंडमा पदर कोंबीसन हासेत. चौधरीनना सकायना चहा, नाश्टा तठे खाटलावरच व्हये . ११ वाजनात का धाकटी व्हवु इचाराले ये '" आत्याबाई, जेवाले काय करान?" मग धल्ली म्हणे," काही नाही व्हयी ते डुबुकवडासनी मसालानी भाजी करी टाक, उकाव!"!
व्हवा सैपाक ले लागी ग्यात का, मंग म्हतारी बागेच वावर मा चक्कर टाके. साल्दारास्ना पगारपाणी तिन्हाच हाथामा व्हतं.
४वाजनात का म्हतारी आंगन मा यी बठे. वाटवरन्या आयाबायास्ले बलाये इकडनं तिकडनं चावळाले.
"व धोंडी! तुले समजनं का?”
"हा बोल वं माडी! काय व्हयनं ! आज काय खबरबात? " अशी सुरुवात व्हयनी का समजी लेवान आते दिवेलागणी व्हयीस्तोवर म्हतारी काय उठाउ नई!
परोनदीन नी गोट शे! धल्लीनी चाभर चाभर सुरु व्हयनी.
“वं बहिन तुले काय सांगु! भलता उप्पात मांडेल शे या मोबाईलनी! मांगल्या महिन्यामा लगिनले गयथु. तथानी गंमत सांगस तुले. नवरदेव पारवरथुन ऊना,लगिन लागं, हार टाकायी ग्यात ! नवरदेव नवरीले होमना जोडे बठाडेल व्हतं. तर ती नवरी खाली मुंडी घाले आन हासे. मी म्हंत,काय चांगलं वळण लावेल शे पोरले मायबापनी! वर मान करीसन बघत बी नाई हाई पोर! नैत तिना जोडे बठेल ती सांडोरी! त्या झिपाट्या, त्या बाल बठ्ठा उंद्री लागेल आन त्या कपडा!नुसता नखराच देखी ल्या! चवनीन ढवनी सोंगाडी! मी धीरेच मना व्हवुना कान मा बोलनु. दख व इजु, आसं वळण जोयजे पोरीस्ले. मन्हा आबाना करता अशी पोरगी जोयजे, नै का? व्हवु तोंडले पदर लावीसन धीरेच माले बोलनी. म्हने "नई व आत्याबाई, ती त्या मोबाईल मा दखी राह्यनी,त्या व्हॉटस अप का काय म्हंतस ना त्यामां.
हात्तं मरो, काय जमाना येयेल शे! आसा बठ्ठा लोके चगी जायेल शेतस त्या डबडाना पायरे! इतला इतला पोरे आखो गांxxxx धुवानी अक्कल नै न त्या बी मोबाईल मां बोटे घाल्तस! त्या मन्हा नात नातु बी दिनभर आथा तथा कुत्र्यानं गत पयतस आन संध्याकायले घर येताबरोबर ते डबडं हातमां! एकनं तोंड इबाक, एकनं तिबाक.ना घरमां काई काम, ना अभ्यास, ना येरोनेर संगे काही बोलनं ! बस्स आख्खी रातभर त्या मोबाईल टिभलतस! त्या पोराटोरास्लेच काय म्हनावं! त्या आम्हन्या नटमोगऱ्या शिकी जायेल शेतस आते! काम मा ध्यान नई शे.मोबाईलमा टुकटुक व्हयनं का लगेच घेवाले पयतस! कालदीन तं आख्खा कुकर शिट्ट्या फुकी फुकीसन काया पडी ग्या.पण एकन बी ध्यान नई व्हतं. मंग वरजनु,"कथा शिलगन्यात ठिगळ गोमाश्या?ग्यास इझाडी द्या ना! कान शेतस का सुपडां?चवन्यान ढवन्या…!” मंग दखं त धाकली कानमा त्या मोबाईलन्या काड्या घालीसन आरामशीर बठेल शे. घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा!
इबाक धल्लीनं चावयनं व्हयनं. अन तिबाक धाकली व्हवु ने आंडेर ले बलाई लिधं. खुसफुस व्हयनं .येरोनेर नी डोयाना इशारा किधा आणि आंडेर म्हतारीना जोडे जाई बठनी!
“आज्जी, वं आज्जी!”
“काय शे वं? “
“हाई दख ना! मी तुले एक मजा दाखाडस! “
“काय दाखाडी राह्यनी?”
“हाई दख! आते मी तुले हाई मोबाईल कसा वापराना ते शिकाडी देस!”
हावो! आते माले काय करनं शे शिकीसन? आरध्या गवर्या ग्या मन्ह्या मसनवटीमां!
आज्जी! आवं तुले हाई उनं ना तं तुले आत्या बी दिखी यामा. परोंदिनच मी हाई व्हाटस अप टाकेल शे. आते तु तिन्हा संग बात बी करु शकशी.
आंडेरनं नाव काढता बरोबर म्हतारी ना चेहरा खुलना.
"काय सांगी राह्यनी? माले तर काही समजी नही राह्यनं! मरो काय काय नविन टेकनिक यी काय सान्गता येत नै!"
“दम धर,मी शिकाडस तुले! आते दख हाई आठे आस सापना गत बोटे फिरावा ना कि तो मोबाईल उघडी जास.“
धल्ली: आह्या माय वं! खोलनं पडस का हाई डबडाले बी?
नातः हावो मंग त्याले बी कुलुप ऱ्हास!
धल्ली: आस बी ऱ्हास का? तुन्हा मायना तोंडले नै का व काई आस काही कुलुप लावता यी?
नातः आज्जी तु आथा द्ख ना! हाई द्ख आते असा बोट फिरावना का हाई पडदा पडस. मग हाई कोपराले चौकोन दिखी राह्यनात का तुले?
धल्ली: हा वं माय, दिखी राह्यनात ना!
नातः त्याले बोट लाव बरं!
धल्ली: हाव ह्ये लावनं बोट. हाई काय उनं आते?
नातः आज्जी तुले ए बी सी डी येस ना?मंग आठे काय शे? D ते डाटा कनेक्शन र्हास. त्याले बोट लाव.आते हाई खुली गय विंटरनेट!
धल्ली; वं मन्ही माय वं! याले म्हंतस का ते विंटरनेट,फिंटर्नेट ...!
नातः नई ना वं आज्जी! आखो शे...
धल्ली: हा वं माय.तुच राह्येल व्हती माले शिकाडानी आते.खान तशी खापरी,नी माय तशी छोकरी!
नातः तु दख त खर गंमत. मंग जे काय यी ना त्याले ok म्हनानं म्हन्जे हाई ok लिखेल शे ना त्याले बोट लावानं .व्हयनं? आते हाई हिरवा फोन दिखी राह्यना का तुले? हाई व्हाटसआप र्हास....
धल्ली: हा वं माय!
नातः त्याले बोट लाव. बस्स व्हई गय सुरु.
धल्ली: हा लावना बोट, आखो?
नातःमंग आते तुले आत्याना फ़ोटो दिखस का?
धल्ली: वं माय वं! काय लक्ष्मी ना गत दिखी राह्यनी मन्ही पोर!
नातः आते हाई दखस का मराठी "अ आ ई.तठे त्या अक्षर टाईप कराना. तुले थोडी प्रेकटीस करनी पडी. पण यी जाई! टाईप कर बर आठे!
धल्ली: काय टाईप करानं? आवाज बी यी का तिन्हा याम्हां?
नातः हा आवाज बी येस ना! काय बी टाईप कर! पह्यले तिले सांगजो बरं तु कोन बोली राह्यनी ते.
धल्ली: बर्र." को न? अ ल की शे का. मी तु न ही मा य बो ली रा ह नु आ था ई न!
नातः व्वा व्वा आज्जी! तुले त एका झटका मा यी गय!
धल्ली: पन मंग माले कसं समजी की ती बी तिकडुन बठेल शे हाटस अप वर!
नातः आव आज्जी,आत्या जव्हय यी तव्हय ती तथाईन मेसेज टाकी दी ना! ती बग उनी आनलाईन! हाई तिन्ह नाव ना खाले लिखेल शे ना ते वाची ले विन्ग्लीश मा!
बास्स, त्या दिनथीन धल्लीनी शिकवनी सुरु व्हयनी.
धल्ली: काय मस्त शे व हाई डबडं! मी उगाच त्याले गाया देउ पह्यले. आते तं मी रोज आंडेर ना संगे गप्पा मारु!
नातः आज्जी,इतलच नै शे. मी तुले गेम बी शिकाडस दख! हाई शे 'सबवे सर्फ' गेम!
धल्ली: माले फक्त सर्फ नी पावडर म्हाईत शे वं बहिन!
नातः आवं आज्जी हाई रेस ना गेम र्हास! हाई दख.हाई आगगाडीना रुय शेतस ना, हाई पोरगा शे ना तो दख आगगाडीनावर काहीतरी चिंखडी राह्यना ब्रश लिसन. म्हणुन त्याना मांगे हाऊ पोलीस शिपाई लागस. आते त्या पोर्याना वर तु बोट लावं का तो जीव खायीसन पयस. मधे मधे सोनान्या नाणां पडेल शेतस त्या बी गोया करस. हा फक्त एक ध्यानमां रखजो का त्या पोर्यानी टक्कर नई व्हयनी पायजे आगगाडीना डबाले. हाई आसा मोबाईलना वर बोटे फिरावा का तो आगगाडीना वर चढीसन पयस. तठे बी सोनाना नाणां रखेल शेतस दख! बस आपनले जादा से जादा हाई सोनाना नाणा गोया करना शेत.
हाई आठे नात धल्लीले शिकाडी राह्यंथी आन तठे सैपाकघरमां येरोनेरना हातवर टाया पडी राह्यंथा. ह्ये आस व्हयन नाईकभाऊले वाडा भ्याये, नि घरनी बाई बाहेर पये”
आते धल्ली रोज सकाय सकाय उठनी का खाटवर बठस. उसशीना खाले रखेल मोबाईल काढस. रोज आंडेर ना संगे बात करस. नेट पॅक संपना का एक शंभर नि नोट आणि एक पन्नासनी नोट देस नातुले. मंग नातु १४० ना नेट पैक रिचार्ज मारी येस आणि १० नी नोट नातु ना खिसामा जास. एकच व्हयनं धाकली व्हवुले तिन्हा मोबाईल कुर्बान करना पडी ग्या थोडा दिन. पन त्यान्हा काय फरक नै पडाउ.ती गंज लाडका दिव्वा शे तिन्ह नवर्याना. भेटी जाई तिले बी नवा मोबाईल.
आते रोज सकाये सकाये चौधरीनना आंगणमां शांती र्हास आन बठ्ठ्या "चव नै न ढव नैन सोंगाड्या" बी निवांत र्हातस.
__xxx_
आर्या, मस्त! कॉमेडी
आर्या, मस्त! कॉमेडी कट्टामध्ये वाचलं होतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान! याला म्हणतात
छान!
याला म्हणतात तंत्रज्ञानाचा सदुपयोग!
वाचले ! बरेच समजले !
वाचले ! बरेच समजले !
मस्त.. सावकाश वाचल.
मस्त..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सावकाश वाचल.
मजा आली वाचायला.. संदर्भाने
मजा आली वाचायला.. संदर्भाने अर्थ कळत गेला !
समजत नाहीये भाषा. पण प्रयत्न
समजत नाहीये भाषा. पण प्रयत्न केला..
पुढ्ला अहिरानी साहित्य
पुढ्ला अहिरानी साहित्य सम्मेलनमा तुम्हनी हाजरी पक्की व्है गई आते. सम्मेलनना तहहयात आयोजक भगवान मामाले सांगी ठेवस मी, का हाऊ आर्याबईन नवीन अहिरानी साहित्तिक शे. हिले जरूर बलाडजो.
त्यातल्या त्यात काही कठीण
त्यातल्या त्यात काही कठीण शब्दांचे अर्थ :
वटका = वटवट
व्हऊ = बहू = सून (अनेकवचन व्हवा)
धल्ली/धड्ली = म्हातारी (हे आई या अर्थी आदरार्थी आहे. धड्ला = म्हातारा.)
आत्या = सासू.
चिंखाडि = चिंखडणे = लिहिणे. चिरखडणे.
आंडेर = मुलगी (गर्ल नव्हे. डॉटर) आंडोर = मुलगा.
मजा आली वाचायला. हळू हळू
मजा आली वाचायला. हळू हळू संदर्भाने अर्थ लावत वाचली.
काही ओ कि ठो कळली नाही.
काही ओ कि ठो कळली नाही. मैत्रिण आहेस म्हणुन तरी सुद्धा नेटाने वाचण्याचा प्रयत्न केला, पण छे च .....! कळतच नाही म्हटल्यावर संपुर्ण वाचायचा उत्साहच नाही राहिला.
आता सगळे म्हणताहेत म्हणजे छानच असणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनिमाऊ +1
मनिमाऊ +1
काही काही शब्द कठीण वाटले पण
काही काही शब्द कठीण वाटले पण पूर्ण स्टोरी कळली. छान लिहिलंस आर्या.
हाहाहा मस्त लिहिलंय आर्यातै
हाहाहा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मजा आली वाचायला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलंय आर्यातै
मला अहिराणी बोलता येत नाही, पण वडलांचं मूळ गाव मालेगाव असल्याने तो बाज माहितीये भाषेचा... भारीये कथा
काय बाज आहे ह्या भाषेचा..
काय बाज आहे ह्या भाषेचा.. आहाहा. पहिल्यांदा एकेक शब्दं लावत वाचावी लागली. मग पुन्हा एकदा धडक्यात वाचली.. फक्तं भाषेसाठी.
खूप झकास आहे हा अनुभव
सावकाश वाचल...थोड थोड समजल..
सावकाश वाचल...थोड थोड समजल..
एक नंबर आहे हे! प्रत्यक्ष
एक नंबर आहे हे!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
प्रत्यक्ष कथानकापेक्षाही भाषेचा जो बाज, ठसका पकडलाय तो प्रचंड आवडला!
आजवर मी अहिराणी कधीच प्रत्यक्ष ऐकलेली नाही. त्यामुळे दाद म्हणाली तसं हे पहिल्या वाचनात १०%च कळलं. पण परतपरत वाचल्यावर काय मजा आली!!
भारी !! एकदम ठसकेबाज!! हाई
भारी !! एकदम ठसकेबाज!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हाई पोरगा शे ना तो दख आगगाडीनावर काहीतरी चिंखडी राह्यना ब्रश लिसन. म्हणुन त्याना मांगे हाऊ पोलीस शिपाई लागस>> सबवे सर्फर
धन्यवाद दिमा, फोड करून सांगितल्यामुळे लगेच समजली भाषा..
अश्विनी,साती, मुक्तेश्वर,
अश्विनी,साती, मुक्तेश्वर, अंकू , दिनेशदा, कापोचे, पियु, दिमा, मनी, हर्षल, स्वाती, अंजु , सृ,मॅगी, दाद, प्रीति , मॅगी....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद!
दिमा अहो काय चेष्टा करताय माझी …. एक कथा काय लिहून आली मासिकात तुम्ही साहित्यिक वै फार मोठी उपाधी दिलीत.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
शब्दांचे अर्थ द्यायचे लक्षातच राहिले नाही माझ्या. थॅन्क्स!
लले, तुझ्यामुळेच ही संधी उपलब्ध झाली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि थॅन्क्स टु मायबोली! इथे आल्यावरच आपापल्या 'बोली भाषेचे' महत्व समजले.
सहीच. आम्हना गावना बाजुलेच
सहीच.
आम्हना गावना बाजुलेच घडेल दिखी र्हायना हाई बठ्ठ. वाचाले मजा उनी.
चेटाडा तो मोबाईल तथा नी जपा भो गुच्चुप.
बॉन्ड्भौ... कसाले चेताडाना
बॉन्ड्भौ...
कसाले चेताडाना मोबाईल? चान्गल काम व्हयी राह्यन ना... ![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
वाचली, सावकाश. संदर्भाने अर्थ
वाचली, सावकाश. संदर्भाने अर्थ लागला. कधी ऐकली, वाचली नाहीये अहीराणी. गुजराथीच्या जवळ जाणारी वाटली.
नयना, तु आणि जेम्स जे काही
नयना, तु आणि जेम्स जे काही बोललात ते तरी सांग. काही सुद्धा कळालं नाही.
मने, शब्दान्चे अपभ्रन्श ओळख
मने, शब्दान्चे अपभ्रन्श ओळख ग!
<< जेम्स बॉन्ड | 19 January, 2016 - 12:42
सहीच.
आम्हना गावना बाजुलेच घडेल दिखी र्हायना हाई बठ्ठ. वाचाले मजा उनी.
चेटाडा तो मोबाईल तथा नी जपा भो गुच्चुप.<<
आमच्या गावाच्या बाजुलाच घडलेले दिसतय हे सगळ. वाचायला मजा आली
पेटवा तो मोबाईल आणि झोपा ब्वॉ गुपचुप..
असा शब्दशः अर्थ!
दिखी राह्यन- दिसुन राह्यल- दिसतय. अहिराणी/ वर्हाडीत कित्येकदा हिन्दीसारखे दोन-दोन क्रियापदे आढळतात. उदा. हायी(हे) करी टाक- हे करुन टाक- हे कर. देउन टाक, काय करी राह्यनी- काय करतेस( काय करत आहेस)
बठ्ठ- सगळ
चेताडा- चेतवणे- पेटवणे
जपा- झोपा ( शब्द उच्चारतांना शब्दातल्या वेगळ्या-वेगळ्या अक्षरांवर जोर दिल्यास अपभ्रंश होतो हे माझे मत!)
<<मी_आर्या | 19 January, 2016 - 13:06
बॉन्ड्भौ... हाहा कसाले चेताडाना मोबाईल? चान्गल काम व्हयी राह्यन ना..<<
कसाले- कशाला
चेताडाना- पेटवायचा
व्हयी राह्यन- होत आहे, होउन राहिले ना!
मस्तच्च्च्च्च तै! छान
मस्तच्च्च्च्च तै! छान लिहिलिये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)