Submitted by सुप्रिया जाधव. on 16 January, 2016 - 12:26
टाळता येतात झालेल्या चुका
एवढा निष्कर्ष काढूयात का
वर्दळीचा एक रस्ता बोलका
आतल्या अंगास वळताना मुका
शेव पदराचा उडू दे मोकळा
रोख वार्याचा कळू दे नेमका
झेप पृथ्वीची पडावी तोकड़ी
अन नभाचा प्रश्न हा की का झुका ?
चेहर्यामागील त्याचा चेहरा
ओळखीचा वाटतो नाहीचका !
चंद्रभागेच्या तिरावर घोळका
विठ्ठलावाचून वाटे पोरका
सुप्रिया
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>र्दळीचा एक रस्ता
>>>र्दळीचा एक रस्ता वाहता
आतल्या अंगास वळताना मुका
शेव पदराचा उडू दे मोकळा
रोख वार्याचा कळू दे नेमका
चारचौघाच्यांत बोले मोजका
लेखणी धरताच होतो बोलका
झेप पृथ्वीची पडावी तोकड़ी
अन नभाचा प्रश्न हा की का झुका ?<<<
सुरेख शेर!
मतल्यात जमीन प्रस्थापित झालेली नाही 'का' ही रदीफ आहे की 'काफियाचा' भाग हे स्पष्ट व्हायला हवे. त्यातही अपवाद असतातच. भटसाहेबांच्या 'अजून गा रे, अजून गा रे, अजून काही' मध्ये त्याचे उदाहरण सापडते. पण तुम्ही ते हेतूपुरस्पर केले आहेत की कसे हे स्पष्ट झाले नाही. ह्या गझलेतील वर उद्धृत केलेले शेर उत्तम! शुभेच्छा!
वाहवा!! खूपच आवडली!!
वाहवा!!
खूपच आवडली!!
वाह सुप्रिया ... बोलका ,
वाह सुप्रिया ...
बोलका , पोरका ...हे फारच आवडले ...
वा .छान! वर्दळीचा एक रस्ता
वा .छान!
वर्दळीचा एक रस्ता वाहता
आतल्या अंगास वळताना मुका
चारचौघाच्यांत बोले मोजका
लेखणी धरताच होतो बोलका
हे खूप आवडले
मनःपूर्वक धन्यवाद बेफिजी,
मनःपूर्वक धन्यवाद बेफिजी,
क्षमस्व ! आधीचा प्रतिसाद संपादित करीत आहे.
खरेतर काही गझलकारांच्या गझलेत अश्याप्रकारै शेर आढळले होते ते लक्षात असल्याने मी ही हा प्रयोग करून पाहण्याचे धाडस माझ्या नकळत केले असावे परन्तु
मी माझ्या भूमिकेबद्दल ठाम नव्हते मात्र शेरातील सुलभतेच्या दृष्टिकोनातून ही सूट घ्यावी या मतावर यावेसे वाटत आहे .
चु भू दे घे
पुनश्च धन्यवाद !
सुप्रिया
सगळ्यांचे आभार !
सगळ्यांचे आभार !